Sunday, 17 December 2023

स्वच्छता अभियान में मुंबईकर बड़ी संख्या में हुए शामिल संकल्प : स्वच्छ, सुंदर व हरित मुंबई का

 स्वच्छता अभियान में मुंबईकर बड़ी संख्या में हुए शामिल

संकल्प : स्वच्छसुंदर व हरित मुंबई का

                                                          - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई दि 17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देशभर में स्वच्छता अभियान चलाकर सभी के लिए स्वच्छता का आदर्श स्थापित किया है. यहीं प्रेरणा लेकर मुंबई  प्रदूषणमुक्तस्वच्छ और हरित करने का संकल्प लेकर अब मुंबई गड्ढेमुक्त हो रही हैयह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बताया. 

संपूर्ण स्वच्छता अभियान (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) के अंतर्गतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में बृहन्मुंबई महानगरपालिका के ‍चार परिमंडल के चार प्रशासकीय विभागों में (वॉर्ड) स्वच्छता अभियान का आयोजन किया गया.   

इस अवसर पर कौश विकास उद्यमिता एवं नवाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिले के पालकमंत्री मंगल प्रभात लोढासांसद मनोज कोटकसांसद राहुल शेवाळेविधायक राम कदमविधायक कालिदास कोळंबकरबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त

अश्विनी भिडेअतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आदि मान्यवर उपस्थित थे.

आज सुबह से ही एन विभाग के अमृतनगर सर्कल से इस स्वच्छता अभियान का प्रारंभ किया गया. स्वच्छता करने के लिए आवश्यक ग्लोव्हज हाथ में पहनकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता अभियान में शामिल हुए. अमृतनगर सर्कल में मुख्यमंत्री श्री. शिंदे के हाथों स्वच्छता कर्मियों को सम्मानित किया गया. 

उसके पश्चात्  एन विभाग के कामराज नगर व घाटकोपर पूर्व स्थित राजावाडी अस्पताल परिसर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता अभियान में शामिल हुए. एम पश्चिम विभाग के डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानतिलक नगरभैरवनाथ मंदि मार्गएफ उत्‍तर विभाग के भैरवनाथ मंदिर मार्गयहाँ पर भी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपस्थिति में 'संपूर्ण स्वच्छता अभियानचलाया गया. 

लोगों की सहभागिता

अतिरिक्त मानव संसाधन के साथ विविध संयंत्रों की सहायता से वॉर्ड के कोने-कोने की स्व‍च्छता की गई. शालेय विद्यार्थियों समेत मुंबई के लोगों ने भी इस अभियान में बड़ी संख्या में भाग लिया. 

अत्याधुनिक तकनीक का उपयोग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि मुंबई शहर के प्रदूषण पर नियंत्रण के लिए प्रमुखता से यह स्वच्छता अभियान चलाया जा रहा है. स्वच्छता अभियान के लिए आवश्यक मानव संसाधन उपलब्ध कर यह अभियान चलाया जा रहा है. इसके लिए अत्याधुनिक तकनीक का उपयोग भी किया जा रहा है. मुंबई के लोगों का स्वास्थ सुधारने के लिए यह अभियान निश्चित ही उपयुक्त साबित होगा और इसके सकारात्मक परिणाम निश्चित ही दिखाई देंगे. श्री. शिंदे ने बताया कि यह अभियान निरंतर जारी रहेगा और इस अभियान में लोगों की सहभागिता बढ़ रही है, इस पर उन्होंने ख़ुशी जाहीर की. मुंबई अंतरराष्ट्रीय स्तर का शहर है. उस दृष्टि से मुंबई हमें स्वच्छसुंदर और हरित रखनी ही चाहिए. 

सफाई कर्मियों को सभी अत्यावश्यक सुविधाएं उपलब्ध की जाएगी 

मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि आपला दवाखाना की संख्या बढ़ाई जा रही है. सफाई कर्मियों को सभी अत्यावश्यक सुविधाएं उपलब्ध की जा रही है और उनकी समस्याओं का निराकरण किया जाएगा. अधिकारियों ने जगह-जगह भेट देकर स्वच्छता अभियान के कामों का समय-समय पर जायज़ा लेने के निर्देश भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान दिए.   

 

अस्पतालों की क्षमता बढ़ाने पर विचार 

राजावाडी यह अस्पताल मुंबई के लोगों के लिए महत्त्वपूर्ण अस्पताल है. इस अस्पताल की क्षमता 1000 बेड तक बढ़ाने का विचार है और यहाँ पर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराने पर भी जोर दिया जाएगा.  हॉस्पिटल की स्वच्छता पर विशेष जोर दिया जा रहा है और बृहन्मुंबई महानगरपालिका के सभी अस्पतालों को सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करने पर भी जोर दिया जा रहा है. अस्पताल में रहते नागरिकों को दवाइयां बाहर से न लानी पड़े, इसके लिए 'जीरो प्रिस्क्रिप्शनअवधारणा को भी लागू करने के निर्देश मुख्यमंत्री शिंदे ने संबंधितों को इस दौरान दिए. 

स्वच्छता अभियान बने जनअभियान

मुंबई के लोगों के स्वास्थ्य के लिएमुंबई स्वच्छ और सुंदर करने के लिए जारी स्वच्छता का यह अभियान सिर्फ महापालिका कर्मचारी,  अधिकारी तक ही सीमित न रहते हुए यह जनअभियान होने के लिए  मुंबई के प्रत्येक व्यक्ति का सहभाग इसमें आवश्यक होने की बात मुख्यमंत्री श्री. शिंदे ने  कही.

स्वच्छता कर्मचारी ही असली हीरो

मुंबई को स्वच्छसुंदर और स्वस्थ्य रखने के लिएमुंबई महापालिका के सफाई कर्मी काम करते है. उनकी वजह से ही मुंबईस्वच्छ और सुंदर है और स्वच्छता कर्मचारी ही ‘असली हीरो’ है, यह सराहनास्पद शब्द कहते हुए उनका सहयोग करने का आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस अवसर पर किया. 

चरणबद्ध तरीके से होगा डीप क्लीनिंग अभियान

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि स्वच्छता अभियान के लिए बड़े पैमाने पर मानव संसाधन और विभिन्न प्रकार के अत्याधुनिक तकनीक पर आधारित संयंत्रे और वाहनों का उपयोग किया जा रहा है, जिससे परिसर कम समय में अधिक उत्तम रूप से स्वच्छ हो रहा है. लोकप्रतिनिधियों का भी सक्रिय सहभाग इस अभियान में है और यह निश्चित ही प्रेरणादायी है.  समूचे मुंबई शहर में चरणबद्ध तरीके से डीप क्लीनिंग अभियान चलाया जा रहा है और स्वच्छता अभियान के द्वारा बढ़ते प्रदुषण पर भी रोक लग सकेगी. इसमें सड़क नालेफूटपाथसार्वजनिक स्वच्छतागृह की स्वच्छता प्राथमिकता से की जा रही है.  निर्माणकार्य क्षेत्र के (राडारोडा) की सफाई भी की जा रही है. डीप क्लीनिंग अभियान के द्वारा स्वच्छसुंदर और स्वस्थ्य मुंबई की ओर आगे बढ़ रहे है श्री. शिंदे ने बताया.   

मुंबई की सभी सडकोंमुख्य सड़कोंअंतर्गत सड़केंअंतर्गत वसाहत के डीप क्लीनिंग इस अभियान के माध्यम से की जा रही है. इसमें पीने के पानी का उपयोग नहीं कर रहें है, बल्कि इसके लिए रिसायकलिंग किए हुए पानी का उपयोग कर रहे है. इस अभियान में चार-पाच वार्ड से मिलकर कम से कम दो हजार लोग एक समय में एक परिसर में काम करने से परिसर पूरी तरह से स्वच्छ होता है. सड़कें टासार्वजनिक शौचालये स्वच्छ हो रहें है. झोपडपट्टी सुधार योजना भी इसमें समावेश किया है और इसमें भीतरी टूटी-फूटी सड़कोंफुटपाथ खराब शौचालयों की दुरुस्







*जिसका मन मस्त है* **उसके पास समस्त है

 *जिसका मन मस्त है*

**उसके पास समस्त है!** मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची.... म्हणून सांगतोय. 

हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं. 

मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे. 

त्यात त्यांनी विचारलेलं असायच की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथं लिहून द्यायच आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात "करायचे राहून गेलेलं" असं काही असेल तर तेही लिहायच. की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेल !

*

ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत. 

- त्यात कुणी लिहिलेलं असायच की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो. तर आता यापुढे देईन 

- तर कुणी लिहायच.... माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे. 

- कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायच राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार 

- एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन. 

- एकीने लिहिलं.... संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायच, हसायचंच विसरून गेलेय... यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार 

- निवृत्त वडिलांनी लिहिलेलं.... माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही. 

- एका सासूने लिहिलं होत.... लेक आणि सुनेत मी थोडं डाव उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !

अशी अनेकांनी त्यांची त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली. 

*

आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटर मध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो "उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म" त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर "टिकमार्क" करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?

*

आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, "जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायच आहे"

किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायच आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायच आहे. 

*

आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, "ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होत ?

यावर रुग्ण निरुत्तर होत मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात. 

डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे.... माहित नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा. 

आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, "अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा" यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभातून सांगतोय. 

*

पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय.  जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारख प्रत्यक्षात आणलं खरं पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन अस्मानचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअर ला दुसरं घ्या असं सांगितलं होत तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय.  योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk)  आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण.... बास याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल "घंटा" वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच ! 

*

आणि अजून एक म्हणजे.... फार वखवख करत जगणे सोडून द्यावे. 

कारण... असं म्हणतात की 

*जो प्राप्त है-पर्याप्त है*

*जिसका मन मस्त है*

*उसके पास समस्त है!*

दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

 दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल

आपण नाटक पाहायला गेलो, तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पाहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच. असत  साबण बनवायला तेल हा घटकजरूरीचा असतो आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो! हा अटळ विरोधाभास आहे. जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात, वेडी माणसं आणि लहान मुलं! चांगल्या काम ासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या जगण्याचा आनंद घ्या.

जीवन खूप सुंदर आहे. फक्त तसं जगायला हवं, काचेला पारा लावला की, आरसा तयार होतो. पण, लोकांना आरसा दाखवला की, त्यांचा पारा चढतो. आरसा तोच असतो. फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की, आपण दुःखी दिसतो. तसेच, जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल.

हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज

 हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज

                                                                                    - विधिमंडळ सचिव विलास आठवले

            नागपूरदि. 17 :- संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात  कायदेनियमध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले.

            राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी 'भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचनाकार्यपद्धती व कायदा तयार करण्यासाठी प्रक्रियाया विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे उपस्थित होते.

            सचिव श्री.आठवले म्हणालेलोकसभाविधानसभा ही महत्वाची सभागृहे असून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमुळे संसदविधिमंडळ तयार होते. संसदेत राष्ट्रपतीप्रधानमंत्रीमंत्रिमंडळ तर विधानमंडळात राज्यपालमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लोकांच्या भावनाआकांक्षाचा विचार करुन जनहिताचे निर्णय घेतले जातात.

            देशहिताच्या दृष्टीने कायदे करण्याचा संसदेला तर राज्यहिताच्या दृष्टीने महत्वाचे कायदे करण्याचा अधिकार विधिमंडळाला घटनेने दिलेला आहेअसे सांगून श्री. आठवले म्हणालेघटनेतील तरतुदीशी सुसंगत कायदाविधेयक तयार करण्यापूर्वी या विषयातील तज्ज्ञसंबंधित विभाग  यांचे अभ्यासपूर्ण मत विचारात घेऊन ते प्रारूप तयार केले जाते. कायदाविधेयकाच्या प्रारुपाला मंत्रिमंडळात मान्यता देऊन ते संसद व विधिमंडळासमोर मांडले जाते. अशा कायद्याचीविधेयकाची ओळख  सभागृहाला संबंधित खात्याचे मंत्री करुन देतात. यावर प्रत्येक सदस्याचे मत विचारात घेतल्यानंतर राष्ट्रपतीराज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याला राजपत्रात प्रसिद्धी दिली जाते. तद्नंतर हा कायदा अंमलात येतो. संविधानात अनेक तरतुदी असून राष्ट्रपतीप्रधानमंत्रीमुख्यमंत्री यांची वेगवेगळी कार्ये असल्याचे श्री.आठवले यांनी सांगितले.

            संसदविधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी मंडळाला पार पाडावे लागते. तर कायद्यानुसार सुरू असलेल्या कामकाजावर लक्ष ठेवणे व कायद्याचा अर्थ लावण्याचे काम न्यायमंडळ पार पाडतेअसे त्यांनी सांगितले.

            राष्ट्रपतीराज्यपाल यांच्या अभिभाषणाबद्दल श्री. आठवले यांनी सांगितले,  नवीन संसदनवीन विधानसभा व अर्थसंकल्पापूर्वी अभिभाषण होते. या भाषणात देशातराज्यात सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणांचा उहापोह केलेला असतो. लोकांच्या हिताच्याजिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा संसद व विधिमंडळात केली जात असून संविधानिक बाबीने याकडे पाहिले जाते. सामाजिकऔद्योगिकआर्थिक विकासासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पात जनतेला अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तरतूद केली जाते. यामध्ये वित्त विभागाची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. आठवले यांनी आपल्या भाषणात तारांकित प्रश्नअतारांकित प्रश्नलक्षवेधी,  प्रश्नोत्तराचा तासस्थगन प्रस्तावअल्पसूचनाविशेष सूचनाऔचित्याचा मुद्दाअंतिम आठवडा प्रस्तावशासकीय विधयकेअशासकीय विधेयके याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

            महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विधिमंडळ सचिव श्री. आठवले यांचा विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनाशिकची विद्यार्थिंनी पूजा इंगळे हिने आभार मानले.

000000

 

 

विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकारांची तरतूद

 विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकारांची तरतूद

विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे

 

नागपूरदि. १७ - संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना कोणत्याही दबाव आणि अडथळ्या शिवाय सभागृहात बोलत यावेकाम करता यावे यासाठी त्यांना विशेषाधिकार तरतूद राज्य घटनेत असल्याचे प्रतिपादन विधान मंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी केले.

      राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात आज ‘विधीमंडळकार्यविशेषाधिकार’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

संसद आणि राज्यातील विधान मंडळाचे सदस्य यांनाच विशेषाधिकार असल्याचे सांगून सचिव श्री. भोळे म्हणालेजिल्हा परिषदपंचायत समितीग्राम पंचायत, नगरपालिकाआणि महानगर पालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांना विशेषाधिकार नाहीत. संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना त्यांची कर्तव्य व्यवस्थित पार पाडता यावीत हा विशेषाधिकारांचा उद्देश आहे. ब्रिटिश पार्लमेंट सदस्यांना ज्या प्रमाणे विशेषाधिकार आहेत, त्याच धर्तीवर आपल्या देशातील संसद आणि विधानमंडळ सदस्य यांना विशेषाधिकार आहेत. विशेषाधिकारांमध्ये कोणतेही अधिकार कमी करता येत नाहीत अथवा वाढविता येत नाहीत. या विशेषाधिकारांनुसार सर्व सदस्यांना भाषण स्वातंत्र्य दिले आहे. सभागृहात सदस्याने केलेल्या भाषणावरटीकाटिप्पणी यावर न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. त्याशिवाय सभागृहाचे सत्र सुरू होण्यापूर्वी ४० दिवस आणि सत्र संपल्यानंतर ४० दिवस सदस्याला अटक करता येत नाही. तो विधिमंडळ सभागृहाचा हक्कभंग होतो. एखाद्या सदस्यास अटक केल्यास त्याची माहिती विधानमंडळ सभागृहात द्यावी लागते. अध्यक्षसभापती यांच्या पूर्व परवानगी शिवाय विधानमंडळ परिसरात कोणालाही अटक करता येत नाही. विधानमंडळाच्या गोपनीय प्रक्रियांची माहिती प्रसिध्द करता येत नाही. सभागृहाच्या परवानगी शिवाय सदस्य न्यायालयात साक्ष देऊ शकत नाही. सभागृहातील चर्चेविषयी न्यायालयात चर्चा करता येत नाही. तसेच न्यायालयातील सुनावणी विषयी सभागृहात चर्चा करता येत नाहीअसे विशेषाधिकार संसद आणि विधानमंडळ सदस्यांना असल्याचे श्री. भोळे यांनी सांगितले.

             श्री. भोळे म्हणालेविशेषाधिकार जपण्यासाठी विशेषाधिकार समिती असते. विशेषाधिकारांचे उल्लंघन झाल्यास तो हक्कभंग होतो. हक्कभंग प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर तो हक्कभंग समिती कडे येतो. मग त्यावर प्रक्रिया होऊन समिती दोषी व्यक्तीस शिक्षेची शिफारस करते. शिक्षा कोणती करायची याचा निर्णय अंतिमतः सभागृह घेते. शिक्षा वेगवेगळ्या प्रकारची असतेजसे वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिलगिरी व्यक्त करणेकारावासाची शिक्षा देणे. आतापर्यंत जास्तीत जास्त ९० दिवसांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. दोषी व्यक्तीस सभागृहासमोर आणून समज देणे. सभागृहाची नापसंती दोषी व्यक्तीस कळवणे अशा शिक्षा असतात. तसेच हक्कभंग प्रकरणी  मोठ्या मनाने माफ करणे ही सभागृहाची भूमिका असते. पण  त्याचबरोबर सभागृहाचे पावित्र्य राखणेत्याचा मानसन्मान अबाधित राखणे महत्त्वाचे असते. त्यासर्व दृष्टीकोनातून शिक्षा सुनावली जाते. एखादे प्रकरण गंभीर असेल तर त्याविषयी कठोर निर्णय घेतला जातो. या विशेषाधिकाराच्या संरक्षणासाठी विविध ३५ समिती कार्यरत असतात. सभागृह हे त्यांच्या हक्काविषयी जागरूक असतेअसेही श्री.भोळे यांनी सांगितले.

  शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठमुंबई ची विद्यार्थिनी वेनिसा लेविस हिने केले.

०००००


 

राज्यपालांच्या हस्ते सनातन धर्माचे अमेरिकन अभ्यासक आनंद मॅथ्यूज यांच्या 'इन क्वेस्ट ऑफ गुरु', पुस्तकाचे प्रकाशन

 राज्यपालांच्या हस्ते सनातन धर्माचे अमेरिकन अभ्यासक आनंद मॅथ्यूज यांच्या 'इन क्वेस्ट ऑफ गुरु', पुस्तकाचे प्रकाशन


सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता


- राज्यपाल रमेश बैस


 


मुंबई, दि.१६: व्यक्तिगत, सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे. परंतु, मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या 'वसुधैव कुटुंबकम' या व्यापक शिकवणीत आहे. सनातन धर्मातील या शिकवणीचे शास्त्रशुद्ध विवेचन करुन ते युवापिढीला सांगण्याचे काम अमेरिकन लेखक आनंद मॅथ्यूज शोकी करीत असून ते कार्य महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.    


अमेरिकन सिनेमॅटोग्राफर व सनातन धर्माचे अभ्यासक आनंद मॅथ्यूज शोकी यांनी लिहिलेल्या 'इन क्वेस्ट ऑफ गुरु' या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 


आज विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक ज्ञान - विज्ञान शिकवले जाते. मुलांचा बुद्ध्यांक वाढत आहे. परंतु जीवन जगण्याची कला त्यांना शिकवली जात नाही. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक वैयक्तिक, सामाजिक तसेच राष्ट्र स्तरावर अशांत व अस्वस्थ आहे. भारतीय तत्वज्ञानात गुरुला फार महत्व आहे. गुरुला ईश्वरापेक्षाही अधिक महत्व दिले आहे, कारण गुरूच ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरूंचा शोध हा वास्तविक स्वतःचा शोध असतो. आनंद मॅथ्यूज यांनी गुरूंचा शोध घेताना सनातन धर्माचे अनुभवसिद्ध तत्वज्ञान सोप्या भाषेत युवकांना विशद करून सांगितले आहे, असे सांगून राज्यपालांनी लेखकाचे अभिनंदन केले. 


लेखक आनंद मॅथ्यूज यांनी आपल्या प्रस्तावनेतून अमेरिकेतून भारताकडे येण्याचा अध्यात्मिक प्रवास व गुरूंचा शोध याबद्दल माहिती दिली.       


 


विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल जी डी बक्षी, कर्नल अशोक किणी, पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यूज शोकी, अध्यात्मिक गुरु मोहनजी, विश्व संवाद केंद्राचे मुख्य संवाद अधिकारी निशिथ भांडारकर व निमंत्रित उपस्थित होते. 


000



 


 


Maharashtra Governor releases Matthew Zschoche's book 'In Quest of Guru'


Mumbai, 16 : Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'In Quest of Guru' authored by American Cinematographer and spiritual seeker Anand Matthews Zschoche at Raj Bhavan Mumbai on Sat (16 Dec). The book publication was organised by Vishwa Samvad Kendra.


 


Army veteran Maj Gen Dr G D Baxi, Col Ashok Kini, spiritual leader Mohanji, author Anand Matthew Zschoche, Chief Communication Officer of Vishwa Samvad Kendra Dr Nishith Bhandarkar and invit

ees were present.


000


Saturday, 16 December 2023

आत्मनिर्भर महिला स्वत:सोबत समाजाचेही कल्याण करतात

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद


आत्मनिर्भर महिला स्वत:सोबत समाजाचेही कल्याण करतात


- प्रधानमंत्री


विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यात राज्य व केंद्रीय मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती


 


मुंबई, दि. 16 : आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रधानमंत्री यांनी मुंबईतील कांदिवली येथे राहणाऱ्या मेघना गुरव यांच्याशी संवाद साधत त्यांची माहिती घेतली. विविध योजनांमुळे मेघना यांच्यासह त्यांच्या बचतगटातील इतर स्त्रियांच्याही आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडल्याचे त्यातून उलगडत गेले. पूर्वी पदपथावर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या मेघना यांना मुद्रा योजनेतून कॅनरा बँकेमार्फत मिळालेल्या 90 हजार रुपयांच्या कर्जाने, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आवश्यक ती सामग्री विकत घेऊन त्यांनी एकटीच्या हिंमतीवर व्यवसायाचा पसारा वाढवला. त्यानंतर मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाच्या मदतीने त्यांच्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवता आल्यामुळे एक 'एकल माता' म्हणून त्यांना विशेष समाधान झाले, असे मेघना यांनी यावेळी सांगितले. मेघना यांनी पीएम स्वनिधी योजनेतून कर्जाची उचल केली. योजनेची सुयोग्य माहिती त्यांना प्राप्त झालेली असल्याने हप्ते वेळेवर भरणाऱ्यास पुढे कमी दराने मिळणाऱ्या अधिक कर्जाची माहिती त्यांना आहे, व व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने त्यांनी तशा अधिक कर्जाची उचल करण्याचे नियोजनही केले आहे.


मेघना यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या मदतीने स्वतःचा संसार सावरण्याबरोबरच बचत गटातील 25 भगिनींना काम दिले. पीएम कौशल्य विकास योजनेद्वारे या स्त्रियांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले व आता त्या जोरावर त्यांना ठिकठिकाणची शिवणाची कामे तर मिळतातच, पण त्यांनी केलेल्या रजया परदेशातही जातात, हे ऐकून प्रधानमंत्री यांनी त्यांची विशेष प्रशंसा केली.


या दृकश्राव्य संवाद कार्यक्रमासाठी मुंबईत मालाडमध्ये जनकल्याण नगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री योगेश सागर, राजहंस सिंह, सुनील राणे, महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.


चंद्रपुर येथे आयोजित अशाच कार्यक्रमात केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांबरोबर होणाऱ्या संवादात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की मे 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर सर्वांसाठी घरे, एलपीजी कनेक्शन, नळ जोडणी यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. लखपती दीदी या माध्यमातून शिवणकाम, प्लम्बिंग तसेच तत्सम उद्योगातून महिलांना लखपती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे अनेक महिला आता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. ड्रोन दीदी माध्यमातून ड्रोनचे प्रशिक्षण देऊन महिलांना कृषी क्षेत्रात ड्रोन वापराने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे पुरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील पेठ येथील भारत संकल्प रथयात्रेत भेट देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मिळालेला लाभ याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांचे समवेत चिखलीच्या आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या.


छत्रपती संभाजीनगर शहरातील मोहाटादेवी चौक, बजाज नगर येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. आरोग्य आणि बाकीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मंत्री डॉ. कराड म्हणाले. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना नागरिकांनी जाणून घ्याव्यात, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कराड यांनी केले. सामान्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी ही यात्रा महत्वपूर्ण आहे, असे मत याप्रसंगी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. डॉ. कराड यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजना कार्ड देण्यात आले.


विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या चिखली इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरातील अनेक लाभार्थ्याशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव तालुक्यातील शिरूर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी उपस्थित होते. भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठीच विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असून देशातील सामान्य नागरिकांचा विकास झाला तरच भारत जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येईल, असे मत पंकज चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.


मुंबई दक्षिण मधील काँटनग्रीन परिसरातल्या शहीद भगतसिंग मैदानातही विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्यप्रणालीच्या माध्यतातून देशभरातल्या लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टाँल लावण्यात आले होते. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले.


शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, अशा लोकांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा, या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये 47 हजार 164 लाभार्थ्यांपैकी 23 हजार 668 पुरुष तर 22 हजार 845 स्त्रिया व 652 अतिमहत्वाच्या व्यक्तींनी

 सहभाग घेतला आहे.


000


Featured post

Lakshvedhi