Saturday, 24 February 2024

सन 2020, 2021 व 2022 चे कृषी पुरस्कार जाहीर राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान - धनंजय मुंडे पुरस्कारांच्या रक्कमेत चार पटीने वाढ

 सन 20202021 व 2022 चे कृषी पुरस्कार जाहीर

राज्यातील शेतीनिष्ठ शेतकरी व संस्थांचा होणार सन्मान

- धनंजय मुंडे

पुरस्कारांच्या रक्कमेत चार पटीने वाढ

 

            मुंबई़ दि. 23 : सन 20202021 व 2022 करिता कृषी विभागामार्फत देण्यात येणारे शेतकरी व शेतीशी संबंधित संस्था यांचा सन्मान करणाऱ्या शासकीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्य शासनाच्या कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व तत्सम संस्थांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारवसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारजिजामाता कृषिभूषण पुरस्कारकृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कारवसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कारयुवा शेतकरी पुरस्कारउद्यान पंडित पुरस्कारवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी व सर्वसाधारण गट)पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार (मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

            सन 2020 पासून कोरोनाच्या संकटाच्या काळात या पुरस्कारांच्या वितरणात खंड पडला होता. दरम्यान धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून या तीनही वर्षातील कृषी विभागाच्या पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत ते आग्रही होते. त्यानुसार सन 20202021 व 2022 मधील पुरस्कारांची विभागनिहाय घोषणा करण्यात आली आहे.

            कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांच्या सोबतीने प्रोत्साहनपर रक्कम दिली जातेत्या रकमेतही मंत्री श्री.मुंडे यांनी नुकतीच तब्बल चार पटीने वाढ केली आहे.

            दरम्यान लवकरच या पुरस्कारांचे शासन स्तरावर कार्यक्रम आयोजित करून वितरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.


००००

प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले

 प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            ठाणे, दि.23 (जिमाका) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी श्री अयोध्या धाम मधील रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिर बांधण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. समस्त विश्व गायत्री परिवार राष्ट्रात सनातन संस्कृतीचा प्रसार करून विश्व बंधुतेचा संदेश देत आहे. अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे आयोजित अश्वमेध महायज्ञ ज्ञान मंच येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भावना व्यक्त केली.


            यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.


     अश्वमेध महायज्ञ आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे आभार मानले. यासाठी देवभूमी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे सांगितले. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे मन मोठे असले पाहिजे, असे सांगितले. कारण मन मोठे झाले की, सर्व संकटे आपोआप दूर होतात. या विचाराने केलेले कार्य समाज आणि राष्ट्राच्या विकासाकडे घेऊन जाते. अखिल विश्व गायत्री परिवारातील प्रत्येक सदस्य याच विचाराने कार्य करीत असून जगाला विश्वबंधुतेचा संदेश देत आहे.


      अश्वमेध महायज्ञाच्या उपयुक्तततेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे पुण्य वाढते आणि दुर्गुण कमी होतात. प्रधानमंत्री मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक करताना ते म्हणाले की, देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने पुढे नेले आहे.


            केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राजकीय व्यक्तींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यांना अशा कार्यक्रमातून दशा आणि दिशा मिळते. राजकारण हे राज आणि नीती या दोन शब्दांपासून बनलेले आहे, ज्याचा अर्थ राज्य आणि समाजाला योग्य मार्गावर नेणे. अशा घटना ही व्यवस्था मजबूत करण्याचे काम करतात.


००००



 

Friday, 23 February 2024

दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट दीपक

 दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण

वाय चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता - अभिनेत्री

संजय पाटील यांचे 'आभाळसंग मातीचं नांदनठरले उत्कृष्ट गीत

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान

 

            मुंबईदि. 23-   सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीकलाकारांचे बहारदार  नृत्यकार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी 57 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. यावेळी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'वायया चित्रपटाने मिळविला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित वाडीकर यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले.  बाबा चित्रपटातील भूमिकेसाठी दीपक डोब्रियाल यास उत्कृष्ट अभिनेता तर मिस यू मिस्टर मधील भूमिकेसाठी मृण्मयी देशपांडे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले.

            वरळी येथील डोमएन एस सी आय येथे गुरुवारी रात्री राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रंगला. मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री  श्री.फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार ॲड. मनीषा कायंदेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरेकिरण शांतारामजब्बार पटेलसचिन पिळगावकरमहेश कोठारेमहेश मांजरेकर आदींसह चित्र नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते.

            याच पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेचमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले.

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विविध वर्गातील पुरस्कार विजेते :-

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.१ -

            वाय (अजित वाडीकर)भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.१ - वाय ( अजित वाडीकर). बाबूराव पेंटर उत्कृष्ट चित्रपट क्र.2 - मिस यु मिस्टर (श्रीम. दिपा त्रेसी). राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक क्र. 2 -मिस यु मिस्टर (समीर जोशी). मा. विनायक उत्कृष्ट चित्रपट क्र.3 -  स्माईल प्लिज (श्रीम. निशा सुजन /श्रीमसानिका गांधी). राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक क्र.3- स्माईल प्लिज ( विक्रम फडणीस).

अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट-  (ताजमाल) नियाज मुजावर.

दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट - ताजमाल ( कुलभूषण मंगळे).

दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक -समीर विद्वांस (आनंदी गोपाळ).

व्ही. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट- आनंदी गोपाळ (मंगेश कुलकर्णी).

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती -  विशबेरी ऑनलाईन सर्विसेस प्रा.लि (झॉलिवूड).

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक - अच्युत नारायण (वेगळी वाट).

उत्कृष्ट अभिनेता कै. शाहू मोडक पारितोषिक  व श्री शिवाजी गणेशन पुरस्कार -दीपक डोब्रियाल (बाबा).

उत्कृष्ट अभिनेत्री (कै.स्मिता पाटील पारितोषिक) - मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - कै.काशिनाथ घाणेकर पारितोषिक -अजित खोब्रागडे (झॉलिवूड).

 उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री कै. रंजना देशमुख पारितोषिक - अंकिता लांडे (गर्ल्स).

उत्कृष्ट विनोदी अभिनेता कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक -पार्थ भालेराव (बस्ता).

सहाय्यक अभिनेता - कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक -  रोहित फाळके (पांघरुण).

सहाय्यक अभिनेत्री - कै. शांता हुबळीकर व कै. हंसा वाडकर पारितोषिक - नंदिता पाटकर (बाबा).

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - राज्याभिषेक गीत सुभाष नकाशे (हिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वगायिका- मधुरा कुंभार (गीत- आभाळसंग मातीचं नांदन ,मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट पार्श्वगायक - सोनू निगम ( गीत- येशील तूहिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रफुल्ल - स्वप्निल (स्माइल प्लिज).

उत्कृष्ट संगीत -कै. अरुण पौडवाल पारितोषिक

 - अमितराज (हिरकणी).

            उत्कृष्ट गीते - कै.ग. दि. माडगूळकर पारितोषिक -  संजय कृष्णाजी पाटील (गीत- आभाळसंग मातीचं नांदन,हिरकणी).

उत्कृष्ट संवाद- कै.आचार्य अत्रे पारितोषिक

 इरावती कणिक (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट पटकथा-  विक्रम फडणीस,इरावती कर्णिक (स्माईल प्लिज),

सर्वोत्कृष्ट कथा - कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक -पांघरुण.

            याशिवायतांत्रिक गट आणि उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारही यावेळी देण्यात आले. यामध्येउत्कृष्ट कला दिग्दर्शन-(कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक ) - सुनील निगवेकरनिलेश वाघ (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट छायालेखन ( कै. पांडुरंग नाईक पारितोषिक) - करण बी. रावत (पांघरुण)

उत्कृष्ट संकलन- आशिष म्हात्रेश्रीमती अपूर्वा मोतीवाले (बस्ता).

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण - अनुप देव (माईघाट),

उत्कृष्ट ध्वनिसंयोजन - मंदार कमलापूरकर (त्रिज्या),

उत्कृष्ट वेशभूषा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज),

उत्कृष्ट रंगभूषा - श्रीमती. सानिका गाडगीळ (फत्तेशिकस्त)

उत्कृष्ट बालकलाकार (कै. गजानन जहागिरदार पुरस्कार)  - आर्यन मेघजी (बाबा).

            या दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

 0000

Dylisis centre,Mumbai,sindudrag

 




महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी

 महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी

 

            मुंबई, दि. २२ : बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला नामवंताच्या भेटीसोबत मुंबईकरांनी मोठा प्रतीसाद दिला आहे. जेष्ठ दिगदर्शक राजदत्तसंगीतकार श्रीधर फडकेअभिनेत्री स्मिता तांबेमनवा नाईक या मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.

            या प्रदर्शनात राज्यातील १२५ पेक्षा जास्त लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात खादीपैठणीहिमरू शालमधहस्तकलावारली पेंटिंग्जबांबूपासून तयार वस्तूकोल्हापूरी चप्पलज्वेलरी, मसाले इत्यादी दर्जेदार गोष्टीं अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध आहेत. प्रदर्शनातील एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये प्रत्यक्ष वस्तूंची निर्मिती सुद्धा पाहायला मिळते.

            याशिवाय स्वयं सहायता महिला बचत गटाच्या खाद्य पदार्थांची मेजवानीविविध प्रांतातील स्वादिष्ट व रुचकर पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल देखील या प्रदर्शनात अनुभवता येते.

            या प्रदर्शनाला आतापर्यंत हजारो मुंबईकरांनी भेटी दिल्या आहेत.

            हे प्रदर्शन २५ फेब्रुवारी पर्यंत बी के सी येथील एमएमआरडीए ग्राऊन्ड वर आहे. मुंबईकरांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी केले आहे.

0000

नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी निधीस मान्यता

 नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी

विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी निधीस मान्यता

- मंत्री अनिल पाटील

            मुंबईदि. २२ :-  नागपूर शहरात  सप्टेंबर२०२३ मध्ये  झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्यासाठी  राज्य शासनाने विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी ७१ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            या निधीस  प्रशासकीय मान्यता मिळाल्याने पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण होऊन याचा नागरिकांना लाभ मिळेलअसा विश्वास मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

            अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात नुकसानग्रस्त पायाभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या या निधीमध्ये नुकसान झालेल्या नदी नाल्यांच्या ८.४१ कि.मी. लांबीच्या  बांधकामांसाठी १६३ कोटी २३ लाख ३१ हजार आणि नादुरुस्त झालेल्या ६१.३८ कि. मी. रस्त्यांच्या दुरस्तीच्या कामासाठी ४१ कोटी  ४८ लाख ३१ हजार रुपयांचा समावेश आहे.

            नागपूर शहरात २३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबाझरी तलावनाग नदीपिवळी नदीआणि स्थानिक नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातील अनेक भागात विशेषत: अंबाझरी तलावनाग नदीजवळील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती व या भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. नागपूर महापालिका अग्निशमन दलएनडीआरएफएसडीआरएफभारतीय लष्कर आणि आपदा मित्र या बचाव पथकांनी या ठिकाणी अडकलेल्या ३४९ व्यक्तींची सुटका केली होती. अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात २ व्यक्ती आणि १४ गुरे बुडून मृत झाली होती. दोन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख प्रमाणे अनुदान मंजूर केले होते. तसेच मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई पोटी एक कोटी १२ लाख ५०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते अशी माहिती, मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/


 

महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार

 महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार

- मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर

‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ चे उद्घाटन

            मुंबईदि. २२ : महासंस्कृती महोत्सवामध्ये मर्दानी खेळ, शिववंदनासह राज्याच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

            शहीद भगतसिंग मैदानअभ्युदय नगरकाळाचौकी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने  महासंस्कृती महोत्सवाचे २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री दीपक केसरकर  बोलत होते.

            या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकरमुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव,अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कटकधोंडनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी,सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीमुंबई शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबईतील पोलीस वसाहतींचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरच एक केंद्र सुरू करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी  गिरगाव येथे पहिले काळजी केंद्र  सुरू होणार आहे.मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर बुधवारी आणि मुंबई महापालिकेत देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो असे मंत्री श्री.केसरकर म्हणाले.

            उद्घाटन समारंभानंतर 'जल्लोषया कार्यक्रमात सुशांत शेलारपूजा सावंतश्वेता खरात जुई बेंडखळेगौरी कुलकर्णीविश्वजीत बोरवणकरआनंदी जोशीकमलाकर सातपुतेअंशुमन विचारेकौस्तुभ दिवाण, पूर्वी भावे यांचा सहभाग होता.

            महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात २३ ते २६ फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. प्रदर्शन दालनामध्ये शिवकालीन शस्त्रेनाणी व हस्तलिखीतेशिवसंस्कार काव्य दालनस्वराज्य ते साम्राज्य आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रंगमंचावरील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे महाराष्ट्राची लोकधारा व लोकनृत्यशिववंदनमराठी बाणाजल्लोषसप्तरंग-हास्य व नृत्य गाण्यांचा बहारदार नजराणादशावतार कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तसेच मर्दानी खेळामध्ये मल्लखांबलेझीमपारंपारिक नृत्य कला प्रकारदेशभक्तीपर गीतेइ. चा समावेश असणार आहे. या कार्यक्रमामध्ये  स्थानिक कलावंताच्या कलेस वाव मिळणार आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/


 

वृत्त क्र. 701

Featured post

Lakshvedhi