Wednesday, 24 January 2024

अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी

 अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 23 : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये राज्याचा समावेश असून राज्यातील 149 अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंबडॉक्टरपरिचारिकारुग्णालयेसमुपदेशकपोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

            यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीराज्यातील अवयवदानाची आकडेवारी वाढली असली तरी एवढ्यावर समाधान न मानता राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहेत्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदान जनजागृतीची गरज आहे.

            वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अवयदानासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. त्यामुळे अवयवदानाची वृत्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेतअसे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. अवयवदात्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राज्य शासनातर्फे श्रद्धांजली अर्पण करावीअशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी  आरोग्य विभागाला केली आहे.

००००

स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा

 स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

            मुंबईदि. २३ : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छसुंदरप्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असताना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेतअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईत सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) बाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाखासदार राहुल शेवाळेआमदार राम कदममुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशीअश्विनी भिडेपी.वेलारासूडॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीडीप क्लिन ड्राइव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे. ही मोहीम मुंबईच्या प्रत्येक गल्ली आणि रस्त्यापर्यंत पोहचायला हवी. प्रत्येक रस्तागल्लीसह सार्वजनिक शौचालये नियमितपणे स्वच्छ व्हायला हवी. या मोहिमेचा परिणाम मुंबईच्या अंतर्गत भागात दिसायला हवा. यासाठी लागणारे मनुष्यबळयंत्रसामुग्रीची गरज भागविण्यासाठी गरज भासल्यास बाहेरील संस्थांची मदत घ्यावी. स्वच्छतेसोबतच वृक्षारोपणहिरवाई तयार करणेसुशोभिकरण याकडे लक्ष द्यावे. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करुन त्यांच्यावर सुशोभिकरणाची जबाबदारी सोपवावी. महानगरपालिकेची रुग्णालयेसमुद्रकिनारेमंडईशाळांचे परिसर यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले कीमुंबईच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांना हटवून स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. मोहीम सुरु झाल्यापासून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या बदलासाठी ही चांगली सुरुवात आहे. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी उत्साहाने योगदान देत आहेत. त्यांच्या सर्व वसाहतींच्या विकासाची कामे तातडीने सुरु करावीत. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डातील सहाय्यक आयुक्तांनी थेट फिल्डवर उतरुन काम करावे. वॉर्डांमध्ये स्पर्धा ठेवून चांगले काम करणाऱ्या वॉर्डांना गौरवण्यात यावे. यामुळे मोहिमेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेलअसेही त्यांनी सांगितले.

            यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या विविध वार्डांचे सहाय्यक आयुक्त दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

0000

Tuesday, 23 January 2024

कई लोग इलाज के लिए मुंबई जाते हैं। यह उपयोगी जानकारी है। कृपया इसे सहेजें:*

 *कई लोग इलाज के लिए मुंबई जाते हैं। यह उपयोगी जानकारी है। कृपया इसे सहेजें:*


  *डी मार्ट* *डी मार्ट के प्रमोटर राधाकिशन दमानी ने मुंबई में इलाज करा रहे मरीजों के परिवारों के लिए 53 कमरों के साथ *ए* मेट्रो सिनेमा क्वींस रोड मुंबई के पास *गोपाल हवेली* में एक सुविधा का निर्माण किया है। इसका उद्घाटन कल किया गया। यह बहुत अच्छे से किया। शुभचिंतकों की ऐसी किसी भी वास्तविक आवश्यकता का उल्लेख किया जा सकता है।

  पता:

  गोपाल हवेली

  50, क्वीन रोड (सिनेमा लेन)

मेट्रो सिनेमा के पास

  मुंबई 400 020

  संपर्क जानकारी:

  व्हाट्सएप एप्लीकेशन। गतिमान

  91 88799 86893

  ईमेल:

  fd@gpalmansion.com

  gm@gpalmansion.com

  दूरभाष नं: 022 22055001/02

  www.gpalmansion.com

  दरें हैं

  बहुत ही उचित

  नाश्ता 30

  लंच प्लेट 75

  खाने की थाली 75

  800 कमरे

रसोई और भोजन कक्ष बहुत विशाल।

  कृपया ज्यादा से ज्यादा शेयर करें। आप सब कैसे हैं

  मुंबई में आपातकालीन रिश्तेदारों के मामले में, पी.एल. इस जानकारी को सभी के साथ साझा करें। * हम मरीजों और रिश्तेदारों को मुफ्त टिफिन प्रदान करते हैं। *क्षेत्र - दक्षिण मुंबई

  अस्पताल:- जसलोक, सैफी, बॉम्बे, नायर, जेजे, मुंबई सेंट्रल और वीटी के पास ....

  संपर्क जानकारी:-

  आप हमें व्हाट्सएप भी कर सकते हैं

  *कल्पेश लोढ़ा 9967236006*

  *मनोज पटवारी 9820645070*

  *अमृत जैन 9029373751*

कम से कम ऐसे लोगों के साथ आगे बढ़ें जो आगे बढ़ सकें और दूसरों की मदद कर सकें।

  * आर.के. होम मेडिकल डिवाइसेस को एक चैरिटेबल ट्रस्ट द्वारा लॉन्च किया गया है।

  * *व्हीलचेयर*

  * *सक्शन मशीन*

  * *पानी का बिस्तर*

  * *एयरबेड*

  * *केर टैक्स*

  उपयोग करने के लिए नि: शुल्क (वापसी योग्य जमा के साथ)

  संपर्क व्यक्ति:-

  *संजय शाह 9322516628*

  *चिंतन पंड्या :- 7666311942*

*जोड़ें:-17-डी, निसारगा उत्तर प्रदेश। आईडीबीआई बैंक के पास, महावीर नगर, कांदिवली पश्चिम मुंबई 67 67 *

  *साईं वल्यात्री साक्षरता पॉलीक्लिनिक*

  "कंबर दरबार" शांतिलाल मोदी रोड, भूराभाई हॉल के सामने, कांदिवली (पश्चिम), मुंबई।

  * टी: 02265811644 *

  *0222865 9615*

  *www.kambardarbar.org*

  * दिन का समय *

  1. *सामान्य ओपीडी* ₹1/- केवल दवाओं सहित

  दैनिक 11-30 पूर्वाह्न और 4-30 अपराह्न

  2. *एक्स-रे* ₹100/-

  प्रतिदिन 9 से 5-00 . तक

  3. *ईसीजी* ₹70.00

  प्रतिदिन _ * * * सुबह 9 बजे से 11.00 बजे तक * 

*. *पैथोलॉजी* अत्यधिक सब्सिडी वाली दरें। केवल सीबीसी ₹20/-।

  दैनिक 8.30 से 12.00

  *. *आंखों की जांच* 20/-

  3.30.30 दैनिक

  सुबह_ 9 बजे: बुध, शुक्र, शनि।

  मोतियाबिंद सर्जरी: सर्वश्रेष्ठ भारतीय लेंस के साथ निःशुल्क।

  लेजर (फेको) सर्जरी:

  5,300/- यू.एस. फोल्डेबल लेंस आयात करना

  / 10,000/- यूके ने फोल्डेबल हरफेरिक लेंस का आयात किया। (बाहरी दर 40,000/- है

  *. *स्त्री रोग/आईवीएफ/हिस्टेरोस्कोपी*

  _मंगल/गुरु/शुक्र। दोपहर 1 बजे

  7. *त्वचा का फटना। * .00 20.00

  सोमवार दोपहर ..pm

  8. *आर्थोपेडिक* 20.00

  मंगलवार 3.30.30_

9. *मधुमेह और कार्डियो* .00 20.00

  बुधवार रात 8:30 बजे।

  10. *बच्चे का विभाजन। * .00 20.00

  शुक्रवार शाम 5.30 बजे

  11. कान/नाक/गला *.00 20.00

  बुधवार / शुक्रवार शाम 4-30 बजे_

  12. *दंत चिकित्सा* नाममात्र शुल्क आरसी शुल्क: ₹750/-।

  प्रतिदिन सुबह 9 बजे से दोपहर 1.00 बजे तक सायं 0.00 बजे से सायं 00.00 बजे तक

  1.. *डायलिसिस* बीपीएल मरीजों के लिए नि:शुल्क

  दैनिक (फोन: 28067645)

14. *सर्वाइकल कैंसर* (सर्वाइकल कैंसर) टेस्ट फ्री

  15. *एंटी कैंसर इंजेक्शन* 14 से 24 साल की उम्र की लड़कियों के लिए।

  16. *वरिष्ठ नागरिकों के लिए वास्तविक सुनवाई*, वास्तविक लागत का 50%। जन्म के समय पात्र बच्चों के लिए निःशुल्क।

  1.. *गर्मी की छुट्टियों के दौरान सभी छात्रों को रियायती दरों पर नोटबुक और अन्य हार्डवेयर आइटम।

  18. * *बी.बी. एमबीबीएस सीए सीएस बी.पी.एच.आर.एम. एम.सी.ए. और एमबीए चुना। छात्रों के लिए पात्र उम्मीदवारों के लिए उच्च शिक्षा के लिए छात्रवृत्ति *। *उपहार*

www.kamberda bar.org और सभी आवश्यक संपार्श्विक के साथ फॉर्म जमा करें।

  कृपया संपर्क करें p_zijn zasainani@rediffmail.com ईमेल

  * किसी सिफारिश की आवश्यकता नहीं है। * कृपया बाँटें। **** जैसा प्राप्त हुआ


जिस ग्रुप को आप जानते हैं उसे भेजें, किसी को फायदा होगा 🙏

अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

 अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

देवेंद्र फडणवीस

   राम लल्लाचे दर्शनाला सर्व सोबत जावूया

   प्रतिष्ठापना सोहळ्याच्या थेट प्रक्षेपण सोहळ्यात सहभाग

   रामनगर येथील मंदिरात राम दर्शन

 

            नागपूरदि.22 अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लल्ला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जावूयाअसे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होवून गर्भगृहात राम लल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी श्री. फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्तर भारतीय मोर्चाचे सुरेंद्र पांडेमाजी आमदार डॉ. आशिष देशमुखशैलेश जोगळेकरसंजय बंगालेजयप्रकाश गुप्ताशाम पत्तरकीनेप्रणिता फुकेअश्विनी जिचकारसंदीप गवई आदी उपस्थित होते.

            भारतीय इतिहासात 22 जानेवारी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले राम जन्मभूमीसाठी अनेक आंदोलने झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला. राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदीर पूर्ण झाले आहे.

कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्तापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनिय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज  भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे. त्यामुळे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.

           श्री. फडणवीस यांनी रामनगर येथील मंदिराला भेट देवून श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात राम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेचा क्षण सर्वांना अनुभवता यावा तसेच या क्षणाचे साक्षिदार होता यावे यासाठी या परिसरात एलएडी स्क्रीनद्वारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे तीन तास चाललेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन राम जन्मभूमी  उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला.

0000


Monday, 22 January 2024

राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

 राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना

मुंबई दि. 22 : अयोध्या येथे प्रभू श्री रा




म मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली.

राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला.

राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती.

साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला.  

श्री राम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस यांचे कुटुंबिय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांना कौतुकाची थाप दिली. 

0000

Maha Governor performs consecration of Shriram Darbar in Raj Bhavan Complex

Maharashtra Governor Ramesh Bais performed the consecration of the Shri Ram Darbar in the Sri Gundi Mandir Complex in Raj Bhavan on Monday (22 Jan).

The consecration ceremony was organised to coincide with the consecration of the Shri Ram Temple in Ayodhya.

The Governor accompanied by his wife Rambai Bais performed the aarti alongwith his family members and the residents of Raj Bhavan complex.

Raj Bhavan has an ancient temple of Sri Gundi, also known as Sagar Mata and Sakalai. Prime Minister Narendra Modi had visited the renovated Sri Gundi Mandir in the Raj Bhavan premises during his visit on 14th June 2022.

The Governor and Smt Rambai Bais were welcomed and felicitated by the members of the Raj Bhavan Devi Mandir Committee.

The Governor and Smt Rambai Bais met the teams of construction workers of the temple and applauded the Raj Bhavan Devi Mandir Samiti for maintenance and cleanliness of the temple.

0000

आरोग्य फक्त आपल्या हातात!!*

 *अहमदनगर आयुर्वेद एक्सपो मध्ये वैद्य सुविनय दामले सर यांनी दिलेल्या व्याख्यानाचा सारांश.*

*✍️..आरोग्य फक्त आपल्या हातात!!*


*अनेक वेळेस अनेक मेडीकल चेकअप कॅम्प्स लावले जातात  तज्ञ डाॅक्टर येणार, आधुनिक यंत्रानी तपासण्या होणार, भविष्यातील रोगाचे निदान लवकर होणार, अर्ध्या किंमतीत तपासण्या, तपासणी पॅकेज ऑफर..*


*अशा कोणत्याही आमिषांना कुणी बळी पडू नये.🙏🙏🙏*


एक वैद्य / डाॅक्टर म्हणून कुणीही असं जाहीरपणे सांगणार नाही.. पण... बुडते हे जन देखवेना डोळा.... म्हणून सांगायचं धाडस करतोय....


खरं सांगायचं तर अशा फ्री चेक  कॅम्प मधूनच नवीन नवीन रोग जन्माला घातले जातात. कुठेतरी रिपोर्ट मधे जरा कमी जरा जास्त दाखवले जाते. (प्रत्यक्षात ते खरे असतात का देव जाणे ! 😡)

पण एक किडा डोक्यात सोडून दिला जातो. नसलेल्या रोगावर स्लो पाॅयझन औषधे सुरू होतात. कॅल्शियम कमी, थोडंस बीपी, थोड्डासा इसीजीतला बदल, कदाचित कॅन्सर होऊ शकेल अशी एवढुशी गाठ, थायराॅईड वाढतंय, शुगर बाॅर्डरवर आलीय, कोलेस्टेरॉल वाढलंय...


अश्या अनेक लक्षणांपैकी प्रत्येकाला एक एक संभाव्य धोकेदायक भीती सांगितली जातात. आपणही, "चला आता औषधाना सुरवात झाली..." असं स्वतःच कौतुक करीत एकच गोळी खायला सुरवात करतो. 

( सुरवातीला अभिमानाने फाईल फिरवली जाते. मोठ्या मोठ्या सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटलची नावे घ्यायला, इम्प्रेशन मारायला जरा बरं वाटतं...)


असं करता करता किती वर्ष आपण नाहक केमिकलची गोळी खातोय, हे पण लक्षात येत नाही.

जसं, जरासा रक्तदाब वाढला की एक गोळी आयुष्यभरासाठी सुरू होते, ( ज्या रक्तदाबाचा खरंतर आपल्याला काहीच त्रास नसतो  आणि काहीवेळा रक्तदाब वाढणे ही शरीराची गरज पण असते....)

त्या गोळीने लघवीला जास्ती होते . रक्तातील पाणी जबरदस्तीने बाहेर काढले जाते. ताण निर्माण करतो मनावर...


टेन्शन मेंदुला, 🧠 रोगाचे नाव रक्ताशी संबंधीत असलेल्या 🫀 ह्रदयावर... आणि औषध जातंय किडनीवर काम करायला !  यालाच म्हणतात रोग मांडीला औषध शेंडीला.. असो ! 


.....तर लघवीला जास्त झाल्याने रक्ताची पीएच बदलते. थोडक्यात रक्त जाड होते. 

आता रक्त पातळ करणारी गोळी सुरू होते. ही एस्पीरीनची एकच गोळी, ह्दयातील रक्त पातळ करताकरता सर्व अंगातील रक्त पातळ करते. (ही गोळी बाकी सर्व अवयवतज्ञांना देखील नको असते. जसे डेंटीस्ट,🦷 सर्जन, ऑर्थोपेडीक्स,👨‍🦽 गॅस्ट्रोएन्टराॅलाॅजिस्ट, इ.इ. कारण या गोळीने रक्त ❣️गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ) परिणामी महत्वाच्या अवयवातील रक्ताची पीएच बदलते. ते अवयव कमजोर व्हायला लागतात. (दुधात पाणी घातलेल्या चहाचा आनंद कसा मिळेल. 🤨 ) अवयवांची उपासमार सुरू होते. अधिक केमिकलची भर रक्तात पडत जाते. तेवढे केमिकल बाहेर काढायला यकृत, किडनी, फुप्फुसे, गर्भाशय इ. अवयवांना आपण छळतो.

आवश्यकतेपेक्षा  रक्त जाड झाल्याने चिकटपणा वाढतो, (त्याला एलोपॅथीनुसार कोलेस्टेरॉल म्हणतात.) आणि चरबी चिकटणे सुरू होते.... 

इथेच फॅटी लिव्हर (या नसलेल्या आजाराचा ) जन्म होतो.


"आता त्यावरची गोळी सुरू करूया."

आता येतो औषधातील स्टॅटीन गट !  या गटातील औषधी सुरू झाल्या की रक्तातील साखर वाढायला सुरवात होते. 🧊 म्हणजे रिपोर्ट मधे डायबेटिस दिसतो.  (प्रत्यक्षात डायबेटिसचे एकही लक्षण रुग्णाला जाणवत नसते. मी याला टाईप 3 डायबेटिस म्हणतो.😶) 

अशीच पाच सहा वर्षे जातात. अजूनही एकही औषध बंद होत नाही. 


कधीतरी थायराॅईड तपासले तर ते पण हट्टाने वाढते किंवा कमी होते.... त्याचीच कमी होती... सुरवातीला 25 नंतर 50...100 अशी चढती भाजणी सुरू होते. आणि समप्रमाणात साईड इफेक्ट्स पण ! 


याच गोळ्यांचा परिणाम म्हणून क्रिएटीनीन वाढत जाते. आता ... ?

 डायलेसीस... 😡😡


तोपर्यंत भरल्या खात्यापित्या घरात😽 चार वेळेस जेऊन सुद्धा जीवनसत्वांची कमतरता दिसायला लागते. मग.... ?

 व्हिटॅमिन्सचा मारा सुरू होतो.

Vit A, B, C D ...Z पर्यंत गोळ्या सुरू होतात. ज्यांची खरंतर गरजच नसते.


आता... ? 

अनावश्यक केमिकल, सांध्यांच्या आजूबाजूला जमायला सुरवात झालेली असते. 


दुखतंय दुखतंय या गोंडस नावाने व्यायामाला फाटा देऊन, कमोडवर बसायला सुरवात झालेली असते. डाॅक्टरनी, "तुमच्यासाठी हा एकच व्यायाम आहे,"असं सांगितल्यामुळे वाढलेली ढेरी सांभाळत, गुडघ्यावर भार टाकत, एका बाजूने लंगडत चालायला सुरवात केली जाते. 

माॅर्निंग वाॅकच्या 🏃‍♀️🏃‍♂️ क्रेझपायी ( सक्काळी सक्काळी चालणे हा भारतीय व्यायाम प्रकारच नाही. )  आमचे सांधे आणखीनच झिजवले जातात. 


आता वेदनाशामक औषधे आत जायला लागतात. आतड्यांची कोमल त्वचा जळायला लागलेली असते.

पोटदुखी सुरू होती. त्याच्या तपासण्या आणि स्कोपी.. सगळ्या छिद्रातून आतमधे नळ्या घालून तपासून त्यातून अल्सर, टीबीची लक्षणे ते अगदी कॅन्सर पर्यंत शंका डाॅक्टर घेतातच. या खरंतर फक्त शंकाच असतात. बहुतेक वेळेस खरं काहीच नसतं.... केवळ सस्पेक्ट ऑफ.... असतं. 


काही महाभाग वाॅटसप एफबीचे सल्ले वाचून, जाहीरातींना बळी पडून तोडकरी आयुर्वेदीय बोगस सल्ले, एमवे हेल्थ, नोनी, आणि नको नको ती औषधे स्वतःच्या मनाने खातच असतात  (म्हणे आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात....किती खोटं ? अहो, ज्याला इफेक्ट्स असतात, त्याला साईड इफेक्ट्स असणारच ना ! असो. ) यासाठी कायम आयुर्वेदातील तज्ञ, शासनमान्य अधिकृत वैद्यांचा सल्ला घ्यावा. 

एव्हाना दहा पंधरा प्रकारच्या गोळ्या सुरू झालेल्या असतात.

( बिचार्‍या पोटाने काय काय केमिकल सहन करायची ? )


 कुणीतरी आयुर्वेदातील तज्ञ गाठतोही, पण आधीच्या केमिकलच्या गोळ्या औषधे सुरू ठेवून स्वतःची चूर्णे, गोळ्या वट्या ते वैद्य देतातच. 


एवढं करून छातीत, पाठीत दुखणं सुरूच असतं.

फाईलमधील  कागद वाढतच जातात....

गोळ्या, 💉 औषधे सुरूच असतात...

गुण चार आणे पण नाही..

दुखणे वाढतच असते...

बाहेरची बाधा तपासून अंगारे धुपारेही होतात..☠️

वास्तुशास्त्रानुसार ⚒️🪚 तोडफोड होते...

नवीन रत्न, ♦️🟣आभूषणे खरेदी होते...

लांबलांबचे वैदू, डाॅक्टरही🩺 पाठी पडतात...

पण कोणालाच अचूक निदान☹️ मिळत नाही....

'एनर्जी' 💪💪काही वाढत नाही....


'इमर्जन्सीमधे' इसीजी, स्ट्रेसटेस्ट, एन्जियोग्राफी, लगेचच इमर्जन्सी एन्जीयोप्लास्टी 😡 करायला भागच पाडले जाते.

 ज्या कारणासाठी डाॅक्टरकडे जातोय, ते कारण/लक्षण बाजूलाच रहाते आणि नकोतेच निदान बाहेर येते आणि नकोती औषधे, नको ते पथ्य, पुनः त्यातून कमतरता... कायम स्वरूपी पाठी लागतात.


बघा पटतंय का ? 👊


याची सुरवात कुठुन झाली.. ते आठवा... फ्री चेकअप कॅम्प्स अथवा स्वतःच्या मनाने करवून घेतलेल्या तपासण्या, किंवा सहजपणे डाॅक्टरनी सांगितलेल्या आरोग्य तपासण्या ! ... आणि फक्त एकच 💊 गोळी ! 


यालाच म्हणतात आ बैल मुझे मार ! 

आता काय करायचं हे आपण ठरवा.

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

उगाच वाद घालत अथवा शंका घेत राहू नका! 📢

नागरिकांना अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल

 नागरिकांना अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा मिळणार

दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी

राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. १८ : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्णजलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

             एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर काल चर्चा केली.

            एमएसटीएआर हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे.

            या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. शिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील.  

            यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. यामुळे या सेवा देण्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

            हिताची एमजीआरएम नेटचा एमएसटीएआर प्लॅटफॉर्म हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आरोग्य सेवा देण्यातील अडचणी ओळखून सुलभरीत्या या सेवा देण्याची व्यवस्था यात विकसित करण्यात आली आहे. या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होऊन त्या अधिक कार्यक्षम बनतील.

0000


नागरिकों को अत्याधुनिक डिजिटल स्वास्थ्य सेवा मिलेगी

दावोस में हिताची एमजीआरएम नेट के साथ भागीदारी

राज्य में बुनियादी स्वास्थ्य  सुविधाओं में आयेगी क्रांति

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. १८ :  राज्य की १२ करोड़ जनता को अत्याधुनिक डिजिटल सेवा के रूप में गुणवत्तापूर्णशीघ्र और सुलभ स्वास्थ्य सेवा प्राप्त होगी। इस संदर्भ में स्वित्झर्लंड के दावोस में हिताची एमजीआरएम नेट के साथ भागीदारी किये जाने से  स्वास्थ्य के  क्षेत्र में परिवर्तन होगामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा।

             एमएसटीएआर  प्लॅटफॉर्म के माध्यम से स्वास्थ्य सेवा  देने के लिए कंपनी के वरिष्ठ अधिकारियों के साथ मुख्यमंत्री ने कल विभिन्न मुद्दों पर चर्चा की।

            एमएसटीएआर एक नवीनतम प्लॅटफॉर्म होने से इसमें राज्य की जनता को आयुष्मान भारत डिजिटल मिशन के अनुरूप डिजिटल स्वास्थ्य सेवा  देने की सुविधा है।

            इस भागीदारी से राज्य में स्वास्थ्य की बुनियादी सुविधाओं में क्रांति आयेगी।  नागरिकों को बिना किसी अड़चन के स्तरीय और आधुनिक स्वास्थ्य सेवा मिलेगी। इसके लिए सभी का स्वास्थ्य रेकॉर्ड  अपडेट रखना होगा।  रिमोट पद्धति से चिकित्सीय जांच व परीक्षण किये जा सकेंगे। 

            इस संदर्भ में मुख्यमंत्री ने कहाअत्याधुनिक तकनीकी का इस्तेमाल  कर नागरिकों को अच्छी स्वास्थ्य सेवा प्रदान करना ही हमारा उद्देश्य है। ऐसा करने से स्वास्थ्य  सेवा देने का स्तर ऊंचा उठाने में मदद मिलेगी।

            हिताची एमजीआरएम नेट का एमएसटीएआर प्लॅटफॉर्म अत्याधुनिक उपक्रम है। स्वास्थ्य सेवा देने में आने वाली अड़चनों को देखते हुए सुलभ तरीके से स्वास्थ्य सेवाएं  देने की व्यवस्था इसमें विकसित की गयी है। इस भागीदारी से राज्य में स्वास्थ्य की बुनियादी सुविधाओं में बड़े पैमाने पर तकनीकी प्रगति होगी और  कार्यक्षमता में वृद्धि होगी।‌

0000

Citizens will get State-of-the-Art Digital Health Services

Maharashtra inks MOU with Hitachi at Davos, Switzerland

This will revolutionize Health Care Infrastructure in Maharashtra

- Chief Minister Eknath Shinde

 

      Mumbai January 182024: Maharashtra Chief Minister Shri. Eknath Shinde said that the over 12 crore population of the State will immensely benefit from quick, quality and simplified healthcare facilities through the exploitation of State-of-the-Art Digital Services. Electronics major Hitachi entered into a partnership with MGRM Net at Davos in Switzerland in a move that will transform the State’s Health Care Sector, Shri. Shinde added.

      Maharashtra’s Chief Minister also held discussions on various facets for providing health care services through the MSTAR platform before inking of the agreement with senior officials of the multinational company.

      The innovative MSTAR platform facilitates delivery of digital health care services to people in line with the Ayushman Bharat Digital Mission.

      “This partnership will revolutionize the health infrastructure in the State. Citizens will get quality and modern healthcare without any hindrance whatsoever. In addition, this will allow for the up-to-date maintenance of every treated persons’ health records. Medical tests and examinations will be conducted remotely under the online system. Our aim is to provide good health services to citizens by making use of the latest technology. This will also help in raising the bar on qualitative medical services being provided by the State.” Chief Minister Shri. Shinde further noted.

      Hitachi MGRM Net's MSTAR platform is a new and innovative innovation. The partnership is expected to enable major technological advancements in the health infrastructure of the state and make it more efficient.

0000

Featured post

Lakshvedhi