Thursday, 19 October 2023

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

            मुंबईदि. 18 : राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्याचा येतो. त्याप्रमाणे याही वर्षी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर२०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केले आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी "भ्रष्टाचाराला नाही म्हणा - राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा" (Say no to corruption; commit to the Nation) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

            या सप्ताहानिमित्त कार्यालयांच्या दर्शनी भागात व सार्वजनिक ठिकाणी (जसेरेल्वेस्थानकबस थांबेविमानतळेइत्यादि) भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक भित्तिपत्रकेकापडी फलक, साइन बोर्ड लावण्यात यावेत. व्हॉट्सॲपइत्यादी इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांचाई-मेल्सएस.एम.एस. यांचाही जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे.

            मुंबईपुणे यासारख्या मोठ्या शहरांतील मोक्याच्या ठिकाणी व्हेरीएबल मेसेज सिस्टिम फळकाद्वारे भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक संदेश प्रसारीत करण्यात येणार आहेत. भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी कार्यालये, शाळामहाविद्यालयांच्यास्तरावर वादविवाद स्पर्धा ,व्याख्यानेनिबंधस्पर्धाकार्यशाळाचर्चासत्र मुलाखती यांचे आयोजन करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विशेष पुस्तिकांचे प्रकाशन व वाटप करण्यात येणार आहे.

             राज्यातील अशासकीय संघटनास्वयंसेवी संस्थासामान्य नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत मोठ्या प्रमाणावर, उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याकरीता आवाहन करण्यात येणार आहे. त्याकरीता पथनाट्येनाटिकाकाव्यवाचनइ. नाविन्यपूर्ण व आकर्षक योजना, कार्यक्रमांची आखणी करणे, राज्य शासनाचे सर्व विभागविभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विविध स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखकार्यालय प्रमुखराज्य शासनाचे अंगीकृत उपक्रमसहकारी संस्थास्वायत्त संस्थांमार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

            दिनांक ३० ऑक्टोबर२०२३ रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुखकार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारीकर्मचारी प्रतिज्ञा करतील. या सप्ताहाच्या निमित्ताने मा. राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांचा संदेश राज्यातील जनतेसाठी देण्यात येणार आहे.

0000

पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्याटीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार

 पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्याटीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार

- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

            मुंबईदि.१८ : अनुसूचित क्षेत्रातील १७ अधिसूचीत संवर्गाच्या पदभरतीसाठी रिक्त पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये शिक्षक संवर्गाचा देखील समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य आहे. त्यामुळे ‘पेसा’ क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी आदिवासी विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

             ‘पेसा’ क्षेत्रातील शिक्षक भरतीमध्ये टीईटी परीक्षेची अट शिथिल करणेबाबत मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली.

            मंत्री डॉ. गावित म्हणाले कीराज्यातील ‘पेसा’ क्षेत्रातील 13 जिल्ह्यांत शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या परवानगीनुसार ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.  राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र  किंवा राज्य शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. टीईटीची अट शिथिल करण्यात यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला (NCTE) पत्र द्यावे, अशा सूचना संबंधितांना मंत्री डॉ. गावित यांनी दिल्या. पेसा क्षेत्रातील उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी काही कालावधी देण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार करावा. तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल, असेही मंत्री डॉ. गावित यावेळी म्हणाले.

            या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) आदिवासी विकास विभागाचे उपसचिव र. तु. जाधवतसेच शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

घनकचरा व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण करावे

 घनकचरा व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण करावे


- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


            मुंबई, दि. 18 : राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाची कामे मोठ्या प्रमाणात आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी व्हावी. याबाबतची परिपूर्ण माहिती ग्रामपंचायत तसेच राज्यस्तरावर तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच कुटुंब व सार्वजनिकस्तरावरील कचरा संकलित करुन त्याचे प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेचे अद्ययावत प्रणालीद्वारे सनियंत्रण व मूल्यमापन करण्याबाबत स्वतंत्र कार्यपध्दती विकसित करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.


            स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत विविध विषयाच्या अनुषंगाने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय कुटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्य पाणी व स्वच्छता मिशन अभियान संचालक तथा सहसचिव शेखर रौंदळ, कार्यकारी अभियंता अपूर्वा पाटील, अवर सचिव चंद्रकांत मोरे, स्मिता राणे, यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्वच्छतेबाबत नागरिकांमधील वर्तणूक बदल घडविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंब स्तरावरील व सार्वजनिक ठिकाणावरील कचऱ्याचे संकलित करुन प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेचे अद्ययावत प्रणालीद्वारे स्वतंत्र कार्यपध्दती विकसित करुन सनियंत्रण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन ग्रामीण भागातील कचऱ्याचे 100 टक्के व्यवस्थापन करण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास मंत्री श्री.पाटील यांनी निर्देश दिले

जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..

 जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्याने

नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..

 

            मुंबईदि. 18 : मिळकत पत्रावर नावउत्पन्नाचा दाखलानिवृत्ती वेतनरहिवासी दाखला, अशी महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रे मुंबईतील नागरिकांना आता विहीत वेळेच्या आत मिळू लागली आहेत. जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर स्वत: याची दखल घेत असून दाखले वेळेत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू लागले आहे. नागरिकांची कामे प्रलंबित राहता कामा नयेअसे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.

            शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. केसरकर दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेशी सुसंवाद’ साधत आहेत. पालकमंत्री या नात्याने मुंबईच्या जनतेसाठी काम करण्याचीत्यांच्या समस्या प्रत्यक्षात जाणून घेण्याची संधी मिळत असल्याचे सांगून ते प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरअपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंडउपजिल्हाधिकारी कल्याण पांढरेजयकृष्ण फडजिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर आदी उपस्थित होते.

            मिळकत पत्रउत्पन्नाचा दाखलारहिवासी दाखलाकलावंतांना निवृत्ती वेतनासाठी संबंधित दाखलेजागेचा नकाशाआधार कार्डच्या नोंदीत बदलमतदार यादीत नाव नोंदणीनॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदींसाठी अर्ज केलेल्या रहिवाश्यांनी आज पालकमंत्री श्री. केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते मागील आठवड्यात अर्ज केलेल्या 13 लाभार्थींना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रमाणपत्रांसाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही तसेच प्रमाणपत्रे तयार झाल्याचे लाभार्थींना दूरध्वनीवरून कळविण्यात येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलले होते. लाभार्थींनी समाधानाच्या प्रतिक्रियेने संपूर्ण यंत्रणेला धन्यवाद दिले आहेत

तुळजापूरमध्ये 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान भाविकांसाठी महाआरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिरात 10 लाखापेक्षा जास्त भाविकांच्या

 तुळजापूरमध्ये 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान भाविकांसाठी महाआरोग्य शिबिर

महाआरोग्य शिबिरात 10 लाखापेक्षा जास्त भाविकांच्या

मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

           

            मुंबई, दि. 18 : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे आयोजन तुळजापूर येथे 2728 व 29 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात येत आहे. या शिबिरात 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. वैद्यकिय अधिकारी आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध 25 ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेतअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

            नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या आयोजनाबाबत बैठकीचे आयोजन आज आरोग्य भवन येथे करण्यात आले होते. बैठकीला मार्गदर्शन करताना  मंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी मुंबईतील विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मंत्री डॉ. सावंत म्हणाले कीतेलंगणाकर्नाटकआंध्रप्रदेशसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील भाविक तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. अशा भविकांपर्यंत शासन पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी या ठिकाणी 25 आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत.  सामाजिक संस्था आणि खासगी रुग्णांलयातील डॉक्टरांच्या मदतीने त्यांना या आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. यावेळी गरजूंना चष्माव्हीलचेअरवॉकर अशा वस्तूही पुरविण्यात येणार आहेत.   सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्सही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहनही मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

०००

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

 आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी

पारदर्शकमानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. १८ : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

            दरम्यानआज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९१ टक्के जणांना, तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे.

            परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्येविधिमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायचा त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणकीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसित केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवारअतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाइन मागविण्यात आले आहेत. त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाइन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.

            १६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी १०० जणांना प्रथम पसंती क्रमानुसार३५ जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार१५ जणांना तृतीय पसंती क्रमानुसार, तर १६ जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे.

            या बैठकी दरम्यानमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. त्यासाठी अधिक उपाययोजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले. समृद्धी महामार्गावर वाहनांना थांबवू नका. त्यांची वेगमर्यादा निश्चित करावीअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांसोबत विशेष परिवहन अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्व‍ितेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

 बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्व‍ितेसाठी

नागरिकांचा सहभाग महत्वाचा

- मंत्री छगन भुजबळ

बोधीवृक्ष महोत्सवाचे 24 ऑक्टोबरला आयोजन

            नाशिकदि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात 24 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून मान्यवर व उपासक येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यक्रमाच्या यशस्व‍ितेसाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

            शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोधीवृक्षाच्या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी नाशिक येथे मंत्री श्री. भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदंत सुगत थेरोभदंत संघरत्नसमिती सदस्य आनंद सोनवणेबाळासाहेब कर्डकरंजन ठाकरेबॉबी काळेबाळासाहेब शिंदेदिलीप साळवेश्री.भालेराव आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, या महोत्सवास श्रीलंकाथायलंडकोरियाम्यानमारमलेशियाजपानतैवानव्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती, भन्ते व उपासक उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्थायेणाऱ्या बौद्ध उपासकांची निवासभोजन व्यवस्थासुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शासनाकडून 18 कोटी 4 लाख 67 हजार रुपयांचा निधी

Featured post

Lakshvedhi