Sunday, 17 December 2023

गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष

 गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष


…………..

बिहारमध्ये रुग्णालयानंतर धर्म शाळेसाठी प्रयत्न
केंद्रीय गृहराज्यमंत्र्याकडे पाठपुरावा

प्रशांत देशमुख यांच्या पुढाकारातून प्रभावी प्रयत्न

मुंबई - बिहारमधील वाढती कर्क रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे. मुंबईच्या टाटा ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय लक्षात घेता प्रशांत देशमुख यांच्या अथक पाठपुराव्यामुळे टाटा मेमोरियलने बिहारच्या मुझफ्फरपूर येथे कर्क रुग्णालय सुरू केले. त्यानंतर आता या ठिकाणी गाडगे महाराज धर्मशाळा व्हावी यासाठी प्रशांत देशमुख यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. बिहारसह विविध ठिकाणी असलेल्या दानशूर नेत्यांची त्यांनी त्यासाठी भेट घेतली असून यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा त्यामध्ये समावेश असून त्यांनी याकरिता सर्वकष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

 देशभरातून कर्क रुग्ण हे मुंबईत येतात. टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातात. देशातील विविध राज्यांच्या तुलनेत  बिहारमधील कर्करुग्णांची संख्या अधिक आहे. दादरच्या धर्मशाळेत रुग्णालयात येणारे रुग्ण आश्रय घेतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता धर्मशाळेवरही काही मर्यादा येतात. त्यांची पुरेशा प्रमाणात सोय उपलब्ध होऊ शकत नाही. यातून व्याकुळ होत दादरच्या धर्म शाळेचे प्रमुख प्रशांत देशमुख यांनी बिहारमध्येच टाटा ट्रस्ट रुग्णालय व्हावे यासाठी 2016 पासून प्रभावीपणे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी बिहार मधील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. विषयाचे गांभीर्य त्यांना पटवून दिले. त्यानंतर आता बिहारच्या मुजफ्फरपुर येथे टाटा मेमोरियल सेंटर द्वारे कर्क रुग्णालय सुरू केले आहे. 250 ते 300 पर्यंत ची येथील ओपीडी असते. या रुग्णालयाचा आणखीन मोठ्या प्रमाणात विस्तार म्हणून 154 कोटी रुपयाचे निधीतून बांधकाम येथे केले जाणार आहे. रुग्णांच्या उपचाराचाच प्रश्न सुटत नाही तर प्रशांत देशमुख यांनी बिहारच्या मुजफ्फर पूर येथे श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी अलीकडेच त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांना या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. त्यांनीही सहकार्य दाखवले असून धर्मशाळे करिता जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे गाडगे महाराज भक्त मंडळाचे अरविंद राय यांचे त्यासाठी विशेष सहकार्य मिळत असल्याची माहिती प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.

------

कोट..

मुजफ्फरपुर येथे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा व्हावी यासाठी संपूर्ण लोकप्रतिनिधी यांची भेट घेत आहे. यापूर्वी त्याठिकाणी रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न आरंभले होते. ते यशस्वी झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारानंतर रुग्णांच्या निवासाचा प्रश्न सुटला तर त्यांना मुंबईत येण्याची आवश्यकता राहणार नाही. गाडगेबाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे त्याकरिता मोलाचे सहकार्य मिळत आहे.

-प्रशांत देशमुख,

व्यवस्थापक, संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट, दादर, मुंबई

----

फोटो ओळ - केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद  राय यांच्याशी धर्मशाळा निर्माणाबद्दल चर्चा करताना प्रशांत देशमुख.

00000

बातमी हिंदी.

-----

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi