Thursday, 26 October 2023

राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

 राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे

नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा

 

            मुंबईदि. 25 :- नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेलीप्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकास कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपरिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तापर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोजपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखउपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपुणे मेट्रो क्रमांक ३ चे कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयटाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी चतुर्थ श्रेणी पदे मंजूर नसल्यास ती तत्काळ मंजूर करावीत. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी. पुणे बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी लागणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. वडाळा येथील जीएसटी भवनामध्ये शासकीय कार्यालयांसाठी कार्यालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठीच्या परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण कराअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालयऔंधनाशिककोल्हापूरनागपूरअमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामपुणे येथील कृषीभवनशिक्षण आयुक्तालयकामगार कल्याण भवनसहकार भवननोंदणीभवनसाखर संग्रहालयइंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi