Sunday, 17 December 2023

हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज

 हक्क, कर्तव्यांप्रती सदैव जागरुक राहण्याची गरज

                                                                                    - विधिमंडळ सचिव विलास आठवले

            नागपूरदि. 17 :- संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात  कायदेनियमध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले.

            राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी 'भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचनाकार्यपद्धती व कायदा तयार करण्यासाठी प्रक्रियाया विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे उपस्थित होते.

            सचिव श्री.आठवले म्हणालेलोकसभाविधानसभा ही महत्वाची सभागृहे असून लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमुळे संसदविधिमंडळ तयार होते. संसदेत राष्ट्रपतीप्रधानमंत्रीमंत्रिमंडळ तर विधानमंडळात राज्यपालमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लोकांच्या भावनाआकांक्षाचा विचार करुन जनहिताचे निर्णय घेतले जातात.

            देशहिताच्या दृष्टीने कायदे करण्याचा संसदेला तर राज्यहिताच्या दृष्टीने महत्वाचे कायदे करण्याचा अधिकार विधिमंडळाला घटनेने दिलेला आहेअसे सांगून श्री. आठवले म्हणालेघटनेतील तरतुदीशी सुसंगत कायदाविधेयक तयार करण्यापूर्वी या विषयातील तज्ज्ञसंबंधित विभाग  यांचे अभ्यासपूर्ण मत विचारात घेऊन ते प्रारूप तयार केले जाते. कायदाविधेयकाच्या प्रारुपाला मंत्रिमंडळात मान्यता देऊन ते संसद व विधिमंडळासमोर मांडले जाते. अशा कायद्याचीविधेयकाची ओळख  सभागृहाला संबंधित खात्याचे मंत्री करुन देतात. यावर प्रत्येक सदस्याचे मत विचारात घेतल्यानंतर राष्ट्रपतीराज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याला राजपत्रात प्रसिद्धी दिली जाते. तद्नंतर हा कायदा अंमलात येतो. संविधानात अनेक तरतुदी असून राष्ट्रपतीप्रधानमंत्रीमुख्यमंत्री यांची वेगवेगळी कार्ये असल्याचे श्री.आठवले यांनी सांगितले.

            संसदविधिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी मंडळाला पार पाडावे लागते. तर कायद्यानुसार सुरू असलेल्या कामकाजावर लक्ष ठेवणे व कायद्याचा अर्थ लावण्याचे काम न्यायमंडळ पार पाडतेअसे त्यांनी सांगितले.

            राष्ट्रपतीराज्यपाल यांच्या अभिभाषणाबद्दल श्री. आठवले यांनी सांगितले,  नवीन संसदनवीन विधानसभा व अर्थसंकल्पापूर्वी अभिभाषण होते. या भाषणात देशातराज्यात सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणांचा उहापोह केलेला असतो. लोकांच्या हिताच्याजिव्हाळ्याच्या प्रश्नांची चर्चा संसद व विधिमंडळात केली जात असून संविधानिक बाबीने याकडे पाहिले जाते. सामाजिकऔद्योगिकआर्थिक विकासासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पात जनतेला अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तरतूद केली जाते. यामध्ये वित्त विभागाची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. आठवले यांनी आपल्या भाषणात तारांकित प्रश्नअतारांकित प्रश्नलक्षवेधी,  प्रश्नोत्तराचा तासस्थगन प्रस्तावअल्पसूचनाविशेष सूचनाऔचित्याचा मुद्दाअंतिम आठवडा प्रस्तावशासकीय विधयकेअशासकीय विधेयके याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.

            महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विधिमंडळ सचिव श्री. आठवले यांचा विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनाशिकची विद्यार्थिंनी पूजा इंगळे हिने आभार मानले.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi