*भरली ओंजळ...एक गृहप्रवेश*
एका मराठी सिरयल मध्ये नवरीची गृहप्रवेशाची बदलेली पध्दत पाहिली.
ती नवी पध्दत अशी की
धान्याने भरलेल माप हे पायानी न सांडता हाताने त्यातिल चार दाणे घरात टाकायचे.
हा विचार ज्यांनी मांडला आणि ज्यांनी खरच अशी कृती केली असेल त्या साऱ्यांचे खूप खूप कौतुक.
जुन्या गृहप्रवेशाच्या पध्दती मध्ये अन्नाचा अपमान होतो
धान्याच्या मापट्याला आपण पाय लावतो
आणि धान्य खाली सांडल्या मुळे वापरले जात नाही
नवीन पध्दती मध्ये
*भावना तीच असणार आहे फक्त कृती बदलणार आहे.* त्या मुळे सर्वाना नविन पध्दत स्विकारण्यात हरकत नसावी
ही ओळ खास करून त्या लोकांसाठी आहे जे आजही जुन्या रीतीरीवाजांना कवटाळून बसले आहेत
याच नव्या पध्दतीमध्ये मी अजून थोडा पुढचा विचार करतो
बघा तुम्हाला पटतो का
चार दाणे तरी का टाकायचे ?
नका टाकू चार दाणे पण
त्याऐवजी त्या नवरीने भरलेल्या ओंजळीने घरात पाऊल टाकले तर....
नाही समजले ना, थांबा सांगतो सविस्तर
आपल्याकडे धान्याने किंवा फुलांनी भरलेली ओंजळ हे शुभ मानले जाते.
धान्याने भरलेली ओंजळ म्हणजे समृध्दी,भरभराटी चे प्रतिक मानले जाते.
त्यामुळे जर घरात येणाऱ्या नवरीने धान्याने भरलेली ओंजळ घेऊन घरात प्रवेश केला तर तिच्या हाताने घरात समृध्दी आली .
जे लोक देव मानतात त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर
धान्याने भरलेली ओंजळ घेऊन तुमच्या घरी लक्ष्मी , अन्नपूर्णा आली.
आणि सासू-सासऱ्यांनी ते धान्य नव्या सुनेच्या ओंजळीत टाकावे आणि ती ओंजळ सांडू नये म्हणून नवरदेवाने त्या हाताखाली ( ओंजळीखाली) आपल्या हाताने आधार द्यावा.
आणि दोघांनी मिळून गृहप्रवेश करावा.
सासू-सासऱ्यांनी धान्य ओंजळीत टाकणे याचा अर्थ असा की घरातील असलेला ,जपलेला समृध्दीचा, भरभराटीचा वारसा सासू- सासरे किंवा मुलांचे आई-वडील हे पुढच्या पिढीकडे सोपवत आहेत.
आणि इतका मोठा वारसा ( घराची जबाबदारी) एकट्या सुनेने पेलवण्यापेक्षा दोघानी मिळून पेलावे म्हणून नवरदेवाने खाली आपला हात लावून आधार द्यावा.
*गृहप्रवेशाच्या पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावनेला धक्का न लावता त्याच भावनेने हा नवा विचार मी मांडला आहे, बघा पटतंय का*
*कोणी लिहिलं माहित नाही पण छान वाटले वाचुन.*
No comments:
Post a Comment