Thursday, 17 August 2023

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे कामवेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे

 राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे कामवेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 17 : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे 12 लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातील नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी आज मंत्री श्री. पाटील यांनी केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, उपसचिव प्रताप लुबाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बनगोसावी, ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड, सहायक संचालक डॉ.विजयकुमार जगताप, ग्रंथपाल संजय बनसोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे प्रलंबित बांधकाम पूर्णत्वास आले असून काही किरकोळ कामे राहिलेली आहेत. ती कालबद्ध पद्धतीने नियोजन करून तातडीने पूर्ण करावीत आणि राज्यातील नागरिक व जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय लवकर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.


0000

भवताल’...

 भवताल’...


सुरुवातीला दिवाळी अंकासाठी हे नाव दिलं गेलं. त्यानंतर मासिकासाठी आणि पुढं एकूणच निसर्ग-पर्यावरणाविषयक मंचासाठी दिलेलं हे नाव. हे नाव ऐकताच अनेकांची प्रतिक्रिया असते की, या विषयासाठी इतकं समर्पक नाव दुसरं असूच शकत नाही! अगदी खरंय ते.


पण हे नाव कुठून आणि कसं आलं? हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. त्याचीच ही गोष्ट.


या नावाची सुरुवात होते- ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्रापासून. मी १९९६ सालापासून ‘लोकसत्ता’ शी संबंधित होतो. त्या वर्षी अगदी अपघाताने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, पत्रकारितेच्या वर्गाला प्रवेश घेतला. लगेचच काही महिन्यांनी, गणपतीच्या काळात विद्यार्थी म्हणून ‘लोकसत्ता’ मध्ये प्रवेश केला. पुढे २०१५ पर्यंत तिथेच होतो. त्या वर्षी दिवाळीत ‘भवताल’ या नावाने नियतकालिक सुरू केले. त्याच्या थोडासा आधी ‘लोकसत्ता’ तून बाहेर पडलो. तब्बल १९ वर्षांचा हा काळ, विद्यार्थी ते वरिष्ठ सहसंपादक अशी प्रगती होत गेली.


या काळात बरंच काही केलं. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान, पर्यावरण या विषयांसाठी दिलेलं योगदान. हवामान, भूविज्ञान, पाणी या विषयांवर केलेले स्तंभलेखन. लहरी हवा, दगडांच्या देशा, पाणी ते पाणी... या स्तंभामधील लेखांची आठवण अजूनही काही वाचक करून देतात. महाराष्ट्रातील नद्यांच्या पात्रात फिरून त्यांची सद्यस्थिती मांडणारी, ‘मरणासन्न नद्या’ ही दीर्घ वृत्तमालिका लिहली. तिचंही तेच. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मराठी पत्रकारितेत पूर्वी काठावर असलेले हे विषय केंद्रस्थानी येण्यास मदत झालीच. शिवाय व्यक्तिश: मला पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जरनॅलिझम’ याच्यासह इतर पुरस्कारही मिळाले. पाच पुस्तके झाली. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘लोकसत्ता’ मध्ये सलग पाच-सहा वर्षे चालवलेले पर्यावरणासाठीचे पान. त्या वेळी म्हणजे २००५ – ०६ च्या सुमारास पर्यावरणासाठी असे साप्ताहिक / पाक्षिक पान चालवणे ही कल्पना नवी होती.


या पानाच्या निमित्ताने ‘भवताल’ चा जन्म झाला. त्या वेळी श्री. कुमार केतकर हे ‘लोकसत्ता’ चे संपादक होते. त्यांनी दिलेली संधी आणि प्रोत्साहन यामुळे हे विषय हाताळू शकलो. या पर्यावरणाच्या पानाची संकल्पना मांडल्यावर, त्याचे नाव काय असावे, यावर बरीच चर्चा झाली. याबाबत मुंबईत त्या वेळच्या संपादकीय विभागातील वरिष्ठांची चर्चा झाली. अनेक शब्द सुचवण्यात आले. तत्कालीन सहसंपादक रेखा देशपांडे यांनी नाव सुचवले, ‘ताल – भवताल.’ त्यावरील चर्चेत ‘ताल’ शब्द मागे पडला आणि ‘भवताल’ या नावाने पान सुरू झाले. या पानाशी माझी ओळख निर्माण झाली. पुढे २०११-१२ च्या सुमारास हे पान बंद झाले, तरी ती अभिजित घोरपडे या नावाशी भवताल ची असलेली ओळख टिकून होती.


पुढच्या काळात म्हणजे २०१५ या वर्षात मी ‘लोकसत्ता’ तून बाहेर पडलो. आपण ज्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात लिहीत आलो आहोत, ज्यावर काम करत आलो आहोत, त्या विषयांसाठी म्हणून स्वतंत्रपणे काहीतरी सुरू करावे, असे कितीतरी वर्षे आधी मनात घोळत होते. त्यातून या विषयांना वाहिलेले मासिक किंवा नियतकालिक सुरू करावे, त्याचा आगळा-वेगळा दिवाळी अंक असावा असा विचार पुढे आला. त्याला स्वाभाविकपणे ‘भवताल’ हे नाव दिले. असा या नावाचा जन्म. पुढे ‘भवताल’ ची व्याप्ती वाढत गेली. त्याच्या अंतर्गत मासिकाच्या पलीकडे अनेक उपक्रम सुरू झाले. पुढेही अनेक गोष्टी येतील. त्याची सुरुवात मात्र दिवाळी अंक आणि नियतकालिकापासून झाली.


- अभिजित घोरपडे


संस्थापक - संपादक, भवताल


 


(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)


( क्रमश: )


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)


9545350862 / bhavatal@gmail.com

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद

 मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद

            मुंबई दि. १६ - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर 'शासन आपल्या दारी', जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील.

केव्हा आणि कुठे होईल संवाद

            गुरूवार दि १७ ऑगस्ट २०२३ रोजी महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये ऑफीस बिल्डींग, १०, शेख हाफिझुद्दिन मार्ग, भायखळा, मुंबई- ४००००८ येथे दुपारी ४ ते ७ यादरम्यान पालकमंत्री श्री.केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे सदर जनतेशी सुसंवाद कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.


            या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.


 

Wednesday, 16 August 2023

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक 21 अभंगांच्या 'अभंग एकविशी' पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

 जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक 21 अभंगांच्या

'अभंग एकविशीपुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

 

'अभंग एकविशीपुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलनसर्वधर्मसमभावाचेसत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचतील उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

            मुंबईदि. 16 : जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून 21 अभंग निवडून ते 'अभंग एकविशीपुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. 'गाथा परिवारआणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित 'अभंग एकविशी-तुकोबारायांचीपुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला.

            'गाथा परिवारआणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी निवासस्थानी झाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळसहकारमंत्री दिलीप वळसे-पाटीलक्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळखासदार सुनील तटकरेराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरआमदार अमोल मिटकरीविक्रम काळेसतीश चव्हाणनितीन पवार, किरण लहामटेगाथा परिवाराचे अविनाश महाराज काकडेअशोक महाराज काळेतुलसीदास खिरोडकरराजु चिमणकरनंदकिशोर चिपडेअनंत गावंडे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीजगतगुरु संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. त्यांनी चारशे वर्षांपूर्वी रचलेले अभंग आजच्या आधुनिक युगातही तितकेच समर्पकव्यवहार्यमार्गदर्शक आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग मानवी जीवनावरील महाभाष्य आहेत. या महाभाष्यातील 21 अभंग निवडण्याचे आणि 'अभंग एकविशीपुस्तिकारुपाने प्रसिद्ध करण्याचे कठीण काम आमदार श्री. मिटकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

            'अभंग एकविशी- तुकोबारायांचीपुस्तिका प्रकाशनाच्या उपक्रम प्रत्यक्षात आणल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'गाथा परिवारतसेच आमदार अमोल मिटकरी व सहकाऱ्यांच्या अभिनंदन केले. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या प्रचार-प्रसारासाठी  'गाथा परिवार', आमदार श्री. मिटकरी आणि आपल्यापैकी अनेक जण करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.

            'अभंग एकविशीपुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलनसर्वधर्मसमभावाचेसत्यशोधक विचारशेतकरीकष्टकरीसैनिक वर्गाला दिलेला संदेशमानवी मूल्ये रुजवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न या साऱ्या गोष्टीशालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतसमाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचतीलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

०००

 

 

वृत्त क्र. 275

स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन

 स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन


            मुंबई दि.16 : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी भारतीय वन सेवेतील अधिकारी व चित्रकार प्रदीप वाहुळे यांच्या 'स्पिरिट ऑफ इंडिया' या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले होते.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर या प्रदर्शनाला भेट दिली व चित्रकार श्री. वाहुळे यांचे कौतुक केले.


            'स्पिरिट ऑफ इंडिया' या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत आहे. मंत्रालयातील आयोजनानंतर हे प्रदर्शन आता वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे दि. 21 ऑगस्टपर्यंत सकाळी 11.00 ते सायं. 7.00 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

थळ ग्रामपंचायत अलिबाग रायगड,15ऑगस्ट सोहळा

 



ग्रामपंचायत चभारखिंड, महाड,रायगड15ऑगस्ट swantra दिंन सोहळा








 

Featured post

Lakshvedhi