Thursday, 26 October 2023

घेरावाडी आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांसह पुनर्वसनाबाबत 7 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करावी

 घेरावाडी आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांसह पुनर्वसनाबाबत

7 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करावी

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 25 : कर्नाळा (जि. रायगड) पक्षी अभयारण्यातील घेरावाडी या आदिवासी पाड्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आणि पुनर्वसनाबाबत वन विभागाने 7 दिवसांत बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना   वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

            कर्नाळा पक्षी अभयारण्यातील घेरावाडी आदिवासी पाड्याचे पुनर्वसनकर्नाळा पक्षी अभयारण्याचा निसर्ग पर्यटन आराखडा आदींच्या संदर्भात आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश बालदी,  वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि घेरावाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीघेरावाडी येथील आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार तेथे रस्तेवीजपाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याशिवाय या आदिवासी बांधवांना पुनर्वसनाचे अन्य पर्याय समजावून सांगावेत. त्यापैकीजो पर्याय स्थानिक नागरिक निवडतीलत्या पर्यायाची उपयुक्तता तपासावी. यासाठी वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन यासंदर्भात काय पर्याय स्थानिकांना उपयुक्त ठरेलयाबाबत आढावा घ्यावाअसे सांगितले.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या अधिक संधी

            कर्नाळा पक्षी अभयारण्याचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी निसर्ग पर्यटन आराखड्याची अंमलबजावणी चांगली होणे आवश्यक आहे. या आराखड्यात प्रस्तावित केलेली कामे ही दर्जेदार असणे अपेक्षित आहे. ही कामे वेळेवर पूर्ण होणे तितकेच गरजेचे असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

0000

Wednesday, 25 October 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन

 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती

अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 25 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील अनुसूचित जातीविमुक्त जाती व भटक्या जमातीइतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेकरीता नवीन (Fresh) व नूतनीकरणाच्या (Renewal)  ऑनलाइन अर्जाची स्वीकृती सुरू झाली आहे.

            ऑनलाइन अर्जाची स्वीकृती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता ११ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु झाली आहे. महाडिबीटी ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत सर्व महाविद्यालयांनी कार्यवाहीचे आवाहन सहायक आयुक्तसमाजकल्याणमुंबई उपनगर प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

*

पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर

 पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर

लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक

 

            मुंबईदि. 25 : राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची  वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे.

            बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती, पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.

            स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. बाजार समितीची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समिती यांच्या तुलनेत शेतकरी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समितीमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.

            जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प सुरु आहे. बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी

            बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधाआर्थिक व वैधानिक कामकाजयोजना / उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण ३५ निकष तयार करण्यात आलेले होते. या निकषाशी संबधित माहितीची संबधित तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनी तपासणी करून एकूण २०० गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्याची सन २०२२-२३ या वर्षाची क्रमवारी (रॅकिंग) निश्चित करण्यात आली आहे.

0

जनतेशी सुसंवाद कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण

 जनतेशी सुसंवाद कार्यक्रमांतर्गत

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वितरण

           

            मुंबईदि. 25 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊ नकाअसे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी प्रशासनाला दिले.

            जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत मंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना पाहिजे असलेल्या दाखल्यांचे वितरण तातडीने केले जात आहे. विविध दाखले नियोजित वेळेत मिळत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

            आज आयोजित जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरनिवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारीजिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्रउत्पन्नाचे दाखलेमिळकत प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांचे संजय गांधी निराधार योजनाअंत्योदय योजना आदी योजनांमधून लाभ मिळावा यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या सहभागातून नशा मुक्तीसाठी जनजागृती करू या - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ

 विद्यार्थ्यांच्या सहभागातून नशा मुक्तीसाठी जनजागृती करू या

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी ‘स्टुडंट्स प्रहरी क्लब’चा शुभारंभ

 

            मुंबईदि. 25 : व्यसनांमुळे असंख्य तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणे ही गंभीर बाब आहे. व्यसनांच्या विळख्यातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत 'स्टुडंट्स प्रहरी क्लब'चा शुभारंभ करण्यात आला आहे. या माध्यमातून मुंबईसह राज्यभरातून ड्रग्ज हद्दपार करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते 'स्टुडंट्स प्रहरी क्लबचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरवरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रवींद्र सिंघलनशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाडसरचिटणीस वर्षा विद्या विलासजिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. केसरकर म्हणालेमुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवीत आहे. त्याबरोबरच आंतरिक स्वच्छता देखील आवश्यक आहे. विद्यार्थी संवेदनशील असतातत्यांच्या सहभागातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ड्रग्ज मुक्त मुंबई अभियान यशस्वी होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            समाज हा पोलीस यंत्रणेचे डोळे असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीसमाजाने नशा मुक्तीसाठी पोलिसांना सहकार्य करावे. समाजातील विविध प्रकारच्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्वांनी मिळून वाटा उचलू याअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी शासनाने नशामुक्तीसाठी विविध पावले उचलली असल्याची माहिती दिली. विद्यार्थी नशेसारख्या सवयींना लवकर बळी पडण्याची शक्यता असल्याने मंत्री श्री.केसरकर यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी वाईट सवयींना बळी पडू नयेत ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असून सर्वांनी या अभियानाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

            यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत स्टुडंट्स प्रहरी क्लबच्या लोगोचे तसेच सहसाहित्याचे अनावरण करण्यात आले. मुंबईतील 450 शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून केंद्र सरकारच्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत दहा मुले व दहा मुली यांचा स्टुडंट्स प्रहरी क्लब स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एक युद्ध नशे के विरूद्ध’ ही या अभियानाची घोषणा असणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/


 


राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

 राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे

नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावावेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा

 

            मुंबईदि. 25 :- नागरिकांना विकास कामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेलीप्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकास कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपरिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तापर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोजपुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखउपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपुणे मेट्रो क्रमांक ३ चे कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयटाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी चतुर्थ श्रेणी पदे मंजूर नसल्यास ती तत्काळ मंजूर करावीत. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी. पुणे बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी लागणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. वडाळा येथील जीएसटी भवनामध्ये शासकीय कार्यालयांसाठी कार्यालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठीच्या परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण कराअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेचे पुण्यातील मुख्यालयऔंधनाशिककोल्हापूरनागपूरअमरावतीतील सारथीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामपुणे येथील कृषीभवनशिक्षण आयुक्तालयकामगार कल्याण भवनसहकार भवननोंदणीभवनसाखर संग्रहालयइंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

००००


चांगलं द्या, चांगलंच मिळेल*

 *चांगलं द्या, चांगलंच मिळेल*  


एकदा श्रीकृष्ण व अर्जुन  एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णला बोलतो मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे, त्या साठी तू माझी मदत कर. कृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकाच धोशा लावतो की मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

 कृष्ण म्हणतो ठिक आहे मी तुला एक संधी देतो पण माझी पण एक अट आहे मी तुला जी संधी देईन तीच संधी कर्णाला सुद्धा देईन अणि ह्या परीक्षेत तू कर्णा पेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन कृष्णाची ही अट मान्य करतो. 

    कृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो ,आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.

  लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...

  मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.

लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.

  पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.

   अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.

   लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

 आता अर्जून अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. 

 शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही. 

  मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......

 या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....

  या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. 

 एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

  अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... 

 अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!  

   कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

  आपले कुणी कौतुक करतंय.....गुणगान गातंय......हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

  देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....

शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....

म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.

कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............                                                    *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार.कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगल द्या पदरी चांगलंच मिळेल.*

"काय चुकलं" हे शोधायला हवं,

 पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.....

*🌷 राम कृष्ण हरी 🌷*

Featured post

Lakshvedhi