Friday, 23 February 2024

भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन

 भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना   

आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विशेष मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्देश

 

            मुंबईदि. 22 : भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखलाआधारकार्डमतदार ओळखपत्रशिधापत्रिकाआयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका देण्याबाबत कार्यवाही करावी. या समाजातील नागरिकांना आधारकार्ड देण्याबाबत महिनाभरात प्राधान्यक्रमाने शिबिरांचे आयोजन करण्यात यावेअसे निर्देश महसूलपशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

            भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर आणि भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते. तसेच  सर्व विभागीय आयुक्तसर्व जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. सावे म्हणालेभटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना  विविध दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी विविध शासकीय विभागांमार्फत निर्देश झालेले आहेत.

            या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी प्रामुख्याने जन्म दाखलाआधारकार्डमतदार ओळखपत्रशिधापत्रिकाआयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका,  जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यांची गरज असते ते मिळताना विविध समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो.  हे टाळण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

             भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना आधार कार्ड देण्याबाबत माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) यांनी क्षेत्रिय स्तरावर सुचना दिलेल्या आहेत तसेच या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना  कळविण्यात आले आहे.

            भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना शिधापत्रिकाचे वितरण व्हावे यासाठी विशेष मोहिम राबविण्याकरिता  अन्न व नागरी पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड व सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी दिली.

००००

राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश नवजात मृत्यू कमी करण्यातही विभागाला यश बाल आरोग्य कक्षाची उल्लेखनीय कामगिरी

 राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश

नवजात मृत्यू कमी करण्यातही विभागाला यश

बाल आरोग्य कक्षाची उल्लेखनीय कामगिरी

 

            मुंबईदि. 22 : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्यात येत आहे.  या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र शासनाच्‍या २०१८ च्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जिवंत जन्मामागे १९ असा होतात्यात घट होऊन सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार तो १६ झाला  आहे.

            तसेच सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचे (एसडीजी २०३०) नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठले आहे.

            आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. त्यांनी नियमित यासाठी बैठका घेतल्या.

            राज्यातील जिल्‍हा रुग्णालय,  स्त्री  रुग्णालय  व  काही  उपजिल्‍हा रुग्णालयांत शिशु अती दक्षता विभागाची  (एसएनसीयू)ची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ५३ एसएनसीयू कक्ष स्थापन  करण्यात आले  आहेत. या ठिकाणी  बाळ  जन्मल्‍यानंतर बाळाचे वजन कमी असल्‍यासकाविळ झाली असल्‍यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्‍यास बाळाला  एसएनसीयू  कक्षामध्ये  दाखल  करुन  उपचार  केले  जातात. एसएनसीयुमध्ये  किमान  १२  ते  १६  खाटा  असून  हा  कक्ष  रेडियंट  वॉर्मरफोटोथेरपी युनिटइन्प्युजन पंपमॉनिटर्सनॉन इनवेसिव्ह व्हेंटीलेशन (सीपीएपी) यासारख्या उपकरणांनी सुसज्‍ज आहे. राज्यात माहे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४  पर्यंत  एकूण ५६ हजार ४६७  बालकांना  एसएनएसीयुमध्ये  उपचार  करण्यात आले.  त्यांपैकी  १५००  ग्रॅम पेक्षा  कमी  वजनाच्या  ५ हजार ४५९  बालकांवर  उपचार करण्यात आले.

            राज्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्‍हा रुग्णालय येथे नवजात स्थिरीकरण युनिट (एनबीएसयू) कार्यरत  आहेत. राज्यात  एकूण २०० एनबीएसयु असून येथे सौम्य आजार असलेल्‍या नवजात बालकांवर उपचार केले  जातात.  या कक्षामार्फत  रेडियंट वॉर्मरफोटोथेरपी युनिटपल्‍स ऑक्सीमीटरकांगारु मदर केअरस्‍तनपानाची लवकर सुरुवात,  ऑक्स‍िजन सलाईन,  आदी सेवा देण्यात येतात. राज्यात माहे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत एकूण २४ हजार ६३ बालकांवर उपचार करण्यात आले.

माँ ( मदर एब्सुल्युट अफेक्शन) कार्यक्रम

             स्तनपानाविषयी मातेलावडिलांना तसेच कुटुंबियांना योग्य माहिती पुरविण्यासाठी तसेच स्तनपान व शिशुपोषणास सक्षम असे वातावरण तयार करण्यासाठीचा हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमा अंतर्गत प्रचार व प्रसिध्दीस्तनदा व गरोदर मातांसाठी आशांमार्फत घेण्यात येणाऱ्या माता बैठकाआरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनपान व शिशूपोषणाचे प्रशिक्षणसनियंत्रण व  मूल्‍यमापनसर्व आरोग्य संस्थांचे शिशू  मैत्रीकरण इ. उपक्रम राबविले जातात. यामध्ये ६ महिन्यापर्यंत निव्वळ स्‍तनपान व ६ महिन्यानंतर पूरक आहार देण्‍याबाबत समुपदेशन करण्यात  येते. माहे एप्रिल २०२३  ते  डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ७२ हजार ९४१ माता बैठका झाल्‍या असून यामध्ये १३लाख ७४ हजार ५१५ मातांना समुपदेशन करण्यात आले.

 

ॲनिमिया मुक्‍त भारत कार्यक्रम

            राज्यातील लहान बालकेकिशोरवयीन मुले व मुलीगर्भवती व स्तनदा मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ६ महिने ते ५९ महिने व ५ ते ९ वर्ष या वयोगटातील बालकांना१० ते १९ वर्षे वयोगटातील  किशोरवयीन मुला-मुलींनागर्भवती व स्तनदा माता व प्रजननक्षम वयोगटातील स्त्रिया यांना लोह व फॅालिक ऑसिड (IFA) या औषधाची प्रतिबंधात्मक पूरक मात्रा देण्यात येते. तसेच रक्तक्षय असलेल्‍या लाभार्थ्यांना  आवश्यक उपचार व संदर्भ सेवा देण्यात येते.

गृहस्तरावर नवजात बालकांची काळजी

            राज्यातील नवजात शिशु व अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. या  कार्यक्रमांतर्गत आशा सेविकांना १ ते ४ टप्याचे प्रशिक्षण देण्यात येते. आशांव्दारे एच.बी.एन.सी. प्रशिक्षणाच्या आधारावर नवजात बालकांना ४२ दिवसात सहा ते सात गृहभेटी देण्यात येतात. आरोग्य संस्थेत प्रसूती झालेल्‍या माता व नवजात बालकांस आशा मार्फत ६ गृहभेटी या जन्मानंतर ३,,१४,२१,२८ व ४२ व्या दिवशी देण्यात येतात.

            तसेच घरी प्रसूती झालेल्‍या माता व नवजात बालकांस आशामार्फत ७ गृहभेटी या १,,,१४,२१,२८ व ४२ व्या दिवशी देण्यात येतात. या वेळापत्रकाप्रमाणे गृहभेटी दिल्‍यास प्रत्येक आशाला २५० रुपये इतके मानधन अदा करण्यात येते. प्रसूतीच्या ४२ दिवसांपर्यंत आई आणि नवजात  बालक दोघेही सुरक्षित राहतीलयाची  खात्री करण्यात येते. गृहभेटी दरम्यान जंतुसंसर्गन्युमोनियाहायपोथर्मियातापस्तनपान समस्याअतिसारकमी दिवसाची बालकेकमी वजनाची बालकेडोळयाने दिसणारे जन्मजात व्यंग अशी बालके  आढळल्‍यास नवजात शिशुंना जवळच्या शासकिय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात येते. बालकांच्या तपासणी दरम्यान आढळलेल्‍या बाबींची नोंद करण्याकरिता आशांना एचबीएनसी बुकलेट उपलब्ध करुन दिले आहे. गृहभेटी दरम्यान पोषणआरोग्यप्रारंभिक बालपणातील विकास आणि वैयक्तिक व परिसर स्वच्छता या ४ प्रमुख बाबींवर भर देण्यात येतो.

००००

निलेश तायडे/विसंअ/


 


अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा

 अष्टपैलूअशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न

            मुंबईदि. २२ : आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यां


नी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेतअशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे जे आवश्यक आहेत्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करूअसे प्रतिपादन त्यांनी केले.

            महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज  प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवायमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरआमदार मनीषा कायंदे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमहाराष्ट्र राज्य चित्रपटरंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

            यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीअष्टपैलूहा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे.  अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येत आहेहा अवघ्या महाराष्ट्रासाठी  केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

            गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाहीअसे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतोअशा शब्दात त्यांनी  ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.

            मुख्यमंत्री म्हणाले कीमुंबईतल्या फिल्मसिटीत शुटींगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेचमुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर 'वन विंडो सिस्टीम'चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नवे चित्र नाट्यगृह उभारण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी  मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            आजचा  दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेतअशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

            ते म्हणाले कीमराठीहिंदी चित्रपटसृष्टीनाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. याशिवायसुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केलेत्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळालीअशी भावनाही यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण : मंत्री सुधीर मुनगंटीवार

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीमहाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे.  महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे.  या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

            फिल्मसिटीच्या बाहेर जिथे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या अगोदरच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्मसिटी करू शकतोअसा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील : अशोक सराफ

            महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलातयाचा खरोखर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना त्यांनी मदत केली आहेही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहीलअशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

लतादीदींच्या नावे पुरस्कार हा आशीर्वाद : सुरेश वाडकर

            यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लताजींच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद आहे. आजही लतादीदी आपल्यात आहेतहीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असे आपले राज्य आहे. महान सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यात कलावंतांचा मोठा वाटा आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कारमहोत्सव आयोजित करून व्यासपीठ निर्माण करण्याचे काम राज्य शासन करीत आहे. तीन वर्षाचे पुरस्कार यावर्षी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणीसन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला.  तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्तासन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही श्री. विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.  सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी (मरणोत्तर)सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.

            चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरेसन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

            यावेळी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

0000

दीपक चव्हाण/निलेश तायडे/विसंअ/


वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्वीकार प्रणाली अवलंबावी

 वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी

एकसमान स्वीकार प्रणाली अवलंबावी

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबईदि. २२ : ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या फेडरेशनच्या प्रस्तावानुसार देहदान स्वीकारण्यासाठी राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे देहदान स्वीकारण्यासाठी एकसमान स्विकार प्रणाली (sop) अवलंबावी असे वैद्यकीय शिक्षणऔषधी द्रव्य आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            राज्यातील अवयवदान क्षेत्रात अधिक सुधारणा करण्यासाठी मंत्रालयात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.

            फेडरेशनद्वारे अवयव दानाच्या प्रचार आणि प्रबोधनासाठी राज्यभरात  पदयात्राकार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे अशा विविध उपक्रमांचा आढावा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला व त्याबद्दल फेडरेशनचे कौतुक केले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात नेत्र व त्वचा स्वीकारण्यासाठी (retrieval center) केंद्र उभारावे, असे निर्देश मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

            श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात फेडरेशनच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अवयव दान कार्यकारिणी समिती नेमावी. समितीमध्ये जिल्हाधिकारीसीईओजिल्हा माहिती अधिकारीवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापत्रकारपोलीस मित्ररेड क्रॉस सदस्यनिवृत्त प्रशासकीय अधिकारीमाजी सैनिक यांचा समावेश असावा. दि फेडरेशन ऑफ ऑर्गनबॉडी डोनेशन यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किंवा शासकीय रुग्णालयात अवयव दानाविषयीचे माहिती केंद्र असावे  .

            यावेळी फेडरेशनचे संस्थापकअध्यक्ष पुरुषोत्तम पवारकोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य समन्वयक योगेश अग्रवालयशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूरच्या रेखा बिरांजे, समीर पाटील उपस्थित होते.

0000

नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागातील सरळसेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना आवाहन

 नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागातील

सरळसेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना आवाहन

 

            मुंबईदि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत कोकण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीस (TCS) संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दि. २५/११/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षराज्यस्तरीय निवड समिती (गट-ड) तथा सहसंचालकनगर रचनापुणे विभागपुणे यांनी परीक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवारांची यादी नगर रचना संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

            गुणवत्ता यादीनुसार कोकण विभागासाठी प्राधान्यक्रम दिलेल्या शिफारस पात्र उमेदवारांनी दि. २६.०२.२०२४ नंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह सहसंचालकनगर रचनाकोकण विभागनवी मुंबई कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावाअसे आवाहन सहसंचालकनगर रचनाकोकण विभागनवी मुंबई यांनी केले आहे.

0000 

आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा केंद्रिय अर्थसहाय्यित योजनांसाठी प्रस्ताव निर्धारित वेळेत पाठवावेत

 आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

केंद्रिय अर्थसहाय्यित योजनांसाठी प्रस्ताव निर्धारित वेळेत पाठवावेत

 

            मुंबई, दि. २२ :    आदिवासी विकासाच्या विविध केंद्रीय अर्थसहाय्यित योजनांसाठी निर्धारित वेळेत प्रस्ताव पाठवावेत त्यानुसार केंद्राकडून निधी प्राप्त होईल राज्याने केंद्र सरकारकडे एकलव्य आश्रमशाळामुलांसाठी वसतिगृह यांसह इतर योजनांसाठी त्वरित प्रस्ताव पाठवावेअशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली.

            राज्यपाल रमेश बैस व केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज राजभवन मुंबई येथे राज्यात सुरु असलेल्या आदिवासी विकासाच्या केंद्रीय अर्थसहाय्यित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

            यासंदर्भात केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी सादरीकरणात राज्यातील केंद्र सहाय्यित आदिवासी विकास योजनामंजूर निधीपूर्ण झालेल्या योजनाप्रत्यक्ष खर्चसुरु असलेल्या योजना व अखर्चित निधी याबाबत माहिती दिली.

            बैठकीमध्ये प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजनाअतिमागास जमातींसाठी असलेल्या 'प्रधानमंत्री जनमन मिशन', जिल्हानिहाय बहुउद्देशीय केंद्रांची स्थापना व वन धन विकास केंद्रांची स्थापनाआदिवासी विकास आयुक्तालयाच्या यशस्वी योजना तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली.  

            बैठकीला केंद्रीय जनजाती मंत्रालयातील अतिरिक्त सचिव डॉ नवलजीत कपूरराज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुडराष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाचे (ट्रायफेड) व्यवस्थापकीय संचालक टी. रौमून पैतेशबरी आदिवासी वित्त विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

0000

Governor, Union Minister Bharati Pawar review

progress of Tribal Welfare Schemes in Maha

 

            Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Union Minister of State for Tribal Affairs Dr Bharati Pawar reviewed the implementation of various Centrally Assisted Tribal Welfare Schemes in Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Thu (22 Feb)

            A presentation on various Centrally Sponsored Tribal Welfare schemes in Maharashtra was made by Tribal Welfare Commissioner Nayana Gude.

            The meeting reviewed the implementation of Pradhan Mantri Adi Adrasha Gram Vikas Yojana, PM Janman Mission for the Particularly Vulnerable Tribal Groups and District Wise target of Multi Purpose Centre and Van Dhan Vikas Kendras, Tribal Student Hostels and Ashram Shalas.

            The Commissioner also briefed about the Best Practices of Tribal Welfare Commissionate such as Central Kitchen scheme of feeding children nutritious food, ATAL Arogya Vahini, Super 50 scheme etc. Further TRTI Commissioner made a presentation on the Best Practices of Tribal Research and Training Institute.

            The meeting was attended by Additional Secretary, Ministry of Tribal Affairs Dr Navaljit Kapoor, Secretary, Tribal Welfare Vijay Waghmare, Commissioner, Tribal Research and Training Institute Rajendra Bharud, TRIFED M D T. Roumuan Paite, MD of Shabari Adivasi Vitta Vikas Mandal Leena Bansod and other officials.

Thursday, 22 February 2024

देशातून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वेगाने काम करावे

 देशातून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वेगाने काम करावे

- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

आरोग्य क्षेत्रासाठी केंद्रीय निधी व योजनांचा घेतला आढावा

            मुंबईदि. २२ : देशातील आरोग्यविषयक पायाभूत सोयी – सुविधा उभारणेरुग्णसेवा प्रभावी होणे यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून राज्यांना निधी देण्यात येतो. या निधीच्या विनियोगातून राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम होत आहे. यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सिकलसेल आजाराच्या निर्मुलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी यंत्रणांनी वेगाने काम करावेअसे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

               आरोग्य क्षेत्रासाठी केंद्राकडून प्राप्त निधीविविध योजनांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संचालक डॉ. सरोज कुमारअतिरिक्त आयुक्त डॉ. पवन कुमारकेंद्रीय आरोग्य विभागाच्या लेखा शाखेचे शशांक शर्माअप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकरआरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरअतिरिक्त संचालक नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

              सिकलसेल रूग्णवाहक यांचे निदान होणे गरजेचे असून रूग्णांची तपासणी करून ओळख व्हावीयासाठी रूग्ण ओळखपत्र वितरण गतीने पूर्ण करण्याच्या सूचना करीत मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की,  ओळखपत्रामध्ये रूग्ण व वाहक असे प्रकार असावे. सिकलसेल निर्मुलनासाठी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर तपासणी वाढविण्यात यावी. गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीमध्ये सिकलसेल आजाराची तपासणी सक्तीची करण्यात यावी. यासोबतच क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. ‘निक्षय मित्र’ बनण्यासाठी जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना यामध्ये जोडण्यात यावे.

              राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन अंतर्गत राज्यात प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यात चार जिल्ह्यात ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच १८ क्रिटीकल केअर ब्लॉक्सचे कामही करण्यात येत आहे. राज्यामध्ये ११ हजार ५२ आरोग्यवर्धीनी केंद्र असून त्यांना आता आयुष्मान भारत आरोग्य मंदिर करण्यात आले आहे. या ठिकाणी मधुमेह तपासणीतीन प्रकारच्या कर्करोगाच्या तपासण्या आदी नवीन सुविधा असणार आहेत.

               दूरध्वनीवरील आरोग्य सल्ला (टेलिकन्सल्टींग) सुविधेचा राज्यात ६९ लाख रूग्णांनी लाभ घेऊन तज्ज्ञांचा सल्ला मिळविला आहे. त्याचा लाभ रूग्णांना झाला आहे. १५ वा वित्त आयोगकोविड प्रतिसाद निधी आदींचा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपयोग करण्यात यावा. राज्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे तीन कोटी २६ लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत या योजनेतून २४ लाख रूग्णांनी लाभ घेतला आहे. या योजनेतंर्गत कार्ड वितरण पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री डॉ. पवार यांनी दिल्या.

               गुजरात व महाराष्ट्रात किलकारी प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या बाळाची काळजी घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष संपर्क करून त्यांना आरोग्य सुविधा देण्यात येतील. आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासह देशात वैद्यकीय शिक्षणाच्या जागाही वाढविण्यात आल्या आहेत. नंदूरबार व गोंदीया येथे वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे.  तसेच आरोग्य क्षेत्रात सार्वजनिक खासगी भागीदारी ( पीपीपी) पद्धतीचा उपयोग करण्यात यावा. यामधून चांगले काम होत आहे. कर्करोग निदान व उपचारामध्ये केमोथेरपी केंद्र उघडण्यात यावे. कर्करोगासाठी प्रभावी नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात यावाअसेही केंद्रिय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.                                                       

******

Featured post

Lakshvedhi