Monday, 18 December 2023

अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार

 अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

            नागपूर दि. 15 : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

            या संदर्भातील प्रश्न सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री. सामंत म्हणाले कीअकोला विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ६६१.४३ हेक्टर आर संपादित जमिनीपैकी टेक्स्टाईल पार्कला शंभर  हेक्टर आर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ५० आरेखित भूखंड वाटपास उपलब्ध असून त्याचे क्षेत्रफळ ४३.८३ हेक्टर आर आहे. या क्षेत्रामध्ये सामाईक सोयीसुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविण्यात आल्या आहेत.

00000

जिल्हा परिषदांच्या शाळांची बिंदूनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण

 जिल्हा परिषदांच्या शाळांची बिंदूनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण

- मंत्री दीपक केसरकर

            नागपूर, दि. १५ : सन २०१७ नंतर शिक्षक भरती करताना जिल्हा परिषद शाळांच्या बिंदूनामावलीमध्ये त्रुटी असल्याबाबत या विभागास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर दिलेल्या निर्देशानुसारसर्व जिल्हा परिषद शाळांची बिंदूनामावली प्रक्रिया तपासून पूर्ण झाली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य महादेव जानकर यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीशिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदूनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याची पूर्णपणे तपासणी झाली आहे. हा विषय जिल्हा परिषदग्रामविकासमागासवर्ग कक्ष यांची एकत्रित बैठक घेऊन तांत्रिक विषयसकारात्मक बिंदूनामावली तपासणे व कागदपत्रांची पडताळणी करून भरती प्रक्रिया तातडीने झाली पाहिजे हा शासनाचा मानस आहे. ही भरती प्रक्रिया होताना कोणावरही अन्याय होणार नाहीयाची शासन दखल घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बदली हा विषय जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने ही प्रक्रिया 18 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहेअसल्याचेही त्यांनी सांगितले.

            बिंदूनामावली बाबत विविधस्तरावरील प्राप्त तक्रारीनंतर नियुक्ती प्राधिकारी असलेल्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्ययावत केलेली व कार्यरत शिक्षकांची पदे बिंदूनामावली अद्ययावतीकरणाची कार्यवाही केली असून ही बिंदूनामावली मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्तांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करुन दिली आहे. त्यानुसार राज्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची २४,४६२ रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीमध्ये एनटीसी (भजक) प्रवर्गाच्या रिक्त जागा जवळपास ५३२ इतक्या दिसून येत आहेत.

            सन २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीची तपासणी करताना प्राप्त तक्रारी विचारात घेऊनसंबंधित जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही केलेली असल्यामुळे व त्याची पडताळणी करून सहायक आयुक्तमागासवर्ग कक्ष यांनी जिल्हा परिषदांची बिंदूनामावली प्रमाणित केली असल्यामुळे त्यामध्ये तफावती राहिल्या नाहीतअसेही लेखी उत्तरात नमूद केले आहे.

            शासनस्तरावरुन तसेच शिक्षण आयुक्त यांच्या स्तरावरुन एनटीसी प्रवर्ग तसेच इतर सर्व प्रवर्गाच्या बिंदूनामावली तपासणीतील त्रुटी दूर करण्यासंदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार बिंदूनामावली अद्ययावत करण्यात आली आहेअसेही यात नमूद केले आहे.

०००००

प्रवीण भुरके/विसंअ/


मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; जय्यत तयारी सुरू

 मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी 

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; जय्यत तयारी सुरू 

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर (जि. जळगांव) येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली. या संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलन आदि कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. 


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या  कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनीप्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलनपूर्व कार्यक्रम म्हणून बालमेळावा आयोजित केला आहे. यात बालनाट्य तसेच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित नाट्य प्रवेश-नाट्यछटा, गाणी सादर होतील. 


दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलानाची सुरुवात सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर स.१०.३० वा. उद्घाटन समारंभा आधी ध्वजारोहण व ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. दु.२ वा. बालसाहित्य संमेलनातील निवडक कार्यक्रमाचे सादारीकरण होईल. दु.३.३० वा. मुख्य सभागृहात होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे, राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय संध्याकाळी ५.३० वा. कविसंमेलन होईल. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सभागृहात दु. २.३० वा. कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक या विषयावर परिसंवाद होईल. दु. ३.३० वा. शासकीय परिसंवाद सादर होईल. संध्या. ५ वा. स्थानिक वक्ते स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयावर भाषण करणार आहेत.


दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलनाची सुरुवात स.९ वा. गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीने होईल. मुख्य मंडपात स. ११ वा. आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का? आणि दु.१२ वा. अलक्षित साने गुरुजी या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. यांत साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दु.२ वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे 'आंतरभारती काल-आज-उद्या.' दु.२ वा. आठवणीतल्या कविता-रसास्वाद नंतर संध्या. ६ वा. कविसंमेलन-२ होणार आहे. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सभागृह २ मध्ये स.१० वा. चैत्राम पवार यांची मुलाखत नंतर दु.११ वा. मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे या विषयावर परिसंवाद होईल. दु. १२.३० वा. स्थानिक बोलीभाषेवर कार्यक्रम सादर करतील. दु. १.३० वा. कथाकथन. दु. ४ वा. कळ्यांचे निःश्वास परीचर्चेचा कार्यक्रम सादर होईल. संध्या. ६ वा. स्थानिक लोकांचा अभिवाचनाचा कार्यक्रम होईल.


दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी स.९ वा. श्री. बाबा साहेब सौदागर यांची मुलाखत. नंतर स.१०.३० वा अभिरूप न्यायालय यांत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज नाहीत या विषयावर चर्चा होईल. दु.१२ वा. परिसंवादः मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल आयोजित केला आहे. दु.३ वा. लेखिका मीना प्रभू आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. दुसऱ्या मंडपात स.९.३० वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य. स. ११ वा. साहित्यिकांचे शताब्दी स्मरण मध्ये शाहीर साबळे, जी.ए. कुलकर्णी, के.ज. पुरोहित-शांताराम, श्री. पु. भागवत, विद्याधर गोखले, विद्याधर पुंडलिक, इ. साहित्यिकांचे स्मरण करण्यात येईल. दु. २ वा. भारतीय तत्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. तसेच दोन दिवस कवी कट्टा, एक दिवस गझल कट्टा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Sunday, 17 December 2023

राज्यातील विविध विश्वस्त संस्थांना दिलेल्या जमिनींसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना

 राज्यातील विविध विश्वस्त संस्थांना दिलेल्या जमिनींसंदर्भात

जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना

- राधाकृष्ण विखे पाटील

            नागपूरदि. 15 : राज्यातील विविध विश्वस्त संस्थाना (ट्रस्ट) समाजोपयोगी कारणांसाठी राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनींचा वापर त्या कारणांसाठी झाला किंवा नाही यासर्व बाबींची चौकशी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            मुंबईतील विविध ट्रस्टच्या जमिनींविषयी सदस्य सचिन अहीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटील म्हणालेट्रस्टना दिलेल्या काही जमिनींवर अनधिकृत बांधकामे झाले आहेत. काही जमिनींचा वापर दिलेल्या कारणासाठी झालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील अशा जमिनी शासन हस्तांतरित करण्यासाठी चौकशी करण्यात येत आहे. ज्या जागेवर अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर अनेक लोक राहतातत्यांची माहिती घेऊन सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नुतनीकरण करण्यात दोषी आढल्यास त्या संबंधित कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            यावेळी सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकरअमोल मिटकरीप्रसाद लाड यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.

मराठी साहित्य संमेलनात 'बालमेळावा'; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

 मराठी साहित्य संमेलनात 'बालमेळावा'; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी कलानंद बालमेळावा संपन्न होत आहे. या संमेलनातील बालमेळाव्यात बालनाट्य, काव्य वाचन, नाट्यछटा, नाट्य प्रवेश, समूहगीत, कथाकथन, सादरीकरण करण्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 


बालमेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आपले कला गुण सादर करु शकतात. काव्य वाचनासाठी स्वलिखीत कवितांचे सादरीकरण करण्यासाठी २० डिसेंबरला निवड चाचणी होईल. बालमेळावा उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतातील गायनाची निवड चाचणी २६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होईल व त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतात खरा तो एकची धर्म व बालसागर भारत हो या गाण्यांवर समुहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. नाट्यछटा सादरीकरण २७ डिसेंबरला सकाळी दहा वाजता होईल. सर्व निवड चाचण्या साने गुरुजी हायस्कूल एस.एम. गोरे सभागृह अमळनेर येथे होणार आहेत.


ज्यांना कलानंद बालमेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावीत त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळातून निवड करून कलानंद बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात येतील. कलानंद बालमेळावा साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ आहे त्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर जिल्हा जळगाव येथे पाठवावे, असे आवाहन, आयोजकांकडून करण्यात आले आहे. 


चिमुकल्यांच्या हस्तेच बालमेळाव्याचे उद्घाटन

कलानंद बालमेळाव्याला उद्घाटक म्हणून मुलगा, मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. कलानंद बाल मेळाव्याचे उद्घाटक मुलगा, मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्या मुलामुलींचे कविता कथा आणि इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला नामवंतांनी गौरविण्यात असेल अथवा एखाद्या साहित्यिक पुरस्कार मिळाला असेल असे इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे (मो.९४२२२७९७१०), भैय्यासाहेब मगर (मो.९४२३९०४४८३), वसुंधरा लांडगे (मो.९६८९०३७८४१), स्नेहा एकतारे (मो.९४२३९०२९६५) यांच्याशी संपर्क साधावा.



९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7


गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष

 गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष


…………..

बिहारमध्ये रुग्णालयानंतर धर्म शाळेसाठी प्रयत्न
केंद्रीय गृहराज्यमंत्र्याकडे पाठपुरावा

प्रशांत देशमुख यांच्या पुढाकारातून प्रभावी प्रयत्न

मुंबई - बिहारमधील वाढती कर्क रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे. मुंबईच्या टाटा ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय लक्षात घेता प्रशांत देशमुख यांच्या अथक पाठपुराव्यामुळे टाटा मेमोरियलने बिहारच्या मुझफ्फरपूर येथे कर्क रुग्णालय सुरू केले. त्यानंतर आता या ठिकाणी गाडगे महाराज धर्मशाळा व्हावी यासाठी प्रशांत देशमुख यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. बिहारसह विविध ठिकाणी असलेल्या दानशूर नेत्यांची त्यांनी त्यासाठी भेट घेतली असून यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा त्यामध्ये समावेश असून त्यांनी याकरिता सर्वकष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

 देशभरातून कर्क रुग्ण हे मुंबईत येतात. टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातात. देशातील विविध राज्यांच्या तुलनेत  बिहारमधील कर्करुग्णांची संख्या अधिक आहे. दादरच्या धर्मशाळेत रुग्णालयात येणारे रुग्ण आश्रय घेतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता धर्मशाळेवरही काही मर्यादा येतात. त्यांची पुरेशा प्रमाणात सोय उपलब्ध होऊ शकत नाही. यातून व्याकुळ होत दादरच्या धर्म शाळेचे प्रमुख प्रशांत देशमुख यांनी बिहारमध्येच टाटा ट्रस्ट रुग्णालय व्हावे यासाठी 2016 पासून प्रभावीपणे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी बिहार मधील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. विषयाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. त्यानंतर आता बिहारच्या मुजफ्फरपुर येथे टाटा मेमोरियल सेंटर द्वारे कर्क रुग्णालय सुरू केले आहे. 250 ते 300 पर्यंत ची येथील ओपीडी असते. या रुग्णालयाचा आणखीन मोठ्या प्रमाणात विस्तार म्हणून 154 कोटी रुपयाचे निधीतून बांधकाम येथे केले जाणार आहे. रुग्णांच्या उपचाराचाच प्रश्न सुटत नाही तर प्रशांत देशमुख यांनी बिहारच्या मुजफ्फर पूर येथे श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी अलीकडेच त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांना या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. त्यांनीही सहकार्य दाखवले असून धर्मशाळे करिता जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे गाडगे महाराज भक्त मंडळाचे अरविंद राय यांचे त्यासाठी विशेष सहकार्य मिळत असल्याची माहिती प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.

------

कोट..

मुजफ्फरपुर येथे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा व्हावी यासाठी संपूर्ण लोकप्रतिनिधी यांची भेट घेत आहे. यापूर्वी त्याठिकाणी रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न आरंभले होते. ते यशस्वी झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारानंतर रुग्णांच्या निवासाचा प्रश्न सुटला तर त्यांना मुंबईत येण्याची आवश्यकता राहणार नाही. गाडगेबाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे त्याकरिता मोलाचे सहकार्य मिळत आहे.

-प्रशांत देशमुख,

व्यवस्थापक, संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट, दादर, मुंबई

----

फोटो ओळ - केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद  राय यांच्याशी धर्मशाळा निर्माणाबद्दल चर्चा करताना प्रशांत देशमुख.

00000

बातमी हिंदी.

-----

दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

 दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

आपण नाटक पाहायला गेलो, तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच. असत  साबण बनवायला तेल हा घटकजरूरीचा असतो आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो! हा अटळ विरोधाभास आहे. जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात, वेडी माणसं आणि लहान मुलं! चांगल्या काम ासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या जगण्याचा आनंद घ्या.

जीवन खूप सुंदर आहे. फक्त तसं जगायला हवं, काचेला पारा लावला की, आरसा तयार होतो. पण, लोकांना आरसा दाखवला की, त्यांचा पारा चढतो. आरसा तोच असतो. फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की, आपण दुःखी दिसतो. तसेच, जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल.

Featured post

Lakshvedhi