Thursday, 12 October 2023

नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे 'मंगलमय धोरण' नवरात्री आणि छठ पूजेचे नियोजन महापालिका करणार

 नवरात्री उत्सवासाठी बृहन्मुंबई महापालिकेचे 'मंगलमय धोरण'

नवरात्री आणि छठ पूजेचे नियोजन महापालिका करणार

            मुंबईदि.११ : शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

            पालकमंत्री श्री. लोढा यांनी आजवर प्रत्येक निर्णय प्रक्रियेत जनतेला सहभागी केले आहे. यावेळी ही सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्याकल्पना आणि सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी नमूद करून घेतल्या व त्यानुसार तात्काळ अंमलबजावणीसाठी आदेश दिले. यावेळी बिगर व्यावसायिक नवरात्र मंडळासाठी परवानगी शुल्कअग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावर्षी नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असून, पूर्वापार चालत आलेली ही भावना जपण्यासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांनी एक अनोखी संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. या संकल्पनेनुसार नवरात्रीरास दांडियागरबा आयोजनाच्यावेळी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

            या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येईल. याकाळात पोलिसांचे निर्भया पथक संपूर्णपणे कार्यान्वित केले जाईल. महिला सुरक्षेची काळजी घेऊन उत्सव जल्लोषात साजरा व्हावा आणि आवश्यक तयारी कोणत्याही विलंबाशिवाय मंडळांना करता यावी यासाठी नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. तसेच दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जनगरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्थाप्रकाश झोत दिवेशौचालयधुम्र फवारणीस्वच्छतानिर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल.

            छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्थाप्रकाशझोत दिवेशौचालयधुम्र फवारणीस्वच्छतानिर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्र उत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते.

****

मराठवाडा - विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही

 मराठवाडा - विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी

आता संख्येची मर्यादा नाही

- धनंजय मुंडे

वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक

           

            मुंबई दि. ११ : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक) निश्चित करण्यात येते. मात्र आता मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातून या कंपन्यांच्या संख्येची (लक्ष्यांकाची) अट शिथिल करण्यात यावीअसे निर्देश आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दिले आहेत.

            मराठवाडा व विदर्भ या भागात असलेल्या कृषी उत्पादक कंपन्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढवले जावेयादृष्टीने जिल्हानिहाय असलेली संख्येची मर्यादा रद्द करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

            कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी आदर्शकुमार, 'मित्रा'चे मुख्याधिकारी प्रवीण परदेशीकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमारस्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते.

            कृषी उत्पादक कंपन्यांनी आपले व्यवसाय व उत्पन्न अधिक वृद्धिंगत करावेत. या दृष्टीने कोल्ड स्टोरेज उभारणीच्या खर्चाच्या रकमेत 12500 रुपये प्रतिटन वरून वाढ करून 17500 रुपये इतके करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी दिले. 3000 टन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या कोल्ड स्टोरेजेला एक्सप्रेस फीडरऐवजी जवळच्या शासकीय सौर ऊर्जा प्रकल्पांशी किंवा तत्सम यंत्रणेशी लिंकेज केल्यास त्या कंपनीचा विजेचा वापर व बिलही कमी होईलअसेही यावेळी मंत्री श्री. मुंडे म्हणाले.

            महाराष्ट्रात कृषी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत सोयाबीनकापूसहळद यांसह विविध अन्न पदार्थांवर प्रक्रिया करून उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. याच उत्पादनांना प्रसिद्ध नामांकित कंपन्यांशी थेट जोडून दिले, तसेच उत्पादक कंपन्यांना ऑनलाईन मार्केटिंग सारख्या सहज उपलब्ध बाजारपेठा खुल्या करून दिल्या, तर शेतकरी अधिकचे उत्पन्न मिळवू शकतात. यादृष्टीने वर्ल्ड बँकस्मार्ट व कृषी विभागाने कृषी उत्पादक कंपन्याजागतिक कंपन्या व मार्केटिंग कंपन्यांची एकत्रित बैठक व कार्यशाळा घेऊन पुढील निर्णय घ्यावेत.

            विदर्भ-मराठवाड्यासमोरील चाऱ्याच्या संभाव्य समस्येला अनुसरून मुरघास उत्पादनास देखील कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात यावेअसेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करावा

 वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून

पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबईदि. ११ : वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याच्या विषयावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होतीत्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलमाजी आमदार किरण पावसकरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांच्यासह शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित शिष्टमंडळाशी संवाद साधून वसाहतीतील सोयी-सुविधांची संपूर्ण माहिती घेतली. वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जागातेथील क्षमता आणि फनेल झोनसह इतर सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन त्या जागेचा सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            वांद्रे (पूर्व) येथे सुमारे ९० एकर क्षेत्रफळाच्या शासकीय भूखंडावर शासकीय वसाहत उभी असून १९५८ ते १९७३ च्या दरम्यान या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार ७८२ सदनिका आहेत. यापैकी १६९ इमारती धोकादायक असून त्यातील ६८ अतिधोकादायक आहेतउर्वरित १०१ इमारती रिकाम्या करण्यात येणार असून तेथील कर्मचाऱ्यांना लॉटरी पद्धतीने सेवा निवासस्थाने देण्यात येणार आहेत. या वसाहतीमध्ये १२ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्यापैकी ४ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १२ इमारतींपैकी एक इमारत सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाला देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.

0000

ग्रामीण भागातील संशोधन देशी जुघाड

 

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव

मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

गुरुवारी पारितोषिक वितरण

            मुंबईदि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथमसांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगरविटाता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ ( मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाखव्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            रवींद्र नाट्यमंदिरप्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

             या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत.

1 मुंबई 1. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

२. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ

३. निकदवरी  लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

2 मुंबई उपनगर: १. स्वप्नाक्षय मित्र मंडळ२. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळघाटकोपर(प) ३. बाल मित्र कला मंडळविक्रोळी (प)

3 . ठाणे : १. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे २. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि  रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३. शिवसम्राट मित्र मंडळठाणे

4 . पालघर: साईनगर विकास मंडळपालघर

5 . रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळता. महाड

6 . रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळजैतापूर

7. सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळसलईवाडासावंतवाडी

8. पुणे : १. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्टखडकी

२. उत्कर्ष तरुण मंडळचिंचवडगाव

9 .सातारा:सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळसावलीता. सातारा

10. कोल्हापूर ,:श्री गणेश तरुण मंडळढेंगेवाडी

11. सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळमाढा

13. नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळनाशिक

14. धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठानदेवपूर

15.जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळजळगाव

16. नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळतळोदा

17 अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ

18 . छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळचिखलठाण

19. जालना : कारेश्वर गणेश मंडळदेवगाव खवणे ता. मंठाजि. जालना

20. हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळएन टी सीहिंगोली

21. परभणी : स्वराज्य गणेश मंडळदेवनंदरा

22. धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळगवळी गल्लीधाराशिव

23. नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड

24. बीड : जय किसान गणेश मंडळमठ गल्लीकिल्ले धारूर

25. लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळलातूर

26. नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी

27. गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळगडचिरोली

28. गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळबोडगाव

29. चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर

30. वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळसमुद्रपूर

31.भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळमोहगाव देवीमोहाडी

32. अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ

33. बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळबुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्थाचिखली (विभागून)

34. वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम.

35. यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ

000

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती

मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम


 


            मुंबई, दि. 11 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.


            वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या ग्रंथावर ‘चर्चा व अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होईल.


            या कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्रातील साहित्य संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने देखील महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचनकट्टा, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना दोन हजार पत्रांचे लेखन’ असे कार्यक्रम महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे होतील. 


            दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पूज्य साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटुर, जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व काव्यवाचन : लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम आ.मा.शाळा व वि.जा.भ.ज. कमवि कुंटुरतांडा, ता.नायगाव, जि.नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो ?’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मनोगत हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘अभिवाचन व काव्यवाचन’ हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व अभिवाचन’ हा कार्यक्रम मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे होईल. त्याचप्रमाणे सायंकाळी ७ वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘नाट्यअभिवाचन : संगीत देवबाभळी’ हा कार्यक्रम नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्स, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. 


            दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचन संस्कृतीचे वर्तमान आणि युवक’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पुस्तकावर निबंधवाचन व चर्चा’ हा कार्यक्रम ना.गो.नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. 


            दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कथाकथन’ हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे होईल. तर सकाळी १० वाजता जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचनाचे महत्त्व’ हा कार्यक्रम ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘मराठी गद्यलेखनाचे अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


            दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : समकालीन वाचनसंस्कृती’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : कशासाठी वाचायचे ?’ हा कार्यक्रम पेठवडगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.


            दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘परिसंवाद’ इचलकरंजी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा-पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचक मेळावा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 


            वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वरील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. पाटील यांनी केले आहे.


00000


बी.सी.झंवर/विसंअ/

बाकी तुम्ही सुज्ञ आहात

 *सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोणीही नवरात्र उत्सवात साड्यांचे रंग विचारू नये. साड्या आणि नवरात्र यांचा परस्परांशी काही संबंध नाही हा सगळा व्यावसायिक फंडा आहे कारण भगवती जगदंबेने युद्ध केलं होत तिचं  सर्वांग रक्ताने माखलेल होत त्यामुळे शक्तीची उपासना या नवरात्रात केली जाते त्यामुळे शुद्ध सात्विक आणि पूर्ण कपडे घाला.घरातही मुलींना आवर्जून या गोष्टी सांगा वेळ वाईट आहे साड्यांपेक्षा स्वतःच रक्षण कस करता येईल याकडे जरा लक्ष द्या आणि आपल्या हिंदू धर्मात हे जे षडयंत्र सुरू आहे याला स्वतः आपल्या घरापासून आवर घाला हीच तुमची खरी नवरात्र असेल.*

*बाकी तुम्ही सुज्ञ आहात*


 *शक्य झाल्यास हा मेसेज नातेवाईकांमध्ये ही पाठवून धर्मजागृती साठी मदत करा*

Featured post

Lakshvedhi