Thursday, 23 November 2023

महा आवास अभियानाचे 23 नोव्हेंबर रोजी हस्ते शुभारंभ.राज्यात महा आवास अभियानातून 10 लाख घरकुलांची निर्मिती

 महा आवास अभियानाचे 23 नोव्हेंबर रोजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यात महा आवास अभियानातून 10 लाख घरकुलांची निर्मिती

 

            मुंबई दि. 22 : राष्ट्रीय आवास दिनानिमित्त  31 मार्च 2024 पर्यंत महा आवास अभियान 2023-24 राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महा आवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

            राज्यात राबविण्यात येणाऱ्या  महा आवास अभियान 2023-24 या अभियानामुळे 10 लाख गरीबगरजूबेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

      सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनाशबरी आवास योजनापारधी आवास योजनाआदिम आवास योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजनायशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनामोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा हेतू आहे.

             या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणेघरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणेमंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे,  सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणेप्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणेग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणेबहुमजली इमारतीगृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणेडेमो हाऊसचा प्रभावी वापर करणेशासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणेनावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणेइ. 10 उपक्रम राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी केले.

            विविध विभागाचे मंत्रीसचिव  व राज्यस्तरीय वरीष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

०००

श्री. राजू धोत्रे/विसंअ/

वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत

 वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई,दि.23 : वसमत (जि.हिंगोली) शहरातील पाणीपुरवठा योजनाभुयारी गटारेबढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.

            मंत्रालयात वसमत शहरातील विविध विकास प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. बैठकीला आमदार चंद्रकांत नवघरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयनगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तानगरपरिषद प्रशासनचे संचालक मनोज रानडे यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,वसमत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशितोष चिंचाळकर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीवसमत शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी वाढीव योजनेसाठी 159.61 कोटी रुपये, तर भुयारी गटार योजनेसाठी 191.69 कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिलेला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करून तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा. वसमत शहरातील 28 रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि नाला बांधकामासाठी 108 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

            बढा तलावाची भिंत वाहून गेल्याने शहरात पाणी शिरले होते. यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सर्वेक्षण आणि दुरुस्तीचे काम करून घ्यावे. शिवाय जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या मशिनरी घेऊन तेलाचा खर्च भागवून तलावातील गाळ काढावा. नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून जलपर्णी होणार नाहीयाची दक्षता घेण्याच्या सूचनाही उपमख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या. वसमत नगरपालिका हद्दीमध्ये अतिक्रमणे असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेतत्यामुळे अतिक्रमणे हटवावीतअशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्याकडून जिल्ह्यातील दुष्काळपीक स्थिती जाणून घेतली. पाणीचाऱ्याची टंचाई भासणार नाहीयाची दक्षता घ्यावीविजेबाबतच्या तक्रारी दूर कराव्यातपाणी टंचाई भासली तर टॅंकर भरण्याचे स्त्रोत निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.

            जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याने राज्य बँकर्स समितीमध्ये त्यांना सूचना देण्यात येतीलअसे अपर मुख्य सचिव डॉ. करीर यांनी सांगितले.

००००

संविधान दिवस कार्यक्रमात सहभागाचे नागरिकांना आवाहन

 संविधान दिवस कार्यक्रमात

सहभागाचे नागरिकांना आवाहन

 

            नवी दिल्ली, दि. 23 : संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधानाच्या संस्थापकांच्या  योगदानाचा  सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने,  भारतीय संविधानाचा  स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस  साजरा केला जातो.

            संविधान दिवस साजरा करतानासंसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात अधिकाधिक सहभाग निश्चित करण्यासाठी मंत्रालयाने दोन वेब पोर्टल्स  कार्यान्वित केले आहेत.

            22अधिकृत भाषा आणि इंग्रजीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाइन वाचनासाठी संकेतस्थळ असे - https://readpreamble.nic.in/ ;

ऑनलाइन प्रश्नमंजुषा  (भारत: लोकशाहीची  जननी) :

 https://constitutionquiz.nic.in/

            पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. यात कोणालाही सहभागी होऊन  सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग वापरून समाजमाध्यम मंचावर पोस्ट करता येतील.

००००

पे

मुंबई फेस्टिव्हल २०२४' मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे

  

'मुंबई फेस्टिव्हल २०२४मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे

पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण

            मुंबई, दि. २३ : मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या  या फेस्टीव्हलमध्ये  सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल  समिती मार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 कार्यक्रमाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी - शर्मामुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीकाळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री.महाजन म्हणाले की,नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवसंगीतनृत्य आणि सिनेमा इव्हेंट्सफूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणेविकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.'मुंबई फेस्टिव्हल 2024' हा केवळ एक कार्यक्रम नाहीहा एक परिवर्तनकारी अनुभव आहेजो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्हसिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्टमहामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट‍िव्हलमध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.

         मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्रा म्हणाले की,  मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची संकल्पना अत्यंत समर्पक आहे. मुंबईतील कलासंस्कृतीक्रीडाफॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम  नसून रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेलअसे महिंद्रा म्हणाले.

            पर्यटन संचालक डॉ. पाटील म्हणाले की, मुंबईत विविध ठिकाणी मुंबई फेस्टिव्हलचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमव्हायब्रंट म्युझिक फेस्टमहा मुंबई एक्स्पोमनमोहक सिनेमाबीच फेस्टमुव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिकस्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतिचक्र कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवालापोलिस हवालदारबेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच सफाई कामगारसफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील आयकॉन्स एकत्र येतील. राज्य शासनाने विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि. कंपनीकडे मुंबई फेस्टिव्हलचे संकल्पना आणि व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे. मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल. ज्यामध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आउटलेट्स तसेच मनोरंजनाच्या संधींचा समावेश असेल. यातील मेगा बक्षिसांमध्ये अनेकांची स्वप्ने सत्यात उतरतील. मुंबई मॅरेथॉन आणि काळा घोडा कला महोत्सव हे मुंबई महोत्सवाचे सहयोगी कार्यक्रम म्हणून भाग आहेत.

             मुंबई फेस्टिवल २०२४ च्या घोषणेनंतर मुंबई फेस्टिव्हलचा लोगो, ‘सपनो का गेटवे’ या थीमचे लोकार्पण करण्यात आलेयानंतर संगीतकार श्री. टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे देखील लोकार्पण केले गेले. गाण्यातून मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडून येते. चित्रपट आणि नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी मुंबई फेस्टिव्हलच्या गाण्याला हुक स्टेप्स सादर करून 'संकल्प गीतानेसादरीकरण केले.

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

 ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत

ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

 

            मुंबईदि. 22 (रानिआ) : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावाअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

            राज्यातील 2 हजार 352 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिकतसेच थेट सरपंचपदाच्या 130 रिक्त जागा व 2 हजार 950 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. या खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर ॲपद्वारेच सादर करणे बंधनकारक आहेपरंतु, पोटनिवडणुकांत बिनविरोध विजयी झालेल्यांसह सर्व उमेदवारांना खर्चाचा हिशेब पारंपरिक पद्धतीने सादर करता येईलअसेही आयोगाच्या  प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.


सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपतीं पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवसशिवछत्रपतीं पुतळा अनावरण

समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्ग- राजकोट येथील भव्य पुतळ्याचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण

            मुंबईदि. 22 :- भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य - दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आढावा घेतला.

            'शिवछत्रपती भारतीय आरमाराचे जनक आहेत. तसेच त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहेत्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले.

            या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास व उद्योजकता नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकरकॅप्टन सुधीर सावंत यांच्यासह व्हॉईस ॲडमिरल डी. के. त्रिपाठीरिअर ॲडमिरल ए.एन.प्रमोदरिअर ॲडमिरल मनीष चढ्ढाकमोडोर एस.के. रॉयसंदीप सरनागोकुल दत्ताआशिष शर्माविक्रम बोराकॅप्टन चैतन्यउपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यंदाचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येत आहे. नौसेना दलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे.

            बैठकीत नौसेना अधिकाऱ्यांनी नौसेना दिवसाच्या अनुषंगाने तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या अनुषंगाने नियोजित विविध कार्यक्रमत्यांची रूपरेषा आणि त्यातील वैशिष्ट्ये याबाबत सादरीकरण केले. या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी सरखेल कान्होजी आंग्रे  तसेच हिरोजी इंदुलकर यांचे वंशज यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

            सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा ४३ फूट पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान जीवनकार्याचा आढावा घेणारे कलादालन साकारण्यात आले आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौकालढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रमउपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विदेशातील नौसेनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच देश-विदेशातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

            या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रस्तेविविध पायाभूत सुविधा आदींचा आढावा घेण्यात आला.

000

आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना नवीन वर्षात ३४९५ एसटी बस सेवेत दाखल होणार

 आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट,

दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना

नवीन वर्षात ३४९५ एसटी बस सेवेत दाखल होणार

            मुंबईदि. २२ : राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉलजिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. बसस्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरा-मोहरा बदलावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            एसटी महामंडळाला २० नोव्हेंबरला एका दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेतअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी तयार २२०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २२०० तयार परिवर्तन साध्या बस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १२९५ साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील याबैठकीत मान्यता देण्यात आली.

            राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दूधदुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच मुख्यमंत्र्यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५१५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवकरीता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजनाधर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनाहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बसस्थानकांवरील होर्डिंग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Featured post

Lakshvedhi