Monday, 9 October 2023

भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठीआयुष' चा सहभाग महत्त्वाचा

 भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठीआयुष' चा सहभाग महत्त्वाचा


- केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल


राष्ट्रीय आयुष मिशनची क्षेत्रीय आढावा बैठक


            मुंबई, दि. ९ : सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी 'आयुष' क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. त्यात या क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, बंदरे, जहाज बांधणी व जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.


             राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहकार्याने केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आयुष मिशनच्या क्षेत्रीय आढावा बैठकीचे आयोजन सहारा स्टार हॉटेल येथे करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय आयुष मंत्री श्री. सोनोवाल मार्गदर्शन करीत होते.


            यावेळी केंद्रीय आयुष, महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री राजेश कोटेचा, अतिरिक्त सचिव तथा आयुष विभागाचे आर्थिक सल्लागार जयदीपकुमार मिश्रा, केंद्रीय सहसचिव कविता गर्ग, राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, या राज्यांचे आणि दादरा व नगर हवेली, दीव दमण, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचे आयुष व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयानेच आयुष मिशन पुढे जाणार असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल म्हणाले की, राष्ट्रीय आयुष्य मिशन अंतर्गत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनांना पुढाकार घ्यावा लागेल. राज्याच्या सहकार्यानेच आयुष मिशन मजबूत होईल. प्राचीन व आधुनिक उपचार पद्धतीच्या समन्वयातूनच भविष्यात येणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होणार आहे. कोविड काळात कोविडचा संसर्ग नियंत्रित करण्याकरिता आयुषमधील उपचार पद्धतींचा चांगला उपयोग झाला. जगात 'आयुष'चे महत्त्व त्या काळात अधोरेखित झाले.


            जागतिक आरोग्य संघटनेने भारतात त्यांचे विस्तार केंद्र सुरू केले आहे. भारत हा जगातील असे विस्तार केंद्र सुरू होणारा पहिला देश आहे. जगात विविध देशांमध्ये पारंपरिक उपचार पद्धती आहेत. मात्र, भारतातील पारंपरिक उपचार पद्धत जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरली आहे. आयुष क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीच्या विविध संधी आहेत. या क्षेत्रात देशात 900 पेक्षा जास्त स्टार्ट अप सुरू झाले असून अनेक उद्योगही सुरू झाले आहेत. 'एम्स' (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स)पासून ते गाव पातळीपर्यंत आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा आयुषच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.


             यापुढे 'एम्स'मध्ये आयुषला समर्पित एक विभाग कार्यरत असणार आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मानवी शरीराला विविध आजारांपासून संरक्षण देण्याचे महत्त्वाचे काम आयुष मिशन करणार आहे. आयुष मधील जनतेचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. जन सहभागातूनच आयुष मिशन यशस्वी होईल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल यांनी व्यक्त केला.


             याप्रसंगी केंद्रीय आयुष, महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. कालूभाई म्हणाले की, केंद्रीय आयुष मिशन यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा समन्वय महत्त्वाचा आहे. राज्य सरकारांच्या सहकार्याशिवाय मिशन यशस्वी होऊ शकत नाही. मिशन अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदींचा चांगला उपयोग राज्यांनी करावा. यामधून आरोग्य क्षेत्रासाठीच्या दर्जेदार पायाभूत सोयी सुविधा निर्माण कराव्यात. ही आढावा बैठक आयुष मिशनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय सहसचिव कविता गर्ग यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधील आणि दादरा व नगर हवेली, दीव दमण, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील आयुष मिशनच्या प्रगतीचा आढावा सादर केला.


            आयुष विभागाचे केंद्रीय सचिव पद्मश्री राजेश कोटेचा यांनी प्रास्ताविकात आयुष विभागाची ही चौथी आढावा बैठक असल्याचे सांगत सध्या देशात २५ हजार आयुष चिकित्सक काम करत असल्याची माहिती दिली. देशात १४७ आयुष हॉस्पिटल असून ८ कोटी ४२ लाख रुग्णांनी 'हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर'मधून लाभ घेल्याची माहितीही त्यांनी दिली.


            यावेळी भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान योगा प्रात्यक्षिके करण्यात आली. आभार प्रदर्शन केंद्रीय सहसचिव सुरेशकुमार यांनी केले.


0000

Sunday, 8 October 2023

मुंबईत आयुष मंत्रालयातर्फे ९ ऑक्टोबरला विभागीय बैठकीचे आयोजन

 मुंबईत आयुष मंत्रालयातर्फे ९ ऑक्टोबरला विभागीय बैठकीचे आयोजन

            मुंबई, दि.८ : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाची तिसरी विभागीय बैठक सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील सहारा स्टार हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत आयुष विभागाने या बैठकीचे आयोजन केले आहे.

             या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांचे तसेच दादरा नगर हवेली, दीव दमण, व अंदमान निकोबार येथील मंत्री व वरिष्ठ आयुष अधिकारी सहभागी होतील. या बैठकीत राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत सुरु असलेल्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येणार आहे.

            या बैठकीसाठी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालुभाई, राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आयुष मंत्रालय दिल्लीच्या सहसचिव कविता गर्ग, केंद्रीय आयुष विभागाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यांचे आयुष विभागाचे प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, व आरोग्य संचालकही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आयुष विभागाचा आढावा तसेच आयुष अंतर्गत सुरु असलेल्या उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार व यशोगाथा याबाबत चर्चा व सादरीकरण होणार आहे.


000


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल


                                         - मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            कोबे (जपान), दि. 8 : ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


 


            जपान येथील कोबे शहारात भारत-जपान यांच्यातील कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित ‘इंडिया मेला’ या कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जपानचे उच्चायुक्त सिविजाज, कोबेचे उपमहापौर काजुनरी उहारा, तेजसिनियमशिता, निखिलेश गौरी, राम कलानी, भावेन जवेरी, चेंबर ऑफ कॉमर्सचे जॉनी लालवाणी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. 


 


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भारत नेहमीच जपानशी मैत्रीपूर्ण संबंध जपून ठेवत आला आहे. अध्यात्मिक दृष्टिकोनातून भारत आणि जपान यांच्यात प्रेमाचे संबंध राहिले आहेत. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ अर्थात ‘जियो और जिने दो’, असा संदेश देणारे बुद्धिझम भारतातून जपानमध्ये आले आहे. हा विचार जपानच्या घराघरात आणि मनामनात पोहोचविण्याचा जपानने सातत्याने प्रयत्न केला आहे. 


 


            भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ देणारा हा देश आहे. टोकियो शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं मंदिर याची साक्ष देत आहे. संस्कृती आणि परंपरा ही जीवन जगण्याची कला आहे. संस्कृती हे मनाच्या समाधानाचे उत्तम साधन आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ देखील कोणता देश किती धनवान आहे यापेक्षा तो किती गुणवान आहे या आधावर त्या देशाच्या आनंदाची व्याख्या निश्चित करीत आहे, असेही ते म्हणाले.  


 


जपानी भाषेत भाषणाची सुरुवात


 


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भाषणाची सुरुवात जपानी भाषेत केली. जपानी बांधवांना भेटण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद झालाय, सर्वांशी संवाद साधता आला याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.


 


महाराष्ट्राचा अभिमान


 


            महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे जपानमध्ये सादरीकरण झाल्याचा राज्याचा मंत्री म्हणून मनापासून आनंद झाला आहे. महाराष्ट्राच्या कलाकारांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रम सादर केले. त्यांचे मी अभिनंदन करतो: त्यांच्या कार्यक्रमामुळे जपानच्या कोबे शहरातील कला रसिकाच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह बघून आनंद वाटतोय असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्री निधीतून आथिर्क सहाय्य

 


माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे* *🙏🏻😌🌹🙏🏻*

 *माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*

*🙏🏻😌🌹🙏🏻*


 *जीवनात* 

 *उत्तम मित्र,* 

 *योग्य रस्ता,* 

 *चांगले विचार,* 

 *उच्च ध्येय आणि* 

 *अंगी नम्रता या पाच* 

 *गोष्टी पाच बोटाप्रमाने असतात आणि सर्वच छानपैकी जुळून आल्या  तर वज्रमुठ तयार* *होते* .

 *याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन* *जाते* .

चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका.

कारण बदनामीची भिती त्या लोंकाना असते ज्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आणि हिंमत नसते.

जो निसर्ग रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो निसर्ग माणसाला कसा निराधार सोडू शकेल ?

 *माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात.* 


*🙏🏻😌🌹🙏🏻*


Saturday, 7 October 2023

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग

 दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा

ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक

: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

           

            मुंबई,दि.7 : वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी  मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन 'ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पकाळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ६ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला.

            नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली. सामान्य नागरिकांना सार्वजनिक दळणवळणाची सुविधा आरामदायी आणि गतिमान आवश्यक आहे या तळमळीतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या दिल्ली भेटीत त्यांनी ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प किती गरजेचा आहेहे सांगितले.

            या भेटीत महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

            विज्ञान भवनातील डाव्या विचारसरणीमुळे निर्माण झालेल्या उग्रवादाच्या परिस्थितीबाबतची बैठक आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लगेचच केंद्रीय शहरे विकास मंत्री श्री. पुरी यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            या भेटीत मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावीअशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढविण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

            सद्यस्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोच वाढविणे आवश्यक आहे. रिंग मेट्रोच्या प्रकल्प अहवालाला मान्यता देतानाच मेट्रो कोचची संख्या वाढवावी या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअशी ग्वाही दिली. महाराष्ट्रातील नागरी भागात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प

एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

0000

दिल्ली दौरे में मुख्यमंत्री ने ठाणे रिंग मेट्रो परियोजना का लिया फॉलोअप

ठाणेकरों के वेगवानसहज यात्रा के लिए रिंग मेट्रो परियोजना आवश्यक

: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री ने केंद्रीय शहरी विकास मंत्री से की मुलाकात

             

            मुंबईदिनांक: 07 अक्टूबर:- बढ़ते हुए शहरीकरण और उसके लिए आवश्यक इंफ्रास्ट्रक्चर (बुनियादी सुविधाओं) का निर्माण महाराष्ट्र में तेजी से चल रहा है। मुंबई के साथ-साथ ठाणे वासियों के लिए भी तेज और सहज सफर के लिए मेट्रो परियोजना पर काम चल रहा है। ठाणे के बढ़ते विस्तार को ध्यान में रखते हुए 'ठाणे रिंग मेट्रो परियोजनासमय की मांग हैंइस परियोजना को लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल 06 अक्टूबर को केंद्रीय शहरी विकास मंत्री के साथ चर्चा की।

            नई दिल्ली में केंद्रीय गृह मंत्रालय द्वारा आयोजित एक बैठक के लिए मुख्यमंत्री आए हुए थेइस दौरान मुख्यमंत्री ने महाराष्ट्र की इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स (बुनियादी सुविधाओं वाले परियोजनाओं) के लिए केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी से भी मुलाकात की।

            आम आदमी के लिए सार्वजनिक परिवहन सुविधाओं को आरामदायी और गतिमान बनाना जरुरी है। इसी के मद्देनजर  मुख्यमंत्री श्री शिंदे ने अपने दिल्ली दौरे के दौरान रिंग मेट्रो परियोजना ठाणे की जनता के लिए कितना जरूरी हैइस बारे में बताया।

            इस मुलाकात के दौरान महाराष्ट्र के शहरी क्षेत्रों में विभिन्न इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स (बुनियादी और ढांचागत परियोजनाओं) को लेकर चर्चा की गई। इस अवसर ठाणे रिंग मेट्रो परियोजना का फॉलोअप करते हुए मुख्यमंत्री ने यह भी मांग की कि मेट्रो कोचों की संख्या बढ़ाई जाए।

            विज्ञान भवन में वामपंथी विचारधारा के कारण निर्माण हुए उग्रवाद की परिस्थिति पर बैठक करने के बाद मुख्यमंत्री श्री. शिंदे ने तुरंत केंद्रीय शहरी विकास मंत्री श्री. पुरी से मुलाकात की। उनके साथ मुख्यमंत्री के प्रधान सचिव ब्रिजेश सिंहमहामेट्रो के प्रबंध निदेशक श्रावण हर्डीकर उपस्थित थे।महाराष्ट्र में चल रही विभिन्न विकास परियोजनाओं को केंद्र सरकार का सहयोग मिल रहा है। इसके परिणामस्वरुप हम इन परियोजनाओं को समय पर पूरा करने का प्रयास कर रहे हैंऐसा भी इस मुलाकात के दौरान मुख्यमंत्री ने कहा।

            इस बैठक में मुख्यमंत्री ने केंद्रीय मंत्री से ठाणे मेट्रो को लेकर विस्तार से चर्चा की। ठाणे शहर में वर्तमान में दो मेट्रो परियोजनाएं का काम चल रहा हैं। शहर का विस्तार हो रहा है और शहर-जिले की जनसंख्या भी बढ़ रही है। ठाणे के एक रेलवे स्टेशन से 7 से 8 लाख यात्रियों का आवागमन होता है। इसलिए 29 किलोमीटर लंबी ठाणे रिंग मेट्रो की विस्तृत परियोजना रिपोर्ट (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) को मंजूरी के लिए केंद्र के पास भेजा गया है। इसे मंजूरी दी जाए। ऐसी मांग करते हुए मुख्यमंत्री ने मेट्रो कोचों की संख्या बढ़ाने का भी अनुरोध किया है।

            मौजूदा की परिस्थिति और भविष्य को ध्यान में रखते हुए मेट्रो कोच बढ़ाने की जरूरत है। रिंग मेट्रो परियोजना रिपोर्ट को मंजूरी देते समय मेट्रो कोचों की संख्या बढ़ाने की मुख्यमंत्री की मांग पर केंद्रीय मंत्री ने आश्वासन दिया कि सकारात्मक निर्णय लिया जाएगा। इस मुलाकात के दौरान महाराष्ट्र के शहरी इलाकों में चल रही विभिन्न परियोजनाओं पर भी चर्चा की गई।

ऐसा है ठाणे रिंग मेट्रो परियोजना

            कुल 29 किमी लंबे इस परियोजना में 26 किमी लंबा मार्ग एलिवेटेड और 3 किमी लंबा मार्ग भूमिगत (अंडर ग्राउंड) है। इस परियोजना के तहत कुल 22 स्टेशन हैं जिनमें से दो स्टेशन भूमिगत (अंडर ग्राउंड) होंगे। इन भूमिगत (अंडर ग्राउंड) स्टेशनों में से एक को ठाणे रेलवे स्टेशन से जोड़ा जाएगा। शहर के अन्य स्टेशनों को मेट्रो कॉरिडोर से जोड़ा जाएगा

0000


 

During a visit to Delhi, the Chief Minister sought approval

for theThane Ring Metro project

"The Ring Metro project is essential for the fast and convenient commute of Thane residents," stated Chief Minister Eknath Shinde

The Chief Minister met with the Central Urban Development Minister

 

      Mumbai, Date 7: Rapid urbanization in Maharashtra necessitates the swift development of basic amenities. Alongside Mumbai, efforts are underway to provide Thane residents with a fast and convenient metro service. Considering the expanding boundaries of Thane, Chief Minister Eknath Shinde presented the need for the 'Thane Ring Metro Project' to the Central Urban Development Minister yesterday.

            While in New Delhi for a meeting organized by the Central Home Ministry, the Chief Minister met with Central Urban Development Minister Hardeep Singh Puri. Accompanying the Chief Minister were Principal Secretary Brijesh Singh and Administrative Director of Mahametro, Shravan Hardikar. "We are committed to completing various development projects in Maharashtra on time," the Chief Minister mentioned during the meeting.

            In-depth discussions about the Thane Metro took place during this meeting. Currently, two metro projects are underway in Thane city. Given the city's growth and increasing population, there's a daily footfall of 7 to 8 lakh passengers at the single railway station in Thane. Hence, the Chief Minister has submitted the detailed project report of the 29 km long Thane Ring Metro to the center, also requesting an increase in the number of metro coaches.

The Thane Ring Metro Project Details

            The project spans a total of 29 km, with 26 km being elevated and 3 km underground. The project will have 22 stations, with two of them being underground. One of the underground stations will connect to the Thane railway station. The other stations will connect to the city's metro corridors.

0000

 


मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान” च्या माध्यमातून

 मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान च्या माध्यमातून

महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार

:महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि.7: राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण आभियान'  राज्यात दि.02 ऑक्टोबर, 2023 ते दि.01 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. 'मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण आभियानबाबत याआधी महिला बालविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये बदल करुन सुधारित शासन निर्णय 6 ऑक्टोंबर रोजी निर्गमीत केला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

            देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सक्षमीकरण होणे  अत्यंत आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाद्वारे महिलांविषयी राबविण्यात येणाऱ्या योजना एका छताखालीविविध सर्व शासकीय यंत्रणा एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे आणि लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा देखील या अभियान अंतर्गत करण्यात येणार आहे.

            मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाउद्योग विभागाचे सचिवबँकेचे अधिकारीस्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीऑनलाईन बाजाराच्या संबधित तज्ञ व्यक्ती व चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी असतील. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी या समितीची बैठक महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्याचा अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात येईल. या अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी काम पाहतील. जिल्हास्तरावरील यंत्रणेचे जिल्हाधिकारी हे प्रमुख म्हणून काम पाहतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण भागाकरिताशहरी भागाकरिता सहआयुक्त ( नगरपालिका प्रशासन), महापालिका क्षेत्रासाठी महापालिकेचे आयुक्त हे काम पाहतील. दर सोमवारी या अभियानाबाबतचा सर्व तपशील मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाला पाठविण्यात येईल.

            या अभियानांतर्गत शक्ती गटाच्या आणि महिला बचत गटांच्या माहितीचे संकलन करूनराज्यातील एक कोटी महिलांना शक्ती गटाच्या व बचत गटाच्या प्रवाहात जोडण्यात येणार असून महसुली भागात किमान 20 लक्ष महिलांना या बचत गटांच्या माध्यमातून जोडता येणार आहे. जिल्ह्यात अडीच लाखप्रत्येक तालुक्यात तीस हजार आणि प्रत्येक गावात 200 या महिला बचत गटांच्या माध्यमातून जोडल्या जातील. शासनाचे विभागप्रशिक्षण संस्था आणि सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून 10 लक्ष महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्यरोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ही प्रशिक्षणे दिली जातील. सद्यस्थितीतील असलेल्या उद्योगाच्या विस्तारासाठी आणि नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या महिलांसाठी वित्तीय भांडवल उपलब्ध करून दिले जाईल.

            उद्योग वाढीसाठी प्रशिक्षित महिलांना इतर स्थानिक उद्योगासंबंधी लिंकेज करणेप्रशिक्षित सदस्यांना स्थानिक व जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कमी दरामध्ये कच्चामाल उपलब्ध होईल यासाठी समन्वय साधणे, थेट ग्राहकापर्यंत वस्तू सेवांचा पुरवठा करणारी प्रणाली विकसित करणे, महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबवणेमहिला रोजगार मेळावेविविध शासकीय व महामंडळाच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल, नवीन शक्ती गटांची व महिला बचत गटांची नोंदणी व प्रशिक्षणसामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणेविविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे,  प्रोत्साहन पर पारितोषिक वाटप करणे आदी बाबी अभियानादरम्यान करण्यात येणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी आणि माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

         या योजनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीमहाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांचे प्रशासकीय मान्यतेचे अधिकार यापूर्वी 50 लक्ष रुपयापर्यंत होते, ते 1 कोटी पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या धोरणामुळे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार महोदयांच्या स्वेच्छाधिकारात 20 लाख रुपयांचा निधी महिला विकासाच्या योजनांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2023-24 अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी जिल्ह्याच्या नियतव्ययाच्या 1 टक्का निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

       देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. संघटित करूनप्रशिक्षण देऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणेमहिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांमध्ये समन्वय साधून त्या एकाच छत्राखालीच राबविण्याकरिता हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, अशी माहितीही  मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

0000


Featured post

Lakshvedhi