Sunday, 15 October 2023

समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 पालकमंत्रीगृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेटजखमींची विचारपूस

 

            मुंबईदि. 15 :- छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानराव भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.

            या अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून   या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

0000


 

वृत्त क्र. 3423

समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

            मुंबईदि. 15 :- नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेहे वृत्त अत्यंत दुःखदवेदनादायी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर या अपघातातील जखमींवर तातडीनेसर्वतोपरी उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतातनागपूर समृध्दी महामार्गावर  वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi