Tuesday, 27 February 2024

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

 धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

 

            मुंबईदि. 26 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्तनोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी 20 हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज काढला केला आहे.

            या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान फक्त पणन हंगाम सन 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील. खरीप पणन हंगाम सन 2023-24 मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे असल्याने पणन हंगाम सन 2023-24 साठी धानभरडधान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसारच नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.

            हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे.  किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोदंणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पहाणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील. शेतकऱ्यांना (धान विक्री केली असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा. प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही. ई-पीक पहाणी ॲपद्वारे संकलीत माहितीच्या आधारे सात बारा उताऱ्यावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोस्ताहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल. एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर अनुदान देय राहील.

00000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ./

कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

 

            मुंबई दि. 26 : शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा त्याचे राहणीमान सुधारण्यासाठी विभागामार्फत जे काही बदल करता येतील ते कृषी विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            मंत्रालयामध्ये किसान संघ प्रतिनिधींच्या निवेदनासंदर्भात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर (दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे), सहसचिव गणेश पाटील, किसान संघाचे चंदन पाटील, बळीराम सोळुंके, राहुल राठी आणि विविध कृषी विद्यापीठाचे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले, कृषी विभागाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्या शेतकरी मासिकाद्वारे विविध कृषी योजनांची आणि आधुनिक पद्धतीच्या शेती तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी विभागामार्फत हे मासिक सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

               नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे तसेच त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोकणातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.

               यावेळी किसान संघ प्रतिनिधींच्या निवेदनातील 32 विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात कृषी विभागांशी संबंधित विषयाबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच पणन, कामगार, उद्योग आणि ऊर्जा विभागांशी संबंधित विषयांवर त्या विभागांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले

हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा

 हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची  सुविधा

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते २७ जिल्ह्यांतील हिमोफिलिया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन

आता राज्यातील  सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे केअर सेंटर

 

            मुंबईदि. २६ :- हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. मात्र आता नव्याने २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा मोफत उपलब्ध झाली असून रुग्णांना दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहेअसे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी आज केले. 

               हिमोफिलिया रुग्णांना रक्त गोठविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे आज (दि. २६ फेब्रुवारी) आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

            या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावर आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमारसंचालक डॉ. नितीन अंबाडेकरसहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रेसहसंचालक डॉ. विजय बाविस्कर उपस्थित होते. तर  सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीनवीन हिमोफिलिया सेंटर्सचे अधिकारी कर्मचारीरुग्ण दूरदृष्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.

            कार्यक्रम प्रसंगी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधला. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ  उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. म्हैसकर यांनी या उपक्रमाविषयी महिती दिली.

            हिमोफिलिया डे केअर सेंटर या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले,  सेंटरच्या बाहेर संपूर्ण तपशीलवार माहिती असणारा फलक लावण्यात यावा.  याबाबत समाज माध्यमे तसेच प्रसारमाध्यमांमधून जनजागृती करावी. सेंटरमधील औषध साठ्याची  उपलब्धतेनुसार ताबडतोब मागणी नोंदवावी.  या ठिकाणी औषधांचा तुटवडा कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावी.

            राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून हिमोफिलिया रुग्णांसाठी एकूण ९ हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. हिमोफिलिया आजाराच्या रुग्णांमध्ये रक्तातील रक्त गोठविणाऱ्या फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे स्नायूसांध्यांमध्येदातामधूननाकपुड्यातून तसेच मेंदूत रक्तस्त्राव होतो. फॅक्टरच्या कमतरतेच्या तिव्रतेमुळे वारंवार रक्तस्त्राव होऊ शकतो. ही फॅक्टर्स इतर औषधांच्या तुलनेने महागडी आहेत. रक्तस्त्राव होत असलेल्या परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतोही बाब लक्षात घेऊन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले फॅक्टर्स सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार उर्वरित सर्व जिल्ह्यांत नवीन २७ हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत.

            हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूत्राच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे ४,५०० रुग्ण आहेत.

            रायगडपालघरधुळेबीडपुणेसोलापूरनंदुरबारकोल्हापूरजळगांवसिंधुदुर्गरत्नागिरीजालनापरभणीसांगलीहिंगोलीबुलढाणानांदेडलातुरधाराशीवअकोलावाशिमयवतमाळवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोली या जिल्ह्यांत नवीन हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स कार्यान्वित झाल्यामुळे रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच मोफत व वेळेत उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील रुग्णांना याचा लाभ होणार असून सहज उपचार मिळणार आहे.

००००

बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे

 बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीय

नमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

·       मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीत होणाऱ्या

विविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा

            मुंबईदि. 26 :- पुणेसातारासांगलीकोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगारस्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठीकार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बारामती येथे होणाऱ्या विभागास्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकतानाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तापोलीस महासंचालक रश्मी शुक्लानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयराज्य नाविन्यता व कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरीपुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवाररोजगार आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवारमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीपुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरविविध जिल्ह्यांचे व विभागांचे क्षेत्रीय अधिकारीबारामती येथील स्थानिक अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीबारामतीत २ मार्चला नमो महारोजगार मेळाव्याबरोबरच बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटनपोलिसांसाठीच्या घरांचे लोकार्पणपोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पणसीसीटीव्ही प्रकल्पाचा आरंभअतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटनबारामती बसस्थानकाचे लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारकआद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या ठिकाणीही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय महसूल आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागउच्च व तंत्रशिक्षण विभागएसटी महामंडळनगरपालिका आदी संस्थांनी या सर्व कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीबारामती येथे २ मार्च रोजी एकदिवसीय नमो महारोजगार मेळावा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्रइतर विभागस्तरीय मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता बारामती येथील पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आता २ आणि ३ मार्च असा दोन दिवस आयोजित करण्यात यावा. मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. मेळाव्याकरिता बंदिस्त दालनविविध स्टॉल्सपिण्याचे पाणीकार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या सुविधावाहनतळअल्पोपहारबैठक व्यवस्थासीसीटीव्हीएलईडी डिस्प्लेजनरेटर आदी सुविधांची उत्तम व्यवस्था करावी. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छुक दहावीबारावीआय.टी.आय.पदविकापदवीधरपदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

            मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी आणि औद्योगिक संस्थांनी आजच नोंदणी करावी. या मेळाव्यामध्ये युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी (for candidate registration) https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी (For Employer registration)                         https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेअशी माहितीही या बैठकीत देण्यात आली.

---------०००००---------

लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात १ मार्च पर्यंत चर्मवस्तु प्रदर्शनाचे आयोजन लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार

 लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात

१ मार्च पर्यंत चर्मवस्तु प्रदर्शनाचे आयोजन

लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार

- मुख्य सचिव नितीन करीर

            मुंबई‍‍दि. २६ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळणार असल्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सांगितले.

            लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणमंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. करीर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

                या कार्यक्रमास आमदार सरोज आहिरेसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेकोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकरसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभियेचर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर उपस्थित होते.

            श्री. करीर म्हणालेमहामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

            सचिव श्री.भांगे म्हणालेसामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच भाग म्हणून आज राज्यातील 25 हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. गजभिये म्हणालेचर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी लिडकॉम नेहमीच पुढाकार घेते. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार आहे. राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी लिडकॉमच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

                कोल्हापूरी चपलांना जी.आय. नामाकंन मिळाले आहे. महामंडळाच्या कोल्हापूरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचे आज अनावरण करण्यात आले. देवनार येथे लेदर पार्कबेसलाईन सर्वेक्षण करण्यासाठी सीएलआरआय (CLRI) चेन्नई यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच महामंडळाच्या नवीन लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एम.सी.ए.डी. मार्फत २५ हजार विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पिता राणे यांनी केले. लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

*****

लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात १ मार्च पर्यंत चर्मवस्तु प्रदर्शनाचे आयोजन लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार

 लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात

१ मार्च पर्यंत चर्मवस्तु प्रदर्शनाचे आयोजन

लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार

- मुख्य सचिव नितीन करीर

            मुंबई‍‍दि. २६ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळणार असल्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सांगितले.

            लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्रिमूर्ती प्रांगणमंत्रालय मुंबई येथे आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. करीर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

                या कार्यक्रमास आमदार सरोज आहिरेसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेकोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकरसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभियेचर्मकार महासंघाचे अध्यक्ष संजय खामकर उपस्थित होते.

            श्री. करीर म्हणालेमहामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

            सचिव श्री.भांगे म्हणालेसामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचाच भाग म्हणून आज राज्यातील 25 हजार उमेदवारांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजना राबविल्या जात आहेत.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. गजभिये म्हणालेचर्मोद्योग व्यवसायवाढीसाठी लिडकॉम नेहमीच पुढाकार घेते. रायगडमध्ये मेगा लेदर क्लस्टर पार्क व देवनार येथे लेदर पार्क उभारण्यात येणार आहे. राज्यात क्लस्टर धोरण असावे यासाठी लिडकॉमच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

                कोल्हापूरी चपलांना जी.आय. नामाकंन मिळाले आहे. महामंडळाच्या कोल्हापूरी चपलांकरिता ब्लॉक चैन अंतर्गत क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचे आज अनावरण करण्यात आले. देवनार येथे लेदर पार्कबेसलाईन सर्वेक्षण करण्यासाठी सीएलआरआय (CLRI) चेन्नई यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच महामंडळाच्या नवीन लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एम.सी.ए.डी. मार्फत २५ हजार विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पिता राणे यांनी केले. लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्मवस्तु प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा -

 औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

कृती आराखडा तयार करावा

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबईदि. 26 : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटना विषयी उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस देविदास गोरेसंचालकऔद्यागिक सुरक्षा विभागमुंबईडॉ अविनाश ढाकणे सदस्य सचिवमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळशशिकांत बोराटेपोलीस उपायुक्तपुणे शहरप्रदीप जांभडे पाटीलअति आयुक्तपिंपरी-चिंचवड मनपासंदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवडरमेश चव्हाणमुख्य कार्यकारी अधिकारीजि.प पुणे ,कैलास केंद्रे मुख्याधिकारीआळंदी नगर परिषदसंतोष वारीससंचालक फायर ब्रिगेड सेवा महाराष्ट्रकळसकर उपायुक्त परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवडपर्यावरण तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

            औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्यामहानगर पालिकाऔद्योगिक सुरक्षागृहपर्यावरण विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या धोकादायक पदार्थांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त रसायन साठा ठेऊन होणाऱ्या दुर्घटनावर काही प्रमाणात बंधन आणणे शक्य होईल, तसेच या रसायनांचा मर्यादित साठा व आवश्यक तो योग्य वापर होत असल्याबाबत खात्री करता येईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने उद्योगांमध्ये अंतर्गत भागात सी.सी.टी.व्ही बसवावेतउद्योगांपर्यंत जाणारे रस्ते अग्निशमन यंत्रणा पोहचेल असे असावेत. ग्रामीण भागासाठी लहान अग्निशमन यंत्रणा खरेदी कराव्यात,लहान अग्निशमन केंद्रे स्थापन करावीत. सर्व जिल्ह्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन कार्य प्रणाली संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

            उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या१०८ रुग्णवाहिका धर्तीवर अग्निशमन यंत्रणा उभी करण्याबाबत आराखडा तयार करावा. कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात यावे. सुरक्षेबाबत महिला कामगारांमध्ये जनजागृती करावी. महिला बचत गटही अनेक प्रकारचे  उत्पादन घेत असतात. त्यांच्यामध्येही जनजागृती करावी. मोठ्या गृहनिर्माण संस्थामोठे उद्योग यांनी आपल्या परिसरासाठी अग्नी शमन यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या यंत्रणांचा आपत्कालीन परिस्थिती मध्ये नक्की  फायदा होऊ शकतो. राज्यातील असुरक्षित औद्योगिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून बेकायदेशीर कारखान्यांची माहिती संकलित होईल. यामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग कोणत्या क्षेत्रात जास्त आहेत. तसेच कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते याची परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणातून तयार होईल. त्याचा फायदा कृती आराखडा तयार करता होणार आहे. वाढत्या शहरांमध्ये तसेच विकास प्राधिकरणांमध्ये उद्योगांच्या नियमनासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही समावेश कृती आराखड्यामध्ये असावा.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्याप्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये  महिला कामगारांच्या लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावासर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडीट करावेसर्व  कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावाअपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावेअपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी. अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावीअशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

------

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Featured post

Lakshvedhi