Sunday, 14 January 2024

भारतीय डाक विभागाने आपली स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु

 भारतीय डाक विभागाने आपली स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु


मुंबई- भारतीय डाक विभागाने आपली स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु केली आहे. या स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल कायर्यालयाच्या परिसरातून ग्राहक कधीही पार्सल आणि पत्रे गोळा करू शकतात. या स्मार्ट आणि डिजिटल प्रणालीमुळे ग्राहकांच्या पार्सल सेवेत सुलभता येणार आहे.

स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकर ही उच्च-तंत्र सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली कोणत्याही खर्चाशिवाय लोकांना पार्सली ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान करते. ही पार्सल लॉकरची सेवा ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुण्यातील इन्फोटेक पार्व सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

तसेच मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील पाच स्थानांवर लवकरच सेवा सुरु होणार आहे. डिजिटल पार्सल लॉकर सुविधेच्या माध्यमातून ग्राहक आपल्या सोयीनुसार पोस्टातून पार्सल किंवा पत्रे कलेक्ट करू शकतील.या सुविधाच्या जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहेत.

पार्सल लॉकरचा असा करा वापर –

– भारतीय डाक कडून डिजिटल पार्सल लॉकर मध्ये पार्सल ठेवले जाईल.

– ग्राहकाला सदर पार्सल घेण्याकरिता एक ओटीपी मिळेल.

– ग्राहकाला त्याच्या पार्सलची डिलिव्हरी सदर डिजिटल पार्सल लॉकर मधून कोणत्याही वेळेस घेता येईल


डाक निर्यात केंद्रे –

निर्यात उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि निर्यातीसंबंधी प्रक्रिया सुरु करण्यासाठी तसेच निर्यातदारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख टपाल कार्यालयामध्ये डाक घर निर्णयात केंद्रे सुरू केली आहेत.पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई ), कस्टम क्लिअरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या

ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली पुरवल्या जात आहेत.


आजपर्यंत, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात ६९ डाक घर निर्यात केंद्रे (DNKs) कायर्यान्वित झाली आहे. तसेच, निर्यातदार, महसूल विभागासारख्या राज्य सरकारच्या यंत्रणा आणि स्थानिक प्राधिकरण तसे कस्टम प्राधिकरणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विभागाने ५८ कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. सदर सेवा छोट्या स्वरुपातील स्थानिक निर्यातदारांना तसेच ग्रामीण भागातील बचतगट यांच्यासाठीनक्कीच पूरक / चालना देणारी ठरेल. परिणामी, महाराष्ट्र आणि गोव्यालील १४० निर्यातदार आधीच सा सेवे-अंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत आणि डीएनके सुविधेचा वापर करत आहेत. २०२३ मध्ये डीएनके सुविधेअंतर्गत १५ हजार १८५ पार्सल / पत्रे बुक केली गेली आहेत.

रामरक्षा पठण कार्यक्रमात एक कोणालाच माहीत नसलेली गोष्ट

 आजच्या SP कॉलेज ला संपन्न झालेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमात एक कोणालाच माहीत नसलेली गोष्ट अभिनेते राहुल सोलापूरकरांनी सांगितली ती अशी-

अयोध्येच्या राम मंदिराचं बांधकाम कोर्टाच्या 2019 च्या निर्णयानंतर सुरू झाल्यावर, त्याच परिसरात असलेली रामलला ची मूर्ती एका अस्थाई मंदिरात शिफ्ट करायची होती.त्या साठी मुहूर्त जो ठरला होता तो होता  मार्च 2020 चा, नेमका त्याच दरम्यान संपूर्ण भारतात कोरोना सुरू झालेला होता आणि त्यामुळे कुणालाच राम लला च्या मिरवणुकीत सहभागी होता येणार नव्हतें आणि रामाला वाजत गाजत नेता येणार नसल्याने योगी आदित्यनाथ काळजीत होते. त्यांनी मोदींना फोन लावून सांगितलं की रामाची मिरवणूक दणदणीत व्हायला हवी तेव्हा मोदींनी सांगितल की ते मी।बघून घेईन.. आणि तो दिवस होता 25 मार्च 2020 गुढीपाडवा त्या दिवशी सर्व देश वासीयांना थाळी, घंटा नाद तसेच देवाजवळ दिवा लावायला सांगितला गेला... कुणालाच माहिती नव्हते की असे का सांगितले गेलेय.. आणि त्या दरम्यान योगी आदित्य नाथ ह्यांनी स्वतः 1.3 km चालत जाऊन डोक्यावर राम लला ची मूर्ती घेऊन 5 महंत आणि 3-4 सेक्युरिटी गार्ड घेऊन     शिफ्ट केली.. तेव्हा संपूर्ण देशवासी थाळी वाजवत होते परन्तु कुणालाही ह्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.. नंतर मोदींनी आदित्यनाथ ह्यांना सांगितले की 100 कोटी  लोकांना सोबत घेऊन इतकी वाजत गाजत मिरवणूक अयोध्येत  तरी होऊ शकली असती का 😄.... मुख्य म्हणजे ह्यात आस्तिक नास्तिक सगळेच थाळ्या वाजवत होते... जय श्रीराम!🚩

मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२०

 मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड किती संपूर्ण पश्चिम उपनगरासाठी किती महत्वाचा आणि त्याहीपेक्षा तो किती आवश्यक आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हा रस्ता होणे हे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने किती हिताचे आहे. लोकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळ वाचणार आहे. तसेच यामध्ये बाधित होणाऱ्या घरांचे पुनर्वसन याच भागात करता येऊ शकते. तशा सदनिका तयार आहेत, याची माहिती दिली. त्यामुळे हा रस्ता होण्यासाठी काहीच अडचण असण्याचे कारण नाही. लोखंडवाला, म्हाडा येथील हजारो नागरिकांची तशी मागणी आहे. लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अॅथक्शन कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना तसे निवेदनही देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी अत्यंत सकरात्मक दृष्टीकोनातून हा विषय समजून घेतला असून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही दिले.

यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, मागठाणे ते गोरेगाव हा डीपी रोड १९९१ च्या विकास आराखड्यातील आहे. २०१६ मध्ये मुंबईचा जो मोबिलिटी प्लॅन करण्यात आला त्यात या रस्त्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. जे पाच व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जाहीर करण्यात आले त्यातही हा प्रकल्प आहे. यापूर्वी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे बैठक झाली आहे. तत्कालीन मुख्य अभियंता यांची समिती नेमण्यात आली. या समितीने याबाबत अलाइनमेंट होणार नाही असा अहवाल दिला आहे. येथील महिंद्र कंपनीची जागासुद्धा हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. लोकांचा वेळ वाचणार आहे. बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी आप्पापाडा, कांदिवली पश्चिम येथे सदनिका तयार आहेत. या भागातील लोकांना याच परिसरात घरे मिळाली तर तोही प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. भातखळकर यांनी केली. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अॅसक्शन कमिटीच्या वतीने आमदार भातखळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

विकसित भारत' लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण व आरोग्य व्यवस्था आवश्यक

 विकसित भारतलक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण व आरोग्य व्यवस्था आवश्यक

- राज्यपाल रमेश बैस

 

·       राज्यपालांच्या हस्ते संजय मुखर्जीप्रवीण दराडे यांसह 'नव भारत'चे शिल्पकार सन्मानित

 

            मुंबई, दि. 13: विकसित भारताचा महामार्ग विकसित शिक्षण प्रणालीविकसित आरोग्य सेवाउद्यमशीलता व नवसृजनाच्या वाटेने जातोअसे सांगून विकसित भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी नव्या भारतातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी योगदान द्यावेअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.      

            राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १३) प्रशासनपोलीसआरोग्यसेवासमाजकार्यशिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ६५  व्यक्तींना 'नव भारत के शिल्पकारपुरस्काराने सन्मानित करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            प्रकाशनाचे ९० वर्षे साजरे करीत असलेल्या नवभारत समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून नवभारत समूहातर्फे  'शिव राज्याभिषेक ३५० वर्षया कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. 

            स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. आपल्याला भेटणारे विविध देशांचे राजदूतविविध देशांचे संसद सदस्य या सर्वांचे या बाबतीत मतैक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारत येत्या काही वर्षात जगातील तिसरी मोठी आर्थिक सत्ता होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला असल्याचे सांगून विकसित भारत ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या दृष्टीने आपण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना  'विकसित विद्यापीठबनविण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.  

            नवभारत नवराष्ट्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सचित्र ग्रंथ काढल्याबद्दल आनंद व्यक्त करुन प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे महिलांचा सन्मानविविध धर्म व पंथांचा आदर व जनसामान्यांचे कल्याण यासाठी कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.       

            कार्यक्रमाला खासदार पूनम महाजनमाजी मंत्री व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील व नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी उपस्थित होते. .

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते हर्षवर्धन पाटीलमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जीपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेभारतीय राजस्व सेवेतील अधिकारी पल्लवी दराडेस्नेहलता कोल्हे (संजीवनी समूह),  राजेश गोयल (कोहिनुर समूह)महानगर पालिका आयुक्त छत्रपती संभाजी नगर जी श्रीकांतपोलीस आयुक्त अमरावती नवीनचंद्र रेड्डीशशांक परांजपे (परांजपे स्कीम)चिंतन देसाई (सोसायटी टी) आदींना 'नव भारत के शिल्पकारपुरस्कार प्रदान करण्यात आले.

00000


स्वच्छता अभियान मर्यादित न राहता लोकचळवळ बनावी

 स्वच्छता अभियान मर्यादित न राहता लोकचळवळ बनावी

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

                                                            

            ठाणे,दि.13 : सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावेअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.      

      राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता कराया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरूवात ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली.

       यावेळी आमदार संजय केळकरमाजी महापौर नरेश म्हस्केमाजी नगरसेवक सुधीर कोकाटेसंजय वाघुलेपरिवहन सभापती विलास जोशीमहापालिका आयुक्त अभिजीत बांगरअप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आदी सहभागी झाले होते.

      मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वत: हातात झाडू घेवून कौपिनेश्वर मंदिर परिसरात झाडलोट केली मंदिराचा मुख्य सभामंडप व परिसराची साफसफाई केली. 

     ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिराच्या साफसफाईला स्वतः सुरुवात करून मुख्यमंत्री म्हणालेमुंबई- ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहेही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.  

      मुंबई- ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकशालेय विद्यार्थीज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचे रूपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहेयासाठी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

      त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही सांगितले.

     ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमे (Deep Cleaning Campaining) अंतर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.

0000000

Featured post

Lakshvedhi