Wednesday, 21 February 2024

महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीत सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे

 महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीत सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे

- राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या अभिभाषणाने विशेष विधिमंडळ अधिवेशनाची सुरूवात

            मुंबईदि. 20 : शेतकरीकामगारयुवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. रोजगार निर्मितीउद्योगक्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव वाढ झाली असून 2027-28 पर्यंत देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी अनुरूप अशी राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय आपण ठेवले आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            या वर्षीच्या पहिल्या विधीमंडळ अधिवेशनाची सुरूवात संयुक्त सभागृहात राज्यपाल श्री. बैस यांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी त्यांनी राज्यशासन करीत असलेली विविध विकासकामे आणि ध्येयधोरणांचा आढावा घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळाचे सदस्य तसेच दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीआराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजमहात्मा जोतिराव फुलेराजर्षी छत्रपती शाहू महाराजभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजसुधारकांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार राज्य शासन काम करत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक उपाययोजना

            कुणबी नोंदी असलेला अभिलेख शोधण्यासाठी आणि मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठित करण्यात आली होती. त्यानुसारमराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे.  मराठाकुणबीकुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील 75 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी "महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना" सुरू केली आहे. सारथी संस्थेच्या नाशिकछत्रपती संभाजीनगरनवी मुंबईलातूरनागपूरपुणे विभागीय व उपकेंद्र कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 17 हजार 500 पेक्षा अधिक मराठा समाजातील लाभार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक कर्जाकरिता व्याज परतावा म्हणून 232 कोटी रुपये वितरित केले आहेतअसेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

सामाजिक न्यायासाठी आग्रही

            श्री. बैस म्हणाले कीज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत इतर मागासवर्गनिरधिसूचित जमातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना भोजननिवासव्यवस्था व इतर शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी भत्त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्त्यांची संख्या 50 वरून 75 पर्यंत वाढविली आहे. गुरवलिंगायतनाभिकरामोशी व वडार समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर मागासवर्गनिरधिसूचित जमातीभटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी पुढील तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी राज्यात मोदी आवास गृहनिर्माण योजना राबवित असून त्यासाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या मोहिमेत 28 जिल्ह्यांचा समावेश असून 85 हजारांपेक्षा अधिक दिव्यांगजनांना लाभ झाला आहे. विविध गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमिनी देताना दिव्यांगजनांसाठीचे आरक्षण 3 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना अंतर्गतएकाकी वृद्ध व्यक्तीविधवा आणि दिव्यांग व्यक्ती यांसारख्या 45 लाख लाभार्थ्यांसाठीच्या आर्थिक सहाय्यात एक हजारावरून 1500 रुपये इतकी वाढ केली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 हजार रुपये एकवेळ एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासमहिला सन्मान योजनेत तिकिटाच्या दरामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये1 एप्रिल2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी "महिला-केंद्रित पर्यटन धोरण" आखले आहेअसेही त्यांनी सांगितले.

            विविध सण- उत्सवाच्या वेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना तसेच  शेतकरी आत्महत्याप्रवण 14 जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना "आनंदाचा शिधा"चे वितरण केले. "शासन आपल्या दारी" उपक्रमाचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना झाल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य गुंतवणुकीत आघाडीवर आहे. तसेच देशाच्या एकूण निर्यातीत आघाडीवर आहे. या वर्षीसामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 61 हजार 576 कोटी रुपये इतकी गुंतवणूक असलेले 75  प्रकल्प मंजूर केले असून त्यामुळे 53 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.  राज्यात65 हजार 500 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. जानेवारी 2024 मध्येदावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 3 लाख 53 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सामंजस्य करार केले असूनत्यामुळे राज्यामध्ये दोन लाख रोजगार संधी निर्माण होतील. राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023  व एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण2023-2028 जाहीर केले आहे. राज्याला हरित हायड्रोजन व त्याचे तत्सम पदार्थ निर्माण करणारे आघाडीचे राज्य बनविण्यासाठी हरित हायड्रोजन धोरण-2023 धोरण जाहीर केले.

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मिती

            ग्रामीण भागात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन केली आहेत. गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांमधील नक्षलग्रस्त क्षेत्रातील युवकांना सक्षम करण्यासाठी आणि रोजगार देण्यासाठी "कौशल्य विकास कार्यक्रम" सुरू केला आहे. युवकांसाठी यंदा 1 लाख 53 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून सुमारे 7 लाख 11 हजार बांधकाम कामगारांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून 941  कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलाअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य व्यवस्थेच्या अधिक बळकटीकरणावर भर

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीनैसर्गिक आपत्तीसार्वजनिक आरोग्यकृषीवाहतूक नियंत्रणदेखरेख व संनिरीक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र ड्रोन अभियानाला मान्यता दिली आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्हीं योजनांचे एकत्रीकरण करूनराज्यातील सर्व शिधा पत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांचा समावेश करण्यासाठी त्यांची व्याप्ती वाढविली आहे. वार्षिक विमा संरक्षणप्रती कुटुंब1 लाख 50 हजार रुपयांवरुन 5 लाख रुपये इतके वाढविले आहे. सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम सुरू केला आहे. याद्वारेमुंबईतील 35  लाखांहून अधिक व्यक्तींना याचा लाभ झाला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही 347 आरोग्य केंद्रे उघडण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-दोन या अंतर्गत 28 हजार 300 गावे हागणदारीमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठीराष्ट्रीय गृहनिर्माण दिनी, "महा आवास अभियान2023-24" राज्य शासनाने सुरु केले आहे. राज्यातील 409 शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) प्रभावीपणे राबवित असून 15 लाखांहून अधिक घरांना मंजुरी दिली असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांच्या विस्तारात अग्रेसर

            देशातील सर्वात जास्त लांबीचा समुद्र सेतू अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेसिंदखेडराजा ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्गभंडारा-गडचिरोलीनागपूर-चंद्रपूर आणि नागपूर-गोंदिया तसेच जालना ते नांदेड या द्रूतगती महामार्गांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती राज्यपालांनी त्यांच्या भाषणात दिली.

            राज्यातील 5700 गावांमध्ये  जलयुक्त शिवार अभियान 2.0 हा दुसरा टप्पा सुरू केला आहे. 13 जिल्ह्यांतील 43 तालुक्यांमधील 1442 गावांमध्ये "अटल भूजल योजना" राबवित आहे. 21 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-दोनला तत्वत: मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत27 प्रकल्पांना आणि बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत 91 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. 13 लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी 80 हजार कोटी रुपये खर्चाच्या 68 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.


मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव २०२४ चे २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन

 मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव २०२४ चे

२१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन

- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई दि. २० : सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनच्यावतीने महासंस्कृती महोत्सव २०२४ चे आयोजन जिल्ह्यात गोरेगाव चेंबूर विलेपार्ले या ठिकाणी २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी महोत्सवाची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले कीराज्यातील विविध संस्कृती आणि परंपरांचा जागर करण्यासाठी तसेच पुढील पिढीला इतिहासाचीसंस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढाक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.

            महोत्सवाचे उद्घाटन शिव सोहळ्याने होणार आहे. या अंतर्गत मी मराठी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे सायंकाळी  ६.३० वाजता मालाड पश्चिम येथील मालवणीअंबोजवाडी मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

            २३ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत संत संमेलन कार्यक्रमांतर्गत व्याख्यानसन्मान सोहळाशोभा यात्रा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन सकाळी १० वाजेपासून विलेपार्ले पश्चिम येथील सन्यास आश्रम येथे करण्यात आले आहे.

            २४ व २५ फेब्रुवारी रोजी बुद्ध महोत्सवात पुस्तक प्रदर्शनव्याख्यानशोभा यात्रामहिला मेळावाशाहिरी जलसाभीमगीत स्पर्धाधम्म परिसंवादसंविधान रॅली टिळक नगर येथे लोकमान्य टिळक टर्मिनल जवळ सर्वोदय बुद्धविहारात सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे.

            २७ ते २८ फेब्रुवारी रोजी शबरी महोत्सव अंतर्गत लोकनृत्यवस्तू प्रदर्शनआदिवासी भागातील जनजाती पूजा पद्धतीवैदू संमेलन ७५ जनजाती क्रांतिकारकांची प्रदर्शनीआदिवासी महिलांच्या संमेलनाचे सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे. तरआदीशक्ती आदीमाया या महोत्सव अंतर्गत संध्याकाळी ६.३० वाजता महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती यांना समर्पित नृत्यगीत यांचा कलाविष्कार गोरेगाव येथे मध्यवर्ती आरे डेअरीचे पटांगण येथे आयोजित करण्यात आले आहे.

            २८ फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाच्या सांगता समारंभात संगीत शिवस्वराज्य गाथाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ नवं गीतांमधून साकारलेलं संगीतमय शिवचरित्र संध्याकाळी ६.३० वाजता आरे कॉलनीच्या मध्यवर्ती पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी नागरिकांना केले आहे.

000

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा

 महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा

उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरणाबद्दल राज्यपालांची

होमी भाभा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शाबासकी

 

            मुंबई, दि. 20 : अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने  आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना  तोडीस तोड देणारे आहे.  पर्यटनासाठी विदेशात जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व राज्यांना भेट दिली तर तेथील पर्यटन वाढेल व लोकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईलअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 

            राज्यपाल  श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २० फेब्रुवारी) महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम सादर केला. 

            सूर्योदय पाहावयाचा असल्यास प्रथम अरुणाचल प्रदेश राज्याकडे पहावे लागते. त्या राज्यात लोक परस्परांना शुभेच्छा देताना 'जय हिंदम्हणतात ही गोष्ट उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी सांगितले.     

            आपण त्रिपुरा राज्यातील एका लहानश्या गावाला भेट दिली होती. तेथील स्वच्छता व प्रत्येक घरासमोरील फुलांची वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण थक्क झालो होतोअसे सांगून उत्तर पूर्व राज्यांच्या विकासाकरिता गेल्या दहा वर्षांमध्ये कसोशीने प्रयत्न झाले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

            'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत  देशातील विविध राजभवनांमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्यात येत असून महाराष्ट्रात आतापर्यंत १८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. या उपक्रमामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांची कलासंस्कृतीपरंपरा व नृत्य यांमधील समृद्धी पाहण्यास मिळालीअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

            सिडनहॅम व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही राज्यांच्या लोकगीत व नृत्यावर सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.  राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थी कलाकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

            या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल के. टी. परनाईक (नि) यांचा अरुणाचल प्रदेश स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.    

            डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत तसेच विद्यापीठांतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालयसिडनहॅम वाणिज्य महाविद्यालयविज्ञान संस्था व सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई या महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

००००


 

Foundation Day of Arunachal Pradesh and Mizoram celebrated in Maharashtra Raj Bhavan

 

            Mumbai, 20th Feb : The State Foundation Day of Arunachal Pradesh and Mizoram was celebrated for the first time in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Tue (20 Feb). 

            The Arunachal Pradesh and Mizoram State Foundation Day was celebrated as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India.

            A cultural programme depicting the rich culture, folk dance and traditions of Arunachal Pradesh and Mizoram was presented on the occasion. The Cultural programme was presented by the students of Dr Homi Bhabha State University. Two audio visual films showing the beauty and well known tourist destinations of the two States were also shown on the occasion.

            The Governor complimented the students of the University for their excellent cultural presentation.

            A video message of Arunachal Pradesh Governor Lt Gen K T Parnaik, PVSM, UYSM, YSM (Retd) was shown on the occasion.

            Vice Chancellor of Dr Homi Bhabha State University Prof Rajneesh Kamat, Deans of affiliated colleges, members of faculty and students were present on the occasion.

0000


 

मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव २०२४ चे २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन

 मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव २०२४ चे

२१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन

- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई दि. २० : सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनच्यावतीने महासंस्कृती महोत्सव २०२४ चे आयोजन जिल्ह्यात गोरेगाव चेंबूर विलेपार्ले या ठिकाणी २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी महोत्सवाची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले कीराज्यातील विविध संस्कृती आणि परंपरांचा जागर करण्यासाठी तसेच पुढील पिढीला इतिहासाचीसंस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढाक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.

            महोत्सवाचे उद्घाटन शिव सोहळ्याने होणार आहे. या अंतर्गत मी मराठी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे सायंकाळी  ६.३० वाजता मालाड पश्चिम येथील मालवणीअंबोजवाडी मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

            २३ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत संत संमेलन कार्यक्रमांतर्गत व्याख्यानसन्मान सोहळाशोभा यात्रा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन सकाळी १० वाजेपासून विलेपार्ले पश्चिम येथील सन्यास आश्रम येथे करण्यात आले आहे.

            २४ व २५ फेब्रुवारी रोजी बुद्ध महोत्सवात पुस्तक प्रदर्शनव्याख्यानशोभा यात्रामहिला मेळावाशाहिरी जलसाभीमगीत स्पर्धाधम्म परिसंवादसंविधान रॅली टिळक नगर येथे लोकमान्य टिळक टर्मिनल जवळ सर्वोदय बुद्धविहारात सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे.

            २७ ते २८ फेब्रुवारी रोजी शबरी महोत्सव अंतर्गत लोकनृत्यवस्तू प्रदर्शनआदिवासी भागातील जनजाती पूजा पद्धतीवैदू संमेलन ७५ जनजाती क्रांतिकारकांची प्रदर्शनीआदिवासी महिलांच्या संमेलनाचे सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे. तरआदीशक्ती आदीमाया या महोत्सव अंतर्गत संध्याकाळी ६.३० वाजता महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती यांना समर्पित नृत्यगीत यांचा कलाविष्कार गोरेगाव येथे मध्यवर्ती आरे डेअरीचे पटांगण येथे आयोजित करण्यात आले आहे.

            २८ फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाच्या सांगता समारंभात संगीत शिवस्वराज्य गाथाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ नवं गीतांमधून साकारलेलं संगीतमय शिवचरित्र संध्याकाळी ६.३० वाजता आरे कॉलनीच्या मध्यवर्ती पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी नागरिकांना केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 23.37 कोटी रुपये वितरित.

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 

23.37 कोटी रुपये वितरित.

 

            मुंबई दि. 20 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे.

            राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

0000

कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार

 कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. 20 : कोल्हापूर, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न  100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. एकूण 7 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

            कोल्हापूरसह इतर 4 परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकामफर्निचरयंत्रसामुग्रीमनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94  लाख  इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

Tuesday, 20 February 2024

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे 26 फेब्रुवारीपासून

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई येथे 26 फेब्रुवारीपासून


27 फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार


 


            मुंबई, दि. 20 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, दि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवार, दिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे.


            विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. 


            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


            अर्थसंकल्पिय अधिवेशन 26 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत होणार असून, एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे.


Featured post

Lakshvedhi