Saturday, 17 February 2024

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सव

 मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे

२२ फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सव

 

            मुंबईदि. १६ : राज्य शासनातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २२ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुंबईतील शहीद भगतसिंग मैदानअभ्युदय नगर येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महोत्सवाचे नियोजन करावेअशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी  दिल्या.

            जिल्हास्तरावर आयोजित होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवलेपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकरशिक्षण विभागाच्या प्रतिनिधी वैशाली शिंदेपोलिस निरीक्षक संजय मोहितेअशोक लांडगे (वाहतूक) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी म्हणाले कीया महोत्सवाच्या माध्यमातून विविध विभागातील संस्कृतीचे आदान- प्रदानस्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणेलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनस्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात- अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा पाच दिवसीय सांस्कृतिक महोत्सव होईल. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे.

            महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रदर्शनांचा समावेश असेल. त्यात शस्त्र व हस्तलिखितांचे प्रदर्शनबचतगटांचे स्टॉल मांडण्यात येतील. पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीपालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या सोहळ्याचे प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावेअशाही सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी दिल्या.

०००००

जुन्नरसह आंबेगाव येथील हिरडा पीक नुकसानभरपाई संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा

 जुन्नरसह आंबेगाव येथील हिरडा पीक नुकसानभरपाई

संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा

- मंत्री दिलीप वळसे पाटील

 

मदतीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळासमोर ठेवणार - मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. १६ : जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पाठवावाअसे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. हा प्रस्ताव प्राप्त होताच तो  मंत्रिमंडळासमोर ठेऊन मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईलअशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

            मंत्रालयात आज मंत्री श्री. वळसे पाटील यांनीजुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने बैठक झाली. मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठीआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेमदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जगताप उपस्थित होते. तर कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडामजिल्हाधिकारी सुहास दिवसेउपवन संरक्षक प्रवीण सिंग आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले कीजुन्नर आणि आंबेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने येथील शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी त्यांचे पंचनामेही करण्यात आले. मात्रअद्यापपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही. ही मदत त्यांना मिळावीयादृष्टीने त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावेळ हिरडा पिकाचा बाजारभाव लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावा.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनीविशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येईल आणि त्यास मान्यता घेऊन या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईलअसे स्पष्ट केले. येत्या सोमवारपर्यंत याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील बाधित गावांची संख्या ८१ असून शेतकऱ्यांची संख्या ४१८९ इतकी आहे. केंद्राच्या आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मध्ये याबाबत मदत करण्यास अडचण येत असल्यास विशेष बाब म्हणून ती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

0000

लघु उद्योजकांना प्रोत्साहनासाठी महाखादी कला सृष्टी प्रदर्शन 2024 चे आयोजन

 लघु उद्योजकांना प्रोत्साहनासाठी महाखादी कला सृष्टी प्रदर्शन 2024 चे आयोजन

खादी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन

            मुंबईदि. 16 : खादी हा केवळ एक धागा नसून विचार आहे. हा विचार जागृत ठेऊन लघुउद्योजकांची प्रगती साधण्यासाठी महाखादी कला सृष्टी 2024 या प्रदर्शनाचे मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लघुउद्योजकांच्या कामाला प्रोत्साहन द्यावेअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाखादी कला सृष्टीचे उद्घाटन श्री.साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त विकास आयुक्त प्रकाश वायचळस्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे (सीडबी) महाव्यवस्थापक अंजनीकुमार श्रीवास्तवमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमलालघु उद्योग महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादमउद्योग विभागाचे उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

            श्री.साठे यांनी महात्मा गांधी यांनी खादीला प्रतिष्ठा मिळवून दिल्याचा उल्लेख करून सध्या खादीच्या कपड्यांना अधिक मागणी असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील खादी वापरण्याचे आवाहन करून लघु उद्योजकांना मोठे उद्योजक बनण्याची प्रेरणा दिली आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शनास भेट देणारा प्रत्येक जण खादीचा दूत असून खादीचा प्रचारप्रसार होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने खादीचे एकतरी उत्पादन वापरून खादीची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी हातभार लावावाअसे आवाहन केले.

            श्री.श्रीवास्तव यांनी महाखादी कला सृष्टीसारखे प्रदर्शन हा खादीला प्रोत्साहन देण्याचा उत्सव असल्याचे सांगून सीडबी राज्यशासनासह मिळून विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. फरोग मुकादम यांनी या प्रदर्शनामध्ये पैठणी कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून नागरिकांनी या कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील असून प्रदर्शन हे ग्राहकांना उद्योजकांपर्यंत तसेच उद्योजकांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे एक माध्यम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

            प्रास्ताविकात आर.विमला यांनी खादी हा सर्वांना एकत्र आणणारा धागा असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या कीकोणताही चांगला बदल हा स्वत:पासून होतो याचा आदर्श गांधीजींनी घालून दिला. आजचे लघुउद्योजक देखील अशा बदलाची सुरुवात लघु उद्योगाच्या माध्यमातून करीत असून शासन अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून लघुउद्योजकांना मदतीचा हात देत आहेव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून मार्केटिंग सुद्धा केले जात आहे. याचा लाभ घेऊन स्वत:ची उन्नती साधावी. लघु उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे असून त्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी. नागरिकांनी खादी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करावीअसे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

            या प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल्स असून हे प्रदर्शन 16 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये

 ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. १६ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय,दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणविशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्वंकष आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त यांनीही सर्व शासकीय अधिष्ठातांना अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अख्यत्यारितील सर्व वैद्यकीयदंत, अतिविशेषोपचार महाविद्यालये रुग्णालयांमार्फत ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळस मोफत आरोग्य चाचणी, तपासणी करण्यात यावी. ही आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्डएच. एम. आय. एस. प्रणालीमध्ये घेतली जाईल.

            ज्येष्ठ नागरिकांनी राज्यातील १.५० कोटी संख्या विचारात घेता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी, तपासण्यांकरीता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात येतील. सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीत दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अटी व शर्ती अनुसार उपचार करण्यात यावेत,

            सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करुन देण्याची सुविधा असावी. अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

00000

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४

शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

 

              मुंबईदि. १६: पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४'चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची संस्कृतीसमृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कलासंगीतसाहस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमीदुर्गप्रेमीपर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.    

शिवनेरी फेस्टिवल २०२४ मध्ये विविध उपक्रम

            पारंपरिक संगीतनृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असूनहस्तकला प्रदर्शनचवदार आणि मनमोहक अशा पाककृतीकार्यशाळाक्वाड बायकिंगपेंटबॉलतिरंदाजीगिर्यारोहणरॅपलिंगझिपलायनिंगस्पीड बोटींगवॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभवकुकडेश्वर मंदिरनागेश्वर मंदिरहरिश्चंद्रेश्वर मंदिरकाशी ब्रह्मनाथ मंदिरअष्टविनायक मंदिरलेण्याद्री मंदिरओझर मंदिरज्योतिर्लिंग मंदिरभीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शननिरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. किल्ले हडसरनिमगिरी - हनुमंतगडनाणेघाटासोबत जिवधनगडकुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावेकँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर - निमगिरी - हनुमंतगड - नाणेघाट - जिवधन येथे गिर्यारोहण  हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.                                    

सांस्कृतिक कार्यक्रम व विविध बचतगटांचे प्रदर्शन

            या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हे सर्व कार्यक्रम शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदानतालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहेत. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स.१० ते रात्री ९ वा. विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शन असेल. दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजीसायं. ६:३० ते ७:३० वा. छत्रपतींची मानवंदना शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा पर कार्यक्रम.सायं. ७.३० ते रात्री ९.३० वा. जाणता राजा (महानाट्य) चे आयोजन. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ६.३० ते ७.३० वा. गर्जा महाराष्ट्र माझा ही नृत्य नाटिकासायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा गनिमी कावा हा कार्यक्रम. दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ शिवजन्मोत्सव सोहळासायं. ६:१५ ते ७ वा. महा शिवआरती कार्यक्रमसायं. ६.३० ते ७.३० वारी सोहळा संताचा (नृत्य)सायं ८:३० ते ९.३० वा. शिवशंभु शौर्यगाथा-शिव सह्याद्री (महानाट्य) या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

0000

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ राज्यातील २० नामवंत संस्थांसमवेत सामंजस्य करार

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या

 ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ

राज्यातील २० नामवंत संस्थांसमवेत सामंजस्य करार

 

            मुंबई‍‍दि. १६ : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC)  मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून येणाऱ्या तीन वर्षात २ लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार असून महा ऐज (MAHA-EDGE) महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘महा ऐज’ (उद्योजकता विकास आणि रोजगार वाढ) (MAHA-EDGE)(Entrepreneurship Development and Growth in Employment) उपक्रमाचा शुभारंभ  करण्यात आला.

            यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदेयांच्यासह या क्षेत्रातील कौशल्य परिषदविद्यापीठेउष्मायन केंद्रांचे २० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

            ‘महा ऐज’ हा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि ‘महाप्रित’ चा एक संयुक्त उपक्रम आहे. ज्या अंतर्गत लक्ष्यित समुदायातील दोन लाख लाभार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले  आहे. यापैकी १.५ लाख लोकांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ५० हजार लाभार्थ्यांना राज्यात उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करण्याची योजना आखली आहेज्याचा उद्देश नवीन युगाच्या क्षेत्रात १०० हून अधिक स्टार्टअप्स तयार करणे हा आहे.

            केंद्र सरकार आणि सामाजिक न्याय विभाग समाजातील सर्व घटकांच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असून ‘महा ऐज’ हा उपक्रम तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर परिणाम करेलअसा विश्वास सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी यावेळी व्यक्त केला.

            सचिव श्री. भांगे म्हणाले की, अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी महामंडळ आणि ‘महाप्रित’ सोबत सहकार्य करण्यासाठी सर्व सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) यांचा समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानून केंद्र सरकारच्या पीएम अजय योजनेअंतर्गत २० हजार लाभार्थ्यांना पहिल्या ट्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनाने शासन आपल्या दारी सारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. महा ऐज उपक्रमांद्वारे युवकांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करेलअशी माहिती महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिंदे यानी यावेळी दिली.

            महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठे आणि उष्मायन केंद्रांच्या सहकार्याने या कार्यक्रमातून निवडलेल्या स्टार्टअप्सना त्यांचे उपक्रम तयार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितलेमहामंडळाने त्या दिशेने आधीच एक पाऊल टाकले आहे आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना आणि इच्छुक उद्योजकांसाठी एक आधार म्हणून काम करण्यासाठीअत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नागपुरात नव्याने सुरू झालेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) इनक्युबेशन सुविधेसोबत सहकार्य केले आहे. महामंडळाचे ५० नवोदित उद्योजकांना त्यांच्या स्टार्ट-अप्सची भरभराट करण्यासाठी सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभे असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            या कार्यक्रमादरम्यान महामंडळाने २० हून अधिक  सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) सह सामंजस्य करार केले. त्यामध्ये प्रामुख्याने अपोलो मेडस्कील्स सारख्या नामवंत संस्थांचा समावेश आहे. विज्ञान तंत्रज्ञान उद्यान, पुणे आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्याशी महा ऐज उपक्रमाच्या अंमलबजावणीस सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आल्या. या उपक्रमाची महामंडळाच्या mpbcdc.in and nbrmahapreit.in  या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येत आहे.

            यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक  प्रशांत गेडामनिवृत्त सह सचिव दिनेश डिंगळेराज्यातील विविध विद्यापीठविविध बँकासामाजिक न्याय विभाग व महामंडळाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

Friday, 16 February 2024

जुन्नरसह आंबेगाव येथील हिरडा पीक नुकसानभरपाई संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा

 जुन्नरसह आंबेगाव येथील हिरडा पीक नुकसानभरपाई

संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पाठवावा

- मंत्री दिलीप वळसे पाटील

 

मदतीचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळासमोर ठेवणार - मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. १६ : जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तत्काळ पाठवावाअसे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. हा प्रस्ताव प्राप्त होताच तो  मंत्रिमंडळासमोर ठेऊन मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईलअशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

            मंत्रालयात आज मंत्री श्री. वळसे पाटील यांनीजुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने बैठक झाली. मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठीआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेमदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जगताप उपस्थित होते. तर कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडामजिल्हाधिकारी सुहास दिवसेउपवन संरक्षक प्रवीण सिंग आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले कीजुन्नर आणि आंबेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने येथील शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी त्यांचे पंचनामेही करण्यात आले. मात्रअद्यापपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही. ही मदत त्यांना मिळावीयादृष्टीने त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावेळ हिरडा पिकाचा बाजारभाव लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावा.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनीविशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येईल आणि त्यास मान्यता घेऊन या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईलअसे स्पष्ट केले. येत्या सोमवारपर्यंत याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील बाधित गावांची संख्या ८१ असून शेतकऱ्यांची संख्या ४१८९ इतकी आहे. केंद्राच्या आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मध्ये याबाबत मदत करण्यास अडचण येत असल्यास विशेष बाब म्हणून ती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईलअसे त्यांनी स्पष्ट केले.

0000

Featured post

Lakshvedhi