Monday, 18 December 2023

पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी चौकशी अहवालानंतर कारवाई करणार

 पुलगाव येथील तांदूळ साठ्याप्रकरणी 

चौकशी अहवालानंतर कारवाई करणार

- मंत्री अब्दुल सत्तार

 

नागपूरदि. १८ : पुलगाव (ता. देवळीजि. वर्धा) येथे तीन ट्रकमध्ये ८८ हजार १२५ किलो तांदूळ सापडला आहे. या तांदळाची किंमत  ४५ लाख ८६ हजार ९७१ रुपये आहे. या प्रकरणी  अतिआवश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापडलेला तांदूळ तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईलअशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.    

           पुलगाव येथील सापडलेल्या तांदळाबाबत विधानसभा सदस्य रणजित कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

       पणन मंत्री श्री. सत्तार म्हणाले,पोलिसांनी केलेल्या तपासानुसार या प्रकरणी दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 22 स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi