सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 12 October 2023
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते
गुरुवारी पारितोषिक वितरण
मुंबई, दि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ ( मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.
या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत.
1 मुंबई 1. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
२. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ
३. निकदवरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
2 मुंबई उपनगर: १. स्वप्नाक्षय मित्र मंडळ, २. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर(प) ३. बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)
3 . ठाणे : १. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे २. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३. शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे
4 . पालघर: साईनगर विकास मंडळ, पालघर
5 . रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळ, ता. महाड
6 . रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापूर
7. सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सलईवाडा, सावंतवाडी
8. पुणे : १. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट, खडकी
२. उत्कर्ष तरुण मंडळ, चिंचवडगाव
9 .सातारा:सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, ता. सातारा
10. कोल्हापूर ,:श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
11. सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळ, माढा
13. नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळ, नाशिक
14. धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठान, देवपूर
15.जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ, जळगाव
16. नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळ, तळोदा
17 अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ
18 . छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळ, चिखलठाण
19. जालना : कारेश्वर गणेश मंडळ, देवगाव खवणे ता. मंठा, जि. जालना
20. हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एन टी सी, हिंगोली
21. परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनंदरा
22. धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव
23. नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड
24. बीड : जय किसान गणेश मंडळ, मठ गल्ली, किल्ले धारूर
25. लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लातूर
26. नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी
27. गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली
28. गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळ, बोडगाव
29. चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर
30. वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर
31.भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी, मोहाडी
32. अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ
33. बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्था, चिखली (विभागून)
34. वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम.
35. यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ
000
वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम
वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम
मुंबई, दि. 11 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या ग्रंथावर ‘चर्चा व अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्रातील साहित्य संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने देखील महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचनकट्टा, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना दोन हजार पत्रांचे लेखन’ असे कार्यक्रम महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे होतील.
दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पूज्य साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटुर, जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व काव्यवाचन : लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम आ.मा.शाळा व वि.जा.भ.ज. कमवि कुंटुरतांडा, ता.नायगाव, जि.नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो ?’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मनोगत हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘अभिवाचन व काव्यवाचन’ हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व अभिवाचन’ हा कार्यक्रम मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे होईल. त्याचप्रमाणे सायंकाळी ७ वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘नाट्यअभिवाचन : संगीत देवबाभळी’ हा कार्यक्रम नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्स, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचन संस्कृतीचे वर्तमान आणि युवक’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पुस्तकावर निबंधवाचन व चर्चा’ हा कार्यक्रम ना.गो.नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कथाकथन’ हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे होईल. तर सकाळी १० वाजता जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचनाचे महत्त्व’ हा कार्यक्रम ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘मराठी गद्यलेखनाचे अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : समकालीन वाचनसंस्कृती’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : कशासाठी वाचायचे ?’ हा कार्यक्रम पेठवडगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘परिसंवाद’ इचलकरंजी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा-पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचक मेळावा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वरील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. पाटील यांनी केले आहे.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/
बाकी तुम्ही सुज्ञ आहात
*सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोणीही नवरात्र उत्सवात साड्यांचे रंग विचारू नये. साड्या आणि नवरात्र यांचा परस्परांशी काही संबंध नाही हा सगळा व्यावसायिक फंडा आहे कारण भगवती जगदंबेने युद्ध केलं होत तिचं सर्वांग रक्ताने माखलेल होत त्यामुळे शक्तीची उपासना या नवरात्रात केली जाते त्यामुळे शुद्ध सात्विक आणि पूर्ण कपडे घाला.घरातही मुलींना आवर्जून या गोष्टी सांगा वेळ वाईट आहे साड्यांपेक्षा स्वतःच रक्षण कस करता येईल याकडे जरा लक्ष द्या आणि आपल्या हिंदू धर्मात हे जे षडयंत्र सुरू आहे याला स्वतः आपल्या घरापासून आवर घाला हीच तुमची खरी नवरात्र असेल.*
*बाकी तुम्ही सुज्ञ आहात*
*शक्य झाल्यास हा मेसेज नातेवाईकांमध्ये ही पाठवून धर्मजागृती साठी मदत करा*
Wednesday, 11 October 2023
सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !
सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !
ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
राजुरा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर तातडीने दिले होते स्थानिक यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश
चंद्रपूर, दि. 10 : अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केले; या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार धावून आले; ना. मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची वस्तुस्थिती मा. मुख्यमंत्री, मा. कृषिमंत्री यांना अवगत करून, विशेष पॅकेज जाहीर करण्याची विनंती केली. तसेच राज्याचे मा. कृषिमंत्री व कृषीसचिवांना राज्यातील इतर जिल्ह्यातही अशाप्रकारे नुकसान झाले असल्यास त्या बाबत स्वतः लक्ष देवून आढावा घेण्याबाबत विनंती केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत.
या शासन निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असताना पडलेला पावसाचा खंड व अनियमित हवामान यामुळे जिल्हयात भात , सोयाबीन व कापूस या मुख्य पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. कृषि विभागामार्फत नियमीतपणे पिकांचे किड व रोगांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक ते तांत्रीक मार्गदर्शन करुन किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.
सोयाबीन पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होवून पिक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्याचे वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री . सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोना (खु) येथे तातडीने जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांनी यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले व मंत्रालयात यासंदर्भात पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते.
सोयाबीन पिकावर मुळकूज, खोडकूज, व रायझेक्टानिया एरीयल ब्लाईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला. त्याची तातडीने दखल घेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत तातडीने मदत देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखिमेच्या बाबींतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा सरंक्षणाच्या 25 % रक्कम तातडीने देण्याबाबतची अधिसुचना निर्गमित करण्यात आली व तशा सुचना ओरीयंटल ईन्शूरंस कंपनीस देण्यात आल्या. मा. पालकमंत्र्यांनी सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची कारणमीमांसा तसेच भविष्यातील व उपाययोजना आखण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञाची चमू पाचारण करून वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत सुचित केले. त्या अनुषंगाने डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांनी संयुक्त सर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर केला.
जिल्हयात पावसाची सुरुवात 22 जून पासून झाली असल्याने हंगामातील पेरण्या उशिराने म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवडयात सुरु झाल्या . जून महिन्यात सरासरीच्या 47.9 टक्के , जुलै महिन्यात सरासरीच्या 153.8 टक्के, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 52 टक्के व सप्टेंबर 2023 महिन्यात सरासरीच्या 113.6 टक्के , अशाप्रकारे अनियमीत स्वरुपाचा पाऊस पडलेला आहे.
जिल्ह्यामध्ये पावसाचे २ ते ३ मोठे खंड पडल्यामुळे तसेच वातावरणातील व जमिनीतील वाढलेले तापमान व त्यानंतर आलेल्या पावसामुळे प्रामुख्याने चारकोल रॉट व रायझोक्टोनिया करपा या रोगाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले.
अश्या आकस्मिक वातावरण बदलामुळे जास्त कालावधीचे, वरील रोगांना संवेदनशील वाण जसे फुले संगम व फुले किमया हे वाण जास्त प्रमाणात बळी पडले.
तसेच काही भागात सुरवातीच्या अवस्थेत खोडमाशी व चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाचे मुख्य खोड पोखरल्या जावून जमिनीतील अन्नद्रव्याचे वहन कमी झाले व झाडे अशक्त होवून शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाने पिवळी पडली, त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला.
पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणेबाबत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तथा कृषि मंत्री श्री.धनंजय मुंडे यांना पत्राद्वारे विनंती केली होती.
त्यामूळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर पंचनामे होवून दिलासा मिळणार आहे.
एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी
एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, मायक्रोलाईट
एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी
मुंबई, दि. 11 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई हद्दीत 17 ऑक्टोबर पर्यंत बंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी दिली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी
आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना
आर्थिक मोबदला देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी
- मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई दि. ११ : कोल्हापूरमधील आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आर्थिक मोबदला मिळण्यासाठीच्या प्रक्रियेस गती द्यावी. क्षेत्रातील इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणे मोबदला देण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने, राज्य पुनर्वसन प्राधिकरणासमोर अहवाल सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबे-ओहोळ मध्यम प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रलंबित विषयासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त उपसचिव श्री. खटवाल, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा शिंगण, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शक्ती कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, प्रकल्पही पूर्ण करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला तातडीने मिळावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागल्यास ती करण्यात येईल. नैसर्गिक न्याय तत्वाचा आधार घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना तातडीने मोबदला मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...