Monday, 23 October 2023

उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

 उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

 रुचेश जयवंशी यांची दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा आणि (दारिद्र्य कमी होऊन) कुटुंब आर्थिकरित्या सक्षम व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगातून रोजगार निर्माण करून देणे आणि आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. हे अभियान नेमके काय आहे, याची अंमलबजावणी आणि नियोजनस्वयंरोजगारासाठी होणारे प्रयत्न, याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जयवंशी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.  

            दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 24बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000



सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा

 सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा

 

       मुंबईदि. २३ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून यानिमित्त आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात. 

            'नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धनज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पानेपाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते. दसरा सण मोठानाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतोकारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहेअसे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात कीदुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा  क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानंशत्रूवर पराक्रमानंवैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा, असा हा दिवस आहे. साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचाचांगल्या गोष्टींचा प्रारंभ करु याअसेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

0000


 

 

वृत्त क्र. 3519

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा

       मुंबईदि. 23 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावाअसे आवाहनही त्यांनी केले आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतातनवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे-जे उदात्तचांगले त्याचा दुष्ट आणि अंधकारावर विजय याचीच जाणीव हा सण करून देत असतो. विजयादशमीनिमित्त होणारे रावणाचे दहन हे अहंकाराचेअन्यायाचे आणि अविचाराचे होवो. राज्यातील शेतकरी सुखी व्हावाराज्य विकासाच्या मार्गावर वेगाने अग्रक्रमाने जात राहावे आणि सर्वांचे जीवन मंगलमय व्हावेअशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. गौतम बुद्धांची शिकवणूक अंगीकारणे आणि अहिंसेच्या मार्गावरून जाणे हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करू याअसेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000


 

वृत्त क्र. 3518

राज्यपाल रमेश बैस यांच्या विजयादशमी निमित्त शुभेच्छा

 

मुंबई, दि. २३ : राज्यपाल रमेश बैस यांनी विजयादशमी (दसरा) निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 विजयादशमीचा सण अशाश्वतावर शाश्वताच्या व दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे.  सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो.  दसरा व विजयादशमीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती, समाधान व समृद्धी घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

 

0000

 

Governor greets people on Vijaya Dashmi

 

            Mumbai, Date 23 : The Governor of Maharashtra Ramesh Bais has greeted the people of Maharashtra on the auspicious occasion of Vijaya Dashmi (Dassera). In his message, the Governor has said:

 

 “The festival of Vijaya Dashmi or Dussera symbolizes the victory of the eternal over the ephemeral and of good over the forces of evil.  The festival reassures that Truth will always prevail.  May the festival bring happiness, peace and prosperity to all. I extend my heartiest greetings on the joyous occasion of Vijaya Dashmi."

 

0000

वृत्त क्र. 3517

राज्यपालांची राजभवन नवरात्री मंडळाला भेट

 

            मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी दुर्गाष्टमीनिमित्त राजभवन कर्मचारी निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीची आरती केली. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला.

 

 

Governor visits Navratri Mandal  in the

Raj Bhavan staff quarters premises 

 

            Mumbai, Date 23 : Governor Ramesh Bais visited the Raj Bhavan Navratri Mandal in the Raj Bhavan staff quarters premises on the occasion of Durgashtami. The Governor performed the aarti and interacted with those present.


पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

 पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

            मुंबई, दि. २३ : विधानपरिषदेत पदवीधर मतदार संघात मतदानासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रालयासह मुंबईत १२ ठिकाणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन दिवसीय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी त्रिमुर्ती प्रांगणात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने २३,२५ व २६ ऑक्टोबर कालावधीत तीन दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरउपजिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र राजपूतपदनिर्देशित अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023  या कालावधीत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी http://gterollregistration.mahait.org  या संकेत स्थळास भेट देऊ शकता. या शिबिरात कोकण आणि मुंबई मतदार संघातील पदवीधर मतदार नोंदणी करू शकणार असल्याची माहितीही मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            पदवीधर मतदार संघासाठी मतदार भारताचा नागरिक असावामतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. 1 नोव्हेंबर 2023 च्या किमान 3 वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असणे आवश्यक आहे.  यासाठी रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक इत्यादी),  विद्यापीठ किंवा संबंधित संस्था  यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका / समकक्ष पदवी प्रमाणपत्रकागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधित कायदेशीर पुरावा असणे आवश्यक आहे. अर्ज मुख्य निवडणूक अधिकारी विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच  https://rb.gy/thjo6 या लिंकवर अर्ज डाऊनलोड करता येईल.

            मुंबई जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभाग भायखळाजे.जे. हॉस्पिटल,  जी.टी.हॉस्पिटलकामा हॉस्पिटलसेंट जॉर्ज हॉस्पिटलश्रीमती नाथाबाई ठाकरसी महिला विद्यापीठमरीन लाईनमध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनंसपश्चिम रेल्वेचर्चगेटआर.बी.आय. फोर्टसह आयुक्त मुंबई महानगर पालिका या विविध 12 शासकीय कार्यालयांमध्ये या तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००

डालडाचा डब्बा ...!!

 डालडाचा डब्बा ...!!


दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.

तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......!


एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....!


डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी” नावांच कांही परिमाण समोर आलेल्या अन्न पदार्थांची मजा घेत चवीने खायच्या ऐवजी त्याचा विचका करायची “Diet Consciousness” चिकित्सा संपूर्णपणे अपरिचीत होती त्यामुळे सणासुदीला डालडांत तळलेल्या टम्म पुऱ्या आणि घरच्या दह्याचा (मलमलच्या फडक्यांत बांधून रात्रभर लोंबत ठेवललेली ती गठडी...) चक्का बनवून त्यांत साखर, केशर, वेलची, जायफळ आणि चारोळ्या घालून तयार केलेलं अस्सल श्रीखंड - पुरीच जेवण हादडून सगळी मंडळी दुपारची मस्त ताणून देत असत...तब्येतीत जगत असत.


शाळेतल्या सहलीला जातांना सकाळी लवकर उठून आई बटाट्याची पिवळी भाजी, डालडात तळलेल्या पुऱ्या आणि एका छोट्या डबीत घातलेलं लिम्बाच लोणच असा डबा तयार करायची ... त्याच्या वासानेच सकाळी सकाळी सातच्या आत भुकेचा लोळ पोटांत उठायचा....!


दिवळींत घरांतले मोठ्ठाले डबे भर भरून मेसुरपाक (कां म्हैसूरपाक ) , कडक बुंदीचे लाडू , जिलेबी वगैरे पदार्थ सर्रास डालडा वापरून बनवले जायचे आणि ते छान लागायचे....हे खाऊन कुणाच बेली फॅट वगैरे वाढल्याच्या तक्रारी कधी चुकुनही ऐकलेल्या नव्हत्या ना कधी ‘डालडा खाऊ नका हो... मराल’ !! असा कुठल्या डॉक्टरने धमकीवजा सल्ला दिला होता....थोडक्यांत काय डालडा हा खाद्य जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता.


१९३० साली प्रथमच तुपाला पर्याय म्हणून हे Hydrogenated Vegetable Fat डच व्यापारी भारतांत घेऊन आले....हळूहळू त्याचा प्रसार होऊ लागला कारण भारतांत तूप न परवडणारी जनता तेंव्हाही अस्तित्वांत होती. डाडा अॅण्ड कंपनी नामक एका डच कंपनीकडे ह्याचे सगळे व्यापारी हक्क होते.....ह्या वस्तूला हिंदुस्थानात जबर मागणी असणार आहे हे ओळखून त्यावेळच्या Lever Brothers ह्या कंपनीने Hindustan Vanaspati Manufacturing Company नांवाने एक कंपनी सुरु करून Hydrogenated Vegetable Fat भारतातच बनविण्यासाठी मुंबईच्या शिवडीला एक कारखाना टाकला. डाडा अॅण्ड कंपनीकडून सगळे हक्क विकत घेतले पण डाडा कंपनी आपलं नाव Product Brand Name मध्ये असावं म्हणून अडून बसली तर Levers आपल्या नावांतल “L” अक्षरावर अडून बसले शेवटी Da Da च्या मध्ये L घालून DALDA (डालडा) हे सोपं सुटसुटीत Brand Name तयार झालं आणि १९३७ सालापासून सर्वसामान्य भारतीयांच्या खाद्य जीवनांत डालडा येऊन बसला तो कायमचा...!


अजूनही डालडाच अस्तित्व आहे पण त्याची पूर्वीची ती शान राहिलेली नाही. हल्ली डालडाला वनस्पती ऑइल म्हणतात.. प्लास्टिकच्या थैलीत तो मिळतो....डालडाचा तो प्रसिद्ध पत्र्याचा दंड गोलाकृती पिवळ्या रंगाचा डब्बा हल्लीच्या पिढीला माहितही नसणार. त्यामुळे त्याचे दिवळीतले महत्व सुद्धा आता इतिहास जमा झाले आहे.


रेडिमेड कपड्यांसारखे रेडिमेड लाडू करंज्याची पार्सलं दादरच्या रानडे रोडवर, दिवाळीच्या मोसमांत ठायी ठायी मिळतात. अगदी अमेरिकेत सेटल झालेल्या लेकरांना ही पार्सलं घरपोंच मिळण्याची व्यवस्था सुद्धा अगदी सहजी होते. अमेरिकेतली पिढी त्यालाही घरचा फराळ मानून धन्य आहे ही त्यांतली जमेची बाजू.. !


एरवी घरांतल्या आया-बहिणीने अपार कष्ट करून बनवलेल्या फराळाला असलेली त्यांच्या हाताची चव, त्यांच्या मायेचा, प्रेमाचा आपुलकीचा दरर्वळ, त्यांतली स्निग्धता ती कशी काय एक्सपोर्ट करणार ? असो.. जे कांही शिल्लक आहे तेही नसे थोडके.. बाकी सारे कालाय तस्मै नम:


प्रदीप अधिकारी.

जिवन गाणे

 मस्तक थोडं वाकवून बघा अहंकार मरून

जाईल.

डोळ्यांना थोडं ओलं करून बघा दगडी मन ही वितळेल.

वाणीवर थोडं संयम ठेऊन बघा दुःखाच काळ निघुन जाईल..

इच्छा थोड्या कमी करून बघा आनंदाचं

जग दिसू लागेल.

विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की, जीवन संपवतो. आणि गैरसमजूतीचा एक शब्द कानात शिरला की, भली भली नाती संपवतो.

        ,, *सुप्रभात,*

Sunday, 22 October 2023

सुखांत, निवांत झोपा कायमचे

 



शरीर में तेजी से खून बढ़ाने के घरेलु उपाय।*

 *शरीर में तेजी से खून बढ़ाने के घरेलु उपाय।*


शरीर में खून की कमी से बहुत बीमारियां लग सकती हैं। जिस वजह से इंसान कमजोर हो जाता है और उसका शरीर बीमारियों से लड़ नहीं पाता है। इसलिए महिलाओं और पुरूषों को शरीर में खून की मात्रा बढ़ाने के लिए इन उपायों को अपनाना चाहिए।


https://chat.whatsapp.com/DAVUTcU1vPwBnRNDvqHtx2

*तिल और शहद* 

दो घंटे के लिए 2 चम्मच तिलों को पानी में भिगों लें और बाद में पानी से छानकर इसका पेस्ट बना लें। अब इसमें 1 चम्मच शहद मिलाएं और दिन में दो बार सेवन करें।


*काफी और चाय खतरनाक*

 काफी और चाय का सेवन कम कर दें। एैसा इसलिए क्योंकि ये चीजें शरीर को आयरन लेने से रोकते हैं।


*ठंडा स्नान* 

दो बार दिन में ठंडे पानी से नहाए और सुबह नहाने के बाद सूरज की रोशनी में बैठें।


*अंकुरित भोजन* 

आप अपने भोजन में गेहूं, मोठ, मूंग और चने को अंकुरित करके उसमें नींबू मिलाकर सुबह का नाश्ता लें।


*आम* 

पके आम के गुदे को मीठे दूध के साथ सेवन करें। एैसा करने से खून तेजी से बढ़ता है।


*मूंगफली और गुड़* 

शरीर में खून की कमी को दूर करने के लिए मूंगफली के दानों को गुड़ के साथ चबा-चबा कर सेवन करें।


*सिंघाड़ा*

 सिंघाड़ा शरीर में खून और ताकत दोनो को बढ़ाता है। कच्चे सिंघाड़े को खाने से शरीर में हीमोग्लोबिन का स्तर तेजी से बढ़ता है।


*मुनक्का, अनाज, किशमिश, दालें और गाजर*

 मुनक्का, अनाज, किशमिश, दालें और गाजर का नियमित सेवन करें और रात को सोने से पहले दूध में खजूर डालकर उसको पीएं।


*फलो का सेवन* 

अनार, अमरूद, पपीता, चीकू, सेब और नींबू आदि फलो का अधिक से अधिक सेवन करें।


*आंवले और जामुन का रस*

 आंवले का रस और जामुन का रस बराबर मात्रा में मिलाकर सेवन करने से हीमोग्लोबिन का स्तर बढ़ता है।


*टमाटर का रस* 

एक गिलास टमाटर का रस रोज पीने से भी खून की कमी दूर होती है। इसलिए टमाटर का सूप भी बनाकर आप ले सकते हो।


*हरी सब्जिया*

 बथुआ, मटर, सरसों, पालक, हरा धनिया और पुदीना को अपने भोजन में जरूर शामिल करें।


*फालसा*

 फालसे का शर्बत या फालसे का सेवन सुबह शाम करने से शरीर में खून की मात्रा जल्दी बढ़ती है।


*सेब का जूस*

सेब का जूस रोज पीएं।


*चुकंदर* 

चुकंदर के एक गिलास रस में अपने स्वाद के अनुसार शहद मिलाकर इसे रोज पीएं। इस जूस में लौह तत्व ज्यादा होता है।


🪷 _ 🪷 _ 🪷 _ 🕉️ _ 🪷 _ 🪷 _ 🪷






 


   *🪷🪷।। शुभ वंदन ।।🪷🪷*


*🪷🪷प्रेषक: डॉ दर्शन बांगिया🪷🪷*


*WhatsApp:.* https://chat.whatsapp.com/DAVUTcU1vPwBnRNDvqHtx2


*Telegram:.* https://telegram.me/dadimaa


*YT:.* https://youtube.com/playlist?list=PLl52TwLppqHOUfSNI3uSAocH6e1H7Crv_


ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।

सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु।

मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

🌸♾️🌸♾️🌸♾️🌸♾️🌸♾️🌸

Featured post

Lakshvedhi