Monday, 20 November 2023

नागपूर हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करणार

 नागपूर हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करणार

मुख्यमंत्र्यांची ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात घोषणा

            भंडारादि. 20 : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करण्यात येईलअशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

            ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदानभंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी ही घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री डॉ. विजयकुमार गावितखासदार सुनील मेंढेआमदार नरेंद्र भोंडेकरआमदार राजू कारेमोरेमाजी मंत्री परिणय फुकेमाजी खासदार शिशुपाल पटले,  मधुकर कुकडेमाजी आमदार नानाभाऊ पंचबुद्धेचरण वाघमारेविशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजेजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरमुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटीपोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

            धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावाअशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केली होती. त्यानुसार नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

            सध्या शेत ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावीत्यासाठी भंडारा जिल्ह्यात पीक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली. समृध्दी महामार्गाचा भंडारागोंदियागडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या मार्गाच्या डीपीआरचे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            भंडारा जिल्हा नैसर्गिक वैविध्यता लाभलेला जिल्हा आहे. पर्यटनवाढीला या जिल्ह्यात मोठी संधी आहे. जिल्ह्यात पितळ उद्योग क्लस्टर उभारण्याची मागणी होत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या बाबी करण्यास शासन कटीबद्ध आहे. सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांना त्यांच्या दारी जावून योजना बहाल करण्याचा हा कार्यक्रम असून राज्यात 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना कार्यक्रमाने थेट लाभ मिळवून दिला आहे.

            सर्वसामान्य शेतकरीकष्टकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण केवळ एक रुपया भरून पीकविम्याचा लाभ देण्याची योजना सुरु केली. लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला या योजनेने संरक्षण दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरु केली. केंद्र शासनाने 6 हजार आणि राज्य शासनाच्या योजनेचे 6 हजार असे 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जात आहेत. अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्तांना चांगली मदत देता यावी म्हणून एनडीआरएफचे नियम बाजूला ठेऊन अधिक मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. पूरबाधित कुटुंबांना 10 हजार रुपये भरपाई देण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणले. सर्वसामान्य गरीब कुटुंबांना शस्त्रक्रियाउपचारांसाठी दिलासा देण्याकरीता महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

            राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना भाड्यात 50 टक्के सवलत75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपुर्ण मोफत प्रवास असे विविध जनकल्याणकारी निर्णय घेतले. येत्या काळात सर्वसामान्य नागरिकलाभार्थ्यांना आपल्या कामासाठी शासकीय कार्यालयात जावे लागणार नाही. घरबसल्या सर्व सुविधा त्यांना मिळतीलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसाला 12 तास वीज देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            कृषी पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. आगामी काळात कृषी फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहेअसे यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. भंडारा हा तलावजंगलवने तसेच धानाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्याने शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपया भरून सुरु केलेल्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेत पहिल्याच वर्षी 1 कोटी 66 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारी ही योजना ठरली आहे.

             शासनाने अंगणवाडी सेविकाआशा स्वयंसेविकामदतनिसांचे मानधन वाढविले. पोलिस पाटलांच्या मानधन वाढीचा देखील विचार सुरु आहे. शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम वाढविली. ओबीसी घटकांकरीता मोदी आवास योजना सुरु केली असून ओबीसीसाठी 10 लाख, तर अनुसूचित जातीजमातीसाठी 5 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वसामान्यांना घर मिळाले पाहिजेअशी शासनाची भूमिका आहे.   

            भंडारा जिल्ह्यात अंभोरा येथे 352 कोटी रुपयांचा  जल पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. गोसीखुर्द राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनाने देखील या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. 2024 च्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊअसे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले. 

एक हजार 954 कोटींच्या अग्रिमाचे वाटप – उपमुख्यमंत्री अजित पवार

            यावर्षीपासून महत्वाकांक्षी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरु केली. योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. नुकसान भरपाईसाठी 47 लाख 63 हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली असून आतापर्यंत 1 हजार 954 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी पहिल्यांदाच 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

            शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने पीककर्जपूरग्रस्तांना दुपटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी धानासोबतच नगदी पिके देखील घेतली पाहिजेत. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावेअशी मागणी होतीती पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून महाविद्यालयाचे बांधकाम सुरु केले जाईलअसे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

            पालकमंत्री डॉ. गावित यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के लाभार्थ्यांना प्रत्यक्षअप्रत्यक्ष लाभ देण्यात आला असल्याचे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटनवाढीला संधी आहे. त्याला गती मिळणे आवश्यक आहे. रेशीम उद्योग आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळावीअसे ते म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी प्रास्ताविक केले. ‘शासन आपल्या दारी’ अभियान कालावधीत जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 756 लाभार्थ्यांना विविध विभागांच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 304 कोटी रुपये एवढी आहे. एकट्या महसूल विभागाने या कालावधीत 99 हजार दाखल्यांचे वितरण केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॅा.अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची भूमिका व फलनिष्पत्ती याबाबत माहिती दिली.

            सुरुवातीस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रिमोटची कळ दाबून शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विविध योजनेच्या 27 लाभार्थ्यांना विविध लाभांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील 168 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने त्यांच्याकडील रिक्त 1 हजार 500 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या निवडक उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

            कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागाचे स्टॅाल लावण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना निवेदनतक्रारम्हणणे सादर करता यावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने स्वतंत्र दालन लावण्यात आले. रोजगार मेळाव्यात अनेक युवकांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना नाश्तापाणीभोजन व प्रवासाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने विनामूल्य करण्यात आली होती. कार्यक्रमास आलेल्या लाभार्थ्यांना प्रदर्शनस्थळी विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुर्तकोटी यांनी आभार मानले.


गंध फुलांचा गेला सांगून

 माझ्या भगिनी सौ स्नेहा भागवत, चिपळूण यांनी लिहिलेला उत्कृष्ट लेख, गंध आठवणीतले!

(चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या "स्नेहबंध" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)

माझे गंध - विश्व

सुवासाच आणि माणसाचं एक अतूट नातं आहे.. जशा आपल्या जाणीवा काळाच्या ओघात विकसित होत जातात तसा त्या त्या वेळच्या सुगंधातले भावार्थ आपल्या मनात दरवळून निघतात. आठवणी गणिक कधीही मनसोक्त हुंगावेत...

रंग,चव ,स्पर्श,नाद  आणि गंध. रंग  हे दीर्घकाळ फोटोत कैद राहतात.चवही काही काळ मनात रेंगाळते.स्पर्श काहीसे  पुसट होत जातात ,नाद मनात काही काळ गुंजन करतात ...पण गंध मनाच्या खोल कप्प्यात दडून बसतात..आपले श्र्वसनेंद्रिय सुमारे  ५०००० प्रकारचे गंध /वास लक्षात ठेवू शकत,हे विज्ञानाने शोधून काढलय. ह्या वाक्याचा मागोवा घेताना  माझं मन अर्थातच भूतकाळात रमलं... तिथे ठाण मांडून  बसले आहेत काही ठळक गंध ..अगदी लहानपणापासून नकळत्या वयात भावलेला वास म्हणजे ओल्या गवताचा वास. बालपणी अनुभवलेला ओलसर रानवट  वास रानगंध अजूनही मनात भरून राहिला आहे.माझी प्राथमिक शाळा आमच्या घरापासून दूर होती..चालत जावं लागे.मैत्रिणीचा चिमुकला हात हातात घेऊन रमत गमत शाळेत जाताना नकळत पणे आमचं निसर्ग वाचन सुरू असायचं.जून महिन्याच्या सुरवातीला कुठेतरी दूर पडलेला पाऊस आम्हाला कळे तो खरपुस मृद्गंध दरवळल्यावरच...पहिल्या पावसाच्या त्या अनुपम गंधाची सर कुठल्याच 

गंधाला नाही.तरीही या विश्र्वातील प्रत्येक गंध मला खुणावतो..आमच्या शाळेच्या गेट वर प्राजक्ताच झाड होत..सकाळची शाळा, तो हवेतला मिश्र नैसर्गिक पानाफुलांचा वास आणि त्यात मिसळलेला तो प्राजक्त फुलांचा स्वर्गीय वास..आजच्या घडीला पुन्हा ते सुख आपण घेऊ शकत नाही...कारण काळ खूप पुढे गेला..आयुष्यात असच होत काहीसं..काही गंध तसेच हवेत विरून जातात... छोट्या च असतात गोष्टी कधीकधी .अगदीच नगण्य.पण विसाव्याच्या क्षणी नेमक्या आठवतात..आम्ही मैत्रिणी १२ वी ते bsc  ला असताना हॉस्टेल ला राहायचो. तेव्हा दुपारी दोन वाजता प्रॅक्टिकल सुटायच फॉर्मलिन, असिटोन, सल्फरडाय ओक्साईड असे भयंकर वास घेऊनच . रूम वर येऊन आम्ही त्या बंद खोलीचा वास घालवायचो ते पानडी नावाची उदबत्ती लावून.त्याच ब्रँड ची उडबत्ती हवी असा आमचा आग्रह असायचा. मग गरम गरम मॅगी करायचो. तीव्र भुकेच्या वेळी सुद्धा त्याचा तो मिश्र गंध आजही मनात दरवळतो.. आता तर त्या मैत्रिणींची भेट्सुद्धा होत नाही..गंध मनात ठेवून चिमण्या चार दिशांना आपापल्या घरट्यात उडून गेल्या. 

आई रव्याचे- बेसनाचे लाडू करून द्यायची.पण बस मधून येताना त्याला एक वेगळाच  वास लागायचा.आम्ही त्या वासाला *प्रवासी वास* अस नाव ठेवलं होत.

गणेश चतुर्थीच्यादरम्याने भात पिकाला  फूलं येत असत..खूप दिवस मला ते फुल कधी दिसलच नाही..कारण ते आकाराने  खूप लहान असत..मग त्या वासाचा शोध घेता घेता त्या नाजूक फुलाचा शोध मला लागला.दिवाळीतील  पदार्थांचा खमंग गोडसर तळणीचा वास त्याची चव चाखण्यापूर्वीच नाकात शिरलेला असायचा .उटण्याचा, सुगंधी तेलाचा, मोती साबणाचा तो मोहक गंध दिवाळीची रंगत वाढवायचा..फटाके फोडल्यावरचा तो जळका वासही मनात ठाण मांडून बसला आहे..

गंध कोऱ्या पुस्तकाचा,पुस्तकात ठेवलेल्या बकुळीच्या गजऱ्याचा. अगदी उकळत असणाऱ्या चहाचा हवाहवासा गंध,कधी उदास सायंकाळी कॉफीचा दरवळ जीव मोहरतो नुसता... ..हा गंधवेडा जीव कुठे कुठे अडकतो.!! 

ब्रुट नावाचं एक अत्तर आहे .ते लेडीज की जेंट्स या फंदात न पडता मी आवडलं म्हणून  बिनधास्त वापरलेलं आहे.आता समजत की अत्तर सुद्धा वेगवेगळ असत..पण अजून कधी तो ब्रुट चा वास आला तर मन अलगद मागे रमून जात. 

नव्या कोऱ्या साडीचा वास असो.की कॉस्मेटिक्स चा वास!! मनभावन गंध आहेत

श्रावण महिन्यातील धूप, कापूर उदबत्तीचे सात्विक वास,हळदीच्या पानातील उकडीच्या  सुबक मोदकांचा दरवळ,

मार्गशीर्ष महिन्यात पडलेल्या दवाचा गंध. बागेतील फुलझाडावरची देवासाठी खुडून आणलेली फुल माझ्या हातावर वास ठेवून खुशाल देवाच्या चरणी रूजू व्हायची..

 होळीच्या दरम्याने पेटलेल्या होमांचे वास,

चैत्र गौरी हळदी - कुंकू समारंभाच्या वेळचा जाई जुई मोगरा  यांचा सुवास मनात अजूनही दरवळतो.

आंब्याच्या बागेतला -मोहोराचा वास,त्याच ऋतूत जंगलात कुठेतरी फुललेला सुवासिक करा (जंगली झाड)..किती दुरून  मोकळ्या माळराना वरूनसुंगध

यायचा तो!!वाऱ्याच्या मंद झुळूकीना सुगंधाचं कोंदण!..समुद्राचा खारा वास.ताज्या मासळीचा वास, पेट्रोलचा वास ..हे सुद्धा आठवणीत रुतून बसलेत.. सगळ्या सुगंधी फुलांप्रमाणे निशिगंधाची आणि सोनचाफ्याची फुल मला खूपच आवडतात..

पुढे मी ठरवलं होत की माझ्या लग्नात निशिगंधाच्या फुलांचा हार असावा..त्या गंधाच्या साक्षीने जीवनातील महत्वाचा संस्कार पूर्ण करावा..पण प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची ती आई- वडील नातेवाईकांची लगीन घाई,सगळ्यांचे मोलाचे सल्ले,नवीन नवीन चेहरे, सासरच्या माणसांचे औत्सुक्य, आनंदाचे संवाद. आणि भटजींनी केलेली घाई. होमाचा डोळ्यात शिरणारा धूर, यात मी तो गंध नाकभरून घ्यायचं विसरूनच गेले.

नंतर पुढे काही काळ नव्या संसाराच्या नव्या जबाबदाऱ्या सांभाळताना गंध हे प्रकरणच विसरून गेले.बाळाच्या चाहुलींमधे तर काही वासांचा अक्षरशः त्रास होऊ लागला. नंतर मात्र धूप ,धुरीचा , बेबी पावडरचा, वेखंड पावडर चा असे काही नवेच गंध मला मोहवू लागले..

कधी इतरांच्या लग्नसमारंभात माळलेला मोगऱ्याचा गजरा हवाहवासा वाटू लागला.. स्री चं संपूर्ण आयुष्य हे गंधाने व्याप्त आहे .खाली गोव्याकडे , दक्षिण भारतात गेलो तर सगळ्या स्त्रियांच्या डोक्यात फुल माळलेली दिसणारच..खर तर सुगंध हे वाण आहे त्याची लूट करण म्हणजेच आनंदाची अनुभूती घेणं..आता मुलाबाळांच्या पुष्कळशा जबाबदाऱ्या कमी झाल्याने पुन्हा नव्याने मी माझं हे गंधवेड जोपासायच ठरवलं आहे..तर लेख लिहिण्याच कारण अस की परवा घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच विंध्यवासिनीच्या मंदिरात गेले होते.मला एकदम

सोनचाफ्याची फुल घ्यावी अस वाटल.पण सोनचाफ्याची फुल अशी कुठे मिळणार अचानक ?

देवळात गेले..एक काकू विंध्यावासिनीच स्तवन गात होत्या .. सकाळी लवकर गेल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती.मी डोळे मिटून स्तवन  ऐकत होते..एवढ्यात मागून कुणीतरी आल..त्यांना गडबड असावी बहुतेक ..त्यांनी त्यांच्या हातातली भेट पुजाऱ्याकडे दिली ..देताना त्यातली दोन फुल माझ्या ओटीच्या ताटात पडली..ती चक्क 

सोनचाफ्याची ताजी  टपोरी सुवासिक फुल होती..मी देवीकडे भारावलेल्या डोळ्यांनी बघितल फक्त..

आणि पुन्हा एकदा नतमस्तक झाले..

©स्नेहा भागवत

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज

२४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

            मुंबई दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले आहे.

            मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १३ ऑक्टोबर १९६७ या कालावधीतील कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावेवंशावळशैक्षणिक व महसुली पुरावेजुन्या सनदाराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास अशा नागरिकांकडून याबाबतचे उपलब्ध अभिलेख मुंबई जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील नियोजन भवन येथे २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. पांढरे यांनी दिली आहे. 

            अधिक माहितीसाठी ०२२-२२६६४२३८ किंवा gadmumbaicity@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बाल स्नेही” पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण - राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन

 बाल स्नेही पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण

- राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा

 

            मुंबईदि.२० : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगमहिला व बाल विकास विभागयुनिसेफकम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फोर चिल्ड्रन इंडियापुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी 'बाल स्नेही" पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

            हा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहनरिमन पॉइंटमुंबई येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.

             राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा राज्यस्तरीय बाल हक्क संरक्षण अधिनियमान्वये स्थापित आयोग आहे. बाल हक्काच्या संरक्षणाची जपणूकप्रचार व प्रसार हा आयोगाचा उद्देश आहे. राज्यात बालकांचा सर्वांगीण विकासबाल हक्क संरक्षणत्यांची सुरक्षाआरोग्य इ. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हापरिषदजिल्हा महिला व बाल विकास अधिकारीबाल संरक्षण कक्षविशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारीबालगृहबाल कल्याण समिती इ. प्रशासकीय यंत्रणा व संस्था या सकारात्मक पद्धतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेतअशा व्यक्ती व संस्थांना "बाल स्नेही" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

             राज्यात अशाप्रकारे बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांकरिता बालस्नेही पुरस्कार सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेतलेले व सद्य:स्थितीत विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एकूण ७५ तरुण - तरुणींचा सत्कार करण्यात येणार आहे.

            या पत्रकार परिषदेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ठाणे) महेंद्र गायकवाड, मुंबई शहरचे बी. एच. नागरगोजे उपस्थित होते.

००००

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे 'बालधोरण' आखणार

 बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे 'बालधोरण' आखणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे 'बाल धोरणही राज्यात तयार करण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            कुलाबा येथील बेस्ट भवन येथे 'अर्पण'  स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या  माध्यमातून १८ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत 'बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानराबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगलअर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया उपस्थित होते.

            मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान बालकांना येणारे वाईट अनुभव कसे टाळता येवू शकतात यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हा जनजागृतीपर चांगला उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून लहान मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श याची माहिती द्यावी. बेस्ट बरोबर परिवहन विभाग, शिक्षण विभागामार्फत बालकांचे हक्क आणि सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे. बालकांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती झालीत्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य संरक्षित करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे असेही मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

             महाव्यवस्थापक विजय सिंगल म्हणाले की, बेस्ट बसमधील प्रवास सर्वांसाठीविशेषतः आमच्या सर्वात छोट्या प्रवाश्यांसाठी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. अर्पण सोबतआम्ही जागरूकता वाढवण्यासाठीकर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी  काम करत राहू अशी ग्वाही श्री. सिंगल यांनी दिली."

            अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया यांनी बेस्टच्या  माध्यमातून 18 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

            यावेळी बेस्टच्या बसेसमधून लहान मुलांच्या सुरक्षा आणि अत्याचार जनजागृतीपर पोस्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००

गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ? गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

 ।।श्रीगणेशाय नमः।।


गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ?


गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

भारतीय संस्कृति में गौमाता की सेवा सबसे उत्तम सेवा मानी गयी है, श्रीकृष्ण गौ सेवा को सर्व प्रिय मानते हैं।


शुद्ध भारतीय नस्ल की गाय की रीढ़ में सूर्यकेतु नाम की एक विशेष नाड़ी होती है जब इस नाड़ी पर सूर्य की किरणे पड़ती हैं तो स्वर्ण के सूक्ष्म कणों का निर्माण करती हैं, इसीलिए गाय के दूध, मक्खन और घी में पीलापन रहता है, यही पीलापन अमृत कहलाता है और मानव शरीर में उपस्थित विष को नष्ट करता है।


गाय को सहलाने वालों के कई असाध्य रोग मिट जाते हैं क्योंकि गाय के रोमकोपों से सतत एक विशेष ऊर्जा निकलती है।


गाय की पूछ के झाड़ने से बच्चों का ऊपरी हवा एवं नजर से बचाव होता है।


गौमूत्र एवं गोझरण के फायदे तो अनंत हैं, इसके सेवन से केंसर व मधुमेह के कीटाणु नष्ट होते हैं।


गाय के गोबर से लीपा पोता हुआ घर जहाँ सात्विक होता है वहीं इससे बनी गौ-चन्दन जलाने से वातावरण पवित्र होता है इसीलिए गाय को पृथ्वी पर सबसे बड़ा वैद्यराज माना गया है, सत्पुरुषों का कहना है कि गाय की सेवा करने से गाय का नहीं बल्कि सेवा करनेवालों का भला अधिक होता है।

कही उजला तो कही अंधेरा

 


Featured post

Lakshvedhi