Saturday, 11 November 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया

दीपोत्सवाचं पर्व मांगल्यसमृद्धी घेऊन येवो

 

मुंबईदि. ११: - आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयाअसा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

            दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण व्हावेत अशी मनोकामनादेखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

 

            शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीआपल्या महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं छत्र आहे. त्यांनी राज्यकारभारसामाजिक सुधारणांचा आणि जनकल्याणाचा आदर्शधडा घालून दिला आहे. त्या प्रकाशवाटेवरूनच आपण वाटचाल करत आहोत. या वाटचालीत आम्ही  राज्याच्या विकासाला गती लाभेलआपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे अनेक निर्णय घेतले आहेत. ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांपर्यंतमाता-भगिनीशेतकरीकामगार आणि कष्टकरी यांच्या जीवनात या विकासाचं प्रतिबिंब उमटेल असे प्रयत्न केले आहेतअसेही त्यांनी नमूद केले आहे.

 

            मुख्यमंत्री पुढे म्हणतात, 'आपण महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न पाहिले आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. शिवछत्रपतींचाजिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हेतर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करत राहीलअसे आमचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नात महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाहीत्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूअसे अभिवनचही यानिमित्ताने देतो.'

 

            'राज्यातील जनतेच्या आयुष्यात आनंद यावात्यांची स्वप्ने साकार व्हावीत म्हणून आपले सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहे आणि पुढे देखील करीत राहीलअसा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 'दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. आपण त्याच उत्साहानं हा प्रकाशाचा उत्सव साजरा करूया. आपण निसर्गपूजक आहोत. आपले सण देखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूयाप्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेतांना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे हे लक्षात ठेवून सण साजरा करूया.'

०००००

 


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कायद्यानुसार पिडीतांना निधी वितरीत

 अनुसूचित जातीअनुसूचित जमाती कायद्यानुसार पिडीतांना निधी वितरीत

              मुंबई, दि. १० :-अनुसूचित जातीअनुसूचित जमती (अत्याचार प्रतिबंध) सुधारित अधिनियम२०१५ व सुधारित नियम२०१६ अंतर्गत पिडीतांना  ३१ कोटी ८८ लाख ५०  हजार रुपये इतका निधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात  उपलब्ध झाला आहे. त्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयाकडून सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

            नागरी हक्क संरक्षण अधिनियम१९९५ अन्वये अस्पृश्यता पाळणे व ती पाळण्यास उत्तेजन देणे हा गुन्हा असून त्यासाठी या अधिनियमांत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती/जमातींवर होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी अनुसूचित जातीअनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम१९८९ लागू करण्यात आलेला आहे. त्या अधिनियमात १९९५ मध्ये केंद्र शासनाने सुधारणा केल्या आहेत. सदर सुधारणा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या आहेत.  अत्याचाराचे प्रकार किंवा गुन्ह्याचे प्रकार व त्यासाठी विहित केलेले सुधारित दर यानुसार नुकसान भरपाई देण्यात येते, असे सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.


महाराष्ट् लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

            मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सदर वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

             वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.  अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Update) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल. या आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

            सन 2024 मधील संभाव्य वेळापत्रक सोबत जोडले आहे.

००००

 

विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही

 विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका,

मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही "भाऊबीज भेट"

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि.10 : नवनियुक्त अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

                मार्च 2023 पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आत्तापर्यंत भाऊबीज दिली होती. आजच्या शासन निर्णयामुळे दिनांक 1 एप्रिल2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर,2023 या कालावधीत अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज भेट दिली असून यापूर्वी दिलेली भाऊबीज भेट म्हणून दिलेले 37 कोटी 33 लाख रुपये  आणि आज नवनियुक्त अंगणवाडी सेविकामदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना  भाऊबीज भेट म्हणून दिलेले 3 कोटी असे एकूण 40 कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास  विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

Friday, 10 November 2023

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित पणती डेकोरेशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित

पणती डेकोरेशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री


 


            मुंबई दि. १० : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी महिलांना महिला बालविकासचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव,अल्पसंख्याक विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, मआविमच्या व्यवस्थापकिय संचालक डॉ. इन्दु जाखड यांनी प्रशस्तीपत्रक प्रदान करून अभिनंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयेाजित पणती सजावट स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.


            मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, स्वाभिमान प्रकल्प (मालाड) येथून आलेल्या महिला बचत गटांचा यात समावेश आहे. १० स्टॉल असून २० महिलांचा यामध्ये सहभाग आहे. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी पणती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना वस्तु खरेदीत २० टक्के सुट देण्यात आली असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाने दिली आहे.


महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री


      मंत्रालय त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनांचा स्टॉल, हस्तकला तोरण, लेदर वर्क, महिलांची सौंदर्य प्रसाधने या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या स्टॉलमधून महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री केली असल्याची माहिती महिला व आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आली.


००००

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातडॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत

 दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातडॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत


            मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


            भारतीय संस्कृतीत उत्सवांना महत्व असून दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. नागरिकांनी सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने राज्यभरात जनजागृतीवर विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानासारख्या मोहिमेतून पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जात आहे. या याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. मोटघरे 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून देणार आहेत.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. मोटघरे यांची ही मुलाखत शनिवार दि. 11 आणि सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


एक्स - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


                                                                        ००००


 


 

९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर

 ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर

-मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

नैसर्गिक आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

 

            मुंबईदि. ९ : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.  या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदतपुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

            मंत्रालयातील वॉर रुम येथे मदतपुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळग्रामविकास मंत्री गिरीश महाजनकृषी मंत्री धनंजय मुंडेरोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरेमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठीपशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडेकृषी  विभागाचे सचिव सुनील चव्हाणवित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळेपाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख,मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकरजलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.

                 मंत्री श्री.पाटील म्हणाले कीकेंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील  काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घटपीक कर्जाचे पुनर्गठनशेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीकृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूटशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफीरोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापरटंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती ९५९ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

            राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थ्यी शेतक-यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणा-या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली. जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच जून २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगावरावेरभुसावळचोपडायावलजळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेत पिकांच्या नुकसानीकरिता  मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

१७८ तालुक्यातील ९५९ सर्कलमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर

        अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळअमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३ मंडळबुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील  ७० मंडळवाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळयवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९ मंडळछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळबीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२ मंडळहिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३ मंडळजालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७ मंडळलातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५ मंडळनांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३ मंडळधाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८ मंडळपरभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८ मंडळनागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५ मंडळवर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ मंडळअहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६ मंडळधुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८ मंडळजळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ मंडळनंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३ मंडळनाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६ मंडळकोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २० मंडळपुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळसांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७ मंडळसातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५ मंडळसोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६ मंडळ असे एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.   

००००

Featured post

Lakshvedhi