Tuesday, 19 December 2023

 रस्त्यांच्या प्रगतीची माहिती आता पोर्टलवर

- मंत्री रवींद्र चव्हाण

 

      नागपूरदि. १९ : राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावीयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत लक्षवेधी मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सर्वश्री राम सातपुतेॲड. आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतला.

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागग्रामविकास विभागप्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत असतात. यांचे निकष आणि नियम देखील त्यानुसार वेगवेगळे असतात. राज्यात प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना मागील दीड वर्षात निधी उपलब्ध करून ते विहित कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेथे अडचणी असतील त्या जाणून घेऊन कार्यवाही केली जात आहे. राज्यातील विविध भागात भौगोलिक परिस्थितीनुसार कामे करण्याचे तंत्रज्ञान वेगवेगळे असते. त्यानुसार केवळ काम देऊन न थांबता विभागामार्फत कामाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवली जात आहे. पूर्ण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले असतील अथवा कामात दिरंगाई होत असेलदेखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये दुरूस्ती केली जात नसेल तर अशा कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सूचना दिल्या जातील. त्यानंतरही दिरंगाई होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईलअसेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना मंत्री श्री. चव्हाण म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे ३०० कोटींची २०० कामे मंजूर असून त्यातील ८२ कामे पूर्ण तर ३९ कामे प्रगतीपथावर आहेत. ७९ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १४७ कामे मंजूर असून ९५ कामे पूर्ण झाली आहेत. ४४ कामे प्रगतीपथावर तर पाच कामे निविदास्तरावर आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेची १२ कामे पूर्ण झाली असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर २८ कामांपैकी २२ पूर्ण तर सहा कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

00000रस्त्यांच्या प्रगतीची माहिती आता पोर्टलवरp- मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी

 मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी

मंत्री अतुल सावे

          नागपूरदि. १९ : मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत ६-६अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईलअसे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

            या उपकरप्राप्त इमारतीची २०१८ मध्ये दुरुस्ती न करता म्हाडाने कामाची बिले अदा केल्याबाबत सदस्य अमीन पटेल  यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्याला उत्तर देताना ते बोलत होते. या दोन इमारतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे.म्हाडाकडे निधी उपलब्ध आहे. रहिवाश्यांनी आर्किटेक्ट सुचवावात्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाईल. फातिमा मंझील इमारतीबाबतही वास्तुशास्त्रज्ञ सुचवून त्यानुसार काम केले जाईल. तसेच डोंगरी भागातील वार्डात मागच्या पाच वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाचे अहवाल मागवले जाईल, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

            यापूर्वीच म्हाडाला अर्थसंकल्पात  ७९ कोटी रूपयेपावसाळी अधिवेशनात ९५ कोटी रूपये आणि हिवाळी अधिवेशनात ९८ कोटी रुपये निधी मिळाला आहे. विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही. म्हाडातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जाहिराती काढण्यात आल्या आहेत. लवकरच पदे भरले जातीलअसे मंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले.

००००

मध्यंतरी एका अंत्यविधी साठी

 ______________________

||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆||

================


               मध्यंतरी  एका अंत्यविधी साठी

अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि

मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्या साठो आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर 

एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात

दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे

आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत 

दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता.

मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं

आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला.

कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटने नंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणालातरी भेटायला गेलो होतो.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते.

बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी

अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या

बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. 

               थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे

बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो. 

" नमस्कार!" मी म्हंटल. त्यांना हे अपेक्षित नसावं

ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी

पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान

हलवली. " आपलं नाव काय?" मी विचारलं. त्यांचा

पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील.  "तुमचं नाव सांगा." त्यांनी तुटकपणे

मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ

गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो

" अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं.

आपण दोन मिनिटं बोलू शकता का?"

"नाही." समोरून फटकन उत्तर आलं. आता मला

धक्के पचवायची सवय झाली होती.

"नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी

बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी

भेटू. आणि माझं नाव नंदू... म्हणजे नंदकुमार सप्रे."

एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी

त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो.

साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा

बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा,

पायात चपला. अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी

दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून

माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला

पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.


               आणि तो दिवस लौकरच आला. मी

कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या

कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा

कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला

गाडी बाजूला घ्यायला संगितली आणि पटकन

खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राह्यलो.

"सप्रे कोणाची वाट बघताय?" मी.

"नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय."

"अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था

करू." मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर

काढायला पाठवलं.

"अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती

करून." सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

"असू द्या हो सप्रे, चला आपण तो पर्यंत गाडीत बसून

बोलू."  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात

केली, "सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस

असा का वागतोय, धड बोलत देखील नाही.

आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो

हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून

अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी

असल्या सारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं

"सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतू

नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण

कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला

असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry."

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी

बोलायला सुरुवात केली. "प्रशांतजी, आज पर्यंत

या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज

मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण अस आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला.

मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी.

मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी

पत्नीचे कोविड मध्ये निधन झाले. आम्ही दोघेही

बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी

हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात

ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली. 

इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण

परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ

भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे.

आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची

कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं.

तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार

पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा

की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही

चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला

सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी

मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं. 

माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक

जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय

का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट

स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या

समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा

दिसतो. हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक

अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो.

चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो.

थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं.

मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा

बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं

पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय."

मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे

देखील मला कळत नव्हते. "सप्रे तुम्ही फार मोठं

काम करताय, You are great." एवढंच मी बोलू

शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती.

सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड

दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या

आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही.

एक दिवस कोणीतरी सप्रे गेले अस सांगितलं.

मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड

होता "मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट" आत एक जोशी

नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे

विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं

येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

"आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।


सुनील होरणे

९८२२११६६३६

E-mail : horanesunil@gmail.com

कोरी वही !"*

 🌹

*"कोरी वही !"*


नविन सुनेचा गृहप्रवेश झाला, सून म्हणाली सासूला

"काय हाक मारु आजपासुन मी तुम्हाला"

सासू संभ्रमात , का हिला असा प्रश्न पडला

वाटलं पटकन म्हणावं , " अगं आईच म्हण मला"

पण हे नातं आहे, कुठला कागद नाही चिकटायला

वेळ द्यावा लागेल नातं आकार घ्यायला 

सावरुन स्वतःला म्हणाली सुनेला 

"मनापासुन जे वाटेल ती साद घाल मला

जे नातं जोडशील ते  निभावून न्यायचंय तुला आणि मला".


नव्यानवलाईचे दिवस सुरु झाले

मुलगा सून संसारात रमले

रोज नविन बेत आखले गेले

कधी नाटक कधी सिनेमे बघितले

रोज नवनवीन पदार्थ होऊ लागले

कधी सासुने कधी सुनेने केले

वर्षाचे सण मजेत साजरे झाले

पण सासुच्या एक लक्षात आले

सुनेने तिला प्रेमाने साद घालायचे टाळले 

मन खट्टू झाले पण वेळीच स्वतःला सावरले

ओठात एक नी पोटात एक, सून नाही अशी आपली 

साद घालेल ती कायमची ही सासुची खात्री पटली


दिवस सरले नवीन पाहुण्याची चाहुल लागली

गोड बातमी सर्वत्र पसरली

सासरी माहेरी कौतुकाला उधाण आले 

सुनेचे मोठ्या प्रेमाने लाडकोड सुरु झाले 

प्रसंगी मुलाला दटावले सुनेला पाठीशी घातले

सासूची लगबग सून डोळे भरुन पाहू लागली

सुनेचं दिवसागणिक बदलतं रूप सासू डोळ्यात साठवू लागली


दिवस काही सरले आणि सुनेने प्रेमाने साद घातली

" साई"

सासू गोंधळली सुनेकडे पाहून विचारती झाली

"मला हाक मारली?"

सून प्रेमाने हसली आणि म्हणाली,

"सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात

दोन नात्यांची सांगड घालून "साई" म्हणायला केली सुरुवात"

सासू आनंदली सून तिला बिलगली

दोघींच्या मनातली किल्मिषं दूर झाली

मग सासू म्हणाली सुनेला ,"मानलं आहेस मला आई

तर आईसारखं कधी रागवले तर चालेल ना तुला बाई ?"

सून म्हणाली," मानलं आहे तुम्हाला आई

मुली सारखी रुसले तर सावराल ना हो साई ?"

एक नातं आकार घ्यायला लागलं 

सासू-सुनेचं चांगलच सूत जमलं !


दोघींनी मिळून मग निर्णय घेतला काही

घरातल्या पुरूषांना वादात कधी गुंतवायचं नाही

पुरुष याबाबत असतात अलिप्त

मोडू नये त्यांची ही शिस्त

दोघींनी करायची एक एक वही

लिहायचं त्यात सर्व काही

हेवेदावे,रुसवेफुगवे सगळं काही

कैद करायला वापरायची ती वही

आठवड्यातून एकदा करायची वहीची अदलाबदल 

वाचून करायचा त्यानूसार स्वभावात थोडा बदल


वहीत लिहायला सुरुवात केली 

मनातली अढि कमी होत गेली

एकमेकींच्या चुकांची दोघींना गम्मत वाटू लागली

क्षमाशील मनाची नव्याने ओळख पटली


मुलांच्या संसारवेलीवर फुले उमलली

मुलगा सून आता कर्तिसवर्ती झाली

नात्यांची विण आता अधिक घट्ट झाली

तशी दोघींची वही आता कोरीच राहू लागली

वही आता कोरीच राहू लागली !


नविन नात्याच्या उंबरठ्यावर उभी एक आई

येईल ना तिला पण होता कुणाची तरी "साई" ?


साभार

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याच्या मान्यतेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

 दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याच्या मान्यतेसाठी

केंद्राकडे पाठपुरावा करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            नागपूरदि. 18 - दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठिशी आहे. त्याचप्रमाणे दूध भेसळ रोखण्यासाठी अशा व्यक्तींविरूद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालिन राज्य शासनाने करून केंद्र सरकारकडे पाठविला होता. तथापि त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याचे सांगून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य हरिभाऊ बागडे यांनी दूध उत्पादकांना मदत करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य बाळासाहेब थोरातजयंत पाटीलॲड.राहुल कुलराजेश टोपे आदींनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीदूध अथवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन प्रामुख्याने लहान मुले करतात. अशा पदार्थांमध्ये भेसळ करणे योग्य नाही. 

महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय महिला आमदारांची समिती

 महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी

सर्वपक्षीय महिला आमदारांची समिती

        - मंत्री उदय सामंत

            नागपूरदि. १८ : महानगर पालिकामुंबई बेस्ट परिवहन उपक्रम तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करतात. अशा महिलांच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठीत्यांना दर्जेदार सोयी - सुविधा उभारण्यासाठी सर्वपक्षीय पाच महिला आमदारांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचा अहवाल ३० दिवसात  बोलाविण्यात येईल. त्यावर शासन आवश्यक ती कार्यवाही करेलअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या  उत्तरात दिली. 

            मुंबईतील बेस्ट उपक्रमात महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य डॉ. भारती लव्हेकरयामिनी जाधवदेवयानी फरांदेयशोमती ठाकूरमनीषा चौधरीराम कदमअजय चौधरी यांनी भाग घेतला. 

            मंत्री श्री. सामंत म्हणालेबेस्ट उपक्रमात ५ हजार ६४३ चालक असून १८९५ वाहक आहेत. यामध्ये १४३ महिला कर्मचारी आहेत. बेस्ट उपक्रमात २७ आगार व ५७ बस स्थानके आहेत.  पुरुषांसाठी ५७ ठिकाणी स्वतंत्र शौचालय असून ३० ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आहे. या सर्व शौचालयस्वच्छता गृहामध्ये दर्जेदार सर्व सोयी - सुविधा महिला कर्मचाऱ्यांसाठी उभारण्याबाबत बेस्ट प्रशासनाला निर्देश देण्यात येतील. या सर्व कंत्राटी महिला कर्मऱ्यांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन देण्यात येते. याबाबत काही तक्रारी आल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. बेस्ट उपक्रमाला महानगरपालिकेने ६ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला आहे. 

             मंत्री श्री. सामंत म्हणालेमहिला व बालविकास विभागाचे अर्थसंकल्पीय निधीची तरतूदझालेला खर्च याबाबत नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील खर्चाचा अहवाल दरवर्षी घेण्यात येईल. महिलांसाठी स्वतंत्र कक्षस्वच्छता गृहाची व्यवस्था मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर करण्यात येईल. 

             यावेळी विधानसभा तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी शासनाला महिला आमदारांसाठी नागपूर व मुंबई विधान भवन येथे स्वतंत्र महिला कक्षस्वच्छतागृह व  आवश्यक त्या सुविधा उपलब्ध पुरविण्याच्या सूचना दिल्या.


महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू

 महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक

समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            नागपूर दि. 18 :- राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज सांगितले.

            तत्पूर्वी राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली, या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवारराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            साठवण क्षमतेच्या अभावामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अणु ऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही. हा प्रकल्प राज्यासाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या पिकास चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचा दृष्टीने हा प्रकल्पही महत्वाचा आहे.
            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. संकटाच्या काळात त्याला मदत करण्यासाठी राज्य शासन  नेहमीच त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहते. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणूकसाठी सहकार्य करून पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आभार मानले.

            प्रारंभी सादरीकरणातून या प्रकल्पाची  माहिती देण्यात आली.


००००

Featured post

Lakshvedhi