Saturday, 14 October 2023

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन

 छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे

 डिसेंबरमध्ये आयोजन

- मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबईदि. 13 : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सवआयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून  काटेकोरपणे करावेअसे निर्देश कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

            देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवीमालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्करउपजिल्हाधिकारी संदीप निचीतक्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारीडॉ. उत्तम केंद्रेसदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी  क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणालेआपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी  पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो,दंड बैठकमल्लखांबलंगडीविटी-दांडूलगोरीअखाडा कुस्तीमानवी मनोरा (पिरॅमिड)रस्सी खेचदोरी उडीसूर्यनमस्कारपावनखिंड दौडशरीरसौष्ठवतलवार बाजीढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी केल्या.

नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार

 नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार

 
आमदार भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
 
मुंबई : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण रविवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून तसा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आजच प्रशासनाकडून नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२.२० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकसेवेबाबत किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.  
रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम सुरु असतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

Friday, 13 October 2023

मिट्टी को नमन ,विरो का वंदन🙏

 जिल्हा नियोजन भवन 

अलिबाग रायगड

 जिल्हाधिकारी कार्यालय

सर्व नगरपरिषद व नगरपंचायत 

*मेरी माटी ,मेरा देश*

*अमृत कलश*

मिट्टी को नमन ,विरो का  वंदन🙏


सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना ठाणे, नवी मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार

 सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना

ठाणेनवी मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार

- मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई दि १२ : बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम आहे. बचत गटांच्या उत्पादनांना मुंबईठाण्यासारख्या शहरात चांगली मागणी आहे. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी सातारा जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादनांना ठाणेनवी मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणेसातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

              सातारा जिल्ह्यातील बचत गटांना ठाणे व नवी मुंबईत जागा मिळणेबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.देसाई बोलत होते.

             मंत्री श्री. देसाई म्हणाले कीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते. बचत गटांच्या महिला विविध प्रकारची उत्कृष्ट उत्पादने तयार करतात. सातारा जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठ्या शहरात कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकासिडको यांच्या अखत्यारीतील जागेत तसेच मोठ्या मॉलमध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावीअसे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले. बचत गटातील महिला त्यांची उत्पादने उत्कृष्ट पद्धतीने पॅकेजिंग करून बाजारात उपलब्ध करून देतात. त्यांची जास्तीत-जास्त विक्री व्हावी यासाठी आपण त्या उत्पादनांचे ब्रँडिंगमार्केटींग केले पाहिजेत्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री वाढवण्यासाठी सुद्धा नियोजन करावेअसेही त्यांनी सांगितले.

            या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशीठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदलसातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारीठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडेनवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय म्हसाळ आदी उपस्थित होते.

*****

शैलजा पाटील/विसंअ/


 

पथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणी व्हीडिओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 पथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणी

व्हीडिओ चित्रीकरणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

            मुंबईदि. १२: पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिकाप्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडिओ चित्रीकरण करण्यात यावेपथकर मार्गावरील पुलांचेउड्डाणपुलांचेभुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेआमदार प्रमोद पाटीलमाजी आमदार बाळा नांदगावकरनितीन सरदेसाईअमित ठाकरेसंदीप देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी शिष्टमंडळासमवेत आलेल्या मुलुंडठाणे येथील गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे टोल वाढ आणि टोल नाक्यांवरील गर्दीसोयीसुविधा याबाबत समस्या मांडल्या. यावेळी टोल बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

            कराराप्रमाणे टोल नाक्यांवर कंत्राटदाराने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामध्ये स्वच्छता गृहेरुग्णवाहिकाप्रथमोपचार सुविधाक्रेन याबाबी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता सतत राखली पाहिजे. मंत्री श्री. भुसेएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींना सोबत घेऊन उद्यापासून टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            टोल नाक्यांवर पिवळ्या पट्टीपर्यंत वाहनांची रांग लागणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घेतली पाहिजे. वाहनांच्या रांगा लागल्या, तर तसेच वाहने सोडून दिली पाहिजेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            मुंबई परिसरातील पाचही टोलनाक्यांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजण्यासाठी व्हीडीओग्राफी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील १५ दिवस हे चित्रीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले. टोल मार्गावरील जे उड्डाणपूलपूलभुयारी मार्ग आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            मुंबई हद्दीतील मुलुंड येथील हरिओमनगर वसाहतीतील रहिवाश्यांना टोल नाक्यावरून मुंबई जावे लागू नये यासाठी नवघर पोलिस ठाण्याजवळील नाल्यावर तातडीने पूल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पोलिसांच्या घरांच्या विषयावरही चर्चा झाली. पोलिसांना निवास देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्यासाठी पुढाकारही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सिडकोला पाच हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांना हक्काची घरे कशी मिळतील यासाठी खासगी विकसकांना आणि एसआरए प्रकल्पांमध्ये वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देऊन अधिकची  घरे मिळू शकतील का यासाठी अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकमुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकरपोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अर्चना त्यागीआदी अधिकारी उपस्थित होते.

०००००


कर्मचारी विमा महामंडळाची रुग्णालये कामगार विभागाकडे हस्तांतरीत करावीत

 कर्मचारी विमा महामंडळाची रुग्णालये

कामगार विभागाकडे हस्तांतरीत करावीत

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 

            मुंबईदि. 12 : कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये (इएसआयसी) ही इतर राज्यात कामगार विभागाकडून अतिशय उत्तम पद्धतीने संचालित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रुग्णालये सुद्धा कामगार विभागाकडून संचालित करण्यासाठी ती कामगार विभागाकडे तत्काळ हस्तांतरीत करावीतअसे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

            कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रातील प्रादेशिक मंडळाची ११४ वी बैठक आज मंत्रालयातील परिषद कक्षात कामगार मंत्री तथा ईएसआयसी राज्य अध्यक्ष डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलकामगार आयुक्त सतीश देशमुखई. एस.आय सी चे विभागीय संचालक तथा सदस्य सचिव अनील साहूसदस्य संगीता जैनरवींद्र झिमटेवैद्यकीय आयुक्त डॉ. सी. सी. खाकाविमा आयुक्त तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

            राज्यात असलेली ईएसआयसी रुग्णालये ही सर्व आजारांचा उपचार करणारीसुपर स्पेशलिटी रुग्णालयांसारखी असावीत. तसेच  त्यांना जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये जोडून घ्यावीत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या 156 रिक्त पदांचा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णालयासाठी अत्यावश्यक असणाऱ्या डॉक्टरांची सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात यावी, असे श्री. खाडे यांनी सांगितले. तसेच जी रुग्णालये जोडलेली आहेत त्यांची देयके त्वरीत अदा करण्यात यावी. वैद्यकीय मंडळ पुनर्गठित करण्यासाठीचे नियम,अटी,शर्ती इत्यादी माहिती पुरविण्यात यावी. विचार विनिमय करून याबाबत निर्णय घेण्यात येईल.

            हिंगोली आणि नंदुरबार येथे कर्मचारी संख्या चांगली असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात दवाखाने सुरु करण्यासाठी शासनाकडून जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास इमारत भाड्याने घेऊन दवाखाने सुरु करावेत, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

००००

आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्वाचा

 आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी

सर्वांचा समन्वय महत्वाचा

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

            मुंबईदि. 13 : राज्यात येणाऱ्या  नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्करनौदल, तटरक्षक दलराज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

            मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिवसानिमित्त  आयोजित कार्यक्रमात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठीआपत्ती व्यवस्थापन संचालक अप्पासाहेब धुळाजतटरक्षक दलाचे महासंचालक श्री. कौशिकराष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे कमांडर दीपक तिवारीनौदलाचे कमांडर अभिषेक कारवानीअग्निशमन दलाचे संचालक संतोष वारी, उपसचिव संजय धारूरकरउपसचिव श्रीनिवास कोतवाल आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतर देखील आपत्ती विभागाची जबाबदारी असते. ज्या ठिकाणी आपत्तीचा धोका संभवतो त्या परिसरात तत्काळ संदेश जाणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर परिस्थिती पाहून मदत व बचाव कार्यही तत्काळ सुरू करावे लागते. अशावेळी सर्व यंत्रणांचा संवाद असणे गरजेचे असते. यवतमाळ, नागपूर येथे आलेल्या पूर कालावधीमध्ये बचाव यंत्रणांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आपत्कालीन यंत्रणा अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असल्या पाहिजेतयासाठी प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आग्रही असावे. आपत्कालीन कालावधीमध्ये कोणती खबरदारी घ्यावी, याचे प्रशिक्षण शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना दिले जावे, यासाठी देखील प्रयत्न करण्यात यावेत.

            आपत्ती व्यवस्थापनचे संचालक श्री. धुळाज म्हणाले कीराज्यात आपत्तीविषयक विविध प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे फोन येत असतात त्यालाही  राज्य नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून  तत्काळ मदत केली जाते. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत उष्णतेच्या लाटा यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा नुकतीच झाली. आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतर कशाप्रकारे काळजी घ्यावी यासाठी क्षमता बांधणी ही काम आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते. राज्यात आपत्ती सौम्यीकरणाचे 3200 कोटी रुपयांची कामे देखील सुरू आहेत. प्रत्येक यंत्रणांचा चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग अहोरात्र कार्यरत आहे. आपत्कालीन कालावधीत तत्काळ मदत मिळण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

               राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील अधिकारीकर्मचारी यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 

आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांनी घेतली शपथ

            मी प्रतिज्ञा करतो कीशासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग घेईन. आपत्तीच्या धोक्यापासून मी स्वतःचीमाझ्या परिवाराचीसमाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सरंक्षण करणेविषयीचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करेन. आपत्तीचे धोके कमी करण्याऱ्या सामुदायिक उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घेईन.

            आपत्तीच्या धोक्यापासून सुरक्षिततेसाठी करावयाच्या पूर्वतयारीची माहिती मी जनजागृतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्ती प्रवण भागात जिवितवित्त व पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सदैव कार्यतत्पर राहीन.

            शासनाच्या वतीने आपत्ती निवारणार्थ घेण्यात येत असलेल्या सौम्यीकरणाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून संभाव्य धोका कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

******

Featured post

Lakshvedhi