Tuesday, 12 December 2023

महसूल व वने, नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी

 महसूल व वनेनगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या

पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण

- मंत्री उदय सामंत

 

            नागपूरदिनांक १२ - मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेख परीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईलअशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिवनगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त - लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेलअसेही त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले कीसदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

            याशिवायनगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरापाणीपुरवठायाबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

            दरम्यान, विधानसभेने आज नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

00000

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मुखपत्र "पोर्ट ट्रस्ट कामगार २०२३" या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मुखपत्र "पोर्ट ट्रस्ट कामगार २०२३" या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. मधुकर तळवलकर यांच्या शुभहस्ते व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. राजीव जलोटा, आयएएस. यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेत बुधवार, दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी, सायंकाळी ०५.३० वाजता, कॉन्फरन्स हॉल, विजयदीप, सातवा मजला, बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. आपण आपला वेळ राखून ठेवावा. कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद!


आपले नम्र,

युनियनचे सर्व पदाधिकारी.

Monday, 11 December 2023

कच्चा तांदूळ नियतन पुरविण्यात कोणताही गैरव्यवहार नाही

 कच्चा तांदूळ नियतन पुरविण्यात कोणताही गैरव्यवहार नाही

- मंत्री छगन भुजबळ

            नागपूरदि. ११ : गोंदिया जिल्ह्यामध्ये नियतनापेक्षा जास्त कच्चा तांदूळ (सीएमआर) उपलब्ध असल्याने शासनाच्या मान्यतेनुसार अहमदनगर जिल्ह्याला सप्टेंबर महिन्याचे ८६ हजार क्विंटल नियतन पुरविण्यात आलेले आहे. या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाहीअसे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            गोंदिया जिल्ह्यात शासन मान्यतेविना तांदळाची उचल केल्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

            धान्य उचलण्याची यापूर्वीच्या तत्कालिन मंत्री आणि सचिवांची संमती देण्यात आली आहे. एफ सी आय संस्था धान्याचा दर्जागुणवत्ता तपासतात. त्यामुळे गैरव्यवहार होत असल्याचे दिसून येत नाही. धान्यासाठी पोते आणि सुतळीची खरेदी करण्यात आली. ती योग्य प्रकारची आहे. सुमारे 20 कोटी रुपयांची सुतळी खरेदी केली. या संपूर्ण खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र सरकार करीत असते. राज्य शासनाने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र सरकार करीत असल्याने चौकशीची गरज नाहीअसेही मंत्री श्री. भुजबळ यावेळी म्हणाले.

            यावेळी सदस्य नानाभाऊ पटोले, ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.

प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद

 प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद




विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे

 -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा

राज्यपाल रमेश बैस

मुंबईदि. ११ : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते.  विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

विकसित भारत @२०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिकखाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्र कुलगुरूकुलसचिव यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत@२०४७ च्या संकल्पनांवर विचार-विमर्श करण्यासाठी राजभवन येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, खाजगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचे  कुलगुरू, प्रकुलगुरुशैक्षणिक संस्था प्रमुख उपस्थित होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेविकसित भारताच्या उभारणीत  'विकसित भारत@२०४७' यामध्ये 'व्हॉइस ऑफ यूथ’ (Viksit Bharat@2047: Voice of Youth) हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) उपलब्ध करुन दिले आहे. विकसित भारत संकल्पनेवर सामूहिक विचार करण्यासाठी हा मंच उपलब्ध आहे. युवाशक्तीमध्ये विचारांची विविधता असून या उपक्रमाचा उद्देश विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी एकत्रित असणे गरजेचे आहे. यामुळेच या उपक्रमात  युवकांनी मोठ्या संख्येने  सहभागी व्हावेआणि विकसित भारतासाठी आपले योगदान द्यावे.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणालेआपले ध्येय,संकल्प विकसित भारतासाठी असले पाहिजे, याद्वारे सुसंस्कारित, बुद्धिमान, अशी युवा पिढी तयार होईल आणि आगामी काळात देशाचे नेतृत्व करेल, देशाला योग्य दिशा देईल. डिजिटल इंडियास्वच्छता अभियान यासह कोरोना काळ आपण पहिला आहे. युवा शक्तीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. देश उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक देशांनी योग्य वेळेत जलद बदल करुन त्या ठराविक कालावधीत देशाचा विकास केला आहे.  भारतासाठीसुद्धा आता हीच योग्य वेळ आहे.  अमृत काळाच्या प्रत्येक क्षणी आपल्यापुढे भारताला विकसित देश म्हणून उभे करण्याचाच ध्यास असला पाहिजे. असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत @२०४७'  संकल्पनेत प्रत्येकाने आपल्या विचारांच्या कक्षा ओलांडून परिघाबाहेरील वेगळा विचार करावा. विकसित भारतासाठी उपयुक्त सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून पाठवलेल्या  सूचनांची निवड करून  पहिल्या दहा चांगल्या सूचना मांडणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मानित करण्यात येईल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारताच्या उभारणीसाठी शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा

राज्यपाल रमेश बैस

राज्याला ज्ञान आणि शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. राज्यातील  विद्यापीठेउच्च शिक्षण संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत होण्यासाठी विद्यापीठ, शिक्षण संस्थांसह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

समाज आणि राष्ट्रासाठी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांनी लोकाभिमुख वार्षिक महोत्सव आयोजित करावे. शिक्षण प्रणालीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, नवनवीन उपक्रम यांचा वापर करणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवकल्पनांना  प्रोत्साहन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीमध्ये एक बेंचमार्क ठरावा, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.

 आज देश अनेक क्षेत्रात प्रगती करीत आहे. आशियाई खेळांमधील कामगिरीजन-धन खातीकोविड काळात लसींचा विकासचांद्रयान मिशनटीबी नियंत्रणडिजिटल पायाभूत सुविधांची निर्मिती यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तसेच जी-२०शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. जपानजर्मनीसिंगापूर आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी महान राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली असून भारतासाठी हीच योग्य वेळ आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी सर्वांनी सहभाग द्यावाअसे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

विकसित भारत संकल्पनेचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशाच्या विकासासाठी नवीन दृष्टिकोन समोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रा  अभियान सुरू केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे लोकचळवळीत  रूपांतर होणे गरजेचे  आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात सर्व समाजघटकांनी सहभाग घेतला होता. तसाच सहभाग विकसित भारत उपक्रमात द्यावा.

जी-२० परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी 'वसुधैव कुटुम्बकम' असा संदेश जगाला दिला आहे. समाजकारणराजकारणअर्थकारणयामध्ये नवीन दृष्टिकोन देण्यासाठी विकसित भारत अभियानाच्या माध्यमातून युवकांनीशिक्षणसंस्थांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे श्री.प्रधान यांनी सांगितले. चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विकसित भारत संकल्पना यावर विचार मांडले. चर्चासत्र झाले.

00000


निर्माता रत्नाकर कुमार की भोजपुरी फिल्म जया का फर्स्ट लुक आउट, माही श्रीवास्तव और दया शंकर पांडे दिखे नए अंदाज में

 निर्माता रत्नाकर कुमार की भोजपुरी फिल्म जया का फर्स्ट लुक आउट, माही श्रीवास्तव और दया शंकर पांडे दिखे नए अंदाज में




एक बार फिर से वर्ल्डवाइड रिकार्ड्स भोजपुरी सिनेमा जगत में धमाल मचाने को तैयार खड़ी है। निर्माता रत्नाकर कुमार की माही श्रीवास्तव स्टारर भोजपुरी जया का फर्स्ट लुक आउट कर दिया गया है। जिसमें माही श्रीवास्तव और दया शंकर पांडे नजर आ रहे हैं। फिल्म के फर्स्ट लुक के साथ इसके टीजर की रिलीजिंग डेट को भी घोषणा की गई है। कल यानी कि 12 दिसंबर को जया का टीजर रिलीज किया जाएगा। जिसकी घोषणा निर्माता रत्नाकर कुमार ने सोशल मीडिया के माध्यम की है। फिल्म के फर्स्ट लुक में नदी घाट जलती हुई चिता, मंदिर और कुछ लोग खड़े हुए नजर आ रहे हैं। जिसमें माही श्रीवास्तव जलती हुई चिता को अपने हाथ मे पकड़े बांस से सही कर रही है। वही पास में बैठे दया शंकर पांडे देहाती लुक में दिखाई दे रहे हैं। जिस तरह से पूरे पोस्टर को ग्रे शेड दिया गया उससे ये प्रतीत होता है कि फिल्म बहुत ही ज्यादा इंटेंससिटी के साथ बनाई गई है। वही माही का नए लुक में नया हेयरस्टाइल सोने पर सुहागा जैसे लग रहा है। जया के फर्स्ट लुक में माही श्रीवास्तव को देखकर ऐसा लग रहा है कि ये फिल्म माही के कैरियर की बेहतरीन फिल्मों में से एक होने वाली है। 



इस फिल्म में माही का किरदार बहुत ही स्ट्रॉग होने वाला है। वही इसमें सत्यमेव जयते, हसीन दिलरुबा, गुलाम, लगान, गंगाजल, स्वदेश जैसी कई सुपरहिट फिल्मों में काम कर चुके बॉलीवुड अभिनेता दयाशंकर पांडेय भी नजर आने वाले हैं। जिन्होंने सिनेमा जगत में अपना अमूल योगदान दिया है। वे जया में बहुत ही महत्वपूर्ण किरदार निभाने जा रहे हैं।  उनका भोजपुरी फिल्म जया में होना इसके हिट होने की पूरी गारंटी है। फिल्म में दयाशंकर अपने अभिनय से दर्शकों को एक बार फिर से मंत्र मुग्ध करने वाले हैं। फिलहाल फिल्म की कहानी क्या होने वाली है इसके बारे में निर्माता द्वारा कोई भी जानकारी नहीं दी गई है। 

वर्ल्डवाइड चैनल और जितेंद्र गुलाटी प्रस्तुत इस फ़िल्म के निर्माता रत्नाकर कुमार और को प्रोड्यूसर निवेदिता कुमार हैं वही इसके निर्देशन की भागदौड़ धीरू ठाकुर ने संभाल रखी हैं। वही फिल्म को अपने एक अलग विजन के साथ डीओपी समीर सय्यद फिल्माने वाले हैं। और फिल्म का लेखन की जिम्मेदारी एक्टर और राइटर धर्मेंद्र सिंह ने ले रखी है। फिल्म के लिरिक्स समीर सय्यद ने लिखे हैं। वही फिल्म का म्यूजिक साहिल खान एंड धीरू यादव,लिरिक्स शकील आज़मी,  एग्जेक्यूटिव प्रोड्यूसर राजेश सिरसट, बिज़नेस हेड इमरोज़ अख्तर(मुन्ना), कोरियोग्राफर महेश आचार्य, एडिटर सनी सिंह, डीआई निमेष चौधरी, बैकग्राउंड म्यूजिक एसएस ब्रदर, मिक्सिंग इंजीनियर सरोज शर्मा, वीएफएक्स सोनू मधेसिया,सिंक साउंड शत्रुघ्न सिंह,एसोसिएट डिरेक्टर सतीश दुबे, आर्ट सिकंदर विश्कर्मा एंड चंदन आर्ट, प्रोडक्शन जुबेर शाह, स्टिल फोटोग्राफर पंकज सक्सेना,पब्लिसिटी डिजाइन सागर सिन्हा हैं।
 फिल्म में माही श्रीवास्तव, दया शंकर पांडे, सुकेश आनंद, मनु कृष्णा, महेश आचार्य, धर्मेंद्र सिंह, राव रणविजय, ओमी कश्यप, रंभा साहनी, सोनाली मिश्रा, जुबेर शाह, योगेश पांडे, सोनू कुमार, निरंजन चौबे, अनामिका राय, नीरज कुमार सिंह, अनिता तिवारी, राम बिलास सिंह, सरिता सिंह, उत्पल सिंह, अभिषेक सिंह हैं।



First look out of producer Ratnakar Kumar's Bhojpuri film Jaya, Mahi Srivastava and Daya Shankar Pandey seen in a new style.



Once again Worldwide Records is ready to create a stir in the Bhojpuri cinema world. The first look of producer Ratnakar Kumar's Mahi Srivastava starrer Bhojpuri Jaya is out. In which Mahi Srivastava and Daya Shankar Pandey are seen. Along with the first look of the film, the release date of its teaser has also been announced. Jaya's teaser will be released tomorrow i.e. on 12th December. Which has been announced by producer Ratnakar Kumar through social media. In the first look of the film, river ghat, burning pyre, temple and some people are seen standing. In which Mahi Srivastava is correcting the burning pyre with the bamboo held in her hand. Daya Shankar Pandey sitting nearby is seen in a rustic look. The way the entire poster has been given a gray shade, it appears that the film has been made with a lot of intensity. Mahi's new hairstyle in her new look looks like icing on the cake. Seeing Mahi Srivastava in the first look of Jaya, it seems that this film is going to be one of the best films of Mahi's career.



Mahi's character is going to be very strong in this film. Bollywood actor Dayashankar Pandey, who has worked in many superhit films like Satyamev Jayate, Haseen Dilruba, Ghulam, Lagaan, Gangajal, Swadesh, is also going to be seen in it. Who has made an invaluable contribution to the world of cinema. He is going to play a very important character in Jaya. His presence in Bhojpuri film Jaya is a complete guarantee of its being a hit. Dayashankar is going to once again mesmerize the audience with his acting in the film. At present, no information has been given by the producer about what the story of the film is going to be.

Presented by Worldwide Channel and Jitendra Gulati, the producer of this film is Ratnakar Kumar and co-producer Nivedita Kumar, while its direction is handled by Dhiru Thakur. DOP Sameer Syed is going to film the same film with his own different vision. And actor and writer Dharmendra Singh has taken the responsibility of writing the film. The lyrics of the film have been written by Sameer Sayyad. Music of the same film Sahil Khan and Dhiru Yadav, Lyrics Shakeel Azmi, Executive Producer Rajesh Sirsat, Business Head Imroz Akhtar (Munna), Choreographer Mahesh Acharya, Editor Sunny Singh, DI Nimesh Choudhary, Background Music SS Brother, Mixing Engineer Saroj Sharma, VFX Sonu Madhesia, Sync Sound Shatrughan Singh, Associate Director Satish Dubey, Art Sikandar Vishkarma & Chandan Art, Production Zuber Shah, Still Photographer Pankaj Saxena, Publicity Design Sagar Sinha.
  The film stars Mahi Srivastava, Daya Shankar Pandey, Sukesh Anand, Manu Krishna, Mahesh Acharya, Dharmendra Singh, Rao Ranvijay, Omi Kashyap, Rambha Sahni, Sonali Mishra, Zuber Shah, Yogesh Pandey, Sonu Kumar, Niranjan Chaubey, Anamika Rai, Neeraj Kumar. Singh, Anita Tiwari, Ram Bilas Singh, Sarita Singh, Utpal Singh, Abhishek Singh.

चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार

 चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

               नागपूरदि. ११ : मुंबईतील चेंबूरमधील आणिकगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणासंबंधी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवाल तत्काळ मागविण्यात येईलअशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

              यासंदर्भात सदस्य आमदार अबू आजमीप्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

               १३ ऑक्टोबर रोजी आणिकगाव मनपा हिंदी शाळेमधील माध्यान्ह भोजनाच्या सेवनानंतर १६ विद्यार्थ्यांना उलटी व मळमळ सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकारामुळे संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कामकाज काढून घेण्यात आले आहे. तसेच त्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला नसल्यामुळे अंतिम कारवाई झालेली नव्हती. त्या शाळेतील १८९ विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होते आणि ५१ इतर मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होतेत्यापैकी १६ विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. हा त्रास कशामुळे झाला हे तपासण्यासाठी फॉरेन्सिकची मदत घेण्यात आली होती. त्याचा अहवाल मागवण्यात येणार आहेअशी माहिती श्री. फडणवीस यांनी सभागृहात दिली.

विद्यार्थ्यांना दर्जेदाररुचकर पोषण आहारासाठी समिती

- मंत्री दीपक केसरकर

                 ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहारातील वस्तू तपासून पाठवल्या जातात. ज्या ठिकाणी मध्यवर्ती किचन आहे त्या ठिकाणी शिजवलेले अन्न तपासले जातेत्याचा दर्जा राखण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून वर्षअखेर पर्यंत उर्वरित दहा जिल्ह्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहार दर्जेदार आणि रुचकर असावा यासाठी समिती तयार करण्यात येणार असून त्याच्या पाककृती ठरविण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात महिनाअखेर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मुलांना आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी  सांगितले.

               ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा ठेकेदारांकडून होत नाही. हा पुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जातो. ग्रामीण भागात धान्य आणि वस्तू तपासून पाठवताना जी प्रक्रिया राबविली जाते ती प्रक्रिया शहरी भागासाठीही राबविली जाईलअशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी सभागृहात दिली.

          यावेळी सदस्य सर्वश्री समाधान अवताडेअशोक चव्हाणमनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

0000

आक्सापूर ते चिंतलधाबा या रस्ता दुरुस्तीचे उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार

 आक्सापूर ते चिंतलधाबा या रस्ता दुरुस्तीचे

उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार

- मंत्री रवींद्र चव्हाण

            नागपूरदि. ११ : बामणी-राजुरा महामार्गावरील आक्सापूर ते चिंतलधाबा या मार्गाची अतिवृष्टीमुळे झालेल्या दुरावस्थेनंतर या मार्गावर दुरुस्ती करण्यात येत आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. याशिवायराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या रस्त्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.

यासंदर्भात सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न विचारला होता.

              मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीआक्सापूर ते चिंतलधाबा प्रजिमा- २४ या रस्त्याची एकूण लांबी ७.५ कि.मी. आहे. या रस्त्यावर ६.५ कि.मी. लांबीमध्ये रुंदीकरण व मजबुतीकरण तसेच डांबरीकरणाचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेली रस्त्यांची संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरणमजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी देण्यात आले असून हे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले

            वरोरा-चंद्रपूर-बामणी या राज्यमार्गावरील बल्लारपूर ते बामणी ही १३.८०० कि.मी. लांबीचा रस्ता खासगीकरणांतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ट असूनत्याची देखभाल व दुरुस्तीची कामे संबंधित कंत्राटदारांकडून करुन घेण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उपप्रश्न विचारले.

000

Featured post

Lakshvedhi