Monday, 19 February 2024

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

 पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा दि.18: पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-2024 बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेटाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते.

            पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे, यानिमित्ताने त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील

 स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा, दि.18महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

             पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनअप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेटाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेशेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. यादृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल  त्याला शेततळेठिबक सिंचन, एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवीत आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला.

            शेती करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचेशेतकऱ्यांचे असल्याने या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या जातील. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजेत व त्याचे संवर्धनही केले पाहिजे.

            महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात . ते पुन्हा गावात यावेतनोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी  पर्यटन वाढी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर,इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन  अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000


 


किल्ले शिवनेरी येथे किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन गडकोट, किल्ले आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू-शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन गडकोट, किल्ले आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू-

 किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गडकोटकिल्ले आपला ठेवातो जपण्याचे काम करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            पुणेदि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध 20 पर्यटनस्थळे विकसित होत आहेतत्यात किल्ले रायगडप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारसहकारमंत्री दिलीप-वळसे पाटीलखासदार डॉ.अमोल कोल्हेआमदार अतुल बेनकेमाजी खासदार तथा म्हाडाचे पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटीलमाजी आमदार शरद सोनवणेविभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीमती आशाताई बुचकेजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेमुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीणजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाणजिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुखउपवनसंरक्षक अमोल सातपुतेमराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकलाअभियांत्रिकीकिल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रमशौर्यत्यागसमर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुषयुगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. त्यांनी अठरापगड जातीचेधर्मांचे लोक एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढेकल्याणापुढे स्वतःचे दुःखआराम कवडीमोल मानला. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण घेतला तर शिवजयंती साजरी करताना त्यांना खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाजराज्यदेश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात शिवछत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. आग्य्राला देखील दिवाण-ए-आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरी करीत आहोत.

            छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढेबोरघरडूचकेवाडीखेतेपठारमार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करूअसेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

            निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे 15 कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

            इतर कुणाचेही नुकसान न करताकुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे.  350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. जाणता राजा महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोतअसेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक  - देवेंद्र फडणवीस

            राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सुलभ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. ही प्रक्रिया सुलभ झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल.  छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहेअसे उपमख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

            छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जोपर्यंत चंद-सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार भारत भूमीत होतच राहील. शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचारचरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेलअसा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

            माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करूनत्यामधील पुरुषत्व जागृत केले. शिवरायांनी अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिलीअसेही त्यांनी सांगितले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी 83 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

            छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत. शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्यभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्ताना अचंबित केले. हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत. त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचाएकतेचा विचार नवीन पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया. सह्याद्रीच्या दऱ्या- खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकामध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला. परकीय सत्तेसमोर सार्वभौमत्व स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावं असे राज्यस्वराज्य त्यांनी स्थापन केलेयाची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे, असेही ते म्हणाले.

            जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सूचना केली. प्रारंभी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारे पाळणा गीत गायले. राष्ट्रगीत तसेच 'गर्जा महाराष्ट्र माझाया राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केला.

            त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व माँ जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.

            कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.

            कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदेमराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

 

'शिवाई देवराईआणि वन उद्यानाचे लोकार्पण

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे 'शिवाई देवराईआणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

            शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र 'शिवाई देवराईविकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे.

00000


राज्यपालांकडून संगीत विभागाला 25 हजार रुपयांचे बक्षीस

 राज्यपालांकडून संगीत विभागाला 25 हजार रुपयांचे बक्षीस

 

            मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिवजयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा तसेच देशभक्तीपर गीतांचे  सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी पालिकेच्या संगीत विभागाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

 

            या कार्यक्रमाला पालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहलअतिरिक्त महापालिका आयुक्त (शहरे) डॉ अश्विनी जोशीछत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किशन जाधव तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

BMC celebrates Shiv Jayanti

 

            Maharashtra Governor Ramesh Bais attended the Shiv Jayanti celebrations organised by the Brihan Mumbai Mahanagarpalika at Krida Bhavan near Shivaji Park Mumbai. A cultural programme comprising patriotic songs on the life and work of Chhatrapati Shivaji Maharaj was presented by the Music Department of BMC.    The Governor announced a prize of Rs. 25000 to the Music Department of BMC on the occasion.

 

            Administrator Dr I S Chahal, Additional municipal commissioner Dr Ashwini Joshi were among those present.

00000

मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. 20 व 21 फेब्रुवारीला पारदर्शकपणे होणार- सचिव सुनील चव्हाण यांची माहिती

 मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. 20 व 21 फेब्रुवारीला पारदर्शकपणे होणार- सचिव सुनील चव्हाण यांची माहिती

         मुंबई,दि.19: मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी आयुक्तमृद व जलसंधारणछत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत  दि. 19 डिसेंबर, 2023 रोजी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा टी.सी. एस. कंपनीमार्फतऑनलाईन पद्धतीने दि. 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी 28 जिल्ह्यामध्ये एकूण 66 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पारदर्शी व व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण सचिव सुनील चव्हाण यांनी दिली.

            सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टि.व्ही.यंत्रणाजॅमर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची पूर्वतपासणी करुनच प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांस कोणत्याही स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सब्लुटुथ उपकरणे इत्यादी वापरण्यास व बाळगण्यास बंदी असणार आहे. उमेदवार प्रणालीमध्ये इंटरनेट अॅक्सेस नसणार आहे. शिवाय प्रश्नपत्रिका सीलबंद आणि सुरक्षितता बाळगून व्हीपीएन वापरुन डेटा सेंटरमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे.

            संपूर्ण परीक्षा पारदर्शी पध्दतीने पार पाडण्याबाबत swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर सूचना प्रसारित केल्या आहेत. यासंदर्भात टीसीएस कंपनीचे प्रतिनिधी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची मंत्रालयात 18 फेब्रुवारीला सविस्तर बैठक घेवून सूचना दिल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.

            परीक्षा केंद्राबाहेर आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सर्व परीक्षा केंद्रांवर विभागाकडून निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) अभियांत्रिकी सेवा परीक्षा2022 च्या मुलाखती दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 ते दि.27 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित केल्या आहेत. सदरहू अभियांत्रिकी सेवा परीक्षा2022 च्या मुलाखतीसाठी  पात्र ठरलेल्या परंतु दि.20 व 21 फेब्रुवारी2024 रोजीच्या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विनंती करण्यात आली असून आयोगाकडून मुलाखतीसाठी सुधारित दिनांक देण्यात येणार आहे.  याची सर्व संबंधित परीक्षार्थींनी नोंद घेण्याचे आवाहन सचिव श्री. चव्हाण यांनी केले आहे.

0000

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

 पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा दि.18: पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा-2024 बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाईआमदार मकरंद पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखअप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेटाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते.

            पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे, यानिमित्ताने त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याच्या आदर्शानुसार

 शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याच्या आदर्शानुसार

महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित वाटचाल करूया

राज्यातील घराघरात शिवजयंती उत्सव साजरा करतानाच

जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुयात

 

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

          मुंबईदि. 18 :-  युगपुरुषछत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. सह्याद्रीच्या कडे-कपारीतील अठरा पगड मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी संघर्षातून स्वराज्याची निर्मिती केली. ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच महाराष्ट्रात सुराज्य निर्मितीच्या दिशेने एकत्रित वाटचाल सुरु आहेही वाटचाल यापुढेही वेगवान पद्धतीने सुरू राहीलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्यातील घराघरात साजरा करतानाचजनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करण्याचे आवाहन करुन त्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            शिवजयंती निमित्त दिलेल्या शुभसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात कीमहाराष्ट्राचे आराध्य दैवतयुगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन हिंदवी स्वराज्यरयतेचं राज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. स्वराज्य निर्मितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष जन्मला हे आपले भाग्य आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हितजनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. राज्यातील महायुतीचे सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनाधोरणांनाकारभाराला आदर्श मानून काम करत राहीलअसा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.

0000  

Featured post

Lakshvedhi