Tuesday, 16 January 2024

सन २०२३ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर सां

 स्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन

 

            मुंबईदि. १५ :  संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची आज घोषणा केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

            राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यासाठी निवड समिती गठीत केली होती. या निवड समितीने सन २०२३ यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना देण्याचा निर्णय घेतला.

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (दि. १५ जानेवारी) याबाबतचा शासन आदेश जारी केला.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi