Tuesday, 16 January 2024

नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

  नरेंद्र मोदी यांनी

कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

 

            नाशिकदि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचा शिक्षक भाऊसाहेब रण या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य विद्यालयांचा लाभ घेऊन एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण करावीतअसे आवाहनही त्यांनी केले. 

            यावेळी केंद्रीय आरोग्यकुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळखासदार हेमंत गोडसेआमदार हिरामण खोसकरआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडेआदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडजिल्हाधिकारी जलज शर्माजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलआदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळीसंदीप गोलाईतनाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमानप्रांताधिकारी रवींद्र ठाकरेगट विकास अधिकारी सोनी नाखाडे यांच्यासह कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी कु. भारती रण व भाऊसाहेब रण यांना मिळालेल्या शैक्षणिक योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. तसेच पी. एम. जनमन अंतर्गत लाभ मिळालेल्या अन्य योजनांबद्दलही माहिती घेतली. त्यांनी सांगितले कीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य विद्यालयांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावाअसेही आवाहन त्यांनी केले.

            कातकरी समाजातील लाभार्थी गोकुळ देवराम हिलम मनोगत व्यक्त करताना म्हणाले कीप्रधानमंत्री आवास योजनेसह अंत्योदय रेशन कार्डवनधन योजनेंतर्गत वनधन केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.

            केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्याअतिमागास भागातील आदिवासी बांधवाना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या मुलांना उत्तम गुणवत्तेच्या शिक्षणासाठी एकलव्य विद्यालयाच्या माध्यमांतून प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेतून वंचितांपर्यंत योजना पोहोचविल्या जात आहेत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सिकलसेल आजारावर वेळीच औषधोपचार करून त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. रामजन्म भूमी पूजनाच्या माध्यमातून मंदिर स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहचवून त्यासाठी सर्वांनी काम करावेअसेही त्यांनी आवाहन केले.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य : डॉ. विजयकुमार गावित

            आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले कीपी. एम. जनमन महा अभियानाच्या माध्यमातून कमी वेळेत आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आवास योजनेचा निधी वाढवून देण्यासाठी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. घरकुल योजना 100 टक्के राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कातकरी बांधवांचे स्थलांतर थांबवीत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेतत्याचा त्यांनी लाभ घ्यावा.

            विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले कीआदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनेचे उद्दिष्ट वाढवून मिळावे. प्रत्येक गरजूला घरकुलाचा लाभ मिळवून द्यावाअशी अपेक्षा व्यक्त  केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

            त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवारआदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांसह मान्यवरांच्या हस्ते मोबाईल युनिट व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तसेच मान्यवरांनी कपिलधारा मंदिर परिसराची स्वच्छता ही केली.

        या लाभार्थींना केले योजनांचे लाभ वाटप.....

MSEB नवीन वीज कनेक्शन

भाऊसाहेब पांडुरंग रनकल्पना आनंदा वाघनामदेव लक्ष्मण गावितसुरेश खंडू वाघसखाराम देवराम मुकणेपीएम किसान क्रेडिट कार्डज्ञानेश्वर नामदेव वाघमंदाबाई बुधा हिलमनारायण सोमा वाघअलका गंगाराम वाघएकनाथ पालू मुकणे

रेशनकार्ड वाटप

विठ्ठल देवराम हिलमसंतोष पांडुरंग रनविलास नारयण रनपिंटु पंढरी हिलीमनारायण दामू रनद्रौपदा भाऊ कवरअंकुश किसन रनप्रकाश पांडुरंग रन

जात प्रमाणपत्र वाटप

देवराम एकनाथ चौरेरोहिदास भगवंत हिलमदत्तु पांडु वाघविठ्ठल नामदेव हिलमपद्मा शांताराम हिलमबाळु भिवा हिलममंदाबाई बुधा हिलमराजाराम बाळु वाघअलका शंकर दिवेवसुंधरा पिंटु मुकणे

आयुष्यमान कार्ड वाटप

मनोहर आनंदा वाघसोनाली अंकुश रनकमल पांडुरंग हिलमफुलाबाई एकनाथ मुकणेकिसन सोमनाथदिवेसविता विठ्ठल वाघ

पी. एम. सन्मान निधी योजना लाभ

पप्पु नाना पवारसान्याबाई लक्ष्मण वाघकिसन सोमा हिलमहरी सिताराम वाघवामन झिपा मुकणे

00000


 

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार

 तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ कलावंत हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन

 

            मुंबईदि. १५ : राज्य शासनाच्यावतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२१ व २०२२ या वर्षातील तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार अनुक्रमे श्रीमती हिराबाई कांबळे आणि अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

            राज्य शासनाने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवन गौरव पुरस्काराचे पुरस्कार्थी निवडण्यासाठी निवड समिती गठीत गठित केली होती. या समितीने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी श्रीमती हिराबाई कांबळे ( सन २०२१) आणि श्री.अशोक पेठकर (सन २०२२) यांची निवड केली.

००००

सन २०२३ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर सां

 स्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन

 

            मुंबईदि. १५ :  संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची आज घोषणा केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

            राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यासाठी निवड समिती गठीत केली होती. या निवड समितीने सन २०२३ यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना देण्याचा निर्णय घेतला.

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (दि. १५ जानेवारी) याबाबतचा शासन आदेश जारी केला.

000

रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे - मंत्री दादाजी भुसे राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा मोहिमेचे उद्घाटन

 रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे

- मंत्री दादाजी भुसे

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा मोहिमेचे उद्घाटन

 






            मुंबईदि. 15 : राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये होत आहेत.  रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राज्य शासन 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या एक महिन्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहे. या अभियानाचा रस्ता सुरक्षावाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती करून अपघात कमी करण्याचा उद्देश आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आणावेअसे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

            रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री. भुसे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरपरीवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीयाअतिरिक्त महासंचालक (वाहतूक) सुखविंदर सिंगसहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रविण पडवळपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारवेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा उपस्थित होते.

            रस्ता सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात असणे गरजेचे असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले कीरस्ता सुरक्षेचे संस्कार लहान वयातच बिंबविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा विचार आता करावा लागेल. राज्यात होत असलेल्या अपघातांमध्ये 60 टक्के अपघात हे दुचाकीचे असतात. दुचाकी अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात यावी. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र आता चित्र बदलत आहे. अनेक नागरिक पुढे येवून गोल्डन अवर’ मध्ये उपचार देवून अपघातग्रस्तांचे प्राण वाचवित आहेत. रस्ता सुरक्षेबाबत उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार निधीची उपलब्धता होत आहे.

            जिल्हा स्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. त्यांच्या स्तरावर जिल्हा नियोजनमधून अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करणेजनजागृती आदींसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येत आहे. परिवहन महामंडळाप्रमाणे चालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी मोहिम राबवावी.  रस्ता सुरक्षा मोहिमेच्या पुढील वर्षीच्या कार्यक्रमात अपघातांचे प्रमाण यावर्षीच्या तुलनेत निश्चितच कमी होण्याची अपेक्षाही मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली.

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे - दीपक केसरकर

            रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावेअसे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

           परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी. स्पीड गनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणावेत्यामुळे निश्चितच अपघात कमी होतील. चालकांनी कटाक्षाने वाहतूक नियम पाळावेत.  नागरिकांना  शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे  हे शासनाचे उद्दिष्ट नाहीअसेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

            परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले,  परिवहन विभाग 37 सेवा फेसलेस पद्धतीने देत असून या सेवांचा आतापर्यंत 68 लाख 61 हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. अपघात कमी करण्यासाठी विभाग अधिक प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.

            यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत अपघातामध्ये लक्षणीय घट होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या मुंबई शहर आणि उपनगरचंद्रपूर व नवी मुंबई येथील परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा रस्ता सुरक्षेबाबत अनुक्रमे प्रथमद्वितीय व तृतीय पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.   तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूतांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यामध्ये खोपोली जि. रायगड येथील गुरूनाथ रामचंद्र साठीलकर व विजय सुरेश भोसलेखालापूर जि. रायगड येथील मो. हनिफ कर्जीकरवर्धा येथील वायरलेस विभागातील हवालदार शशिकांत गजबेमोटार वाहन निरीक्षक कराड येथील  श्रीमती प्रसन्ना पवार यांचा समावेश आहे. मुंबई ते पुणे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुनलेत 32 टक्के अपघात कमी केल्याबद्दल उप परिवहन आयुक्त भरत कळसकरपनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटीलपिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांचा गौरव करण्यात आला आहे. यासोबतच सहा. परिवहन आयुक्त जितेंद्र पाटीलपरिवहन उप आयुक्त (प्रशासन) संजय मैत्रेवारपरिवहन उप आयुक्त (संगणक) संदेश चव्हाण यांचा विशेष कामगिरीसाठी गौरव करण्यात आला.   

            कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा पुस्तिका आणि वेस्टन इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या रस्ता सुरक्षा वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मृण्मयी भजक यांनीतर आभार प्रदर्शन अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

इंटरसेप्टर वाहनांचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

            रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे वाहन असलेल्या इंटरसेप्टर वाहनांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया उपस्थित होते. विभागाला 187 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात 5 वाहनांना ताफ्यात दाखल करून घेण्यात आले.  

                                               

Monday, 15 January 2024

‘मुंबई शाश्वत विकास’ परिषदेचे उद्घाटन मुंबईत 'हॉर्न मुक्त' सप्ताह साजरा करण्याची

 ‘मुंबई शाश्वत विकास’ परिषदेचे उद्घाटन

मुंबईत 'हॉर्न मुक्तसप्ताह साजरा करण्याची राज्यपालांची सूचना

            मुंबई, दि. 15 : जल प्रदूषणवायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी 'हॉर्न मुक्त आठवडा' (नो हँकिंग वीक) साजरा करण्याबाबत पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. 

            अनेक देशात हॉर्नचा आवाज देखील ऐकू येत नाही. त्याउलट आपल्याकडे काही लोकांना विनाकारण हॉर्न वाजविण्याची वाईट सवय आहे. अनेकदा वाहनचालक सिग्नल सुरु होण्यापूर्वी विनाकारण हॉर्न वाजवतात. कर्कश हॉर्नमुळे लहान मुले व वृद्धांना होणाऱ्या त्रासाबद्दल देखील लोक असंवेदनशील होत असल्याबद्दल खेद व्यक्त करून 'नो हाँकिंग'   सप्ताहामुळे ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली.  

            राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सभागृह येथे ‘मुंबई शाश्वत विकास शिखर’ परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते.  विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

            कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरहिंदुजा समुहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजाटाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ शर्माविवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञपार्श्वगायिका अनुराधा पौडवालपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

            शहरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वयं शिस्त आवश्यक असल्याचे सांगून नागरिकांनी पातळ प्लास्टिक पिशव्याचा वापर कमी करावा तसेच गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळाव्याअसे राज्यपालांनी सांगितले.

            सामाजिक व आर्थिक दृष्ट्या शेवटच्या स्तरावरील लोकांचा विकास होत नाही तोवर शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईत पदपथांचा अभाव होत आहे तसेच वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पार्किंगची समस्या वाढत आहे असे सांगून शहरी समस्यांच्या समाधानकारक निराकरणासाठी उपाययोजना झाल्या पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   

‘दिल्लीतील पालिका बाजार प्रमाणे भूमिगत फेरीवाल्यांसाठी झोन व्हावे’

            दिल्लीतील पालिका बाजार प्रमाणे मुंबईत देखील फेरीवाल्यांसाठी भूमिगत बाजारपेठेसाठी  नियोजन व्हावे अशी अपेक्षा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. नदी व जलस्रोतांमध्ये कचरा व सांडपाणी टाकणे बंद झाले पाहिजे असे सांगून शहरांमध्ये लहान मुलेज्येष्ठ नागरिकयुवक अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी स्वतंत्र जागा असल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारत जगातील युवा देश असून कौशल्य शिक्षण तसेच इंग्रजीसह जर्मनफ्रेंच आदी भाषा शिकल्यास युवकांना विविध देशात नोकऱ्या मिळवून जग जिंकता येईल असे त्यांनी सांगितले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरणसंस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील 'मुंबई सस्टेनेबिलिटीपुरस्कार प्रदान करण्यात आले. सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना 'मुंबई शाश्वत विकास जीवन गौरवपुरस्कार देण्यात आला.  डॉ दिवेश मिश्रा (पर्यावरण)अनुराधा पाल (स्त्री शक्ती महिला शास्त्रीय वाद्यवृंद)डॉ. हरिष शेटटी (आहार वेद) अमृत देशमुख (स्वयं वाचन चळवळ) सुजाता रायकर (साथ)लॉरेन्स बिंग (हॉकी)डॉ चिनु  क्वात्रा (खुशिया फाऊंडेशन) यांना देखील राज्यपालांच्या हस्ते 'मुंबई सस्टेनेबिलिटीपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

०००

 

दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजक, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार

 दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य

मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजकगुंतवणूकदारविविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा होणार

तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार होणार

नागरी क्षेत्रातील आव्हानेनाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात सहभागी होणार

           

            मुंबईदि. १५ :- स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार असून या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते नागरी क्षेत्रातील आव्हानेनाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

            दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसहउद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभागएमआयडीसीमुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ जात आहे. एमएमआरडीए व महाप्रित येथील ८ अधिकारी स्वतंत्ररित्या सहभागी होत असून या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौऱ्यामध्ये खाजगी विमानाचा वापर होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत.

            या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन (पॅव्हिलियन) उभारण्यात आले असून याठिकाणी मुख्यमंत्री हे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करतील तसेच मुख्यमंत्री प्रमुख विदेशी उद्योगाच्या प्रमुखांशी देखील चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्राच्या घोडदौडीविषयी माहिती देणारे दृकश्राव्य प्रदर्शन देखील याठिकाणी असेल.

महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग करणार

            १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. ओमानचे उद्योग मंत्रीसौदीचे वित्त मंत्रीदक्षिण आफ्रिकेचे उर्जा मंत्रीदक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर तसेच डीपी वर्ल्ड ( DP World), लुईस ड्रेफस (Louis Dreyfus ) वित्कोविझ एटोमिका (Witkowitz Atomica), या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची चर्चा होईल. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्य देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या दिवशी संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी व मान्यवरांना महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन आयोजित केले आहे.

            १७ तारखेस गौतम अदानी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट असून त्यानंतर मुख्य कार्यक्रमात काँग्रेस सेंटरमध्ये नागरी क्षेत्रातील आव्हानेनाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. याशिवाय कृषीमहिला सहभाग व अन्न सुरक्षा’ या विषयावर ठेवण्यात आलेल्या चर्चासत्रात देखील ते सहभागी होतील

            त्यानंतर मुख्यमंत्री मिशेल एडब्ल्यूएस (Michael aws), लिकस्टनस्टाईनचे (Liechtenstein)चे राजकुमारहिताची कंपनीचे एमडीकार्ल्सबर्ग ग्रुप (Carlsberg Group), दस्सो सिस्टिम्स (Dassault Systems), व्होल्व्हो कार्स च्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठकीत सहभागी होतील. स्विसच्या भारतातील राजदूतांसमवेत चर्चा देखील होणार असून यात ८ कंपन्यांचे सामंजस्य करार केले जातील. याशिवाय इतरही प्रमुख कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशीउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञमाध्यम समूहाचे प्रमुख आदींशी मुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्य संवाद साधणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

            १८ तारखेस सीआयआयने गोलमेज परिषद आयोजित केली असून त्याला केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. कॅपजेमिनी (Capgemini), एपी मोलेर मर्स्क (AP Moller Maersk), बॉल कॉर्पोरेशन (Ball Corporation), यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येणार आहे.

तीन लाख दहा हजार कोटींचे करार करणार

            सुमारे अडीच लाख कोटीची गुंतवणूक या परिषदेच्या माध्यमातून होईल असे नियोजन आहे. ही गुंतवणूक वाढू देखील शकते. पोलादमाहिती तंत्रज्ञानमाहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योगआण्विक ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत – ग्रीन हायड्रोजनहिरे व आभूषणेडेटा सेंटरलॉजिस्टिक्सऑटोमोटिव्ह त्याचबरोबर कृषी- औद्योगिककृषी आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेतयासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले होतेत्यानुसार २० सामंजस्य करार केले जातील. यामध्ये निपॉन आर सेलर मित्तलइंडिया ज्वेलरी पार्ककंट्रोल एसआयनॉक्सए बी ब्रिव्हरीजिंदाल ग्रुप हुंदाई व अन्य कंपन्यांचा समावेश आहे. सर्व करार परदेशी कंपन्यांशी केले जातील असे नियोजन करण्यात आले आहे. हे उद्योग मुंबईपुणे यासह छत्रपती संभाजीनगरगडचिरोलीनागपूरचंद्रपूरजालनारायगड या जिल्ह्यातही येतील.

--

 


जय हो

 


Featured post

Lakshvedhi