Thursday, 24 August 2023

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायकसुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायक

सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

- आर. विमला


            मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना याचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले.


            खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बलुतेदार संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला बोलत होत्या.


            नव्याने सुरु होत असलेल्या 'प्रधानमंत्री विश्वकर्मा' योजनेची सविस्तर माहिती देताना श्रीमती विमला म्हणाल्या की, "खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास सात लाख कारागीर नोंदणीकृत आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.


            केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण, आणि विद्यावेतन देखील मिळणार आहे याचा लाभ कारागिरांनी घ्यावा. या योजनेत मंडळाच्या कारागिरांनी जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कारागिरांना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


            या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे. ही योजना ऑनलाईन उपलब्ध होणार असून आवश्यक ते कागदपत्रे आधारकार्ड, रेशनिंग कार्ड कारागिरांनी तयार ठेवावीत. कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे 'कारागीर' म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच या योजनेत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्व प्राप्त होईल. या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात मिळेल.


            या सभेस राज्यातील बलुतेदार कारागीर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आदी उपस्थित होते. मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी आभार मानले.


००००

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसारकरण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा

 पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसारकरण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 23 :- पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड ब्रॉडगेज हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस आमदार अतुल बेनके, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक (महारेल) राजेशकुमार जैसवाल तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग करण्याबाबत गेल्या २५ वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, विविध कारणांमुळे हा मार्ग तयार करण्याचे काम रेल्वेला शक्य झाले नाही. त्यामुळे हा मार्ग मेट्रो कायद्यानुसार ‘महारेल’च्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले.


००००

पत्रकारांवरील हल्ले निंदनीय:

 ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

पत्रकारांवरील हल्ले निंदनीय: राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 23 : पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले.


            ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे 'आचार्य अत्रे पुरस्कार' राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते, पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यंदा आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे.


            साधारण १९९५ नंतर देशात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली. गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमे देखील आली. परंतु, ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली आहेत असे सांगताना माध्यम जगातील क्रांतीनंतर देखील वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे असे राज्यपालांनी सांगितले.


            पत्रकार समाजाचे कान आणि डोळे असतात. ते लोकशाहीचे पहारेकरी व जनसामान्यांचे हितरक्षक असतात. आज माध्यमांना आपली प्रासंगिकता व निष्पक्षता टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सामान्य जनतेशी निगडित बातम्या दिल्या पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            एखाद्या व्यक्तीविषयी वृत्तपत्रामध्ये बदनामीकारक बातमी छापली तर त्या व्यक्तीला मोठा मनस्ताप होतो. अशा मनस्तापाचा आपण स्वतः अनुभव घेतला आहे असे त्यांनी सांगितले. खोट्या बातमीमुळे आंदोलने होतात, जाळपोळ व हिंसा होते. त्यामुळे पत्रकार म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  


            माध्यमांनी अनुसूचित जाती, आदिवासी, मागास वर्गीय, दिव्यांग, अल्पसंख्याक, शेतकरी व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्याने स्थान दिल्यास माध्यमांची विश्वासार्हता टिकून राहील, असे राज्यपालांनी सांगितले. 


            विजय वैद्य यांना देण्यात आलेला ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो मानवी चेहऱ्यासह पत्रकारितेच्या मोठ्या परंपरेचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विजय वैद्य यांनी पत्रकारितेला व्यापक समाजसेवेचे माध्यम बनवले. त्यांच्याकरिता पत्रकारिता अंतिम ध्येय नव्हते तर देशातील सामान्य माणसांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्याचे ते एक साधन होते, असे त्यांनी सांगितले. एक व्यक्ती आपल्या जीवनात किती मोठे काम करू शकतो याचे विजय वैद्य हे उत्तम उदाहरण आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला याचा अतिशय आनंद झाला असे विजय वैद्य यांनी सत्काराला दिलेल्या उत्तरात सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर विष्णू सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.


            यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगरपाल डॉ जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


००००

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेटमहिला सुरक्षा, शोषण यावर झाली चर्चा.

 ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेटमहिला सुरक्षा, शोषण यावर झाली चर्चा.


            मुंबई, दि. 23 : ऑस्ट्रेलियाचे उप महावाणिज्यदूत मायकेल ब्राऊन आणि मुंबईतील महावाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रमुख मॅजेल हाइंड यांच्या शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवन कार्यपद्धती याचबरोबर सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती दिली. यामध्ये जास्तीत जास्त महिला आमदार आहेत. महाराष्ट्रात स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा, त्यांचे हक्क यासाठी होत असलेल्या कामाची माहिती दिली.


            राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारित असलेल्या महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून ज्या सामाजिक संस्थांमधून महिलांविषयक कार्य केले जात आहे त्यांचे समुपदेशनसुद्धा या माध्यमातून सुरू आहे. वाणिज्यदूतांमार्फत त्या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला तर त्याचा लाभ होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


            पोलीस हेल्पलाईन सुरू केल्याने विविध अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. महिलांमध्ये आपल्या हक्काची जागृती येण्यासाठी पोलिसांसाठी ‘स्त्री-पुरुष समानता: पोलीस मार्गदर्शक’ पुस्तिका तयार केली आहे. याच्या माध्यमातून आणि ऑनलाईन बैठकातूनही पिडीत महिला, मुली यांना प्रशिक्षणाद्वारे आधार देण्याचे काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


            येत्या १३ सप्टेंबर २०२३ रोजी विधानभवनामध्ये ‘फेमीनिस्ट फॉरेन पॉलिसी’ यावर कार्यशाळा होणार असून यामध्ये जपान, मेक्सिको, नेदरलँड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा यांचे वाणिज्यदूत सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूताने सहभागी व्हावे याबद्दल मायकेल ब्राऊन आणि श्रीमती हाइंड यांना डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रण दिले.  


            पोलीस मार्गदर्शक पुस्तिका जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रसारित होण्यासाठी ऑस्ट्रेलियन महावाणिज्यदूत सहाय्य करेल, असे श्री. ब्राऊन यांनी सांगितले.


००००

चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे

 चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन


 


            मुंबई, दि. 23 : जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्व‍ितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व मोहिमांना चांद्रयान-3 मोहिमेमुळे बळ मिळाले आहे. भारत जगातील एक महत्त्वाचा देश बनला असून आगामी काळात जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चांद्रयान-3 मोहीम भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेतून चंद्राचे अनेक रहस्य उलगडले जातील. आगामी काळात भारत चंद्रावर नक्की मानव उतरवेल. भारतीय शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम पूर्ण केली आहे. भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारतीय नागरिक, शास्रज्ञ, तंत्रज्ञ या सर्वांचे मी अभिनंदन करतो. याबरोबरच मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर या शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचाही अभिमान वाटतो. या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार झालो याबद्दल जगभरातील भारतीयांचे अभिनंदन.


००००



 


वृत्त क्र. 2850


भारतीयांची मान उंचावणारा दिवस


- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा


 


 


            मुंबई, दि. २३ : भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी ‘चांद्रयान ३’ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पालकमंत्री श्री. लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील वसंतराव नाईक चौक गार्डन ताडदेव सर्कल, मलबार हिल येथे झाला.


            "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, त्यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांवर दाखवलेला दृढ विश्वास आणि या मोहिमेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वच लोकांमुळे आज १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण अनुभवताना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला असणार हे नक्की आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी म्हटले आहे.


****

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गतपदभरतीची कार्यवाही पारदर्शक पद्धतीने

 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गतपदभरतीची कार्यवाही पारदर्शक पद्धतीने


- संचालक दिगांबर दळवी


               मुंबई, दि.२३ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी कळविले आहे.


           व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याबाबत 16 फेब्रुवारी 2023 रोजी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार जास्तीत जास्त पदांकरिता अर्ज करण्याची संधी उपलब्ध व्हावी, केवळ परीक्षा शुल्कामुळे उमेदवारांची संधी वाया जाऊ नये, याकरिता पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जाहिरातीमधील पदांची ग्रुप ए, बी आणि सी मध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क न आकारता ग्रुपनिहाय परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार किती पदांकरिता अर्ज करावयाचे यांचे संपूर्ण स्वातंत्र्य उमेदवारास होते. विहित परीक्षा शुल्कासह विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीच्या अधिन राहून दि. 16 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेकरिता (CBT) परवानगी देण्यात आली होती.


              जाहिरातीमधील निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) पदांकरिता व्यावसायिक चाचणी (CBT-2) असल्याने ही पदे वगळता उर्वरित सर्व पदांची (Group-B व Group-C) तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) दिनांक 01/08/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेले आहेत, अशा उमेदवारांनी त्या-त्या गटा (Group) करिता असलेली सामायिक परीक्षा (CBT) स्वतंत्रपणे दिलेली असल्याने अशा उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार संगणकीकृत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत समावेश आहे. उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करुन निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Documents Verification) ची कार्यवाही करण्यात येणार आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. तथापि, प्रमाणपत्र तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे आढळून आल्यास चुकीची कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळून आल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.


             पडताळणीअंती वैध ठरतील, अशा उमेदवारांनाच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त पदांकरिता पात्र ठरला, तरी उमेदवार ज्या पदांकरिता पात्र ठरला आहे, त्यापैकी ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल, त्या पदाचेच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.


              प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र, कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येते. या पदभरतीच्या अनुषंगाने अद्याप उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीची (Documents Verification) कार्यवाही झालेली नसल्याने प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र,कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पदभरतीमधील प्रमाणपत्र अथवा कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अद्याप झालेली नसताना तत्पूर्वीच काही उमेदवाराची नांवे गुणवत्ता यादीतून कमी करण्याबाबतची माहिती चुकीची आहे. तरी पदभरतीसंदर्भात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध न करण्याचे तसेच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात येत आहे.


*****

प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरभारत निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’

 प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरभारत निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन

 

            नवी दिल्ली23 : मतदारांना जागृत करणेनिवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी  भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे.

            येथील आकाशवाणी रंगभवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने  आयोजित कार्यक्रमात पुढील 3 वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारनिवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

            देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी श्री. तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक लाभ होण्याच्या दिशेने त्यांचे ईसीआयचे नॅशनल आयकॉन’ होणे अधिक महत्वाचे ठरेल.

            श्री. तेंडुलकर म्हणाले कीभारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरुणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देतानाइंडिया..इंडिया असा जयघोष करणारी टिम इंडिया’ समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल. त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर  गर्दी जमते. त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवू या, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण मतदार निवडणुकीत सहभागी होणारतेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल.

            मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार याप्रसंगी म्हणाले कीसचिन तेंडुलकर भारताचेच नव्हे, तर जागतिक स्तरावरील आदणीय खेळाडू व्यक्त‍िमत्व आहे. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय आणि उल्लेखनीय राहिलेली आहे. यामुळेच ईसीआयने मतदारांची संख्या वाढविण्यासाठी ते एक आदर्श पर्याय ठरतील. या तीन वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वरील टॉक शोकार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांद्वारे श्री. तेंडुलकर मतदारांमध्ये मतदानाविषयी प्रचार-प्रसार करतील. यामाध्यमातून मतदानाचे महत्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते किती महत्वाचे आहे हे मतदारांना पटवून सांगतील. 

            कार्यक्रमामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यामध्ये मतदानाचे महत्व या विषयावर नाटक सादर केले. 

            यापूर्वी भारतीय निवडणुक आयोगाने विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते आमीर खानपंकज त्रिपाठीखेळाडू मेरी कोम, एम.एस. धोनी यांना नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले गेले आहेत.

Featured post

Lakshvedhi