Tuesday, 16 January 2024

नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

  नरेंद्र मोदी यांनी

कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

 

            नाशिकदि. 15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचा शिक्षक भाऊसाहेब रण या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य विद्यालयांचा लाभ घेऊन एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण करावीतअसे आवाहनही त्यांनी केले. 

            यावेळी केंद्रीय आरोग्यकुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळखासदार हेमंत गोडसेआमदार हिरामण खोसकरआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडेआदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडजिल्हाधिकारी जलज शर्माजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलआदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळीसंदीप गोलाईतनाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमानप्रांताधिकारी रवींद्र ठाकरेगट विकास अधिकारी सोनी नाखाडे यांच्यासह कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी कु. भारती रण व भाऊसाहेब रण यांना मिळालेल्या शैक्षणिक योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. तसेच पी. एम. जनमन अंतर्गत लाभ मिळालेल्या अन्य योजनांबद्दलही माहिती घेतली. त्यांनी सांगितले कीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य विद्यालयांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावाअसेही आवाहन त्यांनी केले.

            कातकरी समाजातील लाभार्थी गोकुळ देवराम हिलम मनोगत व्यक्त करताना म्हणाले कीप्रधानमंत्री आवास योजनेसह अंत्योदय रेशन कार्डवनधन योजनेंतर्गत वनधन केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.

            केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्याअतिमागास भागातील आदिवासी बांधवाना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या मुलांना उत्तम गुणवत्तेच्या शिक्षणासाठी एकलव्य विद्यालयाच्या माध्यमांतून प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेतून वंचितांपर्यंत योजना पोहोचविल्या जात आहेत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सिकलसेल आजारावर वेळीच औषधोपचार करून त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. रामजन्म भूमी पूजनाच्या माध्यमातून मंदिर स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहचवून त्यासाठी सर्वांनी काम करावेअसेही त्यांनी आवाहन केले.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य : डॉ. विजयकुमार गावित

            आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले कीपी. एम. जनमन महा अभियानाच्या माध्यमातून कमी वेळेत आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आवास योजनेचा निधी वाढवून देण्यासाठी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. घरकुल योजना 100 टक्के राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कातकरी बांधवांचे स्थलांतर थांबवीत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेतत्याचा त्यांनी लाभ घ्यावा.

            विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले कीआदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनेचे उद्दिष्ट वाढवून मिळावे. प्रत्येक गरजूला घरकुलाचा लाभ मिळवून द्यावाअशी अपेक्षा व्यक्त  केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

            त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवारआदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांसह मान्यवरांच्या हस्ते मोबाईल युनिट व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तसेच मान्यवरांनी कपिलधारा मंदिर परिसराची स्वच्छता ही केली.

        या लाभार्थींना केले योजनांचे लाभ वाटप.....

MSEB नवीन वीज कनेक्शन

भाऊसाहेब पांडुरंग रनकल्पना आनंदा वाघनामदेव लक्ष्मण गावितसुरेश खंडू वाघसखाराम देवराम मुकणेपीएम किसान क्रेडिट कार्डज्ञानेश्वर नामदेव वाघमंदाबाई बुधा हिलमनारायण सोमा वाघअलका गंगाराम वाघएकनाथ पालू मुकणे

रेशनकार्ड वाटप

विठ्ठल देवराम हिलमसंतोष पांडुरंग रनविलास नारयण रनपिंटु पंढरी हिलीमनारायण दामू रनद्रौपदा भाऊ कवरअंकुश किसन रनप्रकाश पांडुरंग रन

जात प्रमाणपत्र वाटप

देवराम एकनाथ चौरेरोहिदास भगवंत हिलमदत्तु पांडु वाघविठ्ठल नामदेव हिलमपद्मा शांताराम हिलमबाळु भिवा हिलममंदाबाई बुधा हिलमराजाराम बाळु वाघअलका शंकर दिवेवसुंधरा पिंटु मुकणे

आयुष्यमान कार्ड वाटप

मनोहर आनंदा वाघसोनाली अंकुश रनकमल पांडुरंग हिलमफुलाबाई एकनाथ मुकणेकिसन सोमनाथदिवेसविता विठ्ठल वाघ

पी. एम. सन्मान निधी योजना लाभ

पप्पु नाना पवारसान्याबाई लक्ष्मण वाघकिसन सोमा हिलमहरी सिताराम वाघवामन झिपा मुकणे

00000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi