Tuesday, 24 October 2023

महिषासुर मर्दिनी स्तोत्र


 

सरस्वती

 


बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत

 बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत

बाईक रॅलीमधून जनजागृती होईल

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

 

             मुंबई दि.24 :  यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान बाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

             गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या यशस्व‍िनी बाईक रॅलीस महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखूवन पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

            यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसेएकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवालमुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी  उपस्थित होते.

             ‘बेटी बचाव बेटी पढाओ हा संदेश घेऊन केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) च्या 75 माहिला जवान 15 राज्यामधून आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 121 जिल्ह्यातून अंदाजे 10 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 3 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनगरशिलाँगकन्याकुमारी ते एकतानगर गुजरात असा प्रवास या रॅलीच्या माध्यामातून होणार आहे.

            या रॅलीचे महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे आगमन झाले. मुंबई येथे ही रॅली आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि माहिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कु.जीविका यादवकु. युक्ता कांबळे (चेंबूर)कु.कस्तुरी देसाई (प्रभादेवी)कु. इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि कु. ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            प्रास्ताविक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे यांनी तर सूत्रसंचालन जाई वैशंपायन यांनी केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलातील पुरुष व माहिला जवान यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

0000


Handicraft exhibition बेलापूर

 


Monday, 23 October 2023

उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

 उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

 रुचेश जयवंशी यांची दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा आणि (दारिद्र्य कमी होऊन) कुटुंब आर्थिकरित्या सक्षम व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगातून रोजगार निर्माण करून देणे आणि आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. हे अभियान नेमके काय आहे, याची अंमलबजावणी आणि नियोजनस्वयंरोजगारासाठी होणारे प्रयत्न, याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जयवंशी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.  

            दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 24बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000



सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा

 सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा

 

       मुंबईदि. २३ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून यानिमित्त आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात. 

            'नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धनज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पानेपाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते. दसरा सण मोठानाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतोकारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहेअसे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात कीदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा  क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानंशत्रूवर पराक्रमानंवैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा, असा हा दिवस आहे. साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचाचांगल्या गोष्टींचा प्रारंभ करु याअसेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

0000


 

 

वृत्त क्र. 3519

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

       मुंबईदि. 23 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावाअसे आवाहनही त्यांनी केले आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतातनवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे-जे उदात्तचांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचेअन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावाराज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावेअशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. गौतम बुद्धांची शिकवणूक अंगीकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करू याअसेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000


 

वृत्त क्र. 3518

राज्यपाल रमेश बैस यांच्या विजयादशमी निमित्त शुभेच्छा

 

मुंबई, दि. २३ : राज्यपाल रमेश बैस यांनी विजयादशमी (दसरा) निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 विजयादशमीचा सण अशाश्वतावर शाश्वताच्या व दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे.  सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो.  दसरा व विजयादशमीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती, समाधान व समृद्धी घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

 

0000

 

Governor greets people on Vijaya Dashmi

 

            Mumbai, Date 23 : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the auspicious occasion of Vijaya Dashmi (Dassera). In his message, the Governor has said:

 

 “The festival of Vijaya Dashmi or Dussera symbolizes the victory of the eternal over the ephemeral and of good over the forces of evil.  The festival reassures that Truth will always prevail.  May the festival bring happiness, peace and prosperity to all. I extend my heartiest greetings on the joyous occasion of Vijaya Dashmi."

 

0000

वृत्त क्र. 3517

राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट

 

            मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी दुर्गाष्टमीनिमित्त राजभवन कर्मचारी निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला.

 

 

Governor visits Navratri Mandal  in the

Raj Bhavan staff quarters premises 

 

            Mumbai, Date 23 : Governor Ramesh Bais visited the Raj Bhavan Navratri Mandal in the Raj Bhavan staff quarters premises on the occasion of Durgashtami. The Governor performed the aarti and interacted with those present.


पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

            मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने २३,२५ व २६ ऑक्टोबर कालावधीत तीन दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरउपजिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र राजपूतपदनिर्देशित अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023  या कालावधीत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी http://gterollregistration.mahait.org  या संकेत स्थळास भेट देऊ शकता. या शिबिरात कोकण आणि मुंबई मतदार संघातील पदवीधर मतदार नोंदणी करू शकणार असल्याची माहितीही मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            पदवीधर मतदार संघासाठी मतदार भारताचा नागरिक असावामतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2023 च्या किमान 3 वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असणे आवश्यक आहे.  यासाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी),  विद्यापीठ किंवा संबंधित संस्था  यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका / समकक्ष पदवी प्रमाणपत्रकागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधित कायदेशीर पुरावा असणे आवश्यक आहे. अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच  https://rb.gy/thjo6 या लिंकवर अर्ज डाऊनलोड करता येईल.

            मुंबई जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभाग भायखळाजे.जे. हॉस्पिटल,  जी.टी.हॉस्पिटलकामा हॉस्पिटलसेंट जॉर्ज हॉस्पिटलश्रीमती नाथाबाई ठाकरसी महिला विद्यापीठमरीन लाईनमध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंसपश्चिम रेल्वेचर्चगेटआर.बी.आय. फोर्टसह आयुक्त मुंबई महानगर पालिका या विविध 12 शासकीय कार्यालयांमध्ये या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००

Featured post

Lakshvedhi