अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार
- उद्योग मंत्री उदय सामंत
नागपूर दि. 15 : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
या संदर्भातील प्रश्न सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री. सामंत म्हणाले की, अकोला विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ६६१.४३ हेक्टर आर संपादित जमिनीपैकी टेक्स्टाईल पार्कला शंभर हेक्टर आर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ५० आरेखित भूखंड वाटपास उपलब्ध असून त्याचे क्षेत्रफळ ४३.८३ हेक्टर आर आहे. या क्षेत्रामध्ये सामाईक सोयीसुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविण्यात आल्या आहेत.
00000
No comments:
Post a Comment