Saturday, 14 October 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे - अजित पवार

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा

दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे - अजित पवार

 

पुणे, दि. 14: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिले.

 

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी. पदपथाच्या बाजूला असणारी हिरवळ आणि फुलझाडांचे नीट जतन होईल याचे सुरुवातीपासून नियोजन करावे. 

 

पदपथावर आलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे. पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कामांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरावी, अशी सूचना त्यांनी केली.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, शहरातील अतिक्रमण काढणे आदीविषयी देखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी माहिती घेतली. पवना धरण भरले असले तरी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

 

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

 

आयुक्त श्री.सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाविषयी माहिती दिली. दापोडी-निगडी कॉरिडॉर 12 किलोमीटर लांबीचा असून त्यात विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन,स्वागत

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन,स्वागत

 

        मुंबईदि,14 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसीय मुंबई भेटीसाठी विशेष विमानाने आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर  राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

 

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थितीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे उद्घाटन होणार आहे.

0000

 

PM arrives in Mumbai; to inaugurate session of IOC

 

          Mumbai , Date 14 : Prime Minister Narendra Modi arrived in Mumbai today for a one-day visit on Sat (14 Oct). Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed the Prime Minister.

 

The Prime Minister is scheduled to inaugurate the 141st session of the International Olympic Committee at Jio World Center in Mumbai.

 

         

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी-अजित पवार

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा

खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी-अजित पवार

 

पुणे, दि. 14: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिले.

 

यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रमेश चव्हाण,  पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात येणाऱ्या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली. धरण परिसरात असलेल्या गावातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा.  धरण परिसरातील 24 गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रुपरेषा तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

        कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाच्या सद्यःस्थितीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयीन वेळ लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी  2-2 तास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी,असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकाबाबत माहिती घेतली. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रश्नाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

 

00000


एक घडी आरोग्यदायी जिवन की

 


असा ग्रुप हवा ज्यामध्ये माणुसकी असेल,पल शेअर

 


मृत्यू का गरजेचा आहे...* *☸️अतिशय सुंदर आणि मृत्यूचे महत्व, गोष्टी रूपाने पटवून देण्याचा छान प्रयत्न...*

 *मृत्यू का गरजेचा आहे...*


     *☸️अतिशय सुंदर आणि मृत्यूचे महत्व, गोष्टी रूपाने पटवून देण्याचा छान प्रयत्न...*


*मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा !!!मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे अशक्य आहे. "जन्म-मृत्यू" हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती.*

         *कशी? ते पहा...*

एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, "साधूमहाराज, मला अमर करू शकेल, अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?" साधू म्हणाला, "हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास, की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील." ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला.

 त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, "या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही." त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, "छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, "ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल." साधूच्या सांगण्या प्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, "आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू ?" राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, "अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडे तीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा."

साडे तीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणला, "मी तरी संपत्ती कुठून देणार ? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत."

यावर राजा म्हणाला, "पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय ? यावर पणाजोबा म्हणाले, "आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे."


तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, "तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती."


 *साधू म्हणाला, "मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि "मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे."*

*स्वतः बदला, जग बदलेल.

१)स्नान करताना *नाम* घेतले तर ते *'तीर्थस्नान'* होईल.

२) भोजन करताना *नाम* घेतले तर तो *'प्रसाद'* होईल.

३) चालताना *नाम* घेतले,

 तर ती *'तीर्थयात्रा'* होईल.

४) स्वयंपाक करताना *नाम* घेतले तर तो *'महाप्रसाद'* होईल.

५) झोपताना *नाम* घेतले

 तर ती *'ध्याननिद्रा'* होईल.

६) काम करताना *नाम* घेतले तर ते कर्म *'भक्ती'* होईल.

७) घरात *नाम* घेतले,

 तर ते घर *मंदिर*' होईल.    

🙏🙏 *ll जय श्री राम ll*  🚩🚩

सात कोड्यांना आईने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे*

 *सात कोड्यांना आईने आपल्या मुलांना दिलेली उत्तरे*


*१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??*

  *मुले म्हणाली , तलवार...*

    

*आईने सांगितले.. जीभ..*

    कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला दुखावतो,  दुसऱ्याच्या भावनांना धक्का पोचवतो.


          

*२. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??*


    एकजण म्हणाला, *सूर्य, चंद्र, आकाशगंगा...*

    

आई म्हणाली... *भूतकाळ.*


   माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.


             

    *३. या जगातील सगळयात मोठी गोष्ट कोणती..???*


     दुसऱ्याने सांगितले की, *पृथ्वी, पर्वत, सूर्य.*


    आई म्हणाली, जगातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे.. *हाव*

     लोक दुःखी होतात, त्यामागील कारण त्यांच्या मनातील न संपणारी हाव. ही हाव पूर्ण करण्यासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे हाव करताना काळजी घ्या.


         

 *४. पृथ्वीवर सगळ्यात वजनदार वस्तू कोणती...???*


    तिसऱ्याने उत्तर दिलं... *पोलाद, लोखंड, हत्ती.*


    आई म्हणाली,  सगळ्यात कठिण वस्तू... *वचन.*


    *वचन देणे सोपे असते पण ते पाळणे कठिण.*


           

    *५. पृथ्वीवरील सगळ्यात हलकी वस्तू कोणती..??*


    चौथा म्हणाला .. *कापूस, हवा, धूळ, पाने.*

   

आई म्हणाली, *सगळीकडे मी आणि मीपणा हलका असतो.*

      

पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्यांकडे पहा. काही जणांनाच हा मीपणा सोडता येतो.


           

    *६. पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती..???*


    पाचव्याने सांगितले, *आई, वडिल, मित्र, नातेवाईक.*


    आई म्हणाली, माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे *'मृत्यू'.*


    कारण *कुठल्याही सेकंदाला मृत्यू येण्याची शक्यता असते.*


         

    *७. शेवटचा प्रश्न..*

    *या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती...??*


     मुले म्हणाली *खाणे, झोपणे, फिरायला जाणे.*


     आईने नम्रतेने सांगितले सगळ्यात सोपी गोष्ट आहे, *आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देणे.*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Featured post

Lakshvedhi