Monday, 18 December 2023

राज्यात आवश्यक तेथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणार

 राज्यात आवश्यक तेथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणार

- प्रा. डॉ. मंत्री तानाजी सावंत

            नागपूर दि. 15 : अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उच्च दर्जाचे उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता राज्यात आवश्यक त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

            राज्यातील 45 ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.सावंत बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरेसत्यजित तांबेमनीषा कायंदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

            यावेळी मंत्री श्री. सावंत म्हणाले कीराज्यातील 45 अकार्यान्वित  ट्रॉमा केअर युनिट पैकी 17 चे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित 28 ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित करण्याची कार्यवाही वेगवेगळ्यास्तरावर सुरू आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या सतरा पैकी पंधरा ट्रॉमा केअर युनिटची पद निर्मिती झालेली आहे. यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडे सुरू आहे. या ट्रॉमा केअर युनिटसाठी  वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच गट ’ व ’ पदभरतीची  जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवाराची परीक्षा घेण्याची प्रक्रिया टीसीएस या कंपनीमार्फत सुरू आहे.

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देणार

 नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देणार

उद्योग मंत्री उदय सामंत

            नागपूर दि.15 : नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देऊन प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीउद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

            नंदुरबार जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक क्षेत्र कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य आमश्या पाडवी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीरसत्यजित तांबे आदींनी सहभाग घेतला होता.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीभालेर औद्योगिक क्षेत्रात 285.58 हेक्टर आर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकास कामे करण्यात आले असून एकूण 409 भूखंडाचे आरेखन केले आहे‌. त्यापैकी 55 भूखंडाचे वाटप झालेले आहे. एका भूखंडावर बांधकाम सुरू आहे‌‌. नवापूर औद्योगिक क्षेत्रात 64.19 हेक्टर आर क्षेत्रावर औद्योगिक  क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. यामध्ये 198 भूखंडाचे आरेखन करून 191 भूखंडाचे वाटप झालेले आहे. सात भूखंड शिल्लक आहेत 0.97 भूखंडावर टेक्स्टाईल उत्पादन सुरू आहे. यामध्ये सुमारे 1738 इतका स्थानिकांना रोजगार निर्माण झालेला आहे.

            अतिरिक्त नवापूर औद्योगिक क्षेत्रात मे. जनरल पॉलिफिम्स प्रा.लि.(मेगा प्रोजेक्ट) यांच्याकडून 700 कोटी रुपयांची  गुंतवणूक करण्यात येत आहे. या उद्योगात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष एक हजार एवढा रोजगार निर्माण होणार आहे.

00000

संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना दिलासा देणार

 संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना दिलासा देणार

- मंत्री अब्दुल सत्तार

            नागपूरदि. १८ : संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईलअशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली.

            यासंदर्भात सदस्य मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री. सत्तार म्हणाले कीसंत्रा निर्यातदारांना बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे संत्रा पीक हे परदेशी न पाठवता स्थानिक बाजारपेठेत पाठवावे लागले. त्याचा परिणाम बाजारभाव गडगडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यासाठी राज्य शासनाने १६९ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल.

            विदर्भात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम संत्र्यांचे उत्पादन होतेही वस्तुस्थिती आहे. राज्यात फळेफुले व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत एकूण ४५ आधुनिक निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात ७ निर्यात सुविधा केंद्र असूनविशेषतः संत्र्यासाठी कारंजा घाडगेजि. वर्धा व वरुडजि. अमरावती येथे संत्रा निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत.

            केंद्र शासनाच्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) व भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था (ICAR-Central Citrus Research Institute) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने विदर्भासह इतर राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमक्षेत्रभेट व कार्यशाळा इत्यादी आयोजित केल्या आहेत. या संस्थेमार्फत सन २०२१ ते २०२३ या कालावधीत जवळपास ४००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच रोगमुक्त लिंबूवर्गीय लागवड साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी एकूण ४ सामंजस्य करार करण्यात आले असून त्याअंतर्गत ५० लाखांपेक्षा जास्त साहित्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. सत्तार यांनी लेखी उत्तरात दिली.

साकव दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करणारसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही साकवांची प्राधान्याने दुरुस्ती करणार

 साकव दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करणार

- मंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही साकवांची प्राधान्याने दुरुस्ती करणार

            नागपूरदि. १८ : राज्यातील साकव दुरुस्तीसाठी १३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासंदर्भात अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात येईल. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही साकवांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये निधी प्राधान्याने देण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य राजन साळवी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

            मंत्री श्री.चव्हाण म्हणाले कीजामदाखोरे (ता.राजापूरजि.रत्नागिरी) येथील सावडाव - नेलेंमिळंद-हातदे या गावांना जोडणारा लोखंडी साकव सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेला. या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी नेर्ले येथे १४ किलोमीटर अंतराचा वळसा मारुन जावे लागत आहे. याशिवायवैभववाडी तालुक्यातील नेर्ले व राजापूर तालुक्यातील सावडाव या गावांना जोडणारा वाघोटन नदीवरील साकव आणि राजापूर तालुक्यातील मिळंद-हातदे या दोन गावांना जोडणारा साकव योजनाबाह्य रस्त्यावर आहे. या साकवांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध देण्यात येईल.

            दरम्यानराज्यातील साकवांच्या दुरुस्तीसाठी १३०० कोटी रुपये आवश्यक असून त्यातील ६५० कोटी रुपये केवळ कोकण विभागातील साकवांच्या दुरुस्तीसाठी लागणार असल्याची माहिती मंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

            साकव बांधकाम करणे खर्चाची कमाल आर्थिक मर्यादा रु. ६०.०० लाख असून ही मर्यादा वाढविण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन आहे.

            यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारसदस्य शेखर निकमॲड. यशोमती ठाकूरसंग्राम थोपटेअजय चौधरी आणि ॲड. आशिष जैस्वाल यांनी चर्चेत भाग घेतला. 

पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी चौकशी अहवालानंतर कारवाई करणार

 पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी 

चौकशी अहवालानंतर कारवाई करणार

- मंत्री अब्दुल सत्तार

 

नागपूरदि. १८ : पुलगाव (ता. देवळीजि. वर्धा) येथे तीन ट्रकमध्ये ८८ हजार १२५ किलो तांदूळ सापडला आहे. या तांदळाची किंमत  ४५ लाख ८६ हजार ९७१ रुपये आहे. या प्रकरणी  अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापडलेला तांदूळ तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईलअशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.    

           पुलगाव येथील सापडलेल्या तांदळाबाबत विधानसभा सदस्य रणजित कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

       पणन मंत्री श्री. सत्तार म्हणाले,पोलिसांनी केलेल्या तपासानुसार या प्रकरणी दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 22 स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील.

कीटकनाशके आणि अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

 कीटकनाशके आणि अन्य साठ्यांच्या अपहारांवर

आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

-         मंत्री धनंजय मुंडे

 

नागपूर दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले .

अकोला जिल्ह्यातील महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील भांडारपालाने कीटकनाशकांच्या केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले कीसंबंधित भांडारपालास निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर विभागीय चौकशी सुरू आहेतसेच या अपहाराच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधक समितीच्या अहवालानुसार संबंधित भांडारपालावर अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे .

महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळावा हा अंतिम उद्देश शासनाचा आहे. मात्र कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकारी शासनाची फसवणूक करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सामग्रीचा अपहार करत असेल, तर अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सरकार गय करणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलअसेही श्री. मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यासंदर्भातील कारवाई गतीने पूर्ण केली जावी. याबाबत सत्यशोधक समितीच्या अंतिम अहवालात सर्वकाही स्पष्ट होईल व दोषीवर कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जाईलअसे मंत्री श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

खांसी का रामबाण सफल इलाज...

 खांसी का रामबाण सफल इलाज...


खांसी एक आम समस्या है जो किसी भी मौसम में आपको हो सकती है. कई बार खांसी अपने आप ठीक हो जाती है तो कुछ मामलों में दवाओं का सहारा लेना पड़ता है. कभी-कभी खांसी की समस्या इतनी बढ़ जाती है कि इसकी वजह से सीने और पसलियों में दर्द होने लगता है. इस लेख में हम आपको  खानपान से जुड़ी जानकारियों के बारे में बता रहे हैं. 


◾खांसी के प्रकार◾


अगर खांसी आने पर साथ में बलगम भी निकल रहा है तो इसे बलगम वाली खांसी या गीली खांसी कहा जाता है. वहीं दूसरी तरफ अगर बलगम नहीं निकल रहा है तो इसे सूखी खांसी (Dry Cough) कहा जाता है. 


सूखी खांसी की समस्या अक्सर रात के समय बहुत बढ़ जाती है और इससे लोगों की नींद डिस्टर्ब होने लगती है. यही वजह है कि खांसी की कई अंग्रेजी दवाओं (Khansi ki Medicine) में ऐसे घटक मिलाए जाते हैं जिससे नींद जल्दी आ जाए और खांसी से आराम मिले. 


वैसे तो बाजार में खांसी के लिए कई कफ सिरप मौजूद हैं लेकिन अधिकांश लोग आयुर्वेदिक कफ सिरप लेना पसंद करते हैं. ऐसा इसलिए क्योंकि आयुर्वेदिक कफ सिरप (Ayurvedic Cough Syrup) पीने से नींद भी नहीं आती है और इससे पुरानी से पुरानी खांसी भी जल्दी ठीक हो जाती है. 


◾खांसी होने के कारण-:


कभी कुछ अधिक ठंडी चीजें जैसे कि आइसक्रीम खा लेने या कोल्ड ड्रिंक पी लेने के बाद खांसी होना आम बात है. इसके अलावा जुकाम होने पर या गले में संक्रमण होने से भी खांसी की समस्या हो सकती है. 


◾खांसी से राहत पाने के लिए आसान घरेलू उपाय-:


खांसी होने पर अधिकांश लोग घरेलू उपाय अपनाने के बारे में सोचते हैं. आयुर्वेदिक एक्सपर्ट का भी मानना है कि खांसी के इलाज में अगर सही तरीके से घरेलू इलाज अपनाएं जाएं तो खांसी जल्दी ठीक हो जाती है. आइए जानते हैं कि खांसी होने पर किन चीजों का सेवन करें:-


1. शहद (Honey for Cough): शहद सूखी और कफ वाली दोनों तरह की खांसी के इलाज में बहुत कारगर है. रात में सोने से पहले अगर आप एक चम्मच शहद का सेवन करें तो सोते समय खांसी कम आती है. आयुर्वेद के अनुसार शहद में कफ शामक गुण होते है जो की खांसी की समस्या को कम करने मदद करते है. 


2. तुलसी (Tulsi for Cough): आयुर्वेद में प्राचीन काल से ही खांसी के इलाज के लिए तुलसी का प्रयोग किया जाता है. तुलसी में एंटीमाइक्रोबियल, एंटी-इनफ्लेमेटरी, एंटीटसिव और एंटी-एलर्जिक क्षमताएं होती हैं जो खांसी से जल्दी राहत दिलाती हैं. यही वजह है कि खांसी की अधिकांश आयुर्वेदिक सिरप में तुलसी का उपयोग किया जाता है. 


3. मुलेठी(Mulethi for Cough): मुलेठी को आयुर्वेद में यष्टिमधु भी कहा गया है जिसका निर्देश कफ संबंधी रोगों लेने का दिया गया है.  गले के स्वास्थ्य के लिए मुलेठी बेहद फायदेमंद है. खांसी हो या गले में खराश हो मुलेठी का सेवन करने से जल्दी आराम मिलता है. मुलेठी गले में ज्यादा बलगम बनने से रोकती है और इस तरह यह खांसी से राहत दिलाती है. 


4. काली मिर्च (Kali Mirch for Cough): काली मिर्च गले की जलन से राहत दिलाती है साथ ही अगर इसका सेवन शहद के साथ किया जाए तो खांसी से जल्दी आराम दिलाती है. 


5. पिप्पली (Pippali for Dry Cough): पिप्पली की तासीर गर्म होती है. आयुर्वेदिक विशेसज्ञों के अनुसार, गला बैठने की समस्या से राहत दिलाने में यह बहुत कारगर है. इसके अलावा यह गले में मौजूद कफ को हटाने में भी मदद करती है. 


6. सोंठ (Sonth or Dry Ginger for Cough): खांसी और गले के संक्रमण के इलाज में उपयोग की जाने वाली की आयुर्वेदिक दवाओं में सोंठ का उपयोग प्रमुखता से किया जाता है.ठंड लगने या जुकाम की वजह से होने वाले खांसी को दूर करने में सोंठ बहुत उपयोगी है. 


खांसी के लिए आयुर्वेदिक कफ सिरप-:


अगर आप खांसी से परेशान हैं और आयुर्वेदिक कफ सिरप खोज रहे हैं तो आपको वो कफ सिरप (Khansi ka Syrup) लेना चाहिए जिसमें ऊपर बताई गई अधिकांश जड़ी-बूटियाँ शामिल हों. जैसे कि  टाटा 1mg तेजस्या कफ रिलीफ सिरप में शहद, तुलसी, मुलेठी, सोंठ और पिप्पली सभी जड़ी-बूटियाँ मौजूद हैं जो इसे बेहद खास और प्रभावी बनाती हैं. आप सूखी खांसी से परेशान हो या बलगम वाली खांसी से, तेजस्या कफ सिरप का उपयोग दोनों में किया जा सकता है.


खांसी के दौरान क्या खाएं और क्या ना खाएं:-


◾क्या ना खाएं ◾

🔹ठंडी चीजों से परहेज करें 

🔹फ्रिज में रखी लस्सी, कोल्ड ड्रिंक या छाछ पीने से बचें 

🔹अधिक तेल मसाले वाली चीजें ना खाएं 

               

◾ क्या खाएं◾

🔹गुनगुना पानी पिएं 

🔹नमक के पानी से गरारे करें 

🔹गर्म तासीर वाली चीजें खाएं..


पोस्ट स्वास्थ्य जानकारी हेतु रिट्वीट शेयर फालो जरूर करें धन्यवाद 💌😇

Featured post

Lakshvedhi