मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड किती संपूर्ण पश्चिम उपनगरासाठी किती महत्वाचा आणि त्याहीपेक्षा तो किती आवश्यक आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हा रस्ता होणे हे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने किती हिताचे आहे. लोकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळ वाचणार आहे. तसेच यामध्ये बाधित होणाऱ्या घरांचे पुनर्वसन याच भागात करता येऊ शकते. तशा सदनिका तयार आहेत, याची माहिती दिली. त्यामुळे हा रस्ता होण्यासाठी काहीच अडचण असण्याचे कारण नाही. लोखंडवाला, म्हाडा येथील हजारो नागरिकांची तशी मागणी आहे. लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अॅथक्शन कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना तसे निवेदनही देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी अत्यंत सकरात्मक दृष्टीकोनातून हा विषय समजून घेतला असून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही दिले.
यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, मागठाणे ते गोरेगाव हा डीपी रोड १९९१ च्या विकास आराखड्यातील आहे. २०१६ मध्ये मुंबईचा जो मोबिलिटी प्लॅन करण्यात आला त्यात या रस्त्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. जे पाच व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जाहीर करण्यात आले त्यातही हा प्रकल्प आहे. यापूर्वी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे बैठक झाली आहे. तत्कालीन मुख्य अभियंता यांची समिती नेमण्यात आली. या समितीने याबाबत अलाइनमेंट होणार नाही असा अहवाल दिला आहे. येथील महिंद्र कंपनीची जागासुद्धा हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. लोकांचा वेळ वाचणार आहे. बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी आप्पापाडा, कांदिवली पश्चिम येथे सदनिका तयार आहेत. या भागातील लोकांना याच परिसरात घरे मिळाली तर तोही प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. भातखळकर यांनी केली. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अॅसक्शन कमिटीच्या वतीने आमदार भातखळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...
No comments:
Post a Comment