Tuesday, 14 November 2023

धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर

            मुंबई, दि. 13 : शासनाने पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

            खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारीबाजरीमका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत.

            सदर योजनेअंतर्गत धान/भात सर्वसाधारण (एफ.ए.क्यू) २१८३ रूपयेअ दर्जा २२०३ रूपयेज्वारी (संकरित) ३१८०ज्वारी (मालदांडी) ३२२५बाजरी २५००मका २०९०रागी ३८४६ रूपये याप्रमाणे आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात येणार आहे. 

            खरीप पणन हंगामात धान ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदी कालावधी असणार आहेतर भरडधान्य १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदीचा कालावधी असणार आहे.

            याशिवाय आधारभूत किमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता व त्या ठिकाणी धानाची व ज्वारीबाजरीमका व रागी या भरडधान्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे.

            राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ (food corporation of India) काम पाहणार आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने राज्य शासन कार्यवाही करणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक हे राज्य शासनाचे मुख्य अभिकर्ता म्हणून या योजनेचे काम पाहणार आहेत.

            खरेदी केंद्र व खरेदी संस्था निवडीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारीजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाजिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा पणन अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापक  यांचा समावेश करण्यात आला आहे.

            रब्बी पणन हंगाम खरेदीबाबत केंद्र शासनाच्या सूचनानुसार स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. याबाबत येणाऱ्या अडीअडचणी व तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम स्थापन करण्यात येणार आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

चिंतनीय लेख आहे, अजिबात राजकीय नाही!*

 *चिंतनीय लेख आहे, अजिबात राजकीय नाही!* 

*आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.* 

 *देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हीच अवस्था आहे, हेच प्रमाण संपुर्ण महाराष्ट्रात आहे.*

*ज्या वयात आपले भविष्य  घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते.*

*अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे.*    

*यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या १० वर्षापासून  इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये.*

*९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिण असणार आहे.*

*ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते.*

*आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते.*

*फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन  यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.*

*आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः,बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.*

*सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार.*

*कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.*

 *स्विट्झरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला.*   

*आपल्याला स्विट्झरलंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.*

*आपल्याला जर खरच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगति पथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेन. सरकारनेही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.*

*अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे, ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्या पेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधलाच ना! ते जीवन जगलेच ना.* 

*आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, ईतर देशात कुठेही नाही.*

*मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो.*

*आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे 'रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार  दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते.*

*"आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा हो! पण आपल्या येणाऱ्*चिंतनीय लेख आहे, अजिबात राजकीय नाही!* 

*"आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा हो! पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच  विचार करा!"* इतकेच नव्हेतर आई वडिला ना मात्र फुकटचे का पोसायचे असा निर्लाज्य पणे सवाल करून वृध्दाश्रम चे पैसे का भरायचे भीक मागून पोट भरा असा ही उपदेश करतात.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच  विचार करा!"* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

 दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत

मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा......

            मुंबई, दि. 13 : सर.... तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे... आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा... आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु..... अशीच काहीशी भावना त्या लहान मुलांच्या आणि त्यांच्या आई – वडिलांच्या डोळ्यातून व्यक्त होत होती....

            निमित्त होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमाचे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने  हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर (कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया), बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात केलेल्या 50 लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिवाळी हा कौटुंबिक कार्यक्रम असून गेल्यावर्षी मी याच ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता आपल्या सोबत दिवाळी साजरी करीत आहे. सर्वसामान्यांसोबत राहून त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे काम गेले कित्येक वर्ष आम्ही करीतच आहोत. तेच काम आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्यसारख्या विविध योजनांतून सर्वसामान्यांसाठी करीत आहोत. राज्यातील सर्व जिल्ह्यांत आरोग्य सोयी सुविधा पोहोचविण्याचे काम अखंडपणे सुरु असून, राज्यातील कुठलाही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेईल. आजार होऊ नये यासाठीच आपण प्रयत्न करीत आहोत. राज्यात जे उपचार उपलब्ध नाही ते परदेशातून उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा सुरु करण्याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काळातही आपण सर्वांनी चांगले काम केले असून यावर्षी दिवाळीसह सर्व सण उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरे करीत आहोत.

            यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एचसीजी (HCG) मानवता कॅन्सर हॉस्पिटलनाशिकचे डॉ.राज नगरकरठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉ.आशिष भूमकरयशश्री हॉस्पिटल सांगलीचे कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.सुधीर कदमज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशुतोष सिंहडॉ.श्रीनिवास सरकोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.अजय ठक्कर, डॉ.उप्पल सर, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

            तसेच यावेळी उपस्थित मुलांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री सहायता कक्षातून मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. दुर्धर आजारांवर मात केलेल्या उपस्थित लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

००००

गोवर्धन पूजा हार्दिक शुभेच्या

Monday, 13 November 2023

धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर

 धान व भरडधान्याच्या  किमान आधारभूत किंमती जाहीर

            मुंबई, दि. 13 : शासनाने पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

            खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारीबाजरीमका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत.

            सदर योजनेअंतर्गत धान/भात सर्वसाधारण (एफ.ए.क्यू) २१८३ रूपयेअ दर्जा २२०३ रूपयेज्वारी (संकरित) ३१८०ज्वारी (मालदांडी) ३२२५बाजरी २५००मका २०९०रागी ३८४६ रूपये याप्रमाणे आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात येणार आहे. 

            खरीप पणन हंगामात धान ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदी कालावधी असणार आहेतर भरडधान्य १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत खरेदीचा कालावधी असणार आहे.

            याशिवाय आधारभूत किमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान विकावे लागू नये यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता व त्या ठिकाणी धानाची व ज्वारीबाजरीमका व रागी या भरडधान्याची खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे.

            राज्यामध्ये केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ (food corporation of India) काम पाहणार आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने राज्य शासन कार्यवाही करणार असून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक हे राज्य शासनाचे मुख्य अभिकर्ता म्हणून या योजनेचे काम पाहणार आहेत.

            खरेदी केंद्र व खरेदी संस्था निवडीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारीजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाजिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा पणन अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापक  यांचा समावेश करण्यात आला आहे.

            रब्बी पणन हंगाम खरेदीबाबत केंद्र शासनाच्या सूचनानुसार स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. याबाबत येणाऱ्या अडीअडचणी व तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम स्थापन करण्यात येणार आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ/

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची

दिलखुलासजय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

            मुंबईदि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सणांच्या कालावधीत अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठीच्या उपाययोजना’ या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            सध्या दिवाळी राज्यभरात साजरी होत आहे. घरोघरी मिठाईफराळाचे पदार्थखवामावाखाद्यतेलवनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.  या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावे नागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत खबरदारी घेण्यात येते.  अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कशा प्रकारे देखरेख करण्यात येत आहेनागरिकांनी अन्न पदार्थ खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी इत्यादी विषयावर मंत्री श्री. आत्राम यांनी 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमातून मंत्री श्री. आत्राम यांची मुलाखत मंगळवार दि. 14 आणि बुधवार दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवारदि. 14 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

 राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने

कलाकृती पाठविण्याचे आवाहन

        मुंबईदि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

            रेखारंगकलाशिल्पकलाउपयोजित कलामुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागविण्यात येत आहे.  कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे. प्रदर्शनातील पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 22620231/32 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Featured post

Lakshvedhi