Wednesday, 25 October 2023

धरणीमातेची दीन बालके*

 *धरणीमातेची दीन बालके* 

लेखिका - सुधा मूर्ती


कुष्ठरोग, नुसतं हे नाव काढले की बरेच लोक घाबरतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोगी व्यक्तीस लेपर म्हणून कधीही संबोधू नये अशी प्रथा आहे. कारण लेपर या शब्दाच्या मागे जो एक अभिप्रेत भाव आहे तो फार वाईट आहे. कुष्ठरोगाची शिकार झालेल्या व्यक्तीचा विचार आला की लगेच आपल्याला हातापायाची बोटे झडलेला भिकारीच आठवतो. कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींना समाज सुद्धा वाळीत टाकतो.


पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की वेळच्या वेळी योग्य उपचार घेतले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, तोही काहीही शारीरिक व्यंग मागे न सोडता. अर्थात हे उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णाला खूप संयम बाळगावा लागतो, धीराने घ्यावे लागतं.  कुटुंबीयांच्या आधाराची गरज असते. या भयावह रोगाविषयी कितीतरी गैरसमज आढळून येतात. तो संसर्गजन्य आहे, आनुवंशिक आहे इत्यादी. पण हे गैरसमजच आहेत. कुष्ठरोगाचे सर्वच प्रकार काही संसर्गजन्य नसतात.


या रोगाविषयीच्या अज्ञानामुळे त्याची लक्षणे लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत. खरंतर ही लक्षणे लवकर कशी ओळखावी याविषयी प्रसार माध्यमे अनेकदा जनजागरणाचं काम करत असतात. पण तरीही हे घडत नाही. अनेकदा लोक फिकीरच करत नाहीत. आपण नेहमी असाच विचार करत असतो की हा प्रश्न इतरांचा आहे, आपला नव्हे. आपण एक गोष्ट विसरतो या रोगाच्या जगात गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही आणि कुष्ठरोग तर मानवजातीच्या अगदी प्रारंभीच्या काळापासूनच या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. अगदी येशू ख्रिस्ताच्या काळापासून.


आमच्या संस्थेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम कुष्ठरोग्यांना मदत करणे हाही आहे. या क्षेत्रात वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत.  काही लोकांच्या मते कुष्ठपीडित रूग्णानी आपल्या कुटुंबातच राहायला हवे,  तर काही लोक म्हणतात की त्यांनी वेगळ्या वस्तीत जाऊन राहिले पाहिजे. 


मी एकदा एका ओसाड प्रदेशात कामासाठी गेले होते. तेथे कुष्ठरोग्यांची वेगळी वसाहत होती. उन्हाळ्याचा ताप असह्य होत होता.  त्या वसाहत मधील दृश्य अत्यंत निराशाजनक होते. वसाहतीत राहणाऱ्या लोकांना त्या रोगाची घृणा वाटत होती. त्यांना यातना सुद्धा सहन होत नव्हत्या.


आम्ही तिथे त्यांना दया दाखवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी गेलो नव्हतो. त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करावं हाच आमचा हेतू होता. ते अगदी लहानसाहान काम जरी करू शकले व पोटा पाण्यापुरतं मिळवू शकले तरी त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार होतो. त्यांचा आत्मविश्वास परत यावा म्हणून आम्ही असं करायचं ठरवलं होतं. कारण माणसाला जेव्हा स्वतःविषयी आत्मविश्वास वाटतो तेव्हाच तो उजळ माथ्याने समाजापुढे तोंड वर काढू शकतो.


त्या वसाहतीतील सर्वात लोक गरीब व असहाय होते. त्यांना मानसिक आणि वस्तूरूपाने अशी दोन्ही प्रकारची मदत हवी होती. काळजी करू नका, आम्ही आहोत ना. असे छोटेसे शब्दसुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. समाजाकडून स्वीकार आणि काही मर्यादित स्वरूपात का होईना पण आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींनी या लोकांचे आयुष्य बदलून गेले असते.


वसाहतीत बऱ्याच झोपल्या होत्या. प्रत्येक झोपडीत एक एक कुटुंब राहत होते. प्रत्येक कुटुंबातील निदान  एक तरी व्यक्ती या रोगाने पीडित होती. हवा फार त्रासदायक होती. पण मला माझं कर्तव्य पार पाडणं भागच होतं.  या झोपडीतून त्या झोपडीत भेटीसाठी जाणं गरजेचं होतं. झोपडीतील स्त्रिया त्यांच्या अडचणी मला सांगत होत्या. सर्वात दुःखाची गोष्ट अशी ती त्यांना झालेल्या या दुखण्यामुळे साधी धुणंभांड्याची कामेही त्यांना कोणी देत नव्हते. त्यांच्यातील काहींनी नशिबापुढे हार मानली होती. सकाळची वेळ असूनही तरुण मुले झोपून होती. लहान मुले मातीत खेळत होती.


वृद्धांची अवस्था तर अत्यंत दारूण होती. मुळात कुष्ठरोगासारखा दूर्धर रोग, त्यात वृद्धापकाळमुळे कमजोर झालेले शरीर, शिवाय या रोगामुळे समाजाकडून मिळणारी हेटाळणीची वागणूक… कधी कधी अशा परिस्थितीने गांजलेली व्यक्ती आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होऊ शकते.


तिथे एक लहानशी, गवताने शाकारलेली झोपडी होती. चिकणमातीच्या भिंती व बांबूचे दार होते. एक स्त्री तिथे राहत होती. ती त्या वसाहतीतील सर्वात वयोवृद्ध स्त्री होती. तिचे नाव वीराम्मा. मी तिला हाका मारून बाहेर बोलावलं. पण ती आली नाही. तिला कदाचित जरा कमी ऐकू येत असेल त्यामुळे आपणच आत जाऊन तिच्याशी बोलावं असं मला वाटलं. मी त्या दारावर अगदी हलकेच टकटक केली, न जाणो दारच मोडायचं. तरीही तिने ओ दिली नाही की बाहेर आली नाही. मग मीच दार ढकलून आत गेले.


झोपडीत काही सामानसुमान नव्हतं. छताला थोडे झरोके होते. त्यातून थोडी हवा व उजेड आत येत होता. दोन-तीन गाडगी-मडकी व एक मातीची थाळी होती. तीन दगडांची चूल मांडलेली होती. एक फाटकी चटई जमीनीवर अंथरलेली होती. जवळच दोन-तीन कांदे पडले होते व पाण्याने भरलेला माठ होता. 


मला झोपडीत वीरम्मा चटकन दिसेना, पण तिच्या श्वासोच्छवासाची चाहूल तर लागली. बाहेरच्या लख्ख प्रकाशातून एकदम आत शिरले होते त्यामुळे डोळे दिपले होते. काळोखाची डोळ्यांना सवय होण्यास वेळ लागला.


मी परत एकदा हलकेच हाक मारली, वीरम्मा मला तुमच्याशी बोलायचंय, कुठे आहात तुम्ही ?  


ती म्हणाली,  अम्मा मी इथे आहे. पण माझ्याजवळ नका येऊ. 


आता मला अंधारात, खोलीच्या कोपऱ्यात बसलेली ती कृश स्त्री दिसली. शरीर सुरकुतलेलं, अंगावर मांसाचा कण नाही. नुसतं कातडं आणि हाडांचा सापळा. ती हाताची घडी करून कोपऱ्यात पाय पण पोटाशी ओढून अंगाचे मुटकुळं करून बसली होती.


अम्मा, ती पुटपुटली, तुम्ही बाहेरून खूप हाका मारत होता ना ? पण मी तुमच्याशी बोलायला बाहेर कशी येणार ? मी एक स्त्री आहे. म्हातारी असले म्हणून काय झालं, अंगात कपडा नसताना इतक्या लोकांसमोर कशी येणार मी ?


तेव्हा मला कुठे जाणवलं की, तिच्या अंगावर जवळपास वस्त्रच नव्हतं. 


मी माझ्या कार्याच्या निमित्याने अनेक गरीब वस्त्यांमधून हिंडले आहे. अठरा विश्वे दारिद्र्य मी पाहिलंय. पण आजवर कधी अशी स्त्री पाहिली नव्हती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाल्यानंतर गरिबीची ही दारुण अवस्था खरोखर मानवतेला काळीमा फासणारी होती. एका वृद्ध स्त्री जवळ अंग झाकण्यापुरता कपडा नसावा ? आणि तरीही ती तक्रार करत नव्हती. सहा वार साडी नेसल्याबद्दल मलाच अपराधी वाटलं.


काही क्षण मला माझी स्वतःची लाज वाटली. मी काहीच बोलले नाही. खरं तर थेट वस्तूरूपाने देणगी किंवा रोख रक्कम हातात द्यायची नाही, असं आमच्या संस्थेचे धोरण आहे. पण ते मी क्षणभर विसरले. ही परिस्थितीतच अशी होती की तातडीने काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक होतं.  मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून त्या वस्तीतील स्त्रियांना देण्यासाठी शंभर साड्या मागवल्या. त्या स्वावलंबी होतील की नाही,  स्वतःच्या पायावर उभ्या राहतील की नाही ही दुरची बाब होती. स्त्रीला लज्जा रक्षणापुरतं वस्त्र तरी किमान असणं ही निकड होती. तेवढं पुरवून सुद्धा त्याने त्या स्त्रीयांच्या आयुष्यात फार मोठा फरक पडणार नव्हता.  पण इतकी गरिबी, इतकी दारूण  अवस्था मी पाहिली की काही वेळा आपण तातडीने काहीतरी कृती करून जातो, त्यातलीच एक गोष्ट. ही गरीब माणसे त्यांचा स्वतःचा काही अपराध नसताना अशी दुःखाच्या खाईत खितपत पडलेली दिसतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे. कारण ईश्वराने मुक्त हस्ताने आपल्यावर कृपेची उधळण केलेली आहे.


भारत म्हणजे काही नुसतं तंत्रज्ञान,  आधुनिकता, फॅशन, सिनेमे किंवा सौंदर्यस्पर्धा नव्हे.  खरा भारत तर आपल्या देशाच्या अंधाऱ्या कानाकोपऱ्यात वसलेला आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेचे हात देखील पोचू शकणार नाहीत, अशा कानाकोपऱ्यात आपण देश सेवा करणं म्हणजे या अशा लोकांची सेवा करणं. 


त्या दिवशी त्या कुष्ठरोगांच्या वसाहतीत जाऊन आल्यापासून आता मी नेहमी एक गोष्ट करत असते कधीही अशा वस्तीत भेटीसाठी गेले तर किमान दहा तरी साड्या बरोबर घेऊन जाते.




*समाप्त*

बर्थडे पार्टी

 एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. "हाय! हॅलो!!" वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी 'ड्रिंक्स & डान्स' चं आयोजन होतंच.


सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती... आणि गाणं सुरु झालं!


"गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया... मंगलमूर्ती..." सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?" लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, "ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!" तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.


"मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे 'गजानना गणराया' गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! 'आपल्याला काय करायचंय?' म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा 'उत्सव' आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला 'Show -Piece' करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!" म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!


मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?" तसं मी हसत म्हटलं, "साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!"


कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल  शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया🙏

माझी लाज तुला पांडुरंगा🚩

 🚩माझी लाज तुला पांडुरंगा🚩


🌻 🌻 संत दामाजी पंत 🌻🌻


"पंत दरवाजा खोलो"

"पंत दरवाजा खोलो'

दारावर जोरजोरात धक्के बसू लागले.

"पंत दरवाजा खोलो...."

पंत जेवायला बसले होते. दुष्काळ असल्यामुळे त्यांच्या पंक्तीला आणखी ही

काही अतिथी होते.

पंतांच्या पत्नीने दरवाजा उघडला. बाहेर हत्यारबंद दोन यवन शिपाई उभे होते.

"दामाजी पंत कहा है ? सरकार का हुक्म है..." ते यवन शिपाई गरजले.

"आपण आत यावे" पंतांची बायको म्हणाली

यवन शिपाई आत आले. आत मध्ये जेवणाची पंगत बसली होती. प्रथे प्रमाणे पंतांच्या पत्नीने गुळपाणी दिले. तसे ते शिपाई म्हणाले,"माई जी खाने को कुछ मिलेगा ?"

"हा हा, क्यू नही, बैठीए",पंत अदबीने म्हणाले आणि पत्नीला चार पानं मांडायला सांगितली,.

दुपारची वेळ होती, उन्हाचा कडाका होता. शिपायांना भूक लागली होती. दोघे जण जेवायला बसले. संतांच्या घरचे ते सात्विक अन्न पोटात गेले आणि शिपायांच्या वृत्तीत बदल होऊ लागला. ते शांत झाले.

त्यांनी थैलीतून एक कागद बाहेर काढला आणि पंतांच्या हातात ठेवला. पंतांनी तात्काळ जाणले त्या कागदात काय लिहिलेले आहे. तो कागद घेऊन पंत देवघरात गेले आणि तो कागद पांडुरंगाच्या मूर्ती पुढे ठेवला आणि म्हणाले,

"माझी लाज तुला पांडुरंगा".

कागद परत घेऊन पंतांनी तो उघडून वाचला. मंगळवेढ्यातले धान्य कोठार लुटल्याचा आरोप दामाजी पंतांवर ठेवून पंतांना काढण्या लावून दरबारात हजर करावे असा हुकूम होता.

दामाजी पंत पत्नीचा निरोप घेऊन त्या शिपायांबरोबर जायला निघाले. ही बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि पंतांच्या वाडयासमोर गर्दी लोटली.

पंतांना घेऊन ते शिपाई वाड्याबाहेर आले. आणि गावकऱ्यांनी शिपायांना वेढा घातला. पंत हात जोडून गावकऱ्यांना म्हणाले

"ते बादशहाचे शिपाई आहेत त्यांना सरकारी कामात अडथळा करू नका."

एव्हढ्यात पंतांची पत्नी शिपायांना म्हणाली,"तुम्ही एकदम बेदरला जाऊ नका आधी पंढरपूरला जा आणि मग बेदरला जा".

शिपाई म्हणाले "आम्हाला तसा हुकुम नाही".

पंतांच्या पत्नीने हातातून सोन्याच्या बांगड्या काढून शिपायांच्या हातात ठेवल्या तसे शिपाई म्हणाले," हां माईजी , जैसा आप कहेंगे वैसा होगा". 

त्याप्रमाणे शिपायांनी पंतांना आधी पंढरपूरला नेले.

पंत विठ्ठलाला म्हणाले,

 "लाज राख पांडुरंगा"

श्रीहरीला दंडवत घालून दामाजीपंत शिपायांबरोबर

बेदरला जायला निघाले.


इकडे श्रीविठ्ठल रुक्मिणीला म्हणाले," दामाजी पंत काही प्राणाची भीक मागणार नाही. मलाच काहीतरी केले पाहिजे. तू तुझे सर्व दागिने मला दे. परत देताना मी दुप्पट करून देईन."

तेंव्हा रुक्मिणी माता म्हणाल्या, " दागिने नेताना सर्व नवरे असेच म्हणतात".

रुक्मिणी मातेनी सर्व दागिने काढून पांडुरंगाच्या हवाली केले. पांडुरंगाने त्या दागिन्यांचे सुवर्ण मोहरात रूपांतर केले. स्वतःचा वेष बदलून ते महार बनले. आणि 

झाला महार पंढरीनाथ !

पंढरीनाथांनी सर्व मोहरा पागोट्यात गुंढाळल्या, पागोटे डोक्यावर ठेवले आणि क्षणात

बादशहाच्या दरबारात हजर झाले.

बादशहाने विचारले," कौन हो तुम ?"

पंढरीनाथ म्हणाले,"विठू महार म्हणत्यात मला. मी दामाजी पंतांकडे कामाला असतो. तसेच काम निघाले म्हणून मालकांनी मला पाठवले. आमच्या मालकांनी धान्यकोठार लुटलेलं नाही तर ते धान्य गावकऱ्यांना विकले. त्याचे हे पैसे आणले आहेत", असं म्हणून पंढरीनाथांनी डोक्यावरचे पागोटे काढून त्यातल्या सुवर्ण मोहरा बादशहापुढे ओतल्या.

बादशहा मनात म्हणाला माझा खजिना पण एव्हढा नाही. बादशहाने पैसे मिळाल्याची पावती विठू महाराचे हाती ठेवली.

आणि विठू महाराला बादशहाने विचारले की,

"दामाजीपंत तुला किती पगार देतात ?"

"एक लक्ष देतात" विठू महार म्हणाला.

मी तुला दोन लक्ष पगार देतो, माझ्याकडे काम कर".

यावर विठू महार म्हणाला,

"मला दोन लक्ष चालत नाही. एक लक्ष संसारात आणि एक लक्ष दरबारात मला चालत नाही. मला एकच लक्ष लागते".

बादशहाला काहीच उमगले नाही !

बाहेर येताच विठू महार अंतर्धांन पावला. 

पंढरीनाथांनी ती पावती पंतांच्या घरी जाऊन त्यांच्या देवघरातल्या पोथीत ठेवली.


इकडे दरबारात यवन शिपायांनी दामाजीपंतांना हजर केले. तेंव्हा 

बादशहांनी दामाजीपंतांना सांगितले तुमच्या विरूद्ध कोणताही आरोप नाही. तुम्ही ज्या विठू महाराला पाठवले होते त्याने सर्व रक्कम दरबारात जमा केली आहे. दामाजीपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला.

हा कोण विठू महार ? त्याने कोठून पैसे भरले ?

बराच वेळ विचार केल्यावर दामाजीपंतांच्या लक्षात आले की विठू महार म्हणजे खुद्द पंढरीनाथ दरबारात येऊन गेले, पंतांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.बादशहाला स्वतः पंढरीनाथांनी दर्शन दिले., पंत मनात म्हणाले हे बरंय पंढरीनाथा ? वर्षानुवर्षे आम्ही तुझी भक्ती करावी आणि दर्शन मात्र तू बादशहाना दिलेस ?


पंत घरी आले आणि थेट देवघरात गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यांना जाणवले पांडुरंग मिस्किलपणे हसताहेत.

त्यांचे लक्ष उघड्या पोथीकडे गेले त्यात एक कागद होता. तो हातात घेऊन वाचला, बादशहाच्या

शिक्क्याची ती पावती होती

"धान्याची रक्कम मिळाली"

पंतांना गहिवरून आले. पुन्हा डोळ्यातून पाणी वाहू लागले.


🔔🚩🌷🔔🚩🌷🔔🚩

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            राज्यातील कारागृहांच्या बळकटीकरणासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. कारागृहांमधील कैद्यांचे पुनर्वसन करणेत्यांच्यात सुधारणा घडवून आणणे तसेच त्यांच्यातील गुन्हेगारीला प्रतिबंधासाठी कारागृह व सुधार सेवा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये बंदिवानांच्या कलागुणांना वाव देणेविशेष माफीवेतनात वाढ शृंखला उपहारगृह हे उपक्रम काय आहेत तसेच राज्यातील कारागृहांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरु आहे. याबाबत जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून श्री. गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

             जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवारदि. 26 ऑक्टोबर2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुंबईतील शासकीय रूग्णालयात सर्व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून द्याव्यात

 मुंबईतील शासकीय रूग्णालयात

सर्व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून द्याव्यात

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

            मुंबई दि. 25 : शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येऊ नये. सर्व चाचण्या शासकीय रुग्णालयांतच कराव्यातयासाठी आवश्यक तंत्रज्ञानमनुष्यबळाची पूर्तता करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.

            मुंबईतील कामासर जे.जे. रुग्णालयजी.टी. रूग्णालयसेंट जॉर्ज रूग्णालयांतील समस्यांबाबत विधिमंडळात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी पुरवठा आणि मनुष्यबळ पूर्ततेसाठी पद निर्मितीसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशित केले. यावेळी हाफकिनचे प्रभारी संचालक अभिमन्यू काळेवैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरजे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होत्या.

            अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले कीमुंबईतील या शासकीय रूग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. वैद्यकीय तपासण्यासाठीची आवश्यक यंत्रे उपलब्ध असल्याने रुग्णांना त्यासंदर्भात सेवा देण्यात यावी. तसेचज्या वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागते त्यासंदर्भात अहवाल तातडीने सादर करावा. संबंधित यंत्रसामुग्री तसेच मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

            जे.जे. रुग्णालयातील बंद अवस्थेत असलेल्या दोन्ही कॅथलॅब पुढील सहा आठवड्यांत सुरू कराव्यात. तसेच शवगृहाची डागडुजी करावी. ज्या शवगृहांचे नव्याने बांधकाम सुरू आहे त्या कामांना अंतिम टप्प्यात नेण्याकरिता आवश्यक कार्यवाही अहवाल एका आठवड्यात सादर करावा. सीटी स्कॅन तसेच एमआरआय मशीन खरेदी संदर्भात हाफकिनने (प्रशिक्षणसंशोधन आणि चाचणी संस्था) निधी रुग्णालयाला वर्ग करावा. रुग्णालयाने कमी कालावधीत यंत्र खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. जेथे शवगृह आहेत, मात्र, कर्मचारी उपलब्ध नाहीत तिथे पदनिर्मितीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. शासकीय  रूग्णालयात येणाऱ्या सामान्य रूग्णांना सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता राखावीशवगृहासंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी दिले.


प्रधानमंत्री नरेंद्र प्रधानमंत्री मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाट सुधारित न

 सुधारित :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर

शिर्डी दर्शननिळवंडे धरणाचे जलपूजन7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू होणार

 

            नवी दिल्ली25 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनशिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील.

             प्रधानमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसारया दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास,  प्रधानमंत्री श्री.मोदी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करुन मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी  दोन वाजतापंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तद्नंतर 3.15 च्या सुमारासश्री. मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्यरेल्वेरस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.

शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन

            शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त  नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सुविधांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉलक्लोक रूमस्वच्छतागृहेबुकिंग काउंटरप्रसाद काउंटरमाहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे .

निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या काठाचे कालव्याचे जाळे देशाला करतील समर्पित

            साईबाबांचे दर्शन घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाचे (85 किमी) कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होईल. या धरणासाठी सुमारे 5 हजार 177 कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ चा शुभारंभ - 86 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

            नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल.

            प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या व्यस्त दौऱ्यात ते अहमदनगर शासकीय रूग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पणकुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी)जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी)एनएच (NH166 (पॅकेज-I)च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरणइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचे उद्घाटन तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणीआयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.

००००


बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार

 बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये पदकांची

लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांनी केला सत्कार

 

            मुंबई, दि. 25 : बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या 'स्पेशल ऑलिम्पिक'मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

            बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक प्राप्त करणेहा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            पूर्वी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये भारत पदकतालिकेत खालच्या क्रमांकावर राहत असे. परंतुयावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पदकांचे शतक पार केले आहे. आज भारत खेळामध्ये आघाडीवर येत आहे आणि त्यात दिव्यांग खेळाडू देखील आघाडीवर आहेतही अभिमानास्पद गोष्ट आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक व युनिफाईड पार्टनर्स यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रभाग संचालक डॉ. भगवान तलवारेतसेच बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमधील सुवर्णरजत व कांस्य पदक विजेते उपस्थित होते. 

            स्पेशल ऑलिम्पिक मध्ये भारतातून १९४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी देशासाठी २०२ पदके जिंकली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत २० पदके जिंकलीअसे स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ मेधा सोमैया यांनी यावेळी सांगितले. स्पेशल ऑलिम्पिक मध्ये ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतातअसे त्यांनी सांगितले.   बर्लिन येथे स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा जून महिन्यात झाल्या.

**

Maha Governor felicitates medallists from Berlin Special Olympics

 

      Mumbai, 25th Oct : Maharashtra Governor Ramesh Bais felicitated 20 athletes and coaches from Maharashtra who bagged medals for the country in the 'Special Olympics' at Raj Bhavan Mumbai on Wednesday (25th). The Special Olympics were held for the intellectually challenged persons in Berlin in June 2023.

      Speaking on the occasion, the Governor said the divyang sports persons have done the State and the nation proud by bagging more than 200 medals in the Special Olympics.

      He said there was time when India stood at the bottom of the medal table in events like the Olympics. He said, India has now crossed the century of medals in the recently concluded Asian Games held in China.

      According to Dr Medha Somaiya, Maharashtra State President of Special Olympic Bharat, 194 athletes from India participated in Special Olympics. Together they won 202 medals for the country. She said the Divyang athletes from Maharashtra won 20 medals in this competition. She informed that contestants from 8 years to 80 years of age participate in the Special Olympics. The Special Olympic Games were held in Berlin in the month of June.

      The Governor also felicitated Sports coaches and Unified Partners on this occasion. Area Director Dr Bhagwan Talware, parents, Sports Director and recipients of Special Olympic gold, silver and bronze medallists were present.

0000

Featured post

Lakshvedhi