Friday, 13 October 2023

भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..

 भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..


काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥


वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥


घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥


भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ||


शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||


एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य! 


माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही. 


या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले....दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही. 


काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.

भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.


थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते. 


सुजनहो!

मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही. 

पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय. 


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||


‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात...

 

भारुड शब्दाची व्युत्पत्ती:


भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं. 

भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.


भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:


गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो....


मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार....अशा असंख्य...! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली...यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.


भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड...


‘अग ग ग ग ग विंचू चावला...

विंचू चावला हो…

काम क्रोध विंचू चावला..

तेणे माझा प्राण चालला..’


माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ. 

पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच,  पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो. 

एकनाथ महाराज पुढे म्हणतात, 

‘...या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’

विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!


भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला. 


‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’

सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय...अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!


‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’

समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला....


‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला 

भवानीआई रोडगा वाहीन तुला….’

एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय...खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…


हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा... तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं...अधिक रमलं...


किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी! 


पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!


डॉ अपर्णा बेडेकर..

दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्यसुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

 दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्यसुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार

            मुंबई, दि. 12 : मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  


            राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी सर्व सुविधांनी सुसज्ज, अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.


            रास दांडिया खेळताना अनेकदा नागरिक भान विसरून नाचतात. काही वेळेस हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी काही वेळेस घडल्या आहेत. तसेच अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी, अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


            याबाबत मुंबईतील 'गुजरात समाचार' या वृत्तपत्राचे संपादक नीलेश दवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हे निर्देश दिले आहेत.


००००


दांडिया आयोजकों को प्राथमिक स्वास्थ्य


सुविधाओं समेत एम्बुलेंस रखना अनिवार्य


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने राज्य के सभी जिलाधिकारियों को दिए निर्देश


आयोजकों को रखना होगा दांडिया में शामिल होनेवाले नागरिकों के स्वास्थ का ध्यान


           


            मुंबई, दि. 12 :- मुंबई समेत राज्यभर के नवरात्रि के औचित्य पर रास दांडिया का आयोजन करनेवाले आयोजकों को इसमें शामिल होनेवाले लोगों के स्वास्थ का ध्यान रखना होगा. चूँकि राज्य के सभी दांडिया आयोजकों को इस साल आयोजन स्थल पर प्राथमिक स्वास्थ्य सुविधा और एम्बुलेंस तैनात रखना अनिवार्य करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए है.


            राज्य में नवरात्रि नौं दिन बड़े पैमाने पर रास दांडिया का आयोजन किया जाता है. कई बार राजनितिक दलों के द्वारा भी बड़े पैमाने पर कार्यक्रमों का आयोजन किया जाता है. उसमें आयोजकों की ओर से कई बार प्राथमिक स्वास्थ्य सुविधा भले ही उपलब्ध कराई जाती हो, लेकिन इस ओर कुछ आयोजक अनदेखी करते है तथा ध्यान नहीं देते. इसीलिए दांडिया का आयोजन करते समय प्राथमिक स्वास्थ्य सुविधा और आयोजन स्थल पर सभी सुविधाओं से सुसज्ज, ऐसी एम्बुलेंस तैनात रखना अनिवार्य करने के निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे ने दिए है.


            कई बार लोग रास दांडिया खेलते समय उसी में पूरी तरह से डूब जाते है. कभी-कभी दिल पर अतिरिक्त तनाव आकर दिल का दौरा पड़ने जैसी घटनाएं भी इसके पहले हुई है. साथ ही अनेक जीवनशैली संबंधित विकारों के मरीजों की संख्या में भी वृद्धि हुई है. इसीलिए किसी भी प्रकार की चिकित्सा या आणीबाणी की स्थिति निर्माण होने पर उक्त व्यक्ति को तुरंत चिकित्सा सुविधा उपलब्ध होना जरुरी है. इसी जरुरत को ध्यान में रखते हुए इस बार मुख्यमंत्री ने ऐसी सुविधा सभी आयोजकों को उपलब्ध कराने के निर्देश राज्य के सभी जिलाधिकारियों को दिए है.


           इस संदर्भ में मुंबई के 'गुजरात समाचार' इस समाचार-पत्र के संपादक नीलेश दवे ने मुख्यमंत्री से मुलाकात कर उन्हें इस विषय पर ज्ञापन सौंपा था, इस ज्ञापन के आधार से ही मुख्यमंत्री श्री. शिंदे ने यह निर्देश दिए है.


००००



 


Dandiya Organizers Mandated to Provide Primary Healthcare Facilities


CM Eknath Shinde's directives to all District Collectors


Organisers have to take care of participants


 


      Mumbai, Date 12 : Chief Minister Eknath Shinde on Thursday has instructed all district heads in the state to ensure that dandiya event organizers provide primary healthcare facilities.


            As Mumbai and the rest of the state gear up for the Navratri celebrations, dandiya events are a central attraction. These festive dance events often witness participants losing themselves to the rhythm, sometimes leading to medical emergencies due to excessive exertion. With lifestyle-related ailments on the rise, instant medical attention becomes crucial during such events. Recognizing this need, Chief Minister Shinde has emphasized the importance of equipped ambulances at the venue.


            Dandiya event, which are a hallmark of the Navratri celebrations in Mumbai and across the state, often witness large turnouts. While many organizers, in the past, have provided basic medical facilities, some have overlooked this crucial aspect.


            To ensure the well-being of the participants, Chief Minister Mr. Shinde has now made it mandatory for all dandiya organizer to have primary healthcare facilities, including fully-equipped ambulances, at their venues. This move comes after Nilesh Dave, Editor of the 'Gujarat Samachar newspaper in Mumbai, met t

he Chief Minister and put forth this suggestion.


0000

भरली ओंजळ...एक गृहप्रवेश*स्तुत्य कार्यक्रम

 *भरली ओंजळ...एक गृहप्रवेश*


 एका मराठी सिरयल मध्ये नवरीची गृहप्रवेशाची बदलेली पध्दत पाहिली. 


      ती नवी पध्दत अशी की

धान्याने भरलेल माप हे पायानी न सांडता हाताने त्यातिल चार दाणे घरात टाकायचे.


           हा विचार ज्यांनी मांडला आणि ज्यांनी खरच अशी कृती केली असेल त्या साऱ्यांचे खूप खूप कौतुक.


        जुन्या गृहप्रवेशाच्या पध्दती मध्ये  अन्नाचा अपमान होतो

 धान्याच्या मापट्याला आपण पाय लावतो

 आणि धान्य खाली सांडल्या मुळे वापरले जात नाही


 नवीन पध्दती मध्ये 

      *भावना तीच असणार आहे फक्त कृती बदलणार आहे.* त्या मुळे सर्वाना नविन पध्दत स्विकारण्यात हरकत नसावी 


 ही ओळ खास करून त्या लोकांसाठी आहे जे आजही जुन्या रीतीरीवाजांना कवटाळून बसले आहेत


      याच नव्या पध्दतीमध्ये मी अजून थोडा पुढचा विचार करतो

बघा तुम्हाला पटतो का


चार दाणे तरी का टाकायचे ?

नका टाकू चार दाणे पण 

त्याऐवजी त्या नवरीने भरलेल्या ओंजळीने घरात पाऊल टाकले तर....


नाही समजले ना, थांबा सांगतो सविस्तर


आपल्याकडे धान्याने किंवा फुलांनी भरलेली ओंजळ हे शुभ मानले जाते.

धान्याने भरलेली ओंजळ म्हणजे समृध्दी,भरभराटी चे प्रतिक मानले जाते.

त्यामुळे जर घरात येणाऱ्या नवरीने धान्याने भरलेली ओंजळ घेऊन घरात प्रवेश केला तर तिच्या हाताने घरात समृध्दी आली . 

जे लोक देव मानतात त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर

धान्याने भरलेली ओंजळ घेऊन तुमच्या घरी लक्ष्मी , अन्नपूर्णा आली.


आणि सासू-सासऱ्यांनी ते धान्य नव्या सुनेच्या ओंजळीत टाकावे आणि ती ओंजळ सांडू नये म्हणून  नवरदेवाने त्या हाताखाली ( ओंजळीखाली) आपल्या हाताने आधार द्यावा.

आणि दोघांनी मिळून गृहप्रवेश करावा.


सासू-सासऱ्यांनी धान्य ओंजळीत टाकणे याचा अर्थ असा की घरातील असलेला ,जपलेला समृध्दीचा, भरभराटीचा वारसा सासू- सासरे किंवा मुलांचे आई-वडील हे पुढच्या पिढीकडे सोपवत आहेत.

आणि इतका मोठा वारसा ( घराची जबाबदारी) एकट्या सुनेने पेलवण्यापेक्षा दोघानी मिळून पेलावे म्हणून नवरदेवाने खाली आपला हात लावून आधार द्यावा.


    *गृहप्रवेशाच्या पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावनेला धक्का न लावता  त्याच भावनेने हा नवा विचार मी मांडला आहे, बघा पटतंय का*


*कोणी लिहिलं माहित नाही पण छान वाटले वाचुन.*

Thursday, 12 October 2023

राज्य अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावणेबाबत


 

पितृपक्ष* 🌸

 🌸   *पितृपक्ष*  🌸


🍱🦅

वडीलांचं रूप घेऊन

कावळा घरी आला

ताटातील मेनू पाहून

बोलाव वाटलं त्याला

🍱🦅

बरं नव्हतं तेव्हा कधीच

आणली नाहीस गोळी, 

आज कशाला वाढतोस रे

ताटात पुरणाची पोळी! 

🍱🦅

विनाकारण भांडत होता

 दिसले खरे रूप, 

कशाला वाढतो मला

आता गावरान तूप! 

🍱🦅

चटणी वर तेलासाठी

 होत नव्हता राजी, 

कशाला वाढतो पात्रावर

वडे आणि भजी!! 

🍱🦅

प्रेम नाही,जिव्हाळा नव्हता

नाही दिलीस साथ,

आज कशाला वाढतो रे

पात्रावर वरण भात!!

🍱🦅

जबरदस्ती अंगठा घेऊन

केली घराची वाटणी,

कशाला वाढतो पात्रावर

आज लोणचं चटणी!! 

🍱🦅

हिस्सा वाटणीसाठी केली

 बहिणी संगे दूरी,

आता काय उपयोग वाढून

पात्रावरती पुरी!! 

🍱🦅

आयुष्याभर ठेवली रे

माझ्या बद्दल अढी, 

आता कोण पिणार ती

द्रोणामधली कढी!! 

🍱🦅

वेगळा राह्यलो तेव्हा नाही

दिलास मला धिर, 

आज कशाला वाढतो तू

पात्रावरती खिर!! 

🍱🦅

सणासुदीला आणलं नाही

मला नवं कापड, 

आता कशाला वाढतोय

कुरडई अन् पापड़!! 

🍱🦅

आजारी असताना तू

धुतली ना सतरंजी, 

आता कशाला वाढतो रे

पात्रावर करंजी!! 

🍱🦅

जिवंत असतांना पोरा

दिले असतेस लक्ष, 

तृप्त झाले असते पुर्वज

नसता  पितृपक्ष!! 

🍱🦅

पितरांचा मिळून तयार

होतो  पितृपक्ष, 

बऱ्याच घरात आज मात्र

झाला विरोधी पक्ष!! 

🍱🦅

सांगतोय तू रहा सदैव

जेष्ठांप्रती दक्ष, 

करावं तसं भरावं लागेल

इतिहास देईल साक्ष!! 

🍱🦅

🌸🌸मातृपितृ देवोभव्🌸🌸🙏

👏🌹

सुरक्षित मातृत्वासाठी ‘मातृ वंदना योजना 2.0’

 सुरक्षित मातृत्वासाठी मातृ वंदना योजना 2.0’

 

            दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्‍या शेवटच्‍या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्‍यू दरात वाढ झाल्‍याने ते नियंत्रित करण्‍यासाठी 1 जानेवारी 2017 पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्‍यात 8 डिसेंबर 2017 पासून आरोग्‍य विभागामार्फत केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्‍य/जिल्‍हास्‍तरावरुन सुरु होती. शासनाने अधिसूचित केलेल्‍या संस्‍थेत नोंदणी केलेल्‍या (शासकीय रुग्‍णालयात) गर्भवती महिलेस पहिल्‍या जीवित अपत्‍यापुरता एकदाच लाभ अनुज्ञेय असून तीन टप्‍प्‍यात लाभाची रक्‍कम पाच हजार रुपये डीबीटीद्वारे लाभार्थीच्‍या बॅंक/पोस्‍ट खात्‍यात दिली जात होती.

            केंद्र शासनाच्‍या महिला बाल विकास विभागाच्या सूचना मिशन शक्‍ती च्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0’ राज्‍यात लागू करण्यात येत आहे.

            केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण 14 योजना एकत्रित केल्‍या  आहेत. त्यापैकी सामर्थ्‍य या विभागात एकूण 6 योजना असून या योजनांमध्‍ये ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेचा समावेश करण्यात आला आहे. ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेतंर्गत लाभार्थींना लाभ देणे व योजना राबविण्याबाबतच्‍या सुधारित मार्गदर्शक सूचना सन 2023-24 पासून राज्यात लागू करण्‍यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्‍याच्‍या सहभागाने राबविण्‍यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा 60 टक्‍के तर राज्‍य शासनाचा 40 टक्‍के सहभाग राहणार आहे. योजनेचा संपूर्ण प्रशासकीय खर्च शासनाच्या स्व-निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

            ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहीत अटीशर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्‍यानंतर तिला पहिल्‍या अपत्‍यासाठी 5 हजार रुपयांची रक्‍कम दोन हप्‍त्‍यांमध्‍येतर दुसरे अपत्‍य मुलगी झाल्‍यास मुलीच्‍या जन्मानंतर एकाच टप्‍प्‍यात 6 हजार रुपयांचा लाभ आधार संलग्‍न बॅंक खात्‍यात किंवा टपाल विभागातील खात्‍यात डीबीटीद्वारे जमा केला जाईल.

योजनेची उद्दिष्टे :

            माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा. लाभ हा जन्‍माच्‍या वेळी लिंग गुणोत्‍तर सुधारणेस्त्री भ्रूण हत्‍येस अवरोध करणे आणि स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत होण्‍यासाठी हितकारी ठरणार आहे. लाभार्थ्‍यांकडून आरोग्‍य संस्‍थांच्‍या सुविधांचा लाभ घेण्‍याचे प्रमाण वाढून संस्‍थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे. नवजात अर्भकाच्‍या जन्‍माबरोबरच जन्‍म नोंदणीचे प्रमाणात वाढ व्‍हावी.

लाभार्थी खालीलपैकी किमान एका गटातील असावा :   

            ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबीक उत्पन्न प्रतिवर्ष 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला, 40 टक्के व अधिक अपंगत्‍व असणाऱ्या (दिव्यांग जन) महिलाबीपीएल शिधापत्रिकाधारक महिलाआयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी,  ई-श्रम कार्ड धारक महिलाकिसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरीमनरेगा जॉब कार्ड धारक महिला

 गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/अंगणवाडी मदतनीस (AWHs)/आशा    कार्यकर्ती (ASHAs).

ही कागदपत्रे आवश्यक :

    लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID)  कागदपत्रशेवटच्या मासिक पाळीची तारीखगरोदर पणाची नोंदणी तारीख व प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असलेले परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्डप्रसुतीपूर्व तपासणीच्‍या नोंदी असाव्‍यातलाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रतबाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रतमाता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्‍या लसीकरणाच्‍या नोंदी असलेल्‍या पानाची प्रतगरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांकलाभार्थीचा स्‍वतःचा किंवा कुटुंबातील सदस्‍यांचा मोबाईल क्रमांकवेळोवेळी विहित केलेले अन्‍य कागदपत्र.

   योजनेची वैशिष्‍ट्ये आणि अंमलबजावणी :

             सर्व नवीन लाभार्थी ज्यांची मासिक पाळीची शेवटची तारीख (LMP) मिशन शक्ती मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झाल्याच्या तारखेनंतर आहे, त्यांना PMMVY 2.0 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाभ मिळेल. जर एखाद्या महिलेने आधीच PMMVY 1.0 अंतर्गत मातृत्व लाभाचा पहिला हप्ता प्राप्त केला असेल व PMMVY 2.0 अंतर्गत मंजूर केलेल्या निकषांनुसार रोख प्रोत्साहन मिळविण्यासाठी पात्र असेल. जर तिला PMMVY 1.0 अंतर्गत पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला असेलतर तिला नवीन PMMVY 2.0 मार्गदर्शक तत्त्वांनुसार उर्वरित लाभ मिळू शकतात.

लाभ देण्‍याची कालमर्यादा :

          पहिल्या अपत्‍यासाठी शेवटच्‍या मासिक पाळीच्‍या (LMP) दिनांकापासून पूर्वी असणारा ७३० दिवसांचा कालावधी कमी करुन तो 510 दिवसांवर आणलेला आहे, तर दुसरे अपत्‍य मुलगी असल्‍यासच तिच्‍या जन्‍माच्‍या तारखेपासून २१० दिवसांपर्यंत संबंधित आरोग्‍य यंत्रणेकडे द्यावा. लाभार्थ्‍यांनी विहित कालावधीत लाभ घेण्‍यासाठी अर्ज करणे आवश्‍यक असून कालावधी उलटून गेल्‍यानंतर लाभार्थ्‍यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तसेच लाभार्थ्‍यांनी हस्‍तलिखित फॉर्म जमा केलेला असेलपरंतु ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेच्‍या नवीन संगणक प्रणालीद्वारे कोणत्‍याही कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्‍वीकारले जात नसल्‍यास अशा लाभार्थ्‍यांना लाभ देय नसेल. योजनेचा लाभ घेण्‍याकरिता लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे व कमाल 55 या दरम्‍यान असावे. लाभार्थींने विहित कालावधीत शासकीय आरोग्‍य संस्‍थेत गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

असा करावा अर्ज :

             इच्छुक असलेल्या लाभार्थींना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्‍या http://wcd.nic.in संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करणे आणि सिटिझन लॉग इनमधून ऑनलाइन फॉर्म भरण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे.  लाभार्थीने अर्ज परिपूर्ण भरुन आपल्या स्‍वाक्षरीच्या हमीपत्रासह  सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह नजीकच्‍या आरोग्‍य केंद्रात किंवा आशा स्‍वयंसेविका यांच्याकडे जमा करावा. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभ पात्र लाभार्थी महिलेस तिच्‍या स्‍वतःच्‍या आधार संलग्‍न (सीडेड) बॅंक किंवा पोस्‍ट ऑफिसमधील खात्‍यातच डीबीटी (DBT) द्वारे जमा केला जाईल. लाभार्थ्‍यांना केवळ आधार क्रमांकाच्‍या आधारावरच लाभ दिला जाईल.  वेतनासह मातृत्‍व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. (केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिला आणि स्तनदा माता किंवा सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्यांतर्गत समान लाभ मिळवणाऱ्या महिलांना PMMVY अंतर्गत लाभ देय नाही.) 

योजनेविषयी महिला सभांचे आयोजन :

            ग्राम सभेच्‍या विषय सूचीमध्‍ये ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेचा समावेश करुन त्‍या अंतर्गत लाभार्थी व त्‍यांना मिळणारे लाभ या विषयी चर्चा करण्‍यात यावी. तसेच लाभ मिळालेले लाभार्थी यांची माहिती ग्रामसभेत आशा कार्यकर्ती यांनी द्यावी. जेव्‍हा शक्‍य असेल त्यावेळी महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्‍य यांनी शक्‍य असेल तेव्‍हा विशेष महिला सभांचे आयोजन करावे. या बैठकांमध्‍ये बचत गटांचे सदस्‍यबॅंकपोस्‍ट आणि जिल्‍हा प्रधानमंत्री मातृ वंदना कक्षास निमंत्रित केले जावे. तसेच महिला बैठकांचे आयोजन वर्षातून किमान दोन वेळा करावे.

-       नीलेश तायडे,

विभागीय संपर्क अधिकारी


पानी बॉटल रसत्यावर टाकल्याने अपघात झाला,आपापल्या सर्व ग्रुप पाठवा 🙏 अपघात टाळा

 पानी बॉटल रसत्यावर टाकल्याने अपघात झाला,आपापल्या सर्व ग्रुप पाठवा 🙏


Featured post

Lakshvedhi