Wednesday, 17 January 2024

प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

 प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत

महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

            मुंबईदि. १६ :- प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजनायंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरणअनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करावी. या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात कृषीअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणसहकारमराठी भाषाशालेय शिक्षणसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसायवनेपाणीपुरवठा व स्वच्छताअल्पसंख्याकपणनकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यतामदत व पुनर्वसनफलोत्पादनरोजगार हमीपरिवहन अशा १६ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळसहकार मंत्री दिलीप वळसे-पाटीलसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेमराठी भाषा विभाग तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरअल्पसंख्याक तथा पणन मंत्री अब्दुल सत्तारकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलफलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते.

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमहाराष्ट्रासारख्या लोककल्याणकारी राज्यामध्ये जनहिताच्या दृष्टीने नवनवीन योजना तयार करून नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्रनवीन योजना घेताना बहुतांश वेळा गरज संपलेल्या पूर्वीच्या योजना तशाच सुरु असतात. या योजनांसाठी वर्षानुवर्षे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही. अशा योजनांचा आढावा घेऊनत्यांचे विश्लेषण करून कोणती योजना सुरु ठेवावी आणि कोणती बंद करावी याची कारणमिमांसा करणारे प्रस्ताव तयार करावेत. साधारण ५० कोटी रुपयांखालील तरतूद असणाऱ्या योजनांबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेता येईल. तसेच ५० कोटींच्या वरच्या तरतुदीच्या कालबाह्य योजना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेतअसे निर्देशही त्यांनी दिले.     

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीकेंद्र शासनाच्या सहकार्यातून राज्य शासनाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठीचा केंद्र शासनाचा हिस्सा वेळेवर मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करताना १५वा वित्त आयोगसमान विषयास केंद्र शासनाकडून मिळणारा निधी यांचाही वापर करावा. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात. राज्य शासनाचे उपक्रमकार्यक्रम ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करावेत. जनतेला दिलेली आश्वासने वेळेअगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावाअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.     

            योवळी रोजगारमत्स्यव्यवसाय तथा सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिव राजेशकुमारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अमुस ओ.पी.गुप्ताकृषी विभाग तथा फलोत्पादन विभागाचे अमुस अनुप कुमारमराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरगृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेसांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीरोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेशालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदनकौशल्यमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.

-------०००------

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi