Thursday, 22 February 2024

मुंबई शहर जिल्ह्यात 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव

 मुंबई शहर जिल्ह्यात 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सव

जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबईकरांना पाच दिवस मिळणार सांस्कृतिक मेजवानी

 

            मुंबई दि. 21 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सव 2024चे आयोजन काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले  आहे. गुरुवारदिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार असून सर्वांनी या महोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

            सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल  आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

            महोत्सवात विविध प्रदर्शन दालनेरंगमंचावरील सांस्कृतीक कार्यक्रम व मर्दानी खेळ असणार आहेत.  प्रदर्शन दालनात शिवकालीन शस्त्रेनाणी व हस्तलिखितेशिवसंस्कार काव्य दालनस्वराज्य ते साम्राज्य या आर्ट गॅलरीचा समावेश करण्यात आला आहे.

            महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात नृत्यवंदना कार्यक्रम होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 7 वाजता जल्लोष या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता लेझीम व मर्दानी खेळतर सायंकाळी 7.00 वाजता मराठी लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता मल्लखांबसायं. 5.00 वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सवसायंकाळी 7 वाजता सप्तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दशावतार या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी 7.00 वाजता शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता पारंपरिक नृत्य व मर्दानी खेळ तर सायंकाळी 7.00 वाजता मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

000

महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणारा ‘डिफेन्स एक्स्पो’

 महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणारा ‘डिफेन्स एक्स्पो’

 

            एक वेळ अशी होती कीअमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास  नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भूउपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनावर अवलंबून आहे. रशियाच्या नकारानंतर  आपल्या वैज्ञानिकांनी दूरदृष्टी दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून काही वर्षातच क्रायोजेनिक इंजिन तयार केले. तेव्हापासून भारतीय वैज्ञानिकांनी इतर देशांसमोर हात पसरण्यापेक्षा वेळोवेळी आव्हाने स्वीकारत देशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करत अंतराळ संशोधनात आज  पहिल्या पाच देशांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

            हीच स्थिती संरक्षण शस्त्रास्त्रे व साहित्य खरेदीबाबतही होती. अमेरिका शस्त्रास्त्रे निर्मिती करण्यात आणि विकण्यातही अग्रेसर आहे. याचप्रमाणेरशियाफ्रांसइस्त्राईलउत्तर व दक्षिण कोरिया हे देशही यात आघाडीवर आहेत. पण आज भारत अनेक शस्त्रास्त्रे स्वदेशी बनावटीची वापरतो. स्वदेशी तंत्रज्ञान ही संकल्पना संरक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादने तयार करणा-या  एमएसएमई देशात तयार झाल्या आहेत. आज देशात मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात १० ऑर्डंनन्स फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पी एस यू आहेत.  टाटाभारत फोर्ज, सोलारएल ॲण्ड टीमहिंद्रानिबे अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपादने तयार करीत आहेत.  

            भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणा-या सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचेआयोजन  करण्यात आले आहे. पुण्यातील  मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे हा एक्स्पो होत आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील या  प्रकारातील  हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने वायुसेनानौसेना आणि स्थलसेना या तीनही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. या एक्स्पोमध्ये १ हजारहून अधिक सूक्ष्मलघु व मध्यम उद्योगस्टार्ट-अप आणि २०,००० हुन अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन  ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतील. यात एल ॲण्ड टीमहिंद्राटाटाडीआरडीओ आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या -पीएसयु (PSUs) यासह विविध प्रतिष्ठित उद्योगातील तज्ज्ञ असतील. हा एक्स्पो महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून निश्चितच पुढे नेणारा ठरणार आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका

            भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्वाची आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे देशाच्या ४० पैकी १० संरक्षण उत्पादन आणि आयुध निर्माण करणारे कारखाने महाराष्ट्रात आहेत. राज्याची राजधानी - मुंबईही भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेले पुणेभारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही (NDA) मुख्यालय आणि सरंक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) सुद्धा याच जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पुण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय आणि  मुनिशन इंडिया लिमिटेडचे मुख्यालय सुद्धा पुण्यात आहे.  भारतीय लष्कराचे आर्मर्ड कॉर्प्स स्कूल आणि सेंटर (ACS&C) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे. लष्कराशी संबंधित  एवढ्या मोठ्या यंत्रणा एकाच राज्यात असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.


 

एक्स्पोची मुख्य उद्दिष्टे

            सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग( MSME) डिफेन्स एक्स्पो हे एक अभूतपूर्व प्रदर्शन असणार आहे.  या क्षेत्रातील नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील प्रमुख खरेदीदार म्हणजे तीनही सैन्य दल आणि विक्रेता यांच्यातील संपर्क वाढवणेमहाराष्ट्रातील डिफेन्स  एमएसएमईची तयार झालेली इकोसिस्टम अधिक बळकट करण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील खरेदीदारांसाठी अर्थपूर्ण संवाद निर्माण करणेयासोबतच व्यवसायाच्या  परस्पर फायदेशीर संधी ओळखण्यासाठी 'डायनॅमिक फोरमचीस्थापना करणेसंरक्षण उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उद्योजकतेची संस्कृती जोपासणेअत्याधुनिक उपायांच्या विकासास प्रेरणा व प्रोत्साहन देणेधोरणात्मक उपक्रम राबवून शाश्वत आणि मजबूत वाढीसाठी आवश्यक सहाय्य प्रदान करून महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राच्या विस्तारासाठी सक्रियपणे योगदान देणेमहत्त्वाच्या क्षेत्रातील एमएसएमईसाठी अनुकूल संधी निर्माण करून खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील संपर्क मजबूत करणे हे या एक्स्पोमागील महत्त्वाचे उद्देश आहेत. 

            तसेच महाराष्ट्रात डायनॅमिक एमएसएमई जाळ्यासाठी एक मजबूत आणि टिकाऊ पुरवठा साखळी फाउंडेशनची स्थापना करणेसंरक्षण उत्पादन आणि निर्यातीसाठी मार्ग मोकळा करणेशैक्षणिक-उद्योग सहकार्याच्या प्रगतीद्वारे राज्य आणि राष्ट्रासाठी एक शक्तिशाली परिसंस्था उत्प्रेरित करणे हा सुद्धा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

महाराष्ट्राचे सक्षमीकरण: एमएसएमईसंरक्षण आणि तंत्रज्ञान

            महाराष्ट्रातील स्टार्ट-अप कंपन्यांद्वारे तयार केले जाणारे काही भविष्यकालीन स्वदेशी तंत्रज्ञान हे संरक्षण तंत्रज्ञान क्रांतीचे पुढचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे राज्य या क्षेत्रात निश्चितच आघाडी घेईल यात शंका नाही. यातील महत्वाच्या बाबी अशा आहेत.

            हवाई देखरेखीसाठी ड्रोन-  पुरवठा आणि ड्रॉप डाऊनची क्षमता असलेले हे पहिले आणि एकमेव मानव-पोर्टेबल स्वायत्त ड्रोन आहे.

            व्हिजन प्रोसेसिंग सिस्टीम उत्पादन-  रणांगणाचे रिअल-टाइम चित्रण दाखवते. प्रगत इमेजिंग आणि सेन्सर तंत्रज्ञान एकत्र करतेयात दिवस आणि रात्रीचे चित्रण दाखवण्याची क्षमता आहे.

            जैव-पॉलिमर प्लॅटफॉर्म - जखमेच्या काळजीसाठी आधारित उत्पादने- हे बायोएक्टिव्ह मायक्रोफायबर जेलिंग तंत्रज्ञानावर आधारित हेमोस्टॅटिक मलमपट्टी करते.

            रोबोटिक सोल्यूशन्स- एकत्रित कार्यरत प्रणाली (युनिफाइड ऑपरेटिंग सिस्टीम) अनेक क्षेत्रांमध्ये जोडलेले रोबोट्स व्यवस्थापित करण्यात मदत करते.

            दृष्य पाळत प्रणाली- हे संरक्षण आणि एरोस्पेस संस्थांसाठी उच्च-स्तरीय इलेक्ट्रो-ऑप्टिक पाळत ठेवणारी प्रणाली आहे.

            लढाऊ शस्त्र प्रणाली - या टाक्या इंजिनसह मागील चाकांना शक्ती पुरवणारा मोटारीच्या यंत्राचा भागलढाऊ चिलखत, युद्ध भूमीवर ॲण्टीड्रोन संरक्षण प्रणालीसह एकत्रीकरणासाठी तयार केल्या आहेत.

            अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह महाराष्ट्र या एक्स्पोमध्ये आपली क्षमता सिद्ध करेल. त्याचबरोबर या प्रदर्शनात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी प्रत्येक सत्रात होणारा संवाद विद्यार्थ्यांच्या भविष्यातील कारकिर्दीला वेगळा आयाम आणि प्रेरणा देणारा ठरेल. कोण जाणे यातूनच भविष्यात काही नाविन्यपूर्ण स्टार्ट अप्स सुरु होतील.

मनीषा सावळे,

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई-32.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 21 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोट जातीतील दारिद्रय रेषेखालील  गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

        महामंडळामार्फत मांगमातंगमिनी- मादिंगमादिंग,दानखणी मांगमांग महाशीमदारीराधेमांगमांग गारुडी,मांग गोराडीमादगी व मादिगा या समाजातील गरजू लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मुंबई व राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या मार्फत विविध व्यवसायाकरिता सुविधा कर्ज योजना, कर्ज मर्यादा रक्कम ५ लाख रुपयेमहिला समृद्धी योजना कर्जमर्यादा रक्कम १.४० लाखशैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा देशाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी रक्कम ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम ४० लाख या प्रमाणे योजना सुरु करण्यात आली असून त्यानुसार जिल्हा कार्यालयात उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. या योजनांची माहिती महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

               अर्जदारांना येणाऱ्या अडीअडचणीचा विचार करून महामंडळामार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://betasladc.org ह्या संकेतस्थळावर करावेत. या कर्ज योजनांचे लाभ घेण्यासाठी अर्ज दि.२० फेब्रुवारी २०२४ ते दि.२० मार्च २०२४ या कालावधीत ऑन लाइन पध्दतीने करावेत.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

निविष्ठा सुधारणा विधेयक सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही

  निविष्ठा सुधारणा विधेयक

सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. 21 : कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            अप्रमाणितभेसळयुक्त व बनावट बियाणेकीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.

            या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरीडॉ. मनीषा कायंदेसमीर कुणावरसंजय रायमुलकर, कैलास पाटीलबाबासाहेब पाटीलदिलीप बनकर, प्रकाश आबिटकरकृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आयुक्त प्रवीण गेडामविधान भवन सहसचिव मेघना तळेकर व अधिकारी उपस्थित होते.

            या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजेत्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

            बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तूबियाणेकीटकनाशके आणि महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम या कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते.


कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी

 कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धा

 

            मुंबईदि. 21 : छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा राज्य शासनामार्फत आयोजित करण्यात येते.  यावर्षी ही स्पर्धा ठाणे येथे 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा असून स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावीअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले. 

             सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक नवनाथ फरतडेजिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्केकबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी  उपस्थित होते.

             या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची बक्षीसांची रक्कम वाढविण्यासाठी तातडीने क्रीडा विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणालेया स्पर्धेत पुरूषांचे 16 व महिलांचे 16 असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहे. खेळाडूंची निवासभोजन तसेच वाहतूकीची उत्तम व्यवस्था करावी. स्पर्धा ठिकाणी स्वच्छतापार्किंग आदींची व्यवस्थाही असावी. महिला खेळाडूंच्या बाबत सुरक्षानिवासाच्या व्यवस्थेचे विशेष लक्ष ठेवावे. ही स्पर्धा ठाणे (पश्चिम) भागातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जवळील मैदानावर होणार आहे.  स्पर्धेसाठी निधी वाढवून मिळण्याबाबत विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

               बैठकीस कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

००००

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करावा

 खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करावा

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

            मुंबईदि. 21 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे उभारण्यासाठी विद्यापीठ कार्यकारी समितीचा अहवाल सकारात्मक आहे. तसेच शासकीय जागाही उपलब्ध आहे. खानापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीमुळे सातारासांगली या भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असून उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावाअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उपकेंद्र आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसुहास बाबर आदी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू दिगंबर शिर्केकुलसचिव व्ही. एन शिंदेप्राचार्य व्ही. एम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            विद्यापीठाने खानापूर येथील उपकेंद्राचा सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणालेखानापूर येथे शासकीय गायरान जमिन उपलब्ध आहे. तसेच जलसंपदा विभागाची जमीनही आहे. आवश्यकता असल्यास जलसंपदा विभागाच्या जमिनीचाही उपयोग करता येईल. सांगली येथे तात्पुरते उपकेंद्र सुरू न करता खानापूर येथेच कायमस्वरूपी उपकेंद्र सुरू करावे. प्रस्ताव तातडीने सादर करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेण्यात येईल. तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

००००

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट..."दीपक राग"

 तानसेन दरबारात गात होता .. गाणे रंगत चालले .. संथ आलाप संपून तेजाळ काजव्यांसारखे ,वणव्यात वाऱ्याने उडणाऱ्या ठिणग्यांसारखे भेदक सूर लय तालांतून गिरक्या घेऊ लागले ... तसतसे दिल्लीच्या हिवाळ्यातले ते थंड वातावरण उबदार होऊ लागले ... अनेकांनी लपेटलेल्या आपापल्या उंची शाली सैल केल्या .. विचित्र काहीतरी घडत होते ... गायनाची तीव्रता वाढत होती तसतशी कणाकणाने उष्णता वाढत होती ... एकीकडे मनाला संमोहित करून पकडून ठेवणारे सूर तर दुसरीकडे या उष्णतेने बैचैन होणारे शरीर या घालमेलीतून सगळेजण जात असतानाच .. गायनाचा परमोच्च बिंदू आला ... जवळ कुठेतरी आगीचा लोळ उसळला आहे असे वाटले आणि अचानक महालातले तेल वात घालून ठेवलेले सगळे दिवे पेटले.. तानसेनाच्या बाजूचा किनखापी पडदा देखील पेटून धडधडा जळू लागला.. तानसेन गाणे थांबवून गलितगात्र होऊन बाजूच्या गिरदीवर कलंडला... बादशाहासहित सगळे दरबारी अवाक होऊन एक दोन क्षण पाहतच राहिले आणि नंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट..."दीपक राग" 


    तानसेनाला अनेक बक्षीस मिळाली ... चारी दिशांना कीर्ती पोहोचली... पण या गोष्टीचा आनंद एक व्यक्ती उपभोगू शकत नव्हती आणि ती म्हणजे स्वतः तानसेन ... दीपक राग गायिल्यामुळे तानसेनाच्या अंगात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती ..खरंतर ऐरागैरा दीपक रागाने भस्मच होऊन जायचा पण गुरु हरिदासांच्या कृपेने जीवावरचं निभावल पण अंगाची लाहीलाही काही थांबत नव्हती .. आणि हलाहल विष पिऊन कंठात विष राहिलेल्या महादेवाप्रमाणे तानसेनच्या कंठात त्या उष्णतेचा परिणाम होऊन सूर निघणेच कठीण झाले ... तानसेन मनातून कोसळला


   तानसेनचे गाणे थांबले... बादशाहासहित सगळे हळहळले .. यावर उपाय काय .. अनेक वैद्य हकीम झाले ..जादू मंतर झाले . मग कुणीतरी सांगितले.. अग्नीला तोड म्हणजे पाणी .. याच्या तोलामोलाच्या कुणी गायकाने मल्हार राग ऐकवला तर कदाचित याचे दुःख दूर होईल.. .. आता तानसेनाच्या तोलामोलाचा गायक सापडणार कुठे ... सगळ्या साम्राज्यात शोध सुरु झाला ..अनेक दिवस गेले आणि एक दिवस बातमी आली .. गुजरातमध्ये वडनगर गावात दोन जुळ्या मुली राहतात .दिव्य निर्मल सुरांत गातात .. त्यांचे नाव "ताना" आणि "रीरी". 


   तानसेन वडनगरला पोहोचला.. ताना-रीरीच्या घरी .. त्यांच्या घरच्यांना विनंती केली .. पण आम्ही घरंदाज आम्ही कोणासमोर गाणार नाही असा त्यांचा ठाम निश्चय .. समोर सापडलेली सुरगंगा पण अजूनही दुर्लभ ... अनेकदा विनंती केल्यावर शेवटी दोघी बहिणी गावातील देवीच्या मंदिरासमोर पडद्याआड राहून देवीसाठी गाणार आणि तानसेन पडद्याच्या पलीकडून ऐकणार असे ठरले .. 


तो दिवस उगवला .. ताना रीरी देवीसमोर मल्हार गाऊ लागल्या .. पहिला सूर कानी पडताच तानसेनाच्या कानात अमृताचे थेंबच पडले ... डोळ्यातून अश्रू वाहू लागले .. हा स्वर्गीय सूर ..आणि हे सुरांचे पावित्र्य .. वातावरण बदलू लागले .. कुंद झाले ... ढग भरून येऊ लागले .. आणि काही वेळाने आवेगाने बरसू लागले ... तानसेन पावसात आणि मल्हारच्या सुरांत मनसोक्त भिजू लागला ... अहंकार ढेकळासारखा फुटून वितळून गेला .. .. दीपक रागाने पेटलेला वणवा मल्हारच्या वर्षावाने विझला .. अंतर्बाह्य थंडावा ... 


   इकडे दिल्लीला खबर पोहोचली .. तानसेनपेक्षा चार पाऊले पुढे असणाऱ्या दोन कन्या ..दोन गायिका .. आपल्या दरबारात कशा नाहीत ... बादशहाने विनन्तीचा निरोप पाठवला .. पण "आम्ही फक्त अंबा मैया समोर गाणार दरबारात गाऊ शकत नाही" म्हणून ताना रिरिने उत्तर पाठवले ... असं कसं चालेल?.. या अकबराच्या दरबारात सगळी रत्ने पाहिजेतच .. मग बादशहाने दरखास्त सोडून हुकूम पाठवला ... तरीदेखील पुन्हा नकार ... आता बादशाहाने कैफात येऊन सैनिक पाठवले , ताना रीरीला काहीही करून घेऊन या आणि नाही आल्या तर गाव उध्वस्त करा ... 


   ताना रीरी धर्मसंकटात सापडल्या .. जावे तर मर्यादेचा भंग ..न जावे तर सगळे गाव हकनाक बळी जाणार .. शेवटी त्यांनी तो मधला मार्ग काढला ... रात्री सगळे गाव आणि घरातले लोक झोपेत असताना .. घरासमोरच्या खोल काळ्याकभिन्न विहिरीला त्यांनी आपलंसं केलं .. 


    बादशाह अपराधी भावाने अहंकाराच्या आणि लोभाच्या कैफातुन भानावर आला .. ताना रीरीचे स्मारक वड नगरला बांधण्यात आले .. तानसेन दुःखाने उन्मळून पडला .. आपल्या काही संगीतरचनांमधून त्याने ताना रीरीच्या स्मृतीला स्थान दिले ... 


   आज देखील गुजरात सरकारतर्फे ताना रिरीच्या स्मरणार्थ ताना रीरी संगीत महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील दोन लोकांना सोबत पुरस्कार दिला जातो.


   गुजराती भाषेतील लोकगीते आजही ताना रीरीची गोष्ट सांगतात .. आणि वडनगरच्या वाऱ्यात पाऊस पडत असताना मल्हारचे फिकट सूर ऐकू येतात...

Featured post

Lakshvedhi