प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई दि. 25: देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव श्री. प्रकाश इंदलकर, अवर सचिव, श्री. रविंद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी श्री. राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधिक्षक, श्री. विजय शिंदे यासह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 4028
स्व.अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन
राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली
मुंबई दि. 25: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment