Wednesday, 17 January 2024

औषध घेताना या चुका करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावं.....!*

 *औषध घेताना या चुका करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावं.....!*

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकवेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

*केळी...*

आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळींमध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल जसे की, कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी घेत असाल तर केळीसहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.

*आंबट फळं...*

 जेव्हा तुम्ही औषधे घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.

*चहा-कॉफी...*

औषधे ही गरम गोष्टींमुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्यासोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला मिळत नाही. अशात बरं होईल की, तुम्ही चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थासोबत किंवा पेयासोबत औषध घेऊ नये. औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबत घ्यावीत.

*डेअरी प्रॉडक्ट्स...*

 डेअरी उप्तादने जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ तुमच्या शरीरात काही एन्टीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीनसोबत काही रिएक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.

*अल्कोहोल...* अल्कोहोलसोबत औषधे अजिबात घेऊ नये. औषधांमध्ये असे अनेक केमिकल्स असतात, जे अल्कोहोलसोबत रिएक्शन करू शकतात. अशात औषधांचा फायदा होण्याऐवजी याने जीवाला धोकाही होऊ शकतो.

*कोल्ड ड्रिंक्स...*

 सोडा आणि कोल्ड ड्रिंक्ससोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*

-------------------------

*

मुंबईत 18 व 19 जानेवारीला देशातील पहिला मध महोत्सव

 मुंबईत 18 व 19 जानेवारीला देशातील पहिला मध महोत्सव

            मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मध माशापालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृतीप्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. मुंबई येथील  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी  पत्रकार परिषदेत केले.

            मंत्रालयातील मंत्रालय आणि  विधिमंडळ वार्ताहर कक्षात श्री साठे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

            मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाची जोडलेला आहे.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे परागमेणरॉयल जेलीप्रोपोलीसमधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती,  मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येत आहे. त्यामुळे मधा बरोबर मधमेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मध महोत्सवात मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्यमधाचे व मधमाशांचे विविध प्रकारव मधापासुन तयार होणारी विविध उत्पादनेतसेच  सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासुन विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक दुपारी 12.30 वाजता आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

            मध महोत्सवाच्या माध्यमातून मधमाशांचे जतनसंवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवादशेतकऱ्यांचे प्रशिक्षणशरीर स्वास्थ आणि मधमधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यात १८ जानेवारीला शेती व मधमाशा पालनगुणवत्तापूर्ण मध आणि मुल्यवर्धित उत्पादने१९ जानेवारीला मध व आरोग्यमधुक्रांतीसाठी महाराष्ट्राचे पाऊल या विषयांवर परिसंवाद होणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचा 'मधुबनहा मधाचा ब्रॅंड आहे. हे दर्जेदार मध २० टक्के सवलतीच्या दराने नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहे असेही श्री साठे म्हणाले. 

             महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव, प्रति किलो पाचशे रुपये, देणारे राज्य आहे. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. राज्यात १० गावांची निवड मधाचे गाव यासाठी करण्यात आलेली आहे. डोंगराळ भागमध हा पारंपरिक व्यवसाय असणे आणि फुलोरा या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात प्रशिक्षण व  जनजागृती करण्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाय मधमाशीचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रिम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

            पहिल्यांदाच न बघितलेलेन अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातुन लोकांना अनुभवता येणार आहे.

            राज्यात मधमाशांच्या  जाती आहेत. सातेरीमेरीफेराआग्याफ्लोरिया आणि पोया. यातील सातेरी आणि मेरीफेरा ह्या अंधारात राहणाऱ्या आणि पाळीव मधमाशा आहेत. या  मधमाशांची शेती उत्पादन वाढण्यासाठी मदत होते.  याच मधमाशीचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाबळेश्वर आणि पश्चिम घाटातील १२ जिल्हे आणि ६३ तालुक्यात सातेरी मधमाशी सापडते.

            कोकणात पोयाच्या छोट्या मधमाशांचे अस्तित्व आढळतेविदर्भात सातेरी तर मराठवाड्यात मेरिफेरा या मधमाशीचे जतन करतात. सूर्यफुलओवाजांभुळआग्या माशांचे मध असे विविध प्रकारचे मध या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे अशी माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.

            यावेळी महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील उपस्थित होते.

००००

प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय

 प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत

महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

            मुंबईदि. १६ :- प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजनायंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरणअनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करावी. या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात कृषीअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणसहकारमराठी भाषाशालेय शिक्षणसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसायवनेपाणीपुरवठा व स्वच्छताअल्पसंख्याकपणनकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यतामदत व पुनर्वसनफलोत्पादनरोजगार हमीपरिवहन अशा १६ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळसहकार मंत्री दिलीप वळसे-पाटीलसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेमराठी भाषा विभाग तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरअल्पसंख्याक तथा पणन मंत्री अब्दुल सत्तारकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलफलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते.

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमहाराष्ट्रासारख्या लोककल्याणकारी राज्यामध्ये जनहिताच्या दृष्टीने नवनवीन योजना तयार करून नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्रनवीन योजना घेताना बहुतांश वेळा गरज संपलेल्या पूर्वीच्या योजना तशाच सुरु असतात. या योजनांसाठी वर्षानुवर्षे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही. अशा योजनांचा आढावा घेऊनत्यांचे विश्लेषण करून कोणती योजना सुरु ठेवावी आणि कोणती बंद करावी याची कारणमिमांसा करणारे प्रस्ताव तयार करावेत. साधारण ५० कोटी रुपयांखालील तरतूद असणाऱ्या योजनांबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेता येईल. तसेच ५० कोटींच्या वरच्या तरतुदीच्या कालबाह्य योजना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेतअसे निर्देशही त्यांनी दिले.     

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीकेंद्र शासनाच्या सहकार्यातून राज्य शासनाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठीचा केंद्र शासनाचा हिस्सा वेळेवर मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करताना १५वा वित्त आयोगसमान विषयास केंद्र शासनाकडून मिळणारा निधी यांचाही वापर करावा. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात. राज्य शासनाचे उपक्रमकार्यक्रम ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करावेत. जनतेला दिलेली आश्वासने वेळेअगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावाअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.     

            योवळी रोजगारमत्स्यव्यवसाय तथा सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिव राजेशकुमारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अमुस ओ.पी.गुप्ताकृषी विभाग तथा फलोत्पादन विभागाचे अमुस अनुप कुमारमराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरगृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीरोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेशालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनकौशल्यमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.

-------०००------

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या आर. विमला यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रदिलखुलास’ कार्यक्रमात

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या आर. विमला यांची मुलाखत

            मुंबईदि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'मध महोत्सव-2024' या विषयावर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला यापासून प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय असून त्यासाठी मंडळामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मंडळामार्फत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 18 व 19 जानेवारी रोजी देशातील पहिला 'मध महोत्सवआयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावीअसे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जय महाराष्ट्र’ आणि दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 17 आणि गुरुवार दि. 18 जानेवारी 2024  रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवारदि. 17 जानेवारी, 2024 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

 प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत

महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

            मुंबईदि. १६ :- प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजनायंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरणअनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करावी. या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात कृषीअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणसहकारमराठी भाषाशालेय शिक्षणसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसायवनेपाणीपुरवठा व स्वच्छताअल्पसंख्याकपणनकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यतामदत व पुनर्वसनफलोत्पादनरोजगार हमीपरिवहन अशा १६ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळसहकार मंत्री दिलीप वळसे-पाटीलसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेमराठी भाषा विभाग तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरअल्पसंख्याक तथा पणन मंत्री अब्दुल सत्तारकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलफलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते.

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमहाराष्ट्रासारख्या लोककल्याणकारी राज्यामध्ये जनहिताच्या दृष्टीने नवनवीन योजना तयार करून नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्रनवीन योजना घेताना बहुतांश वेळा गरज संपलेल्या पूर्वीच्या योजना तशाच सुरु असतात. या योजनांसाठी वर्षानुवर्षे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही. अशा योजनांचा आढावा घेऊनत्यांचे विश्लेषण करून कोणती योजना सुरु ठेवावी आणि कोणती बंद करावी याची कारणमिमांसा करणारे प्रस्ताव तयार करावेत. साधारण ५० कोटी रुपयांखालील तरतूद असणाऱ्या योजनांबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेता येईल. तसेच ५० कोटींच्या वरच्या तरतुदीच्या कालबाह्य योजना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेतअसे निर्देशही त्यांनी दिले.     

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीकेंद्र शासनाच्या सहकार्यातून राज्य शासनाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठीचा केंद्र शासनाचा हिस्सा वेळेवर मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करताना १५वा वित्त आयोगसमान विषयास केंद्र शासनाकडून मिळणारा निधी यांचाही वापर करावा. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात. राज्य शासनाचे उपक्रमकार्यक्रम ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करावेत. जनतेला दिलेली आश्वासने वेळेअगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावाअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.     

            योवळी रोजगारमत्स्यव्यवसाय तथा सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिव राजेशकुमारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अमुस ओ.पी.गुप्ताकृषी विभाग तथा फलोत्पादन विभागाचे अमुस अनुप कुमारमराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरगृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीरोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेशालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनकौशल्यमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.

-------०००------

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल

 केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग

क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल

            नवी दिल्ली१६ : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला.

            या क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झाला. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद शिंदेसहायक व्यवस्थापक अमित कोठावदे व विवेक मोगल या टीमने पुरस्कार स्वीकारला.

            भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या (DPIIT) वतीने राजधानी दिल्लीतील भारत मंडपमप्रगती मैदान येथे राज्यांचे स्टार्टअप रँकिंग पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य आणि उद्योगग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री. गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी विशेष सचिव सुमिता डावरालॉजिस्टिक्सउद्योगग्राहक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे सहसचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेतज्यात राज्य सरकारइनक्यूबेटरएंजेल गुंतवणूकदारशाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट्य ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणे हे समृद्ध महाराष्ट्राचे ध्येय आहे.

            केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे. अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमुंबई २०१८ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअपच्या परिसंस्था वाढीसाठी नियम सुलभ करण्याच्या दिशेने आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट पाठिंबा देण्यास विविध निकषांच्या आधारावर स्टार्टअप रँकिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. वर्ष २०२२ च्या आवृत्तीमध्ये ७ व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामध्ये२५ कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थननाविन्यता आणि उद्योजकताबाजारपेठेत प्रवेशइंक्यूबेशन आणि मेंटरशिप सपोर्टफंडिंग सपोर्टएनेबलर्सची क्षमता बांधणीशाश्वत भविष्यासाठी रोडमॅप यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप वीकस्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मरचा क्रमांक पटकवला.

महाराष्ट्र राज्यात स्टार्टअप इको सिस्टम बळकट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

            महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायताप्रशिक्षण आणि सल्ला सेवास्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.‍ राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्जभांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे.

            राज्य सरकारने स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबत व्यवसाय योजना तयार करणेबाजार पेठेचा अभ्यास करणेवित्तीय व्यवस्थापन करणे यावर ही प्रशिक्षण दिले जात आहे.

००००

विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे

 विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे

पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप

यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

            नाशिक दि. 16 : जगातील सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने काम करावेअसे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केले. दरम्यानया युवा महोत्सवात यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळालेतर हरियाणा आणि केरळने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

            नाशिक येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या २७ व्या क्रीडा महोत्सवाचा आज सकाळी महायुवाग्रामहनुमाननगर येथे समारोप झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेकेंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक वनिता सूदक्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसेविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. प्रारंभी युवा गीत आणि महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले.

            पालकमंत्री श्री. भुसे म्हणालेजिल्हा प्रशासनाने अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नियोजन केले. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वेळोवेळी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे युवकांच्या या कुंभमेळ्याचे यशस्वीपणे संयोजन करता आले. या महोत्सवाच्या पाच दिवसांत नाशिककरांनी युवकांना भरभरून प्रोत्साहन दिले. त्यामुळे

            यजमान महाराष्ट्रासह नाशिककरांच्या आदरातिथ्याचा नावलौकिक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

            क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे म्हणालेनाशिक जिल्हा प्रशासनाने अत्यंत परिश्रम घेत अवघ्या 20 दिवसांत या महोत्सवाची तयारी पूर्ण केली. त्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांनीही या महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. यानिमित्त राज्य शासनाने महा एक्स्पोचे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील युवक - युवतींमध्ये विचारसंस्कृतीचे आदान- प्रदान होऊन देशाची अखंडता आणि राष्ट्रवादाला चालना मिळेलअसेही त्यांनी सांगितले.

            केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक श्रीमती सूद म्हणाल्याराष्ट्रीय युवा महोत्सव हा विविध रंगांनी भरलेला होता. या महोत्सवात सहभागी युवक - युवतींनी महोत्सवाचा आनंदअनुभव घेतला. त्यामुळे नवी उमेद आणि उत्साह घेऊन सहभागी युवक- युवती घरी जातील.

            श्री. दिवसे म्हणाले कीगेल्या पाच दिवसांपासून हा महोत्सव सुरू होता. या महोत्सवात देशातील 31 राज्यातील साडे सातहजारांवर युवक - युवती सहभागी झाले होते. याशिवाय रोज किमान ५० हजार नागरिक महोत्सवास भेट देत होते. पाच दिवसांत तीन लाख नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. बाहेरून आलेल्या युवकांची 120 हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कमी कालावधीत यशस्वीपणे संयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी युवा महोत्सवात झालेल्या विविध कलाक्रीडा व वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागाचे सह संचालक सुधीर मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

सहकार्याबद्दल सत्कार

            नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वी  संयोजनात सहकार्य केल्याबद्दल श्री. क्षेमकल्याणी यांच्यासह उद्धव निमसेमराठा विद्या प्रसारक मंडळाचे ॲड. नितीन ठाकरेसुरेश केला यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह पोलीसमनपाजि.पक्रीडा विभागाचे राज्यभरातील अधिकारी  तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

Featured post

Lakshvedhi