Sunday, 15 October 2023

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती राजधानीत साजरी








 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती राजधानीत साजरी

 

नवी दिल्ली दि. 15 :  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

0000


भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र - आमदार अतुल भातखळकर यांचे प्रतिपादन

 भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

- आमदार अतुल भातखळकर यांचे प्रतिपादन

- भवानी आखाड्याचे उत्साहात उद्घाटन




मुंबई : भारतीय संस्कृतीचा विचार हा मानवतेचा आहे तसाच तो चांगल्या संस्काराचाही आहे.   अशा संस्काराचे एक उर्जा केंद्र म्हणजे भवानी शक्तीपीठ आहे. जगात भेकडाच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही. जो आखाड्यात उतरून बलोपासना करतो त्याच्याच अहिंसेला आणि नैतिकतेला जगामध्ये किंमत असतेअसे प्रतिपादन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले. मालाड पूर्वला दफ्तरी रोड परिसरातील भवानी आखाड्याचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शक्तीपीठाचे प्रमुख राहुल जाधवगुरुजी उपस्थित होते.

आमदार भातखळकर म्हणालेबलाची उपसना करायला भारतीय संस्कृती सांगते म्हणजे भारतीय संस्कृती चूक असे आपल्याला शिकवले गेले. पण त्यांना भारतीय संस्कृती कळली नाही आणि भारतीय विचारही कधी कळला नाही. बलशक्ती ही चांगल्या कामासाठी वापरली जाते.  हाच शक्तीचा खरा अर्थ आहे. याच विचाराचे पुनरुज्जीवन भवानी आखाड्याच्या माध्यमातून होत आहे. बलाची उपासनासंस्कारनैतिकता हाच भारतीय संस्कृतीचा मूळ विचार आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या दारात जेव्हा दुर्गा उभी असते तेव्हाच लक्ष्मी आणि सरस्वती सुरक्षित असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही हाच विचार दिला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या आखाड्यात खेळाडूंनी मल्लखांबकुस्तीची प्रात्यक्षिके करून दाखवली. खेळाडू तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


म्हणून बिया सकट फळ 😂खाऊ नये

 म्हणून बिया सकट फळ 😂खाऊ नये


समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 पालकमंत्रीगृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेटजखमींची विचारपूस

 

            मुंबईदि. 15 :- छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानराव भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.

            या अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून   या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

0000


 

वृत्त क्र. 3423

समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

            मुंबईदि. 15 :- नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेहे वृत्त अत्यंत दुःखदवेदनादायी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर या अपघातातील जखमींवर तातडीनेसर्वतोपरी उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतातनागपूर समृध्दी महामार्गावर  वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

0000

काव काव काव, काहीच नाहीच ठेवलात राव, आता उरलं सुरल खाव


 

सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ मानी, अलिबाग रायगड


 सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ मानी

Shwasachi किंमत

 


Featured post

Lakshvedhi