Tuesday, 23 January 2024

अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

 अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

देवेंद्र फडणवीस

   राम लल्लाचे दर्शनाला सर्व सोबत जावूया

   प्रतिष्ठापना सोहळ्याच्या थेट प्रक्षेपण सोहळ्यात सहभाग

   रामनगर येथील मंदिरात राम दर्शन

 

            नागपूरदि.22 अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लल्ला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जावूयाअसे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण होवून गर्भगृहात राम लल्ला विराजमान होणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी श्री. फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्तर भारतीय मोर्चाचे सुरेंद्र पांडेमाजी आमदार डॉ. आशिष देशमुखशैलेश जोगळेकरसंजय बंगालेजयप्रकाश गुप्ताशाम पत्तरकीनेप्रणिता फुकेअश्विनी जिचकारसंदीप गवई आदी उपस्थित होते.

            भारतीय इतिहासात 22 जानेवारी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले राम जन्मभूमीसाठी अनेक आंदोलने झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला. राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदीर पूर्ण झाले आहे.

कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्तापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनिय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज  भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे. त्यामुळे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.

           श्री. फडणवीस यांनी रामनगर येथील मंदिराला भेट देवून श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात राम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणेचा क्षण सर्वांना अनुभवता यावा तसेच या क्षणाचे साक्षिदार होता यावे यासाठी या परिसरात एलएडी स्क्रीनद्वारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे तीन तास चाललेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन राम जन्मभूमी  उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi