Wednesday, 24 January 2024

अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी

 अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 23 : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये राज्याचा समावेश असून राज्यातील 149 अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंबडॉक्टरपरिचारिकारुग्णालयेसमुपदेशकपोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

            यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीराज्यातील अवयवदानाची आकडेवारी वाढली असली तरी एवढ्यावर समाधान न मानता राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहेत्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदान जनजागृतीची गरज आहे.

            वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अवयदानासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. त्यामुळे अवयवदानाची वृत्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेतअसे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. अवयवदात्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राज्य शासनातर्फे श्रद्धांजली अर्पण करावीअशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी  आरोग्य विभागाला केली आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi