*अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!* *नवरा बायकोचे इतके शार्प ट्यूनिंग प्रथमच पाहिले. एरवी भांडणाची जुगलबंदीच पाहायला मिळते.*❤️❤️❤️
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 25 December 2023
प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई दि. 25: देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव श्री. प्रकाश इंदलकर, अवर सचिव, श्री. रविंद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी श्री. राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधिक्षक, श्री. विजय शिंदे यासह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 4028
स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन
राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली
मुंबई दि. 25: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
00000
भवतल
चेरापुंजीचा पाऊस आणि २३ वर्षांची प्रतिक्षा !
(मेघालय डायरी)
दोन मित्र. जगातल्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी पाऊस पडत असताना जायचं ठरवतात. पुरेसे पैसे जमत नाहीत. शिवाय ऑफिसची सुट्टी, त्या भागातली अनिश्चितता या सर्व गोष्टींचे अडथळे असतात. त्यामुळे सारं काही बारगळतं. पण २३ वर्षांनंतर त्यांचा तिथं जाण्याचा योग येतो. मात्र, दिवस हिवाळ्याचे असतात.
मग नेमकं काय होतं??
...
समीर कोडिलकर आणि माझी मैत्री १९९९-२००० पासूनची. मी पुण्यात ‘लोकसत्ता’ मधे आणि तो ‘प्रभात’ मधे असताना आम्ही भेटलो. आमचा बीट क्राइम. त्यामुळे पोलीस-प्रेसरूममधे भेटणं, बातम्या करणं, गप्पा – टप्पा, त्या निमित्ताने फिरणं. मैत्री घट्ट होत झाली. त्या वेळी मी हौस म्हणून हवामान, पर्यावरण असे त्या काळी फारसे महत्त्वाचे समजले न जाणारे विषयही हाताळायचो. तेव्हाची माझी फॅण्टसी होती- जगातल्या सर्वाधिक पावसाच्या चेरापुंजीचा धो-धो पाऊस अनुभवायचा. समीरला बोललो. त्यालाही कल्पना आवडली. तिकडं जायचं तर दोन गोष्टी महत्त्वाच्या- तीनेक आठवड्यांची सुट्टी (तेव्हा आमची झेप रेल्वेपर्यंतची) आणि खर्चासाठी पैसे. पैसे जमा करायला सुरुवात केली. पाच-सहा महिन्यांत माझ्याकडं काही पैसे जमले, त्याच्याकडंही तसेच काही. पण तेवढ्याने काही होणार नव्हतं. आणि मोठ्या सुट्टीचं काय? मग तो विषय मागं पडला.
अलीकडं मी *‘भवताल इकोटूर्स’* या उपक्रमाच्या निमित्ताने जुलै महिन्यात चेरापुंजीला गेलो होतो. गंमत म्हणजे आम्ही पूर्ण दोन दिवस तिथं होतो, पण पावसाचा एकही थेंब पडला नाही. (आधी सलग ५० दिवस पाऊस पडला होता.) याच उपक्रमासाठी नवनवी ठिकाणं, संकल्पना, वेगळी आकर्षणं यांचा शोध घेण्यासाठी आणि पूर्वतयारीसाठी नुकताच डिसेंबर महिन्यात पुन्हा मेघालय गेलो होतो. सोबत चार मित्र होते. त्यात समीरही होता. पावसाळा नाही तर नाही, निदान ठरवल्यानुसार चेरापुंजीला तरी भेट देता येईल, असा विचार करून समीर सहभागी झाला होता. २००० साली जायचं ठरवलेलं, प्रत्यक्षात तिथं जायला २०२३ साल उजाडलं. यावेळी अनेक भन्नाट गोष्टी एक्सप्लोर करता आल्या. त्याबद्दल लिहीनच. पण आता चेरापुंजीबद्दल.
चेरापुंजीत आमचे दोन मुक्काम होते. नेमकं त्या वेळी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झालं होतं. हवामान ढगाळ बनलं. रात्रीच्या वेळी छतावर टपटप आवाज सुरू झाला. डिसेंबर महिन्यात चक्क पाऊस पडत होता. आमची चेरापुंजीच्या पावसात भिजण्याची इच्छा इतकी तीव्र होती की जणू त्यासाठीच एवढं सारं जुळून आलं होतं... दुसऱ्या दिवशी उठल्यावर पावसात भिजलो. मग हवामान विभागाची वेधशाळा गाठली आणि जिथं सर्वाधिक पाऊस मोजला जातो, ते ठिकाणही पाहिले. तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तिथला पाऊस, मान्सून समजून घेतला... जे ठरवले होते ते तब्बल २३ वर्षांनंतर प्रत्यक्षात येत होते.
- अभिजित घोरपडे
Exclusive Meghalaya - Kaziranga
नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी, चलो मेघालय
(Feb - March च्या सीमेवर)
9545350862 / bhavatal@gmail.com
.................................
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
954
5350862 / bhavatal@gmail.com
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता रामराज्य निर्माणाचा प्रारंभ
भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले तेव्हा जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटले आणि प्रभू श्री राम मंदिरही तयार झाले. हे केवळ मंदिर निर्माण नाही तर नव्या भारताची सुरुवात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्य निर्माणाचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड पूर्व येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘डायरो’ या लोकसंगीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी जे स्वप्न बघितले होते ते प्रत्यक्षात साकारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ज्या ठिकाणी प्रभू श्री राम मंदिर तोडून बाबरी मशिदीचा ढाचा तयार केला होता त्याच ठिकाणी आता प्रभू श्री रामाचे मंदिर उभे राहिले आहे. २२ जानेवारी रोजी तिथे प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ५००-५५० वर्षाच्या संघर्षाला आता अंतिम स्वरूप नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
आमदार अतुल भातखळकर म्हणाले, दरवर्षी या डायरो कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करत असतो. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमात सहभागी झाले ही आनंदाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईसह महाराष्ट्राचा विकास होत आहे. मुंबईतील अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लावून त्यांनी सामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य केले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी कांदिवली पूर्व विधासभेतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
थोड नाही भरपूर हसू या सर्वांनी
थोड नाही भरपूर हसू या
😂 विरंगुळा:
1) सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.
* पु ल देशपांडे
** मग बायको कुणाची पण असो 😊😂😂
2) डॉक्टर :- हा बोला, कुठं दुखतंय..? ....
पेशंट : फी कमीकरणार असाल तर सांगतो. ... नाहीतर शोधा....🤣🤣🤣😂😂😂
3) पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.......:
येवले चहा......:
सायबा चहा......:
कडक चहा......:
हरमन चहा......
मायेचा चहा.......:
प्रेमाचा चहा.....
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.......
सगळ्यात कोणता चहा चांगला ? ? ?
तर तो म्हणाला......फुकटचा चहा......
😉🤪😁😆😝
5) नवरा : मला आज पर्यंत समजलेले नाही की, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ????
बायको : हेल्दी आहे ते...सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना...
आगदी तस्सेच असते हे सुद्धा..😝😄😝😂😂😂
6) एक देशस्थ जाम वैतागला होता. त्याला विचारलं काय झालं तर म्हणतो ह्या कोकणस्थ लोकांचं एक काही धड नसतं -
रानडे कर्वे रोडवर राहतात
कर्वे फडके रस्त्यावर राहतात
फडके लेले आळीत राहतात
लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात
बापट दांडेकर पुलाजवळ राहतात
दांडेकर गोखले नगरला राहतात
गोखले भांडारकर रोड वर राहतात
आणि भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात
अरे आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी .
😡🤭🤣😂😝
7) You can't outsmart a Punekar:-
मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
पुणेकर: दिड दिवस !!!
मुंबईकर:किती हा चिकटपणा ??
पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
मुंबईकर : दहा दिवस
पुणेकर : गणपती कशाची देवता आहे ??
मुंबईकर : बुद्धीची !!!
पुणेकर : मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो.
😝😂😂😂😂
8) दुकानदार - साहेब, काय देऊ?
ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या.
दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार?
🤪🤪🤪😂😂
9) मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया धोतर व टोपी घालू नये. वादळ घुसलं तर पॅराशुट होईल!
🤔🤔🤔
10) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी
IIअतिथि देवो भव II
परंतु देवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...
😂😂😂😂😂
11) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय
पुणेरी वडील - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??
😬🤦🏻♂😬😂😂😂
12) भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो आहे ना साहेब
पुणेकर : मग आधी ते खर्च कर. भिकारचोट कुठला.
😂😂😂😂😂😂
13) स्थळ :- सदाशिव पेठ
गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?”
दुकानदार :-“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.”
गिऱ्हाईक :- “वीस रुपयांचे बघू.”
दुकानदार:- “हे घ्या...
कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...."
गिऱ्हाईक :- “हे कसं काम करतं?”
दुकानदार :- “काहीच काम करत नाही. पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात......
पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं, हेच एकमेव यंत्र आहे..😂🤣🤣🤣🤣
15) कधी विचार केला: M सरळ आणि W उलटे का लिहितो?
कारण Men सरळ आणि Women उलटा विचार करतात काल ही कथा थेट माझ्यासोबत घडली ……
😂😂😂😂😂😂
16) काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: "दुसरा की तिसरा"?
बाईंनी रागाने म्हटले, "आत्या आहे मी याची"
😆😆😆😆😆😆
17) चाळिशीचा फार त्रास होतो ...नको नकोसं होतं नुसतं..काय करावे कळत नाही, सुधरत नाही ...
तिशीत होत तेंव्हा कस बरं होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो...
विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ...
पण आता... नको नकोस झालं आहे ... ४५ च्या आसपास काय होणार काय माहिती? पन्नाशी नंतर तर बोलूच नका।
नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत..तापमानाबद्दल बोलत आहे.. तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलंच चांगलं...
😂😂😂😂
18) लॉक डाऊन पर्यटन ..
पुण्यात पाटी लागली ☆☆☆ स्विगी आणि झोमॅटोचा ड्रेस भाड्याने मिळेल!
मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या!!!
😂😂😂😂
19) शेजारच्या वहिनी बायकोला म्हणाल्या... तुमचे साहेब खूप हुशार आहेत. माझ्या चेहऱ्यावर मास्क असूनही मला
ओळखलं व हसले सुद्धा...!!
आता घरातलं लॉकडाऊन आणखी कडक झालंय ...!!!
😷😷😘😘🤪🤪
20) काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही। मग आज मी एक मेसेज पाठवला
...आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ??
सकाळपासून किमान १०/१५ वेळा फोन केला पठ्ठ्याने. मग मी पण उचलला नाही.
😆😷 😀😄
22) पुणेकर v/s पुणेकर
पहिला पुणेकर - तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ?
दुसरा पुणेकर - घरात एकच वाटी आहे का ?
🤔🤔😃😂🤣😆
23) कावळ्याने माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"
माठानं फारच सुंदर उत्तर दिलं... म्हणाला: बाष्पीभवन, उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही! त्यासाठी डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं.
माझ्या पृष्ठभागावर जी सूक्ष्म छिद्र आहेत, ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो
......
कावळ्यानी मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे नको त्या चौकशा करायच्या नाहीत...
कावळा कुठला होता माहित नाही पण.. माठ पुण्याचा होता....
😂😂😜😂😂😂
24) याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??”
बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!”
😂😂😂
25) आजचा अजून एक शोध ..
रामफळ हे रामाचे.....!💁🏻♂ आणि सीताफळ हे सीतेचे!! 💁🏻♂
तर मग.......... वांगे कुणाचे .....
...... *भरताचे!!*.
बसल्या बसल्या असंच काहीतरी सुचतं 🙈🙈
26) रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ?
मम्मी म्हणाली : आत्या.
पप्पा म्हणाले : मावशी.
मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले
😂😂😂😂
27) सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देताहेत.
मी पोस्ट टाकली होती...
कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!
माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी काळजी घ्या असा सल्ला दिला.
😃😛😛😛 🤭
28) अक्षयतृतीयेच्या* मुहूर्तावर मी एक गादी व दोन उश्या घेतल्या !
आखीर वो भी तो 'सोने' की चीज है ..
😂😂😂
31) पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट .
च्यायला…समजतच नाहीये जमिनीवर राहतो का समुद्रात... 🙄🙄😜😃😜🤪😜🤪😜😜😆😂😱😳😱😜🥶😜
32) तो बायकोला म्हणाला
You are my strength..
बायको त्याला म्हणाली
It means other women are your weakness?
😜😂😂😂
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


.jpeg)
