Saturday, 28 October 2023

देशात प्रथमच, कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार,

 देशात प्रथमचकार्बन क्रेडिटब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार,

सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

राज्यातील  शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार तर अनुसूचित जाती संवर्गातील 10 लाख नागरिकांना मोफत पर्यावरण पूरक निधूर चुलीचेही वाटप होणार

 

            मुंबईदि.27 : जगाला भेडसावणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रणब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला असून देशात प्रथमच महत्त्वपूर्ण अशा सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेली 'महाप्रीतही राज्य शासनाची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून हा करार करण्यात आला आहे. महाप्रीत कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थींसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून येणाऱ्या काळात राज्यातील 10 लाख लाभार्थींना मोफत पर्यावरण पूरक निधूर चुलीचेही वाटप करण्यात येणार असल्याचे  सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी यावेळी सांगितले.

            अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा दर्जा वाढवून  त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत असणारी 'हिंदुस्थान ऍग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड तसेच जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट निर्माण करणारी सर्कुलॅरिटी  इनओव्हएशन हब  आणि देशांमध्ये ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्यासाठी कार्यरत इमरटेक सोल्युशन या संस्थांमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

            बदलत्या हवामानानुसार जगामध्ये कार्बन क्रेडिट निर्माण करण्याचा कल बघता तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना कार्बन क्रेडिट प्राप्त करून देण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असणारे जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सफाई कामगारांबरोबरच शेतकऱ्यांनाही सामाजिक न्याय विभागाच्या सोबत काम करून आर्थिक पाठबळ येणाऱ्या काळात देण्यात येईल असे जोएल यांनी यावेळी सांगितले.

             प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अणुउर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमालाचा दर्जा व टिकवण क्षमता वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले हिंदुस्थान ऍग्रो को ऑपरेटिव्हचे डॉ.भारत ढोकणे पाटील यांनी या कराराच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या लाभार्थींना संधी निर्माण होणार असल्याचे सांगितले.

तर इमरटेक सोल्युशन चे  गौरव सोमवंशी यांनी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियेमधील पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभार्थींसाठी त्यांचे हिताचे प्रकल्प राबवून त्यांचे आरोग्य सांभाळण्यांबरोबरच त्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे व पर्यावरण पूरक प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून कार्बन क्रेडिट निर्माण करणे,प्लास्टिक क्रेडिटब्लॉक चेन संकल्पनांचा प्रत्यक्षात वापर करून जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

             महाप्रीत या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थींसाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यातून रोजगार निर्मिती, आधुनिक प्रशिक्षण,आरोग्याची काळजी,आर्थिक संपन्नता व एकूणच मुख्य साखळी निर्माण करून सामाजिक न्याय विभागाने इतर विभागांसाठी पथदर्शी ठरणाऱ्या  सामंजस्य  करार घडवून आणला आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगेमहाप्रीत कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र देवकातेइमरटेक सोल्युशनचे  गौरव सोमवंशी,हिंदुस्थान ऍग्रो को ऑपरेटिव्हचे  डॉ भारत ढोकणे  पाटीलतर जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाइन पद्धतीने  उपस्थित होते.

००००

माझी माती, माझा देश' उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ

 माझी मातीमाझा देशउपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविला हिरवा झेंडा

 

            मुंबईदि. २७ : 'मेरी माटीमेरा देशअर्थात 'माझी मातीमाझा देशअभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

            यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकरबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेनगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराजशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलमुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरपश्चिम रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक कुशल सिंहविभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभक्ती वाढीस लावणारा माझी माती माझा देश’ कार्यक्रमाची सुरूवात ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती.

00000


 


Friday, 27 October 2023

*खंडग्रास चंद्रग्रहण*

 🚩श्री गणेशाय नम:🚩


🌕🌔🌗🌘🌑

*खंडग्रास चंद्रग्रहण*

🌑🌘🌗🌔🌕


*दि.28/10/2023 शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी  मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे .*


*ग्रहण स्पर्श* -

*29/10/2023 रोजी रात्री 01-05 मि.*


*ग्रहण मध्य* - 

*रात्री 01-44 मि.*


*ग्रहण मोक्ष* -

*रात्री 02-23 मि.*


*ग्रहण पर्वकाल* - 

*1तास 18 मि.चा आहे.* 


*हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.*


*ग्रहण दिसणारे प्रदेश -* *भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल.*


*पुण्यकाल* –

 *ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे.*


*ग्रहणाचा वेध* -

*हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 03-14 मि. पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी  07-41 मि.पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे,झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल.* 

*ग्रहण पर्वकाळात म्हणजे दि.29 ऑक्टोबर रोजी 01-05 मि. ते 02-23 मि. या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.*


 *ग्रहणातील कृत्ये*


 *ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे, ग्रहण  मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.*


*ग्रहणाचे राशिपरत्वे फल*


 *मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभफल.*

*सिंह, तुला, धनु, मीन या राशीना मिश्रफल.*

*मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशीना अनिष्ट फल आहे.*

*ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.*


 *यावर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री 01-05 मि. ते 02-23 मि.असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वी  प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल  त्यावर तुळशीपत्र ठेवावे.*


*संदर्भ-दाते पंचांग*

Thursday, 26 October 2023

मतदारांसाठी सूचन मतदानासाठी सुचाना


मतदारांसाठी सूचन

मतदानासाठी सुचाना 

*त्यासाठी आवश्यक कागदपत्रे (xerox)*


*१) मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र*

*2) आधार कार्ड*

*3)एक पासपोर्ट साइज कलर फोटो*

*4) रहिवाशी पुरावा*


*रहिवाशी पुरावा - कोणताही एक*

a) आधार कार्ड

b) इलेक्शन कार्ड

c) रेशन कार्ड किंवा लाईट बिल

d) Lease Aggrement/ Company Allotment Letter


*नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड*


*(नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर २०२० पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.)*


*सर्व झेरॉक्स वर आपली सही करावी.*


 *जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.*


नांवनोंदणीची अंतिम तारीख २ नोव्हेंबर असल्याने त्वरा करुन सदर अर्ज शिवसेना कार्यालयात आणण्याची कृपा करावी.


धन्यवाद!


जनहितार्थ



🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


अर्ज भरताना खालील  बाबीकडे विशेष लक्ष द्यावे

पदवीधर मतदार नोंदणी अर्जात मतदाराचे मतदान ओळखपत्र क्रमांक तसेच यादी भाग क्रमांक व मतदान केंद्र क्रमांक ही माहिती ऐच्छिक असून ती भरू नये

ईतर सर्व माहिती भरावी

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

 राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे

नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा

 

            मुंबईदि. 25 :- नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेलीप्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकास कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपरिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तापर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोजपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखउपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपुणे मेट्रो क्रमांक ३ चे कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयटाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी चतुर्थ श्रेणी पदे मंजूर नसल्यास ती तत्काळ मंजूर करावीत. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी. पुणे बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी लागणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. वडाळा येथील जीएसटी भवनामध्ये शासकीय कार्यालयांसाठी कार्यालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठीच्या परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण कराअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालयऔंधनाशिककोल्हापूरनागपूरअमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामपुणे येथील कृषीभवनशिक्षण आयुक्तालयकामगार कल्याण भवनसहकार भवननोंदणीभवनसाखर संग्रहालयइंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.


37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना

 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान

 

            मुंबईदि. 25 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात 26 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज व्यक्त केला. राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत करण्यात येत असून यापुढे खेळांडूच्या तयारीसाठी निधीची अडचण भासणार नाहीअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            गोवा येथे होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या ९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा तसेच शुभेच्छापर निरोप देण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडेक्रीडा आयुक्त सुहास दिवसेमहाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकरउपाध्यक्ष प्रदीप गंधेमहाराष्ट्र कबड्डी संघाचे सचिव बाबूराव चांदेरे आदींसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेले खेळाडूक्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीसहभागी सर्वच खेळाडूंकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. मात्र, अपेक्षांच्या दबावाखाली न येता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेनेराज्य शासनराज्यातील साडेतेरा कोटी नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

             उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमागच्या वेळी३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ८०० खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. त्यावेळी ३९ सुवर्ण३८ रौप्य८३ कांस्य अशी १४० पदके मिळाली होती. यावेळी आपले पथक मोठे आहे. यावेळी आपली तयारीही चांगली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ३६ व्या क्रीडा स्पर्धेपेक्षा३७ वी क्रीडा स्पर्धा आपल्याला अधिक पदके मिळवून देणारीराज्याच्या गौरवात भर टाकणारी असेल. महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकूनपहिला क्रमांक मिळवलेला असेल. त्यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वजण पुन्हा एकत्र येऊअसा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

            राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत. तिथे राज्याला मान खाली घालावी लागेल, अशी कुठलीही चुकीची गोष्ट तिथे घडणार नाही, याची शपथकाळजी सर्वांनी घ्यावी. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळातूनखिलाडूपणातूनवागण्यातूनक्रीडा रसिकांची मने जिंकण्याचे काम करावे. राज्यासाठी पदके जिंकणे आणि खिलाडूपणे वागणेया दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत. याची जाणीवही त्यांनी खेळाडूंना करुन दिली.

            महाराष्ट्राने सुरुवातीपासून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. गावागावांत क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी राज्याचं स्वतंत्र क्रीडा धोरण आहे. प्रत्येक जिल्ह्याततालुक्यात क्रीडा संकूल असले पाहिजे. खेळाडूंना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीयनिमशासकीयमहामंडळांच्या सेवेतखासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्या मिळाल्या पाहिजेतयासाठीही शासनाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. या प्रयत्नांना यशही मिळत आहेअसेही उपमुख्यंत्री श्री. पवार म्हणाले.

आशियाई स्पर्धेत देशाची आणि महाराष्ट्राची उज्ज्वल कामगिरी

            चीनमध्ये नुकत्याच झालेल्या19 व्या आशियाई स्पर्धांमध्ये देशाच्या आणि आपल्या राज्याच्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. आशियाई स्पर्धांमध्ये भारताने२८ सुवर्ण३८ रौप्य४१ ब्राँझअळी एकूण १०७ पदके जिंकली. यात महाराष्ट्राचे मोलाचेमहत्वाचे योगदान होते.  आशियाई स्पर्धेतभारताने जिंकलेल्या 28 सुवर्णपदकांपैकी 15 सुवर्णपदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. याशिवाय महाराष्ट्राला 7 रौप्य5 कांस्य पदकं मिळाली आहेत. क्रीडा क्षेत्रातला देशाचा आणि राज्याचा हा विजयरथ पुढे नेण्याचे काम यापुढील काळातराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करायचे आहेयाची जाणीव ठेऊन तुम्ही तयारी केली पाहिजे. चांगले खेळले पाहिजेअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

आशियाई पदक विजेत्यांच्या बक्षीसात भरघोस वाढ

            राज्य सरकार सातत्याने खेळ आणि खेळाडूंच्या पाठिशी राहिले आहे. चीनमधल्याआशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्याराज्याच्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचे आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंनाचांगली तयारी करता यावी म्हणूनप्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण घेतला आहेअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाखमार्गदर्शकास ७ लाख ५० हजाररौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाखमार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाखमार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

            राज्यात क्रीडा विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन उभारण्यात येत आहे. अलिकडच्या काळात जलतरणनेमबाजी सारख्या खेळातंही महाराष्ट्राचे खेळाडू चमकत आहेत. जागतिक पातळीवर भालाफेकीचं सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या पूर्वजांचे संबंधही महाराष्ट्राशी जोडलेले आहेतही बाब अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठीइथल्या क्रीडा संस्कृतीची मुळं अधिक घट्ट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. खेळाडूंना सन्मान आणि खेळांना प्रोत्साहन देण्याच्या कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीअशी ग्वाहीही त्यांनी दिली.

----------------------०००००------------------------

शैलजा पाटील/विसंअ/

बीड जिल्ह्यात विमा कंपनीचे अग्रीम न देण्याचे अपील राज्य शासनाच्या समितीने फेटाळले

 बीड जिल्ह्यात विमा कंपनीचे अग्रीम न देण्याचे

अपील राज्य शासनाच्या समितीने फेटाळले

25 टक्के अग्रीम त्वरित वितरित करण्याचे आदेश

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. 25 : बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे.

            बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात आली होती. शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळण्याबाबत आग्रही होते.

            बीड जिल्हा प्रशासनाने पावसाचे पडलेले खंडशास्त्रज्ञांनी दिलेले अहवाल इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांमध्ये अग्रीम 25% पीकविमा वितरित करण्याच्या सूचना भारतीय कृषी विमा कंपनीस जारी केला होत्या.

            मात्र कंपनीने सरसकट अग्रीम देण्यास हरकत घेत विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. विभागीय आयुक्तांनी सर्व अहवालाची फेर तपासणी करत व विमा कंपनीची बाजू समजून घेत हे अपील 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार फेटाळून लावले होते. त्यानंतर कंपनीने राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते.

            आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे या अपिलाबाबत सुनावणी झाली. कृषी व महसूल विभागाने सादर केलेले अहवालशास्त्रज्ञांनी सादर केलेले अहवालपावसातील खंड व आकडेवारी तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती या सगळ्यांचा विचार करत विमा कंपनीचे अपील फेटाळून लावत विमा कंपनीला त्वरित 25 टक्के अग्रीम विमा वितरित करण्याचे आदेश भारतीय कृषी विमा कंपनीला दिले आहेत. याबाबतचा आदेश कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा राज्यस्तरीय कृषी विमा सल्लागार समितीचे प्रमुख अनुप कुमार यांनी आज जारी केले आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने बैठका घेऊन समन्वय साधला.

Featured post

Lakshvedhi